श्री नृसिंहवाडी पालखी पद
॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
दत्तात्रेय हा स्मरां सुखे हो चतुराक्षरी मंत्र l परब्रह्म हा विष्णु दिगंबर अनसूया पुत्र ॥धृ.॥
दश नादाहूनि परता अक्षय परमामृतकंद l दयाळ व्यापक हा योगीं ध्यातीं मुनिवृंद l
दचके ज्याचे नाम ऐकता महाकाळ लौंद l दर्शन होता क्षणमात्रेची जीव परमानंद ॥१॥
तारक आहे भक्त जनांसी ज्ञानाचा दाता l तात मात हा विश्वप्रजेचा दुष्टांचा हंता l
तामस राजस सत्त्व गुणांचा भेदभाव हर्ता l तापत्रय हो सज्ज निमाले ही ज्याची सत्ता ॥२॥
त्रैमूर्तिचे मूळ अनादी परम फार सूत्र l त्रैयात्मक निजसरस्वतीचे केले सर्वत्र l
त्रय नादाहूनि बिन्दुक लावुनि निर्मल निजतंत्र l त्रैलोक्याचा पालनकर्ता स्मरतां अणुमात्र ॥३॥
यत्नानेको भेद जयाची बोलूची नयें l यम नियमाचे अष्टांगादि नेणति अभिप्राये l
यत्र यत्र सो नेती नेती म्हणता अनुमाये l यदा तदा तो सन्मुख जेथे नाथ कृपा होये ॥४॥
दत्तात्रेय हा स्मरां सुखे हो चतुराक्षरी मंत्र l परब्रह्म हा विष्णु दिगंबर अनसूया पुत्र ॥
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
No comments:
Post a Comment