May 25, 2021

स्वामीन् नमस्ते अक्कलकोटवासिन् - श्री स्वामी समर्थ चरित्र कथा उपक्रम


श्री गणेशाय नम: श्री सरस्वत्यै नम: ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः

॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥

॥ ध्यानम् ॥
अजानुबाहु विशाल नेत्रम् । अनंत ब्रह्माण्डकार स्वरुपम् ॥
भक्त कामकल्पद्रुम कामधेनुम् । स्वामी समर्थ शिरस: नमामि ॥

अनंतकोटी ब्रह्माण्डनायक योगीराज श्री स्वामी समर्थ यांच्या चरित्र-बखर या दिव्य ग्रंथात ग्रंथकार श्री गोपाळबुवा केळकर लिहितात - आज पावेतों असंख्य भक्तजन श्री स्वामी महाराजांचे दर्शनास येऊन पुनीत होऊन गेले आहेत. महाराजांचा प्रत्येक शब्द आणि त्यांची प्रत्येक कृती चमत्काराची असे. क्षणोक्षणीं श्री स्वामींच्या लीलेंत चमत्कार दृष्टीस पडे. मात्र, त्यांची साग्र लीला कोणालाही लिहिता आली नाही.
दत्तभक्तहो, अनेक वाचकांनी श्री स्वामी चरित्र, त्यांच्या लीला याविषयीं लिहिण्याबद्दल सूचना/अभिप्राय पाठवले. तसे पाहतां, या अक्कलकोटनिवासी अवतारी पुरुषाच्या चरित्रावर आधारित श्रीगुरुलीलामृत, श्री स्वामी समर्थ सारामृत, श्री स्वामी समर्थ बखर, श्री स्वामी समर्थ गुरुकथामृत, श्री स्वामी समर्थ सप्तशती असे अनेक सिद्ध ग्रंथ रचले आहेत. तरीही, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अफाट चरित्र सागरांतून अनेक अमौलिक रत्ने, त्यांच्या काही लीला, स्वामीभक्तांना आलेल्या अनुभूती भक्तजनांपुढे मांडण्यासाठी एक उपक्रम घेऊन येत आहोत.
स्वामीभक्तहो, आपणही या उपक्रमात सहभागी होऊ शकता. करायचे एव्हढेच आहे की आपण आपली आवडती श्री स्वामी चरित्र कथा, लीला, बोधकथा आम्हांस ' संपर्क ' वापरून अथवा Email Us इथे कळवावी. आम्ही तुमचा नामनिर्देश करून त्या प्रकाशित करू. जेणे करून सर्व श्री स्वामी भक्तांना त्याचा लाभ होईल. महत्वाचे, आपले नांव प्रकाशित करण्यास आपली अनुमती नसेल तर कृपया प्रतिसादांत तसे स्पष्ट लिहावे.
जास्तीत जास्त भाविकांना हे श्री स्वामी चरित्र वाचता यावे, श्री स्वामी/दत्तभक्तीचा प्रसार व्हावा आणि स्वामींच्या लीलांचे मनन करीत आपण सर्वजण स्वामीकृपेत रंगून जावे, केवळ हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
चला तर मग स्वामीभक्तहो, शुभस्य शीघ्रम् म्हणत सुरुवात करू या. श्री स्वामी समर्थ कृपेनें व्याधिमुक्तता कर्नाटकामध्यें श्रीधर नावाचा एक दत्तभक्त ब्राह्मण राहत असे. तो पोटशुळानें व्याधिग्रस्त होता. अनेक औषधोपचार, नवस सायास करूनदेखील त्याचा रोगपरिहार झाला नाही. अखेरीस, ह्या असाध्य रोगशमनार्थ त्याने श्री दत्तमहाराजांना शरण जाण्याचे ठरविले. त्यानुसार तो गाणगापूर ह्या दत्तक्षेत्रीं आला. तिथे त्याने प्रति दिनीं संगम स्नान, श्री दत्तमहाराजांचे पूजन -अभिषेक, तसेच श्रीगुरुचरित्र पारायण आदि प्रकारें उपासना सुरु केली. त्याच्या भक्तिभावानें प्रसन्न होऊन श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी त्यास स्वप्नदृष्टांत दिला आणि आज्ञा केली, " श्रीधरा, तू श्रीपुरीच्या पानांच्या रसांत सुंठ आणि सैंधव घालून भक्षण कर, त्या योगें तुझी उदरव्यथा नष्ट होईल." या शुभसूचक स्वप्नाने श्रीधरास अत्यंत आनंद झाला. भगवान श्री दत्तात्रेयांना तो वंदन करू लागताच त्याला जागृती आली. परंतु श्रीपुरी म्हणजे कुठला वृक्ष हे काही त्याला माहित नव्हते. दुसऱ्या दिवशीं, गाणगापुरांतील वैद्य, पुजारी मंडळी, आणि इतर भाविक जन यांच्याकडे श्रीधराने श्रीपुरीच्या झाडाबद्दल विचारले. मात्र, कोणाकडूनही यासंबंधी त्याला खात्रीशीर उत्तर सापडले नाही. अत्यंत खिन्न आणि सचिंत होऊन श्रीधर ब्राह्मण श्री दत्तमंदिरात परतला. त्याने पुन्हा एकदा श्री दत्तप्रभूंची कळवळून प्रार्थना केली. त्या रात्रीं श्रींनी पुन्हा एकदा त्याला स्वप्नांत दर्शन दिले आणि सांगितले, " मी सध्या श्री अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ रूपांत अवतरलो आहे, तू तिथे आता त्वरित गमन कर. माझे दर्शन होताच तुझी मनोकामना अवश्य पूर्ण होईल." दुसऱ्या दिवशीं प्रातःकाळीच प्रभू दत्तात्रेयांचे पूजन करून, श्रीधर अक्कलकोटला जाण्यास निघाला. पोटशूळाने ग्रस्त तो ब्राह्मण कसाबसा अक्कलकोटास पोहोचला. त्यावेळीं, श्री समर्थांची स्वारी नव्या विहिरीजवळ असलेल्या मारुतीरायाच्या मंदिरात होती. हे समजताच श्रीधर त्या स्थानीं धावला आणि ' माथा ठेवूनि चरणीं । न्यासितां झाला पुनःपुन्हा ' अर्थात ओट्यावर बसलेल्या श्री स्वामींच्या चरणांवर अत्यंत भक्तिभावानें त्याने आपलें मस्तक ठेवले. समर्थांच्या दिव्य दर्शनानें अष्टभाव जागृत झालेला तो दत्तभक्त हात जोडून तिथेच उभा राहिला. तेव्हा त्याच्याकडे पाहत श्री स्वामीराय वदले, " अरे श्रीधरा, श्रीपुरीचे झाड म्हणजे निंबवृक्ष ! तू त्या पानांचा रस काढून त्यांत सुंठ व सैंधव घाल आणि तें तीन दिवस घे. म्हणजे तू व्याधीमुक्त होशील." श्री समर्थांचे हे वचन ऐकून श्रीधरास हे प्रत्यक्ष श्री दत्तावतार आहेत, याची खात्री पटली. त्याने श्री स्वामींना पुन्हा एकदा नमस्कार केला आणि त्यांच्या आज्ञेनुसार श्रीपुरीचा रस प्राशन केला. त्यायोगें, त्या ब्राह्मणाची उदरव्यथा पूर्णपणे बरी झाली आणि स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होऊन तो आपल्या गांवी परतला. || श्री स्वामी समर्थ || || श्री गुरुदेव दत्त ||

