Showing posts with label अष्टकं. Show all posts
Showing posts with label अष्टकं. Show all posts

Jan 10, 2025

श्रीसाईनाथ प्रार्थनाष्टक


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

सद्‌गुरु श्रीसाईनाथाय नमः

संतकवी दासगणूमहाराजविरचित श्रीसाई-स्तवन-मंजिरी हे साक्षात श्री साईनाथांच्या कृपेचा वरदहस्त लाभलेले स्तोत्र आहे. अनेक साईभक्तांच्या नित्यपठणांत हे स्तोत्र असते. या सिद्ध स्तोत्रांतील प्रार्थनाष्टक तर प्रत्यक्ष श्री साईंचे आशीर्वादस्वरूप असून, ते शीघ्र फलदायी आहे. भक्तिभावाने या आठ श्लोकांचे आवर्तन केल्यास भाविकांना साईकृपेची निश्चितच अनुभूती येते. विशेषतः विवाह, नोकरी, अपत्यलाभ, आरोग्यप्राप्ती या इष्ट मनोकामना साईनाथ महाराजांच्या आशीर्वादाने पूर्ण होतात, असा अनेक साईभक्तांचा अनुभव आहे.

असतील जे विमल मनोरथ, परिपूर्ण सदा ते होतात ॥ शाश्वत या नियमाची, सत्यता अनुभवी मनांत ॥


॥ श्रीसाईनाथ प्रार्थनाष्टक ॥

शांतचित्ता महाप्रज्ञा । साईनाथा दयाघना । दयासिंधो सत्स्वरुपा । मायातमविनाशना ॥१॥

जातगोतातीता सिद्धा । अचिंत्या करुणालया । पाहि माम् पाहि माम् नाथा । शिर्डीग्रामनिवासिया ॥२॥

श्रीज्ञानार्का ज्ञानदात्या । सर्वमंगलकारका । भक्तचित्तमराळा हे । शरणगतरक्षका ॥३॥

सृष्टिकर्ता विरिंची तूं । पाता तूं इंदिरापती । जगत्रया लया नेता । रुद्र तो तूंच निश्चितीं ॥४॥

तुजवीणें रिता कोठें । ठाव ना या महीवरी । सर्वज्ञ तूं साईनाथा । सर्वांच्या ह्रदयांतरी ॥५॥

क्षमा सर्वापराधांची । करावी हेंचि मागणें । अभक्तिसंशयाच्या त्या । लाटा शीघ्र निवारणे ॥६॥

तूं धेनू वत्स मी तान्हें । तूं इंदु१० चंद्रकांत११ मी । स्वर्नदीरुप१२ त्वत्पादा । आदरें दास हा नमी१३ ॥७॥

ठेव आतां शिरी माझ्या । कृपेचा करपंजर१४ । शोक चिंता निवारावी । गणू हा तव किंकर१५ ॥८॥


१. मायारूपी अज्ञानाचा विनाश करणारा २. गोत्र, कुटुंब आदि उपाधि नसलेला ३. माझे रक्षण कर ४. ज्ञानरूपी सूर्य ५. भक्तांच्या हृदयरूपी सरोवरातील हंस ६. ब्रह्मदेव ७. पालनकर्ता ८. श्रीहरी विष्णु ९. महादेव शंकर १०. चंद्र ११. चंद्रकिरणांमुळे पाझरणारे रत्न १२. गंगा १३. नमस्कार करतो. १४. कृपाहस्त १५. दास

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥

Jan 2, 2025

श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचितं श्रीनृसिंहसरस्वतीप्रार्थनाष्टकम्


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ श्रीमन्नृसिंहसरस्वती महाराजाय नमः ॥


‘ संन्यासी वेषधारी श्रीदत्तप्रभू ’ या नांवाने जगतविख्यात असलेले, श्री भगवान दत्तात्रेयांचे द्वितीय अवतार ‘ श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज ’ यांच्या जन्मोत्सवाच्या सर्वांना भक्तिमय शुभेच्छा !!


