Sep 21, 2022
प. पू. श्री. भाऊ महाराज निटूरकरविरचित श्रीपाद श्रीवल्लभ बावनी - २
श्रीपाद श्रीवल्लभ बावनी - १
Apr 2, 2021
श्री अक्कलकोट स्वामी समर्थ - बावनी
॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥
नमस्कार गणेशाला शारदे हंसवाहिनी । अक्कलकोटचे स्वामी श्री समर्थांस वंदन ॥१॥ कर्दळीच्या वनांतून स्वामीश्री प्रगट जाहले । नृसिंह सरस्वती हे श्री समर्थांस वंदन ॥२॥ हिमालयीं असतांना चीनी जोडप्यास त्या । दाखविला चमत्कार श्री समर्थांस वंदन ॥३॥ हिमालयीं समर्थांनी मृग शिशूस रक्षिलें । मृगमृगीला बोध केला श्री समर्थांस वंदन ॥४॥ जन्मांध एक वृद्धास स्वामींनी दृष्टी देऊनी । जनांस दाविली लीला श्री समर्थांस वंदन ॥५॥ पंडित व्याघ्र योनींत जन्मला पाहुनी तया । उद्धरिले दर्शनाने श्री समर्थांस वंदन ॥६॥ मठ राजुरी गांवांत स्वामींनी एक स्थापिला । वास केला दहा वर्षें श्री समर्थांस वंदन ॥७॥ अक्कलकोट महाराज मालोजीराव भोसले । स्वामीभक्त महाथोर श्री समर्थांस वंदन ॥८॥ अक्कलकोट राजांचे बंधु पिरोजी भोसले । मूर्तीतूनि दिले दर्शन श्री समर्थांस वंदन ॥९॥ चंद्रभागें पुरांतून गेले चालत सद्गुरु । अगाध दाविली लीला श्री समर्थांस वंदन ॥१०॥ लीला माणिक प्रभूंची ती सर्व भक्तां निवेदिली । कार्य त्यांचे चालविलें श्री समर्थांस वंदन ॥११॥ बसाप्पा भक्त तेल्यास, तंतुकारासही तसें । उद्धरिले सद्गुरूंनी श्री समर्थांस वंदन ॥१२॥ मृत पुत्र ब्राह्मणाचा, जाधव आणिक रावण्या । प्राणदान दिले त्यांना श्री समर्थांस वंदन ॥१३॥ रोग्यास औषधें देती करती रोग निवारण । पावती जन आश्चर्य श्री समर्थांस वंदन ॥१४॥ वांझ बावन्न वर्षांची दिधली पुत्र संतती । लीला अगाध ही केली श्री समर्थांस वंदन ॥१५॥ स्वामी पिशाच्च वृत्तीने राहती ते मठामध्यें । विटाळादि न मानीती श्री समर्थांस वंदन ॥१६॥ देह कोठेंहि तो राहो असो चित्त जनार्दनीं । करिती जप झोपेंत श्री समर्थांस वंदन ॥१७॥ केशर कस्तुरी भाळीं गळां रुद्राक्ष शोभती । आजानुबाहू दिव्य कांति श्री समर्थांस वंदन ॥१८॥ लागे न थांग जन्माचा असावें वय काय तें ? । बोलती चारशें वर्षें श्री समर्थांस वंदन ॥१९॥ गरिबापासूनी थोर मानी सर्वांस सारखें । राजा रंक जया एक श्री समर्थांस वंदन ॥२०॥ यवनासहि उद्धरिले जातपात न भेद हा । समदृष्टी जगीं ऐशी श्री समर्थांस वंदन ॥२१॥ ठाकूरदास मुंबईचे त्याजला कुष्ठ जाहलें । स्वामीकृपें बरें जाहले श्री समर्थांस वंदन ॥२२॥ कोळीभक्त लक्ष्मणास बुडत्या होडीत रक्षिलें । संसार सोडिला त्यानें श्री समर्थांस वंदन ॥२३॥ बीडकर किमयागार जेव्हां स्वामींस भेटले । किमया सोडिली त्यानें श्री समर्थांस वंदन ॥२४॥ कढीचा सांडला हंडा यज्ञदत्त निवर्तला । जीवदान दिले त्याला श्री समर्थांस वंदन ॥२५॥ राधा वेश्या गणिकेचा केला उद्धार तो स्वयें । ज्ञानबोध तिला केला श्री समर्थांस वंदन ॥२६॥ यवन सैयद मौलवा अल्ला प्रत्यक्ष दाविला । तोच त्यांचा भक्त झाला श्री समर्थांस वंदन ॥२७॥ मुक्या ऐशा एक भक्ता केलें स्वामींनी बोलके । गुरुमंत्र उच्चारीला श्री समर्थांस वंदन ॥२८॥ बडोद्याच्या महाराणी जमनाबाईस दर्शन । दिले स्वामी सद्गुरूंनी श्री समर्थांस वंदन ॥२९॥ समर्थांची करी सेवा यमाची हार होतसे । अक्कलकोटीं करी लीला श्री समर्थांस वंदन ॥३०॥ एकेक घरास जाऊनि दिले भक्तांस दर्शन । रूपें अनंत घेऊनि श्री समर्थांस वंदन ॥३१॥ इंदोरचे महाराज तुकोजी होळकरावरीं । केली श्रींनी कृपादृष्टी श्री समर्थांस वंदन ॥३२॥ मस्त हत्ती गजेंद्रास लीलेनें शरण आणिलें । नेत्रीं त्याचे अश्रु आले श्री समर्थांस वंदन ॥३३॥ स्वामी समर्थ बडोद्याच्या प्रगटुनी सुरसागरीं । वामनबुवा वाचविले श्री समर्थांस वंदन ॥३४॥ मुंबईकरांस स्वामींनी दिगंबर रूप दाविले । झाले अदृश्य तात्काळ श्री समर्थांस वंदन ॥३५॥ मल्हारराव गायकवाडे नवरोजीस धाडिले । आणण्यासी बडोद्यास श्री समर्थांस वंदन ॥३६॥ व्हेरामजी पारशास ' अहुमंजद ' रूपामध्ये । दिले दर्शन प्रत्यक्ष श्री समर्थांस वंदन ॥३७॥ अक्कलकोट महालांत केला सजीव उंदीर । आश्चर्य पावले सर्व श्री समर्थांस वंदन ॥३८॥ गुरुभक्ती सर्व श्रेष्ठ मूर्तिपूजेहूनी असे । बोधिती सद्गुरु स्वामी श्री समर्थांस वंदन ॥३९॥ नित्य धर्मास पाळूनी करा कर्तव्य आपुलें । सदा आळस सोडावा श्री समर्थांस वंदन ॥४०॥ आहारांत विहारांत असावें नेमपूर्वक । पाळावा बोध स्वामींचा श्री समर्थांस वंदन ॥४१॥ सद्गुरुच्याविना शिष्य क्षणही राहुं ना शके । सप्रमाण सिद्ध केले श्री समर्थांस वंदन ॥४२॥ दत्त श्रीपाद नृसिंह साई माणिक हे प्रभू । वासुदेवानंद रंग श्री समर्थांस वंदन ॥४३॥ श्री बाळाप्पा प्रस्थापित मठाधीश गजानन । स्वामीभक्त स्वामीसुत श्री समर्थांस वंदन ॥४४॥ दत्तजयंती उत्सव सद्गुरूंची प्रतिपदा । अक्कलकोटीं उत्सव श्री समर्थांस वंदन ॥४५॥ कृपा करो महाराज सद्गुरु धांव संकटी । निवारी यातना दैन्य श्री समर्थांस वंदन ॥४६॥ विस्तीर्णशा वडाखालीं स्वामी निजधाम पावले । भक्तहृदयीं स्थित झाले श्री समर्थांस वंदन ॥४७॥ शके अठराशें चैत्रांत कृष्णपक्ष त्रयोदशी । निर्वाण चतुर्थ प्रहरांत श्री समर्थांस वंदन ॥४८॥ एकवीस वर्षें संपूर्ण अक्कलकोटांत राहिले । अक्कलकोटचे भाग्य ! श्री समर्थांस वंदन ॥४९॥ समाधिस्त जरी स्वामी देती भक्तास दर्शन । रक्षिती ' माऊली ' जैशी श्री समर्थांस वंदन ॥५०॥ समर्थ-बावनी हीच नेमानें वाचितां । कामना पूर्ण होतील श्री समर्थांस वंदन ॥५१॥ कथा बावन श्लोकांत भक्तांसाठीच गुंफिली । ' श्रीधराचे ' भक्तिभावें श्री समर्थांस वंदन ॥५२॥ ॥ ॐ तत्सत श्री स्वामी समर्थार्पणमस्तु ॥ रचनाकार - श्री. श्रीधर गजानन गडकरी, बडोदें अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ पूजा अंक
Apr 6, 2019
श्री अक्कलकोट स्वामी समर्थ बावनी
II श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ II
Dec 7, 2018
श्री गजानन महाराज बावन्नी
॥ श्री गणेशाय नमः ॥
जय जय सद्गुरू गजानना । रक्षक तुची भक्तजना ॥१॥
निर्गुण तू परमात्मा तू । सगुण रूपात गजानन तू ॥२॥
सदेह तू परि विदेह तू । देह असूनि देहातीत तू ॥३॥
माघ वद्य सप्तमी दिनी । शेगांवात प्रगटोनी ॥४॥
उष्ट्या पत्रावळी निमित्त । विदेहत्व तव हो प्रगट ॥५॥
बंकटलालावरी तुझी । कृपा जाहली ती साची ॥६॥
गोसाव्याच्या नवसासाठी । गांजा घेसी लावुनी ओठी ॥७॥
तव पदतीर्थें वाचविला । जानराव तो भक्त भला ॥८॥
जानकीरामा चिंचवणे । नासवुनी स्वरूपी आणणे ॥९॥
मुकिन चंदुचे कानवले । खाऊनि कृतार्थ त्या केले ॥१०॥
विहिरीमाजी जलविहिना । केले देवा जलभरणा ॥११॥
मधमाश्यांचे डंख तुवा । सहन सुखे केले देवा ॥१२॥
त्यांचे काटे योगबले । काढुनि सहजी दाखविले ॥१३॥
कुस्ती हरिशी खेळोनी । शक्ती दर्शन घडवोनी ॥१४॥
वेद म्हणुनी दाखविला । चकित द्रविड ब्राह्मण झाला ॥१५॥
जळत्या पर्यकावरती । ब्रह्मगिरीला ये प्रचिती ॥१६॥
टाकळीकर हरिदासाचा । अश्व शांत केला साचा ॥१७॥
बाळकृष्ण बाळापूरचा । समर्थ भक्तचि जो होता ॥१८॥
रामदासरूपे त्याला । दर्शन देवुनि तोषविला ॥१९॥
सुकलालाची गोमाता । द्वाड बहू होती ताता ॥२०॥
कृपा तुझी होतांच क्षणी । शांत जाहली ती जननी ॥२१॥
घुडे लक्ष्मण शेगांवी । येता व्याधी तूं निरवी ॥२२॥
दांभिकता परि ती त्याची । तू न चालवूनि घे साची ॥२३॥
भास्कर पाटील तव भक्त । उद्धरिलासी तू त्वरीत ॥२४॥
आज्ञा तव शिरसा वंद्य । काकहि मानति तुज वंद्य ॥२५॥
विहिरीमाजी रक्षियला । देवां तु गणु जव-याला ॥२६॥
पितांबराकरवी लीला । वठला आंबा पल्लविला ॥२७॥
सुबुद्धी देशी जोश्याला । माफ करी तो दंडाला ॥२८॥
सवडड येथील गंगाभारती । थुंकुनी वारिली रक्तपिती ॥२९॥
पुंडलिकांचे गंडांतर । निष्ठा जाणुनि केले दूर ॥३०॥
ओंकारेश्वरी फुटली नौका । तारी नर्मदा क्षणात एका ॥३१॥
माधवनाथा समवेत । केले भोजन उच्छिष्ट ॥३२॥