संदर्भ : श्री स्वामी समर्थ बखर

May 14, 2021

श्री दत्तभावसुधारस स्तोत्र - ( श्लोक १०१ ते ११० )


 || श्री गणेशाय नमः ||

दत्तभक्तहो, ह्या श्री टेम्ब्ये स्वामीरचित स्तोत्राचा भावार्थ जर आपणांस चुकीचा आहे असे आढळल्यास, तर त्या श्लोकाचा योग्य अर्थ आम्हांस ' संपर्क ' वापरून कळवावा, आम्ही तुमचा नामनिर्देश करून योग्य ते बदल जरूर करू. जेणे करून सर्व दत्तभक्तांना त्याचा लाभ होईल.

महत्वाचे, आपले नांव प्रकाशित करण्यास आपली अनुमती नसेल तर कृपया प्रतिसादांत तसे स्पष्ट लिहावे.

|| श्री गुरुदेव दत्त ||

अपक्वं छेदयित्वापि क्षेत्रे शतगुणं ततः । धान्यं शूद्राय योऽदात्स श्रीदत्तः शरणं मम ॥१०१॥ भावार्थ : ज्या गुरुनाथांनी आपल्या शूद्र भक्ताने ( केवळ गुरुवचनांवर दृढ श्रद्धा ठेवून ) पूर्णपणे तयार न झालेले पीक अयोग्य वेळीं कापले असता, त्याच्या भक्तिभावानें प्रसन्न होऊन शतपटीनें अधिक धान्य त्याला दिले, असे ते श्री दत्तात्रेय माझे आश्रयदाता आहेत. 