ऋतकृत्स्वगिरोऽमरोऽभवद्द्विजपत्न्यास्तनयोऽपि योऽभवत् । स नृसिंहसरस्वती यतिर्भगवान्मेऽस्ति परा वरा गतिः ॥१॥
भावार्थ : जे स्वतः साक्षात परमेश्वर असूनही केवळ आपले वचन सत्य करण्यासाठी ब्राह्मणपत्नीचे पुत्र झाले, ते भगवान नृसिंहसरस्वती स्वामी महाराज माझे सर्वश्रेष्ठ कृपास्थान आहे, आश्रयदाते आहेत. प्रणवं प्रपपाठ जन्मतो विजहाराल्पदशोऽपि सन्मतः । स नृसिंहसरस्वती यतिर्भगवान्मेऽस्ति परा वरा गतिः ॥२॥ भावार्थ : जन्मतःच ज्यांनी ॐकाराचा उच्चार केला, जे सत्पुरुषांचे श्रद्धास्थान आहेत, आणि ज्यांनी बालपणीच लोककल्याणार्थ तीर्थाटन-भ्रमण केले, ते भगवान नृसिंहसरस्वती स्वामी महाराज माझे सर्वश्रेष्ठ कृपास्थान आहे, आश्रयदाते आहेत. मृतविप्रसुतं व्यजीवयद्य उ वंध्यामहिषीमदोहयत् । स नृसिंहसरस्वती यतिर्भगवान्मेऽस्ति परा वरा गतिः ॥३॥ भावार्थ : ज्यांनी मृत द्विजपुत्राला जिवंत केले, तसेच ज्यांनी एका वांझ म्हशीला दुग्धवती केले, ते भगवान नृसिंहसरस्वती स्वामी महाराज माझे सर्वश्रेष्ठ कृपास्थान आहे, आश्रयदाते आहेत. स्वतनुं यतये व्यदर्शयद्-द्विजगर्वं बुरुडाद्व्यनाशयत् । स नृसिंहसरस्वती यतिर्भगवान्मेऽस्ति परा वरा गतिः ॥४॥ भावार्थ : ज्यांनी त्रिविक्रमभारती नामक संन्याशाला विश्वरूप दर्शन दिले, आणि एका अंत्यजाकरवी वेदसंपन्न, ज्ञानी तथापि मदोन्मत्त झालेल्या ब्राह्मणांचे गर्वहरण केले, ते भगवान नृसिंहसरस्वती स्वामी महाराज माझे सर्वश्रेष्ठ कृपास्थान आहे, आश्रयदाते आहेत.
प्रददौ हि मृतप्रियस्त्रिया अपि सौभाग्यमु यन्नमस्क्रिया । स नृसिंहसरस्वती यतिर्भगवान्मेऽस्ति परा वरा गतिः ॥५॥ भावार्थ : पती मृत झालेल्या विप्र स्त्रीने केवळ भक्तिभावाने नमन केले असता, ज्यांनी तिच्या मृत पतीला जिवंत करून त्या पतिव्रता स्त्रीला चिरसौभाग्य प्राप्त करून दिले, ते भगवान नृसिंहसरस्वती स्वामी महाराज माझे सर्वश्रेष्ठ कृपास्थान आहे, आश्रयदाते आहेत. स्वमुदेऽभवदन्नवृद्धिकृत्सुवशाया अपि वंशवृद्धिकृत् । स नृसिंहसरस्वती यतिर्भगवान्मेऽस्ति परा वरा गतिः ॥६॥ भावार्थ : स्वतःच्या (भास्कर नामक नि:सीम भक्ताच्या) आनंदासाठी ज्यांनी केवळ तिघांना पुरेल एव्हढे अन्न चार सहस्त्र लोकांना पुरेल इतके वाढविले, आणि वांझ स्त्रीच्या श्रद्धाभावाने प्रसन्न होऊन ज्यांनी कन्या-पुत्र देऊन तिचा वंश वाढविला, ते भगवान नृसिंहसरस्वती स्वामी महाराज माझे सर्वश्रेष्ठ कृपास्थान आहे, आश्रयदाते आहेत. द्रुरकार्यपि शुष्ककाष्ठतः कुसुरौ येन शुची च कुष्ठतः । स नृसिंहसरस्वती यतिर्भगवान्मेऽस्ति परा वरा गतिः ॥७॥ भावार्थ : ज्यांच्या कृपेने वाळलेल्या लाकडाला पालवी फुटून त्याचा आर्द्र वृक्ष झाला, तसेच ज्यांनी दोन कुष्ठरोगग्रस्त ब्राह्मणांना व्याधिमुक्त करून निरोगी केले, ते भगवान नृसिंहसरस्वती स्वामी महाराज माझे सर्वश्रेष्ठ कृपास्थान आहे, आश्रयदाते आहेत. अमराख्यपुरे च योगिनीवरदो योऽखिलदोऽस्ति योगिनीः । स नृसिंहसरस्वती यतिर्भगवान्मेऽस्ति परा वरा गतिः ॥८॥ भावार्थ : ज्यांनी अमरापूर येथे निवास असणाऱ्या चौसष्ट योगिनींना वर देऊन त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण केल्या, ते भगवान नृसिंहसरस्वती स्वामी महाराज माझे सर्वश्रेष्ठ कृपास्थान आहे, आश्रयदाते आहेत.
॥ इति प. प. श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचितं श्रीनृसिंहसरस्वतीप्रार्थनाष्टकम् संपूर्णम् ॥

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥

Jun 27, 2024

श्रीनृसिंहसरस्वतीस्वामीविरचितं श्रीज्ञानेश्वराष्टकं - समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्...


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ 

परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम् ॥ श्री पंढरीनाथ महाराज की जय ॥ जय जय पांडुरंग हरि