लोकमान्य त्या टिळकांना । प्रसाद तूंची पाठविला ॥३३॥
कवर सुताची कांदा भाकर । भक्षिलीस त्वा प्रेमाखातर ॥३४॥
नग्न बैसुनी गाडीत । लीला दाविली विपरीत ॥३५॥
बायजें चित्ती तव भक्ती । पुंडलिकावर विरक्त प्रीती ॥३६॥
बापुना मनी विठ्ठल भक्ती । स्वये होशि तू विठ्ठल मूर्ती ॥३७॥
कवठ्याच्या त्या वारक-याला । मरीपासूनी वाचविला ॥३८॥
वासुदेव यति तुज भेटे । प्रेमाची ती खुण पटे ॥३९॥
उद्धट झाला हवालदार । भस्मिभूत झाले घरदार ॥४०॥
देहांताच्या नंतरही । कितीजणा अनुभव येई ॥४१॥
पडत्या मजुरा झेलियले । बघती जन आश्चर्य भले ॥४२॥
अंगावरती खांब पडे । स्त्री वाचे आश्चर्य घडे ॥४३॥
गजाननाच्या अद्भुत लीला । अनुभव येती आज मितीला ॥४४॥
शरण जाऊनी गजानना । दु:ख तयाते करी कथना ॥४५॥
कृपा करी तो भक्तांसी । धावुनी येतों वेगेसी ॥४६॥
गजाननाची बावन्नी । नित्य असावी ध्यानीमनी ॥४७॥
बावन्न गुरूवारी नेमे । करा पाठ बहू भक्तीने ॥४८॥
विघ्ने सारी पळती दूर । सर्वसुखाचा येई पुर ॥४९॥
चिंता साऱ्या दूर करी । संकटातूनी पार करी ॥५०॥
सदाचार रत सद्भक्ता । फळ लाभे बघता बघता ॥५१॥
सुरेश बोले जय बोला । गजाननाची जय बोला ॥५२॥
सु. ग. शेवडे
(हे स्तोत्र प्रत्येक गजानन भक्ताने म्हणावे.)
श्री साई बावनी
जय ईश्वर जय साईं दयाल, तू ही जगत का पालनहार ।
दत्त दिगंबर प्रभु अवतार, तेरे बस में सब संसार ।
ब्रह्माच्युत शंकर अवतार, शरणागत का प्राणाधार ।
दर्शन दे दो प्रभु मेरे, मिटा दो चौरासी फेरे ।
कफनी तेरी एक साया, झोली काँधे लटकाया ।
नीम तले तुम प्रकट हुए, फ़कीर बन के तुम आये ।
कलयुग में अवतार लिया, पतित पावन तुमने किया ।
शिर्डी गाँव में वास किया, लोगों का मन लुभा लिया ।
चिलम थी शोभा हाथों की, बंसी जैसी मोहन की ।
दया भरी थी आँखों में, अमृत धारा बातों में ।
धन्य द्वारका वह माई, समा गए जहाँ साईं ।
जल जाता है पाप वहां, बाबा की है धुनी जहाँ ।
भुला भटका मैं अनजान, दो मुझको अपना वरदान ।
करुणा सिन्धु प्रभु मेरे, लाखों बैठे दर पे तेरे ।
अग्निहोत्री शास्त्री को चमत्कार तुमने दिखलाया ।
जीवन दान शामा पाया, जहर सांप का उतराया ।
प्रलय काल को रोक लिया, भक्तों को भयमुक्त किया ।
महामारी को बेनाम किया, शिर्डीपुरी को बचा लिया ।
प्रणाम तुमको मेरे ईश, चरणों में तेरे मेरा शीश ।
मन की आस पूरी करो, भवसागर से पार करो ।
भक्त भीमाजी था बीमार, कर बैठा था सौ उपचार ।
धन्य साईं की पवित्र उदी, मिटा गयी उसकी क्षय व्याधि ।
दिखलाया तुने विट्ठल रूप, काकाजी जो को स्वयं स्वरुप ।