गाणगापुरके क्षेत्रे योऽष्टतीर्थान्यदर्शयत् । भक्तेभ्यो भीमरथ्यां स श्रीदत्तः शरणं मम ॥१०२॥
भावार्थ : ज्या गुरुवर्यांनी गाणगापूर क्षेत्री भीमा-अमरजा नदींच्या संगमस्थानीं ( तीरांवर ) असलेल्या आठ तीर्थांचे आपल्या भक्तांना सविस्तर दर्शन करविले आणि त्यांचे माहात्म्यही वर्णन केले, असे ते श्री दत्तात्रेय माझे आश्रयदाता आहेत.

ब्रह्मनिष्ठ वामन ( वामनबुवा ) रावजी वैद्यरचित श्रीगुरुलीलामृत


 श्रीगणेशाय नम  द्रां दत्तात्रेयाय नमः 

॥ श्री स्वामी समर्थ 

श्री दत्तप्रभूंचा अवतार असलेलें अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ यांच्या भक्तगणांत अलोट मान्यता लाभलेला ग्रंथ म्हणजे ब्रह्मनिष्ठ वामन ( वामनबुवा ) रावजी वैद्य रचित श्रीगुरुलीलामृत ! या ग्रंथाच्या नित्य पठणें । सर्व सिद्ध निःशंक होतें श्रवणें । गृहीं हा ग्रंथ संरक्षणें । दत्तदर्शन होईल ॥ अशी निश्चित प्रचिती देणारा हा अलौकिक ग्रंथ प्रामुख्याने श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरित्रावर आधारित आहे. ह्या दिव्य ग्रंथाच्या लेखनाच्या प्रेरणेविषयीं आत्मनिवेदन करतांना ब्रह्मनिष्ठ वामनबुवा म्हणतात - हें नाहीं नाहीं स्वकपोलकल्पित । वेदशास्त्रपुराणार्थरहस्यमथित । हृदयस्थ परमात्मा दत्तावधूत । त्यांचे तेचि वदविती ॥ अर्थात हा सिद्ध ग्रंथ स्वकपोलकल्पित नसून प्रत्यक्ष श्री दत्तप्रभूंनीच लिहून घेतला आहे. 

पंचावन्न अध्याय आणि ९७५८ ओव्या असलेल्या ह्या ग्रंथात धर्म, मीमांसा, व्याकरण, न्याय, ज्योतिष, वैद्यक आदि अनेक शास्त्रांचे सविस्तर विवेचन केले आहे. त्याखेरीज, श्रुति, स्मृति, पुराणे, वेद-उपनिषदें यांतील अनेक श्लोक-वचनेंही प्रतिपादित केली आहेत. श्रीगुरुलीलामृत या चरित्र ग्रंथात प्रत्येक अध्यायाच्या प्रारंभी वेदान्तातील काही प्रमेयांचे विश्लेषण आहे, तदनंतर त्याच अनुषंगाने श्रींच्या भक्तांच्या कथा आल्या आहेत. 

' भावेन विद्यते देव: ' या स्मृति वचनावर विश्वास ठेवून भाविकांनी या प्रासादिक ग्रंथाचे वाचन केल्यास श्री स्वामी समर्थांच्या कृपेची अनुभूती अवश्य येतेच. ही ग्वाही देतांना ग्रंथकार लिहितात - नित्यश: एक अध्याय तरी । सद्भावें वाचावा निर्धारीं । तयाचे सकल मनोरथ पूर्ण करी । श्रीसद्गुरुस्वामी निश्चयें ॥ 

ब्रह्मनिष्ठ वामन रावजी वैद्यरचित संपूर्ण श्रीगुरुलीलामृत अर्थात श्री अक्कलकोट स्वामी समर्थ चरित्र इथे वाचता येईल. 