॥ ॐ नमो भगवते श्रीज्ञानदेवाय


कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं । कलाङ्काङ्क्तेजोधिकामोदिवक्त्रम् । खलानीशवादापनोदार्थदीक्षम् । समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॥१॥ भावार्थ : या कलियुगामध्ये अज्ञानी जीवांच्या उद्धारासाठी ज्यांनी अवतार घेतला आहे, शीतल परंतु कलंकित असलेल्या चंद्राच्या प्रतिबिंबापेक्षाही अधिक आनंददायी आणि आल्हाददायक असा ज्यांचा मुखचंद्रमा आहे, तसेच दुष्ट आणि अविहित कर्मे करणाऱ्यांचा वृथा अभिमान दूर करून त्यांना सदाचरण-सन्मार्ग दाखविण्यास जे समर्थ आहेत अशा सदैव समाधी अवस्थेमध्ये रममाण होणाऱ्या श्री ज्ञानदेवांचे मी स्तवन करतो, त्यांचे नामस्मरण करतो आणि त्यांना नमन करतो.॥१॥  अलङ्कापुरीरम्यसिंहासनस्थं । पदाम्भोजतेज: स्फ़ुरद्दिक्प्रदेशम् । विधीन्द्रादिदेवै: सदास्तुयमानं । समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॥२॥ भावार्थ : अलंकापुरी नगरीत अतिशय शोभायमान अशा सिंहासनावर जे पद्मासनात स्थित आहेत, ज्यांच्या पावन चरण कमळांच्या सभोवती असलेल्या दिव्य तेजाने सर्व दिशा उजळल्या आहेत आणि ब्रह्मदेव-इंद्रादिदेव ज्यांची नित्य स्तुती करत असतात अशा सदैव समाधी अवस्थेमध्ये रममाण होणाऱ्या श्री ज्ञानदेवांचे मी स्तवन करतो, त्यांचे नामस्मरण करतो आणि त्यांना नमन करतो.॥२॥ गदाशङ्खचक्रादिर्भिर्भाविताङ्गम् । चिदानंदसंलक्ष्यनाट्यस्वरुपम् । यमाद्दष्टभेदाड़ग़योगप्रवीणं । समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॥३॥ भावार्थ : ज्यांच्या चरणद्वयांवर शंख, चक्र, गदा आदि शुभ चिन्हें प्रगट झालेली आहेत, जे सदासर्वदा सच्चिदानंदस्वरूपी चैतन्यरूपांत लीन असतात आणि जे यम-दमादि अष्टांग योगामध्ये प्रवीण आहेत, अशा ( मानव रूपांतील श्रीहरि विष्णु असलेल्या ) सदैव समाधी अवस्थेमध्ये रममाण होणाऱ्या ज्ञानदेवांचे मी स्तवन करतो, त्यांचे नामस्मरण करतो आणि त्यांना नमन करतो. ॥३॥ लुलायस्यवक्त्राच्छ्रुतिं पाठ्यन्तं । प्रतिष्ठानपुर्यांसुधीसंघसेव्यम् । चतुर्वेदतन्त्रेतिहासादिपूर्णं । समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॥४॥ भावार्थ : धर्मपीठ असणाऱ्या पैठण नगरीतील समस्त विद्वान ब्रह्मवृंदांच्या सभेत ज्यांनी रेड्याच्या मुखातून साक्षात ऋचा म्हणवून दाखविल्या आणि चारही वेद, तंत्रशास्त्र, आगमनिगमादि यांचे संपूर्ण ज्ञान असलेल्या, सदैव समाधी अवस्थेमध्ये रममाण होणाऱ्या ज्ञानदेवांचे मी स्तवन करतो, त्यांचे नामस्मरण करतो आणि त्यांना नमन करतो.॥४॥ सदापंढरीनाथपादाब्जभृङ्गं । निवृत्तीश्वरानुग्रहात्प्राप्ततत्त्वम् । महेन्द्रायणीतीरभूमौ वसन्तं । समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॥५॥ भावार्थ : पंढरीनाथ अर्थात श्रीपांडुरंगाच्या दिव्य चरणरूपी कमळांतील भ्रमराप्रमाणे जे नित्य श्रीहरींचे गुणगान करतात, सद्‌गुरु श्रीनिवृत्तिनाथांच्या अनुग्रहानें ज्यांना परमात्मास्वरूप-तत्त्वांची प्राप्ती झाली आहे, आणि श्रेष्ठ अशा इंद्रायणी तीरावरील पावन भूमीवर जे वास करतात, अशा सदैव समाधी अवस्थेमध्ये रममाण होणाऱ्या श्री ज्ञानदेवांचे मी स्तवन करतो, त्यांचे नामस्मरण करतो आणि त्यांना नमन करतो.॥५॥  रणे कृष्णबीभत्सुसंवादभूतो --। रुगीतार्थबोधाय ज्ञानेश्वरीवै । कृर्तिनिर्मिता येन च प्राकृतोक्त्या । समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॥६॥ भावार्थ : महाभयंकर महायुद्धाच्या रणांगणावर श्रीकृष्ण आणि अर्जुनामध्ये जो श्रीमद्‌भगवतगीतारूपी संवाद झाला, ते मूळ संस्कृतमध्ये असलेले महान तत्त्वज्ञान सामान्यजनांना प्राकृत मराठीत सुबोध व्हावे यासाठी ज्यांनी श्रीज्ञानेश्वरी ग्रंथ रचला, अशा सदैव समाधी अवस्थेमध्ये रममाण होणाऱ्या श्री ज्ञानदेवांचे मी स्तवन करतो, त्यांचे नामस्मरण करतो आणि त्यांना नमन करतो.॥६॥ चिराभ्याससंयोगसिद्धैर्बलाढय: । बृहदव्याघ्रशायी महान् चांगदेव: । निरीक्ष्याग्रकुड्यागतंवीतगर्व: । समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॥७॥ भावार्थ : दीर्घकाळ केलेल्या परिपाठाने अनेक योगसिद्धी प्राप्त केलेले, बलाढ्य व महान योगी चांगदेव भीमकाय अशा वाघावर स्वार होऊन आपल्या भेटीस येत आहेत, ही वार्ता जेव्हा श्री ज्ञानदेवांना समजली, त्यावेळीं ते आपल्या भावंडांसह स्वतः एका भिंतींवर बसले होते. त्याच जड, निर्जीव अशा भिंतीस ज्यांनी चेतना, गती दिली आणि चांगदेवांचे गर्वहरण केले, अशा सदैव समाधी अवस्थेमध्ये रममाण होणाऱ्या श्री ज्ञानदेवांचे मी स्तवन करतो, त्यांचे नामस्मरण करतो आणि त्यांना नमन करतो.॥७॥ क्वचित्तीर्थयात्रामिषेणिति नित्वा । स्वयंवेद्यतत्त्वं न जानासि विष्णो: । यत: प्रेषित: खेचरो नामदेव: । समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॥८॥ भावार्थ : भगवान महाविष्णुंच्या स्वयंवेद्य-परमात्मस्वरूप तत्त्वाची ज्याला पूर्णत: जाणीव, उपरती झाली नव्हती, आणि ज्याची अद्यापि सगुण-साकाराठायीं प्रीती होती, अशा भक्त नामदेवास तीर्थयात्रेच्या निमित्ताने ज्यांनी सत्संगाचा अनुभव दिला, तसेच पुढें त्या संत नामदेवांस सद्‌गुरु विसोबा खेचर यांच्याकडे पाठवून अद्वैताचा साक्षात्कारही घडविला, अशा सदैव समाधी अवस्थेमध्ये रममाण होणाऱ्या श्री ज्ञानदेवांचे मी स्तवन करतो, त्यांचे नामस्मरण करतो आणि त्यांना नमन करतो. ॥८॥ 

