Nov 28, 2017

आरती श्रीगुरुचरित्राची


॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥


मूर्तित्रयगुणसारं निर्गुणविस्तारं ।षड्गुणपारावारं दुर्जनसंहारं ।

भक्तिप्रियदातारं कल्पितपरिपारं ।मुनिजनमानसहारं निगमागमसारं ॥ १ ॥ 

जय देव जय देव वंदे गुरुचरितं । कृपया मानसदुरितं मामुद्धर त्वरितं ।

जय देव जय देव ॥ धृ. ॥


श्रीपाद श्रीवल्लभ यतिवर कृतकृत्यं ।नरहरि भारति लीला ब्रह्मादिस्तुत्यं ।

कलिमलदाहक मंगलदायक फलनित्यं ।पारायण देहि मे पुस्तकमपि चित्यं ॥ २ ॥ 

जय देव जय देव वंदे गुरुचरितं । कृपया मानसदुरितं मामुद्धर त्वरितं ।

जय देव जय देव ॥ धृ. ॥


त्वद्रतलीलासारं श्रृतिसकलाकारं ।कांडत्रयविस्तारं प्रत्ययलघुकारं ।

कल्पद्रुमफलभारं कल्पित्तदातारं ।पठणामृतरसधारं भवभयपरिहारं ॥ ३ ॥

जय देव जय देव वंदे गुरुचरितं । कृपया मानसदुरितं मामुद्धर त्वरितं ।

जय देव जय देव ॥ धृ. ॥


अगाध श्रीगुरुकरुणं भूइच्छातरणं ।ज्ञानामृतरसभरणं जडजीवोद्धारणं ।

भक्त्या कृतमपि स्मरणं तापत्रयहरणं ।नियमाराधित महिमा मोक्षश्रीवर्णं ॥ ४ ॥

जय देव जय देव वंदे गुरुचरितं । कृपया मानसदुरितं मामुद्धर त्वरितं ।

जय देव जय देव ॥ धृ. ॥


श्रीगुरुकरुणाकृत्यं सिद्धेश्र्वरगीतं ।शारदगंगाधरसुतमथितं नवनीतं ।

भाविकभक्तप्रियकर कृतलोककदतं ।तद्रेतशेषं वांछित सखा हरिहरचित्तं ॥ ५ ॥

जय देव जय देव वंदे गुरुचरितं । कृपया मानसदुरितं मामुद्धर त्वरितं ।

जय देव जय देव ॥ धृ. ॥


श्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजरचित गुरुस्तुती


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥


जो सत्य आहे परिपूर्ण आत्मा । जो नित्य राहे उदितप्रभात्मा । ज्ञानें जयाच्या नर हो कृतार्थ । तो पूर्ण आनंद गुरु समर्थ ॥१॥ अखंड आत्मा अविनाशी दत्त । तया पदीं लाविती जे स्वचित्त । वित्तभ्रमा सोडिती ते कृतार्थ । तो पूर्ण आनंद गुरु समर्थ ॥२॥ जो जागृतीस्वप्नसुषुप्तिसाक्षी । जो निर्विकारें सकलां निरीक्षी ।  वीक्षी परी ज्यासि नसे निजार्थ । तो पूर्ण आनंद गुरु समर्थ ॥३॥ जळीं स्थळीं सर्वही वस्तुमाजीं । व्यापुनी राहेचि तयासी राजी । जो ठेवि भावें नर हो कृतार्थ । तो पूर्ण आनंद गुरु समर्थ ॥४॥ जें दृश्य ते रूप नसे जयाचे । दृश्यांत राहे अविकारी ज्याचें । स्वरूप तोची अविनाशी अर्थ । तो पूर्ण आनंद गुरु समर्थ ॥५॥ दृष्यासी घेतां न च घेववे जें । स्वरूप तत्स्थ प्रभुचें स्वतेजें । स्वयें प्रकाशे जगीं जो परार्थ । तो पूर्ण आनंद गुरु समर्थ ॥६॥ असोनी सर्वत्र गुरुप्रसादा- । विना न लागे करतांही खेदा । भेदाचि वार्ता करी जो अपार्थ । तो पूर्ण आनंद गुरु समर्थ ॥७॥ अनन्यभावें भजतां अनन्य । लभ्य प्रभू जो नच होयि अन्य । संन्यस्तसर्वेषणतारणार्थ । तो पूर्ण आनंद गुरु समर्थ ॥८॥ मागे तुकाराम तयासि दत्त । दे वासुदेवा करुनी निमित्त । हें स्तोत्र चिन्मात्रपदा समर्थ । द्याया हराया सकलाध्यनर्थ ॥९॥ गाणगापुरी अठराशे सत्तावीस शकामधीं । उदेलें स्तोत्र हें अधिव्याधि हारी हरी कुधी॥१०॥ ॥ इति श्री.प. प. श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचिता गुरुस्तुति: ॥