  ॥ श्री स्वामी समर्थार्पणमस्तु 

  सौजन्य : http://swamisamarthmathindore.org/


श्री दत्तात्रेय कवच - ब्रह्मवैवर्त पुराण


॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥


अस्य श्री दत्तात्रेय कवच स्तोत्र महामंत्रस्य आंगिरसो भगवान ऋषी: अनुष्टुप छंद: 

श्री दत्तात्रेय: परमात्मा देवता, ऐं बीजं, क्लीं शक्ति:, स्वाहा कीलकं, 

मम् श्रीदत्तात्रेयप्रसादसिद्धर्थे जपे विनियोग:

अथ ध्यानं

ध्यायेत संयमिसेवितांघ्रिकमलं तत तत प्रकाश उज्ज्वलं मायागूढविहारिणं यदि सदा माहिष्मतीपावनम्  ॥

रेवातीरविहारिणं यतिवर भक्तार्तिनिर्वाहकम्  ॥

योगारुढमतिं प्रसन्नवदनं योगीश्वरीशं भजे ॥

अथ कवच प्रारभ्यते

पूर्वस्यां दिशि योगीश: आग्नेय्यां दिशि माधव: ।

दक्षिणे पातु सर्वात्मा नैऋत्यां भक्तवत्सल: ॥१॥

प्रतीच्यां पातु ब्रह्मण्यो वायव्यां च दिगंबर: ।

उदीच्यां सुव्रत: पातु ईशान्ये पातु भद्रद: ॥२॥

अधस्तात विष्णुभक्तस्तु सर्वत: पातु सर्वग: ।

दत्तात्रेय: शिर: पातु ललाटं मौनिशेखर: ॥३॥

भ्रूमध्यं पातु सर्वज्ञो नेत्रे पातु दयानिधि: ।

नासां पातु महायोगी श्रुतिं पातु श्रुतिप्रिय: ॥४॥

स्कंधौ मनोजव: पातु पार्श्वे च पुरुषोत्तम: ।

करयुग्मं च मे पातु कार्तवीर्यवरप्रद: ॥५॥ 

नखानपातु अघसंहारी कक्ष्यौ पातु भयापह: ।

नारायणात्मक: पातु वक्षसी स्तनयोस्तथा ॥६॥

पृष्ठत: सर्वदा पातु सर्वलोकनियामक: ।

उदरं च अच्युत: पातु नाभिं पातु महात्मक: ॥७॥

अत्रिपुत्र: कटिं पातु सक्थिनि पातु शाश्वत: ।

गुह्यं च मे सदा पातु नग्नवेषधर: पर: ॥८॥

ऊरु पातु त्रिकालज्ञो जानुनी पातु शंकर: ।

जंघे मायाजित: पातु पातु गुल्फौ स्वयं प्रभु: ॥९॥

पादौ पातु सदाभोगी सदायोगी करांगुलि: ।

त्रिकालज्ञो अखिलवपु: पातु रोमाणि सर्वग: ॥१०॥

ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय, सर्वलोकैकसन्नुताय, सर्वनियामकाय, सर्वतंत्राय, सर्वकामफलप्रदाय, सर्वविद्यापारंगताय, सर्वयोगींद्रमुनींद्रसेविताय, सर्वभक्तलोकरक्षणाय, सदाब्रह्मचर्यव्रतधराय, मायागूढविहाराय, जडोन्मत्त-मूक-बधिरस्वरुपाय, नग्नवेषसंचाराय ॥ 

ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय, मुनिपतये, सर्वदेवाभयप्रदाय, सर्वराक्षसविनाशकारणाय, सर्वोपद्रवनिवारणाय, सर्वमंत्र-यंत्र-तंत्रनिवारणाय, सर्वग्रहोच्चाटनाय, सर्वरोगविनाशनाय, ॐ ह्रीं क्रों क्षौं क्रूं ह्रीं ह्रूं श्रीं ॥

ॐ नमो भगवते कार्तवीर्यसमुद्धरणाय, रेवानदीजलक्रीडापरायणाय, माहीष्मतीपुरनिवासाय, अनसूयागर्भसंभूताय, अत्रिनेत्रानंदकराय, क्षणमात्रलोकसंचारणाय, शम-दम-यम-नियमसंपन्नाय, ब्रह्मराक्षस-भूत-वेताल-पैशाचिक-शाकिनी-डाकिनी-पूतनादि ग्रहनिवारणाय, आश्रितार्ति निवारणाय, संस्मरणमात्रसन्निहिताय, श्रीदत्तात्रेयाय  योगीश्वराय  सर्वकार्याणि मे साधय साधय, सर्वदा रक्ष रक्ष हुं फट स्वाहा ॥

॥ इति श्री दत्तात्रेय कवच स्तोत्रं संपूर्णम ॥


श्री दत्तात्रेय कवचाचा मराठी सार्थ अनुवाद इथे वाचता येईल.