स्तवं भावभक्त्या दिभिः सौख्य देयं । पठन्तोऽर्थ जातं ह्य वाप्यापि विष्णोः । पदं यान्ति ते ज्ञानदेवस्य नित्यं । भवाब्धिं तरन्यन्तकाले च भक्ता:   भवाब्धिं तरन्यन्तकाले च भक्ता: भवाब्धिं तरन्यन्तकाले च भक्ताः ॥९॥ भावार्थ : श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या या स्तवनाचा जे दृढ श्रद्धा, भाव-भक्तीने नित्य पाठ करतील, त्यांना अपार सौख्यप्राप्ती होईल आणि पठणकर्त्यांस चारही पुरुषार्थ व श्रीहरि विष्णुंच्या कृपेचा लाभ होईल. तसेच, त्या भक्तांना श्रीज्ञानदेवांच्या दिव्य चरणीं शाश्वतपद प्राप्त होईल आणि अंतकाळी ते संसारसागर सहज तरून जातील. ॥९॥ ॥ इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्य श्रीनृसिंहसरस्वतीस्वामीविरचितं श्रीज्ञानेश्वराष्टकं संपूर्णम् ॥

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥

  

Mar 15, 2024

अद्यापि कां नरहरी करुणा न ये रे...


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

भक्तास्तव प्रगट होऊनि शुष्ककाष्ठी केली तयावरि कृपामृतपूर्ण दृष्टी तेणे परीच चुकवी मम जन्म फेरे अद्यापि कां नरहरी करुणा न ये रे ॥१विश्वासलों दृढ मनें तुझिया पदासी की वारिसील म्हणुनि मम आपदांसी ते दाविशील नयना कधि सांग बा रे अद्यापि कां नरहरी करुणा न ये रे ॥२देवा तुझे हृदय कोमल फार आहे ऐशापरी निगमशास्त्रहि आण वाहे ते काय वाक्य लटिकें करतोसि बा रे अद्यापि कां नरहरी करुणा न ये रे ॥३मी दीन हीन कुमती तुज वर्म ठावें ऐशापरि त्यजुनि कोप उदार व्हावे गाती तुझे पतितपावन नाम सारे अद्यापि कां नरहरी करुणा न ये रे ॥४माझे अपारतम पातकसंघ जाळी क्रोधाग्निनें हरि तझ्या सहमूळ जाळी तैसा करी दृढ जसा भवबंध बा रे अद्यापि कां नरहरी करुणा न ये रे ॥५श्रीपद्महस्त मम मस्तकी ठेवी बापा दृष्टीस दाखवि बरें निजचित्स्वरुपा हे दान दे वचन अन्य न मी वदें रे अद्यापि कां नरहरी करुणा न ये रे ॥६आयुष्य घालूनि अधिक मृत द्विजाला त्वां वांचवोनि जनिं वाढविली स्वलीला होसी समर्थ मज चाळविसी वृथा रे अद्यापि कां नरहरी करुणा न ये रे ॥७वेंचावयासि करुणाघन लोभ वाटे टाकून दे बिरुद लावि मला अवाटे नाही तरी झडकरी मज भेट दे रे अद्यापि कां नरहरी करुणा न ये रे ॥८पाप्यासि तारुनि बळे जन सोकवीले तुझेचि कृत्य तुज मुख्य फळासि आले हे सोडीसी तरि सुटेल तुला कसे रे अद्यापि कां नरहरी करुणा न ये रे ॥९हे श्रीधरे रचुनिया नवरत्नमाला प्रेमेचि अर्पिली बरी पुरुषोत्तमाला हे वर्णिता नरहरी संकट सर्व वारी श्रीपादसद्‌गुरु यतीश्वर चिद्विहारी ॥१० 


॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 


Feb 25, 2024

श्रीदत्तमानंदाष्टकं


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

गुरुमूर्तिं चिदाकाशं सच्चिदानन्दविग्रहं । निर्विकल्पं निराबाधं दत्तमानंदमाश्रये ॥१॥ योगातीतं गुणातीतं सर्वरक्षाकरं विभुं । सर्वदुःखहरं देवं दत्तमानंदमाश्रये ॥२॥ अवधूतं सदाध्यानम् औदुम्बरसुशोभितं । अनघाप्रिया विभुं देवं दत्तमानंदमाश्रये ॥३॥ निराकारं निराभासं ब्रह्मविष्णुशिवात्मकं । निर्गुणं निष्कलं शान्तं दत्तमानंदमाश्रये ॥४॥ अनसूयासुतं देवं अत्रिवंशकुलोद्भवं । दिगम्बरं महातेजं दत्तमानंदमाश्रये ॥५॥ सह्याद्रिवासिनं दत्तं आत्मज्ञानप्रदायकं । अखण्डमण्डलाकारं दत्तमानंदमाश्रये ॥६॥ पञ्चयज्ञप्रियं देवं पञ्चरूपसुशोभितं । गुरुपरम्परं वन्दे दत्तमानंदमाश्रये ॥७॥ दत्तमानंदाष्टकं यः पठेत् सर्वविद्या जयं लभेत् । दत्तानुग्रहफलं प्राप्तं दत्तमानंदमाश्रये ॥८॥ फलश्रुति – एककालं द्विकालं वा त्रिकालं यः पठेन्नरः । सर्वसिद्धिमवाप्नोति श्रीदत्त: शरणं मम ॥


॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥

Feb 15, 2023

नमी तो विभू श्रीगुरू रामदास


श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥ श्री कृष्णदास महाराजविरचित अभंग सह्याद्री खोऱ्यात गर्जला गजर ! जय जय रघुवीर समर्थ !, जय जय रघुवीर समर्थ !! हा तर समर्थ रामदासांचा संचार ! पायी खडावा, हाती कुबडी, सवे झोळी खांद्यावर, भगवी छाटी अंगावर, हाती असे जपमाळ, दाढीजटांचा केशसंभार, शरीर अति सुदृढ, कारण सूर्यनमस्कार ! रूप दिसे ते अति सुंदर, स्वारी करी अखंड संचार ! भेटी होता मज येई गहिवर, भानचि विसरुनि पडलो चरणांवर ! श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य सदगुरू श्रीधरस्वामी महाराजविरचित श्री समर्थाष्टक स्तवावा मनी की गुरु रामदास । कृपे या जयाच्या तुटे मोहपाश । निजानंदरूपें जया नित्य वास । नमी तो विभू श्रीगुरू रामदास ॥१॥ तपोज्ञानयज्ञानिकां साधकांस । करूनि मनः शुद्धि एकान्तवास । मनी ज्या सदा आठवीता उदास । नमी तो विभू श्रीगुरू रामदास ॥२॥ भवी दुःखदावानलें जे उदास । जगी होति ते गुरूदेवदास । जया ध्याति की सद्‌गुरु हे उदास । नमी तो विभू श्रीगुरू रामदास ॥३॥ गुरुसेविं जी प्राप्ती होते जनास । समाधान लाभे जयाच्या मनास । जनीं नित्य ज्या मानितीं की सुखास । नमी तो विभू श्रीगुरू रामदास ॥४॥ तनधर्मकर्मादिकांचा निरास । करूनी अजीवेश होती तयास । सदा ज्या स्थळीं वाटतो शांत वास । नमी तो विभू श्रीगुरू रामदास ॥५॥ असे ईशरुपेंची जो योगियांस । अनेका मतीं अन्य सांख्यादिकांस । मला जो सदा ब्रह्मरुपेचि खास । नमी तो विभू श्रीगुरू रामदास ॥६॥ जयाच्यावारी विश्व जीवेश भास । जसा एक दोरी फणीचा विलास । जया दर्शने सर्व मिथ्याची सोस । नमी तो विभू श्रीगुरू रामदास ॥७॥ जयाच्या स्वरूपी न हा कीं विभास । अवस्थात्रयांती जयाचा विकास । तया मस्त्वरूपी न हा भिन्न भास । नमी तो विभू श्रीगुरू रामदास ॥८॥ (इंद्रवज्रा) श्लोकाष्टके तोषवि जो गुरूस । होई कृपे त्या परिपूर्ण आस । नासूनि सारा जगभिन्न भास । लाभे तया तत्पदिं नित्य वास ॥९॥ ॥ श्रीसमर्थार्पणमस्तु ॥


 ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 


Dec 15, 2022

संतकवी श्रीविष्णुदासरचित श्रीदत्तात्रेय अष्टक ( शुद्धकामदा )


श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ 


जय नमोस्तुते श्रीदिगंबरा । सद्‌गुरु निरूपाधि तूं बरा । उरुं न देसि दैवाचि बाकि ती । करुं विनंति दत्तात्रया किती ॥ १ ॥ सुकुळिं जन्म हा, लाभला मला । जरि तुझा न बा, लाभ लाभला ॥ तरि वृथा कृती, गेलि पंकिं ती । करुं विनंति दत्तात्रया किती ॥ २ ॥ तुज म्हणावया, लाज वाटती । मुळिंच चूकलों, मीच वाट ती ॥ परि तुझ्या सुरी, मान ही हतीं । करुं विनंति दत्तात्रया किती ॥ ३ ॥ विषय वीष हे सोमलादिक । खचित वाटतें तें मलाऽधिक ॥ परि नसे दुजी, भक्षितां गती । करुं विनंति दत्तात्रया किती ॥ ४ ॥ जरि प्रपंच चिंताग्नि पोळवी । तरिही त्यामधें, मोह लोळवी । विविध ऊठती, कल्पना भिती । करुं विनंति दत्तात्रया किती ॥ ५ ॥ कनक द्रव्य लावण्य कामिनी । चटक लागली दिवस यामिनी ॥ विषय ध्यानिं लाचावली मती । करुं विनंति दत्तात्रया किती ॥ ६ ॥ षड्विकार कामादि बापुडे । गमति काजवे बा ! तुझ्यापुढें ॥ दिनमणी तुं ये, ऊदयाप्रती । करुं विनंति दत्तात्रया किती ॥ ७ ॥ आठवितों तुला, मी ज्यव्हां ज्यव्हां । पळसि दुरचि कां, तूं त्यव्हां त्यव्हां ॥ स्तवन कानचि का न ऐकती । करुं विनंति दत्तात्रया किती ॥ ८ ॥ निपट हा करावा विचारची । अनसूया वडीलोपचारची ॥ मनिं आणून दात्याचि नेकि ती । करुं विनंति दत्तात्रया किती ॥ ९ ॥ करिसी भक्तिच्या कागदा सही । म्हणुनि प्रार्थितों, विष्णुदासही ॥ मज प्रसन्न हो, ऐकुनी स्तुती । करुं विनंति दत्तात्रया किती ॥ १० ॥


॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 


संतकवी श्रीविष्णुदासरचित श्रीदत्तात्रेय अष्टक


श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ 


श्रीवक्रतुंड चतुरानन बालिका ही । श्रीलक्ष्मी भगवती महा कालिका ही ॥ गीता वसंततिलकामृततुल्यवृत्त । श्रीदत्त, दत्त, जय श्रीगुरुदेवदत्त ॥१॥ सिंहाद्रि पर्वत महाभुवनप्रकोटीं । इंद्रादि देव वसती तेहतीस कोंटी ॥ गंधर्व-यक्षगण किन्नर ब्रह्मभूत । श्रीदत्त, दत्त, जय श्रीगुरुदेवदत्त ॥२॥ श्रीरेणुका, अनसुया, श्रुति वेदधात्री । गाधी, कपील मुनि, भार्गवराम, अत्री । ध्याती समग्र सरिता नवकोटी तीर्थ । श्रीदत्त, दत्त, जय श्रीगुरुदेवदत्त ॥३॥ श्रीव्यास, वाल्मिक, शुकादिक नारदांही । वाटे तरीच भवसागर पारदा ही । भूकोरि मूळपिठिकाही सर्वोपसंत । श्रीदत्त, दत्त, श्रीगुरुदेवदत्त ॥४॥ कल्पद्रुमा हिणवुनी तरु डोलताती । पक्षी विवीध स्वर मंजुळ बोलताती । अखंड नाम पठणीं करिती अवृत्त । श्रीदत्त, दत्त, जय श्रीगुरुदेवदत्त ॥५॥ जंबूक, व्याघ्र, हरणें, फिरती समोर । चंडोल, कोकिल, करंडक, हंस, मोर ॥ त्या रम्य काननिं सदा रव कानिं येत । श्रीदत्त, दत्त, जय श्रीगुरुदेवदत्त ॥६॥ त्राता दिगंबर अगोचर सूर्यचंद्रा । मातापुरीं करि तृणासनि योगनिद्रा ॥ दाता दयार्णव कदापि नव्हे अदत्त । श्रीदत्त, दत्त, जय श्रीगुरुदेवदत्त ॥७॥ जेव्हा वसंत ऋतु यामिनी शुक्लपक्षीं । नक्षत्रराजमुख लक्षि चकोर पक्षी ॥ तेव्हा कधी म्हणिन त्या वसुनी वनांत । श्रीदत्त, दत्त, जय श्रीगुरुदेवदत्त ॥८॥ आनंदसिंधु शशिबंधु उदारखाणी । कौपीन, कुंडल, कमंडलु, दंडपाणि ॥ माळा जटामुकुटमंडित आवधृत । श्रीदत्त, दत्त, जय श्रीगुरुदेवदत्त ॥९॥ होतील प्राप्त म्हणती मुनि ब्रह्मचारी । धर्मार्थकाममोक्षादिक लाभ चारी ॥ उच्चारितांचि वदनी संसारसक्त । श्रीदत्त, दत्त, जय श्रीगुरुदेवदत्त ॥१०॥ द्यावी सुभक्ति भजनी म्हणे विष्णुदास । आशा धरून एवढी बसलों उदास । केव्हां कृपा करूनि हा पुरवील हेत । श्रीदत्त, दत्त, जय श्रीगुरुदेवदत्त ॥११॥


॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 


Jan 21, 2022

श्रीमत् आद्यशङ्कराचार्यविरचितं नर्मदाष्टकं


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ 

॥ नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर

॥ हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे


सबिन्दुसिन्धुसुस्खलत्-तरङ्ग-भङ्गरञ्जितं । द्विषत्सु पापजातजातकादिवारिसंयुतम् ॥ कृतान्तदूतकालभूतभीतिहारिवर्मदे । त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥१॥ त्वदम्बुलीनदीनमीनदिव्यसम्प्रदायकं । कलौ मलौघभारहारिसर्वतीर्थनायकम् ॥ 

सुमत्स्यकच्छनक्रचक्रवाकचक्रशर्मदे । त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥२॥
महागभीरनीरपूरपातधूतभूतलं । ध्वनत्समस्तपातकारिदारितापदाचलम् ॥ जगल्लये महाभये मृकण्डुसूनुहर्म्यदे । त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥३॥ गतं तदैव मे भयं त्वदम्बु वीक्षितं यदा । मृकण्डुसूनुशौनकासुरारिसेवितं सदा ॥ पुनर्भवाब्धिजन्मसम्भवाब्धिदुःखवर्मदे । त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥४॥ अलक्ष्यलक्षकिन्नरामरासुरादिपूजितं । सुलक्षनीरतीरधीरपक्षिलक्षकूजितम् ॥ वसिष्ठशिष्टपिप्पलादिकर्दमादिशर्मदे । त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥५॥