दामू को संतान दिया, मन उसका संतुष्ट किया ।
कृपानिधि अब कृपा करो, दीन दयालू दया करो ।
तन मन धन अर्पण तुमको, दे दो सदगति प्रभु मुझको ।
मेघा तुमको न जाना था, मुस्लिम तुमको माना था ।
स्वयं तुम बनके शिवशंकर, बना दिया उसका किंकर ।
रोशनाई की चिरागों से, तेल के बदले पानी से ।
जिसने देखा आँखों हाल, हाल हुआ उसका बेहाल ।
चाँद भाई था उलझन में, घोड़े के कारण मन में ।
साईं ने की ऐसी कृपा, घोडा वो फिर से पा सका ।
श्रद्धा सबुरी मन में रखो, साईं साईं का नाम रटो ।
पूरी होगी मन की आस, कर लो साईं का नित्य ध्यान ।
जान के खतरा तात्या का, दान दिया अपनी आयु का ।
ऋण बायजाका चूका दिया, तुमने साईं कमाल किया ।
पशुपक्षी पर तेरी लगन, प्यार में तुम थे उनके मगन ।
सब पर तेरी रहम नज़र, लेते सब की खुद ही खबर ।
शरण में तेरे जो आया, तुमने उसको अपनाया ।
दिए है तुमने ग्यारह वचन, भक्तों के प्रति ले कर आन ।
कण-कण में तुमहो भगवान, तेरी लीला शक्ति महान ।
कैसे करू तेरे गुणगान, बुद्धि हीन मैं हूँ नादान ।
दीन दयालु तुम हो दाता, हम सब के तुम हो त्राता ।
कृपा करो अब साईं मेरे, चरणों में ले लो अब तुम्हारें ।
सुबह शाम साईं का ध्यान, साईं लीला के गुणगान ।
दीन भक्ति से जो गायेगा, परम पद को वह पायेगा ।
हर दिन सुबह और शाम को, गाये साईं बावनी को ।
साईं देंगे उसका साथ, लेकर अपने हाथों में हाथ ।
अनुभव तृप्ति के यह बोल, शब्द बड़े हैं यह अनमोल ।
यकीन जिसने मान लिया, जीवन उसने सफल किया ।
साईं शक्ति विराट स्वरुप, मन मोहक साईं का रूप ।
गौर से देखो तुम भाई, बोलो जय सदगुरु साईं ॥
॥ ॐ श्री साईनाथाय नमः ॥
Jul 13, 2016
॥ श्री दत्त बावनीं ॥
जय योगीश्वर दत्त दयाळ | तुज एक जगमां प्रतिपाळ ||१||
हे योगीश्वर दयाळु दत्तप्रभू! तुझा जयजयकार असो! तूच एकमात्र या जगामधे रक्षणकर्ता आहेस.
अत्र्यनसूया करी निमित्त | प्रगट्यो जगकारण निश्चित ||२||
अत्रि ऋषी आणि अनसूयामाता यांना निमित्त करुन या जगासाठी खरोखर तू प्रगट झाला आहेस.
ब्रह्माहरिहरनो अवतार । शरणागतनो तारणहार ||३||
तू ब्रह्मा, विष्णु आणि शंकर यांचा अवतार आहेस आणि शरणागतांना तू या भवसागरातुन तारुन नेतोस.
अन्तर्यामि सत चित सुख | बहार सद्गुरु द्विभुज सुमुख् ||४||
तू अंतरंगात सच्चिदानंदरुपाने नियमन करणारा आहेस आणि बाह्य स्वरुपात दोन हात आणि सुंदर मुख असलेला असा सद्गुरु रुप आहेस.
झोळी अन्नपुर्णा करमांह्य | शांति कमन्डल कर सोहाय ||५||
तुझ्या हातात असलेली ही झोळी साक्षात अन्नपुर्णा आहे आणि तुझ्या हाती असलेले हे कमण्डलु शांतीचे प्रतिक आहे.