सनत्कुमारनाचिकेतकश्यपात्रिषट्पदैः धृतं स्वकीयमानसेषु नारदादिषट्पदैः  
रवीन्दुरन्तिदेवदेवराजकर्मशर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥६॥

अलक्षलक्षलक्षपापलक्षसारसायुधं
। ततस्तु जीवजन्तुतन्तुभुक्तिमुक्तिदायकम् ॥ विरिञ्चिविष्णुशंकरस्वकीयधामवर्मदे । त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥७॥ अहो धृतं स्वनं श्रुतं महेशिकेशजातटे । किरातसूतवाडवेषु पण्डिते शठे नटे ॥ दुरन्तपापतापहारि सर्वजन्तुशर्मदे । त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥८॥ इदं तु नर्मदाष्टकं त्रिकालमेव ये सदा । पठन्ति ते निरन्तरं न यान्ति दुर्गतिं कदा ॥ सुलभ्यदेहदुर्लभं महेशधामगौरवं । पुनर्भवा नरा न वै विलोकयन्ति रौरवम् ॥९॥

॥ इति श्रीमत् आद्यशङ्कराचार्यविरचितं नर्मदाष्टकं सम्पूर्णम् ॥



Jan 10, 2022

तो हा सद्‌गुरुराज श्रीनरहरी औदुंबरी राहिला


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥


होता ब्राह्मण
भार्ययासह पुरा आला तिच्या उदरा ।
मौनत्वें करितो विचित्र मग जो नानाविलासे हरा मौंजीबंधन झालीया तदुपरीं काशीपुरा चालिला । तो हा सद्‌गुरुराज श्रीनरहरी औदुंबरी राहिला ॥१ गंगास्नान निरंतरा करितसे कालत्रया साधुनीं । चिन्मुद्रा करितो दृढासनी वसे काशीस ध्यातो मुनी येती थोर यतीं नमुनी म्हणती आम्हासि तो आगळा । तो हा सद्‌गुरुराज श्रीनरहरी औदुंबरी राहिला ॥२ वृद्ध कृष्ण सरस्वती यतिवरा सर्वांसी मानी भला । त्यातें वंदूनि बोलतो निजगुजां संन्यास देणे मला चतुर्थाश्रम घेऊनि गुरुचिये आज्ञे स्वयें चालिला । तो हा सद्‌गुरुराज श्रीनरहरी औदुंबरी राहिला ॥३ काषायांबर दंड हस्तकमलीं कमंडलु मेखला । भस्मोद्धुलित केवळा शशीकला रुद्राक्षमाळा गळा तीर्थाला करुनी पुनित सकळा पृथ्वीवरीं चालिला । तो हा सद्‌गुरुराज श्रीनरहरी औदुंबरी राहिला ॥४ मेरू सव्य करूनियां मनगती जातो कसा निर्गुणी । मायामोह त्यजुनि निर्मळ मनें तीर्थें बहू वंदुनी सुक्षेत्रापुर गाणगाप्रति गुरू तात्काळ जो पातला । तो हा सद्‌गुरुराज श्रीनरहरी औदुंबरी राहिला ॥५ स्थाने उत्तम शोधुनी त्रिभुवनीं नाहीं असे पाहुनीं । आला सत्वर पावला कुरुपुरीं एकांत राहे वनीं रजकें जाऊनि वंदिता प्रतिदिनीं राज्यास्पदी स्थापिला । तो हा सद्‌गुरुराज श्रीनरहरी औदुंबरी राहिला ॥६ होती ब्राह्मणि साठ वर्षे तिजसी कन्या-कुमारही दिधला । वांझ महिषीसी दुभविले फुलविले शुष्क काष्ठही तीराला अंत्यजामुखी वेदहीं पढविला त्रिविक्रमा भेटला । तो हा सद्‌गुरुराज श्रीनरहरी औदुंबरी राहिला ॥७ त्रैमूर्ती अवतार हा यतिवरा वेषा धरी मानवा । त्यासी जे नर लोक मूढ म्हणती होई यमा बांधवा जाणे कुंभजवंशी तो गुरुपदी कृष्णातटी पाहिला । तो हा सद्‌गुरुराज श्रीनरहरी औदुंबरी राहिला ॥८ एवं हे गुरूअष्टक प्रतिदिनी त्रिकाळ जे पठती । पापे नासती पुण्य पावति अतीं कीर्ती बहू वाढती विद्या गोधन संतती दृढमतीं सत्त्वें गुणे राहती । एवं नित्य करिती जे गुरुस्तुती अंति गती पावती तो हा सद्‌गुरुराज श्रीनरहरी औदुंबरी राहिला ॥९


॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥


Oct 19, 2021

श्री महालक्ष्मी-अष्टकं


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ 

॥ इन्द्र उवाच ॥

नमस्तेऽस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते । शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोऽस्तुते ॥१॥ नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयङ्करि । सर्वपापहरे देवि महालक्ष्मी नमोऽस्तुते ॥२॥ सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्टभयङ्करि । सर्वदुःखहरे देवि महालक्ष्मी नमोऽस्तुते ॥३॥ सिद्धिबुद्धिप्रदे देवि भुक्तिमुक्तिप्रदायिनि । मन्त्रमूर्ते सदा देवि महालक्ष्मी नमोऽस्तुते ॥४॥ आद्यन्तरहिते देवि आद्यशक्ति महेश्वरी । योगजे योगसम्भूते महालक्ष्मी नमोऽस्तुते ॥५॥ स्थूलसूक्ष्ममहारौद्रे महाशक्तिमहोदरे । महापापहरे देवि महालक्ष्मी नमोऽस्तुते ॥६॥ पद्मासनस्थिते देवि परब्रह्मस्वरूपिणि । परमेशि जगन्मातर्महालक्ष्मी नमोऽस्तुते ॥७॥ श्वेताम्बरधरे देवि नानालङ्कारभूषिते । जगत्स्थिते जगन्मातर्महालक्ष्मी नमोऽस्तुते ॥८॥ महालक्ष्म्यष्टकं स्तोत्रं यः पठेद्भक्तिमान्नरः । सर्वसिद्धिमवाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा ॥९॥ एककाले पठेन्नित्यं महापापविनाशनम् । द्विकालं यः पठेन्नित्यं धनधान्यसमन्वितः ॥१०॥ त्रिकालं यः पठेन्नित्यं महाशत्रुविनाशनम् । महालक्ष्मीर्भवेन्नित्यं प्रसन्ना वरदा शुभा ॥११॥

॥ इतीन्द्रकृतं श्रीमहालक्ष्म्यष्टकम् संपूर्णम् ॥


Jun 28, 2020

श्री गजानन महाराज (राजीमवाले) विरचित श्रीस्वामी समर्थ ध्यानाष्टक


॥ श्रीगणेशाय नम: ॥ ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॥ श्री स्वामी समर्थाय नमः ॥

भव्यमूर्ती कसा शोभे उंच धिप्पाड साजरा मोद होई जनांलागी मुखडा पाहता बरा ॥१ विशाल नेत्र कैसे ते कर्ण खांद्यास लागती गौरकांती जयाचे ते बाहू जानुस टेकती ॥२ लंबोदर पहा त्याचे गजास्या परी भासते वक्षस्थल तसे मोठे नास अव्यंग शोभते ॥३ रेशमासारखे ऐसे पाद ज्याचे अति मृदू ब्रह्मादि जाहले मुग्ध काय मी त्या मुखे वदू ॥४ एक रुद्राक्ष कंठी तो कौस्तुभापरी भासतो मोतियाच्या कुंडलाने कर्णही बहु शोभतो ॥५ तुलसीकाष्ठमाला ती वैजयंतीच दुसरी पहा ती योगीरायाची ज्ञानमुद्रा तशी बरी ॥६ कपाळी केशरी गंध कस्तुरीचा टिळा तसा कटी कौपिन लेवोनी स्वामिनाथ दिसे कसा ॥७ पूर्णावतार विष्णूचा बुद्धिग्रामासी पातला भक्त तारावया लागी यतीचा वेष घेतला ॥८ स्तोत्र हे स्वामीदासाचे नित्य कोणीही वाचील शीघ्र त्या स्वामीनाथाचा कृपावर्षाव होईल ॥९

इति श्री गजानन महाराज (राजीमवाले) विरचित श्री अक्कलकोट स्वामी समर्थ ध्यानाष्टक

श्री स्वामी समर्थार्पणमस्तु


May 8, 2019

श्री गुरुदत्तात्रेय अष्टक


श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

तापत्रयाने मम देह तापला । विश्रांति कोणी नच देतसे मला । दैवें तुझें हें पद लाधलें मला । दत्ता कृपासाऊली दे नमूं तुला ॥१॥ कामादि षडवैरी सदैव पीडिती । दुर्वासना अंग सदैव ताडिती । त्राता दुजा कोण न भेटला मला । दत्ता कृपासाऊली दे नमूं तुला ॥२॥ देहीं अहंता जडली न मोडवे । गृहात्मजस्त्रीममता न सोडवे । त्रितापदावानल पोळितो मला । दत्ता कृपासाऊली दे नमूं तुला ॥३॥ अंगी उठे हा अविचार दुर्धर । तो आमुचें तें बुडवीतसे घर । पापें करोनी जाळितों त्वरें मला । दत्ता कृपासाऊली दे नमूं तुला ॥४॥ तूंची कृपासागर मायबाप तू । तू विश्वहेतू हरि पापताप तू । न तूजवांचूनि दयाळु पाहिला । दत्ता कृपासाऊली दे नमूं तुला ॥५॥ दारिद्रयदावें द्विज पोळतां तया । श्री द्यावया तोडिसी वेल चिन्मया । तयापरी पाहि दयार्द्र तू मला । दत्ता कृपासाऊली दे नमूं तुला ॥६॥ प्रेतासि तू वांचविसी दयाघना । काष्ठासि तू पल्लव आणिसी मना । हें आठवी मी तरि जीव कोमला । दत्ता कृपासाऊली दे नमूं तुला ॥७॥ ह्या अष्टकें जे स्तविती तयावरि । कृपा करीं हात धरीं तया शिरीं । साष्टांग घालूं प्रणिपात बा तुला । दत्ता कृपासाऊली दे नमूं तुला ॥८॥ ॥ इति श्री प.प.वासुदेवानंदसरस्वतीविरचितं श्रीगुरुदत्तात्रेयाष्टकं संपूर्णम॥ ॥ श्रीगुरु दत्तात्रेयार्पणमस्तु ॥ ॥ श्री गुरुदेव दत्त ॥