क्यांय चतुर्भुज षडभुज सार | अनंतबाहु तु निर्धार ||६||
कधी तू चतुर्भुज स्वरुपात असतोस तर काही वेळेस तू षडभुजा धारण करतोस, पण खरे पाहता तू अनंत बाहुधारी आहेस.
आव्यो शरणे बाळ अजाण | उठ दिगंबर चाल्या प्राण ||७||
मी अजाण बालक तुला शरण आलो आहे. हे दिगंबरा ! तू उठ. आता प्राण जाईल अशी स्थिती आहे.
सूणी अर्जुण केरो साद | रिझ्यो पुर्वे तुं साक्षात ||८||
दिधी ऋद्धि सिद्धि अपार | अंते मुक्ति महापद सार ||९||
पुर्वी तू सहस्त्रार्जुनाचा धावा ऐकुन प्रसन्न झाला होतास आणी त्याला ऋद्धी- सिद्धी दिल्या होत्या. त्यानंतर त्याला मुक्ती देऊन महापद दिले होते.
कीधो आजे केम विलम्ब ? । तुजविण मुजने ना आलम्ब ||१०||
मग आजच एवढा विलंब का करीत आहेस? मला तुझ्याशिवाय कुणाचा आधार नाही.
विष्णुशर्म द्विज तार्यो एम | जम्यो श्राद्धमां देखी प्रेम ||११||
विष्णुशर्मा ब्राह्मणाचे प्रेम बघुन तू श्राद्धामधे जेवण केलेस आणि त्यांचा उद्धार केलास.
जम्भदैत्यथी त्रास्या देव | कीधी म्हेर ते त्यां ततखेंव ||१२||
विस्तारी माया दितिसुत | इन्द्र करे हणाव्यो तूर्त ||१३||
जंभ राक्षसामुळे देव त्रासले होते तेव्हा तुच त्यांना ताबडतोब मदत केली होती. तू त्यावेळी आपल्या मायेने इंद्राकरवी त्या राक्षसाचा वध केला होतास.
एवी लीला कईं कईं शर्व | किधी वर्णवे को ते सर्व ||१४||
अशा प्रकारच्या अनेक लीला भगवान शंकराने (शर्व) केल्या आहेत. यांचे वर्णन कोण करु शकेल?
दोड्यो आयु सुतने काम | कीधो एने तें निष्काम ||१५||
आयुराज पुत्रासाठी आपण धावत गेलात आणि त्याला निष्काम (कामनारहित) केले.
बोध्या यदु ने परशुराम | साध्यदेव प्रल्हाद अकाम ||१६||
यदुराजाला, परशुरामाला, साध्यदेवाला आणि निष्काम अशा प्रल्हादाला तू उपदेश केला होता.
एवी तारी कृपा अगाध | केम सूणे ना मारो साद ||१७||
अशी तुझी अगाध कृपा असतांना, तू माझी हाक मात्र का ऐकत नाहीस?
दोड अंत ना देख अनंत | मा कर अधवच शिशुनो अंत ||१८||
हे अनंत, धावत ये, माझा अंत पाहु नकोस. या बालकाचा असा मधेच अंत करु नकोस.
जोई द्विज स्त्री केरो स्नेह | थयो पुत्र तुं नि:संदेह ||१९||
ब्राह्मण स्त्रीचे प्रेम पाहुन तू खरोखर तिचा पुत्र झालास.
स्मर्तृगामि कलितार कृपाळ | तार्यो धोबि छेक गमार ||२०||
स्मरण करतास धावणारा तू , कलियुगामधे तारुन नेणारा, हे कृपाळू, तू तर अगदी अडाणी अशा धोब्याला पण उद्धारले आहेस.
पेटपीडथी तार्यो विप्र | ब्राह्मणशेठ उगार्यो क्षिप्र ||२१||
पोटशुळाने त्रस्त असलेल्या ब्राह्मणास तू तारलेस, आणि व्यापारी ब्राह्मणशेठला वाचवलेस.
करे केम ना मारी व्हार ? | जो आणिगम एकज वार ||२२||
मग देवा, तू माझ्या मदतीला का बरे धावत नाहीस? एकदाच माझ्याकडे पहा!
शुष्क काष्ठने आण्यां पत्र | थयो केम उदासिन अत्र ? ||२३||
वाळलेल्या लाकडाला ही पालवी फुटावी अशी तुझी कृपा असताना, माझी मात्र तू का उपेक्षा करत आहेस ?
जर्जर वंध्या केरां स्वप्न | कर्यां सफळ ते सुतनां कृत्स्न ||२४||
हे देवा, वृद्ध वंध्या स्त्रीला पुत्र देऊन तू तिचे स्वप्न साकार केलेस, तिचे मनोरथ पुर्ण केलेस.
करी दुर ब्राह्मणनो कोढ | कीधा पुरण एना कोड ||२५||
हे दत्तात्रेय प्रभू ! तू ब्राह्मणाचे कोड बरे करुन त्याची मनीची इच्छा पुर्ण केलीस.
वंध्या भैंस दूझवी देव | हर्युं दारिद्र्य तें ततखेव ||२६||
हे प्रभू! आपण वांझ म्हशीला दूभती केलीस आणि त्या ब्राह्मणाचे दारिद्र्य दूर केलेत.
झालर खाई रिझ्यो एम | दीधो सुवर्ण घट सप्रेम ||२७||
श्रावणघेवड्याच्या शेंगांची भाजी खावुन, आपण त्या ब्राह्मणाला प्रेमपुर्वक सोन्याने भरलेला हंडा दिलात.
ब्राह्मण स्त्रिनो मृत भरथार | कीधो सजीवन तें निर्धार ||२८||
ब्राह्मण स्त्रीच्या मृत पतीला तू पुन्हा जीवित केलेस.
पिशाच पिडा कीधी दूर | विप्रपुत्र उठाड्यो शूर ||२९||
पिशाच्च पीडा दुर करुन, तू मृत ब्राह्मण पुत्र पुनश्च जीवंत केलास.
हरि विप्रमद अंत्यजहाथ | रक्ष्यो भक्त त्रिविक्रम तात ||३०||
हे मायबाप ! तू एका हरिजनाचे माध्यमातुन ब्राह्मणाचे गर्वहरण केलेस आणि त्रिविक्रम नावाच्या भक्ताचे रक्षण केलेस.
निमेषमात्रे तंतुक एक | प्होंच्याडो श्रीशैले देख ||३१||
तंतूक नामक भक्ताला तू एका क्षणांत श्रीशैल पर्वतावर पोहोचवुन दिलेस.
एकी साथे आठ स्वरूप | धरि देव, बहुरूप ,अरूप ||३२||
संतोष्या निज भक्त सुजात | आपी परचाओ साक्षात ||३३||
हे प्रभो, तू निर्गुण असुनही अनेक रुपे धारण करु शकतोस. त्यामुळे एकाच वेळी आठ भक्तांचे घरी भोजनास जाऊन तू सर्व भक्तांना संतुष्ट केलेस आणि आपल्या साक्षित्वाची प्रचिती दिली.
यवनराजनी टाळी पीड | जातपातनी तने न चीड ||३४||
हे देवा ! तू यवन (मुसलमान) राजाची शारीरिक व्याधी दूर करुन तू जातीभेद किंवा श्रेष्ठ-कनिष्ठ यात काही फरक करत नाहीस हे दाखवुन दिलेस.
रामकृष्णरुपे तें एम | कीधी लिलाओ कंई तेम ||३५||
हे दत्त दिगंबरा ! तू राम व कृष्णाचा अवतार धारण करुन अनेक लीला केल्या आहेस.
तार्यां पथ्थर गणिका व्याध | पशुपंखी पण तुजने साध ||३६||
हे दत्तात्रेय प्रभो, दगड, वेश्या, शिकारी इ.चा पण तू उद्धार केला आहेस. पशु पक्षी पण तुझ्यातील साधुता जाणुन आहेत.
अधमओधारण तारुं नाम | गातां सरे ना शां शां काम ? ||३७||
हे देवा, तुझे नामस्मरण पापी माणसाला पावन करणारे आहे. तुझे नामस्मरण केल्याने कुठले काम होत नाही?
आधि व्याधि उपाधि सर्व | टळे स्मरणमात्रथी शर्व !||३८||
हे शिवशंकरा, तुझ्या नुसत्या स्मरणाने आधि-व्याधी, आणि सर्व उपाधी नष्ट होतात.
मुठचोट ना लागे जाण | पामे नर स्मरणे निर्वाण ||३९||
तुझे स्मरण केल्याने मूठ मारणे इ. प्रकारचा त्रास होत नाही, आणि मनुष्य मोक्षपद प्राप्त करतो.
डाकण शाकण भेंसासुर | भूत पिशाचो जंद असुर ||४०||
नासे मूठी दइने तूर्त | दत्तधून सांभाळतां मूर्त ||४१||
या दत्त नामाची धून म्हटल्याने डाकिण, शाकिण, महिषासुर, भूत-पिशाच्च, जंद, असुर पळुन जातात.
करी धूप गाए जे एम | दत्त-बावनी आ सप्रेम ||४२||
सुधरे तेना बंने लोक | रहे न तेने क्यांये शोक ||४३||
दासी सिद्धि तेनी थाय | दुःख दारिद्र्य तेनां जाय !||४४||
जे कोणी धूप लावुन ही दत्तबावनी प्रेमपुर्वक म्हणतात, त्यांना इहलोकी सौख्य प्राप्त होते व अंती मोक्षप्राप्ती होते. त्याला कोणत्याही प्रकारचे दु:ख रहात नाही. सिद्धी जणु त्याची दासी होते व त्याला कधीही दारिद्र्य प्राप्त होत नाही.
बावन गुरुवारे नित नेम | करे पाठ बावन सप्रेम ||४५||
यथावकाशे नित्यनियम | तेने कदि न दंडे यम ||४६||
जे कोणी बावन्न गुरुवार नियमांचे पालन करुन नेहमी दत्तबावनीचे बावन्न पाठ श्रद्धापुर्वक करतात किंवा जसा वेळ मिळेल तसे पाठ करतात त्यांना यमराज कधी दंड करत नाही.
अनेक रुपे एज अभंग | भजतां नडे न माया-रंग ||४७||
हा दत्त दिगंबर जरी अनेक स्वरुपात असला तरी त्याचे मूळ स्वरुप कायम असते, त्यात फरक पडत नाही. दत्त प्रभुंची उपासना करतांना माया-मोह त्रास देत नाहीत.
सहस्त्र नामे नामी एक | दत्त दिगंबर असंग छेक ! ||४८||
दत्तात्रेयाला हजारो नावें असुनही तो मात्र दत्त दिगंबर एकच आहे आणि तो सर्व माया मोहापासुन दूर अलिप्त आहे.
वंदुं तुजने वारंवार | वेद श्वास तारा निर्धार ||४९||
हे प्रभो, मी तुला वारंवार वंदन करीत आहे. चारही वेद आपल्या श्वासातुनच प्रगट झाले आहेत हे निश्चित!
थाके वर्णवतां ज्यां शेष | कोण रांक हुं बहुकृतवेष ? ||५०||
जेथे हे दत्तात्रेया, तुझे वर्णन करतांना शेष सुद्धा थकुन जातो, तेथे अनेक जन्म घेणार्या माझ्यासारख्या पामराची काय कथा?
अनुभव-तृप्तिनो उद्गार | सूणी हसे ते खाशे मार ||५१||
दत्तबावनी हे अनुभवाचे बोल आहेत. टिकाकाराच्या दृष्टीकोनातुन कोणी याकडे पाहिले तर त्याला प्रायश्चित्त भोगावे लागेल.
तपसी तत्त्वमसि ए देव ! | बोलो जय जय श्री गुरुदेव !! ||५२||
श्री दत्त प्रभो हे तपसी व तेच निर्गुण ब्रह्मस्वरुप आहेत. म्हणुन सर्वांनी आवर्जुन 'जय जय श्री गुरुदेव' म्हणावे.

