Aug 31, 2021

श्री दत्तप्रभूंचा ध्यानमंत्र


॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥

॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥


दत्तात्रेयं शिवं शान्तमिन्द्रनीलनिभं प्रभुम् । आत्ममायारतं देवं अवधूतं दिगम्बरम् ॥१॥ भस्मोद्धूलितसर्वाङ्गं जटाजूटधरं विभुम् । चतुर्बाहुमुदाराङ्गं प्रफुल्लकमलेक्षणम् ॥२॥ ज्ञानयोगनिधिं विश्वगुरुं योगिजनप्रियम् । भक्तानुकंपितं सर्वसाक्षिणं सिद्धसेवितम् ॥३॥
एवं य: सततं ध्यायेत् देवदेवं सनातनम्
स मुक्त: सर्व पापेभ्यो नि:श्रेयसमवाप्नुयात् ॥४॥

भावार्थ : श्री दत्तात्रेय हे कल्याणकारक, शांत, इंद्रनील मण्याची कांतीप्रभा असलेले, आत्ममायेमध्ये अर्थात निजानंदी रममाण झालेले, अवधूत, दिगंबर आहेत. सर्वांग भस्माने चर्चित असलेले, जटा धारण केलेले, चतुर्भुज, विशाल, प्रसन्नचित्त, कमळाप्रमाणे नयन असलेले, ज्ञानयोगींचे शिरोमणी, या सकल विश्वाचे गुरु, योगिजनांना अतिशय प्रिय असणारे, भक्तांसाठी कृपेचा सागर असलेले, सर्वसाक्षी आणि अनेक सिध्दपुरुष ज्यांच्या चरणीं सेवाभूत असतात अशा या सर्वश्रेष्ठ श्री दत्तप्रभूंचे जो ध्यान करील, तो सर्व पापांतून मुक्त होऊन मोक्ष-सिद्धी प्राप्त करेल.

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥


॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 

॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥

॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥


Aug 30, 2021

श्रीमत प. प. श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचित बालाशिष स्तोत्र


श्रीगणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ 


श्रीदत्तपुराणात अनेक प्रासादिक स्तोत्रांचा समावेश आहे. त्यातीलच श्रीमत परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानन्दसरस्वती यांनी रचिलेले हे बालाशिष स्तोत्र अत्यंत प्रभावी आहे. नवजात शिशु, बालक, कुमार-कुमारीका या सर्वांचे दुष्ट नजरा, गोरज पीडा, भूतादि पीडा, ग्रहादि पीडा अशा सर्व प्रकारच्या पीडांपासून संरक्षण करणारे, तसेच व्याधीमुक्त करून आयुरारोग्य प्रदान करणारे हे अमोघ स्तोत्र दत्तभक्तांनी अवश्य नित्यपठणात ठेवावे.

स्वांशेनेदं ततं येन स त्वमीशात्रिनंदन ॥

मुञ्च मुञ्च विपद्भ्योsमुं रक्ष रक्ष हरे शिशुम् ॥१ प्रातर्मध्यंदिने सायं निशि चाप्यव सर्वतः दुर्दृग्गोधूलिभूतार्तिगृहमातृग्रहादिकान् ॥२ छिन्धिछिन्ध्यखिलारिष्टं कमण्डल्वरिशूलधृक् त्राहि त्राहि विभो नित्यं त्वद्रक्षालंकृतं शिशुम् ॥३ सुप्तं स्थितं चोपविष्टं गच्छन्तं क्वापि सर्वतः भो देवावश्विनावेष कुमारो वामनामयः ॥४ दीर्घायुरस्तु सततं सहओजोबलान्वितः इति श्रीमत परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचितः दत्तपुराणांतर्गत बालाशिषः स्तोत्र: संपूर्णः


डॉ. के. रा. जोशीरचित श्लोकात्मक अनुवाद:

तुझ्याच अंशे बाल निर्मिला अत्रिनंदना परमेशा ।

सर्व संकटे दूर करोनी रक्ष रक्ष हे जगदीशा ॥१

प्रातःकाली सायंकाली दिवसा रात्री केव्हाही ।

शिशुवरी तव कृपा असू दे चिंता त्याची तू वाही दुष्ट नजर त्या कधी न लागो ग्रहादि पिडा तू तोडी गोरजपीडा, भूतप्रपीडा तोडी, फोडी तू मोडी ॥२ त्रिशूलधारी हे परमेशा सर्व अरिष्टा छेदोनी । तुझ्या रक्षणे अलंकारिले बालक तू ही पाहोनी ॥३ अश्विनीवेषा हे जगदीशा कुमार माझा तू रक्षी झोपी जावो, उभा असो वा असो कुठेही तू साक्षी ॥४ दीर्घायु हे बालक होवो, ओजबलाने युक्त असो । मुमुक्षत्व तू मला देऊनी बालकचिंता तुला असो इति श्री. प. प. श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचितः बालाशिषः संपूर्णः


Aug 27, 2021

Gurucharitra Adhyay 13 श्रीगुरुचरित्र अध्याय - १३


श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम:नामधारक शिष्यराणा I लागे सिद्धाचिया चरणां I करसंपुट जोडूनि जाणा I विनवीतसे परियेसा II१II जय जया सिद्धमुनी I तूं तारक या भवार्णीं I सांगितलें ज्ञान प्रकाशोनि I स्थिर जाहलें मन माझें II२II गुरुचरित्रकथामृत I सेवितां तृष्णा अधिक होत I शमन करणार समर्थ I तूंचि एक कृपानिधि II३II गुरुचरित्र कामधेनु I सांगितलें तुम्हीं विस्तारोनु I तृप्त नव्हे माझें मनु I आणखी अपेक्षा होतसे II४II क्षुधेंकरूनि पीडिलें ढोर I जैसें पावे तृणबिढार I त्यातें होय मनोहर I नवचे तेथोनि परतोनि II५II एखादा न देखे तक्र स्वप्नीं I त्यासी मिळे क्षीर-बरणी I नोहे मन त्याचे धणी I केवीं सोडी तो ठाव II६II तैसा आपण स्वल्पज्ञानी I नेणत होतों गुरु-निर्वाणी I अविद्यामाया वेष्टोनि I कष्टत होतों स्वामिया II७II अज्ञानतिमिररजनीसी I ज्योतिस्वरूप तूंचि होसी I प्रकाश केलें गा आम्हांसी I निजस्वरूप श्रीगुरूचें II८II तुवां केले उपकारासी I उत्तीर्ण काय होऊं सरसी I कल्पवृक्ष दिल्हेयासी I प्रत्युपकार काय द्यावा II ९ II एखादा देता चिंतामणी I त्यासी उकार काय धरणीं I नाहीं दिधलें न ऐकों कानीं I कृपामूर्ति सिद्धराया II१०II ऐशा तुझिया उपकारासी I उत्तीर्ण नोहे जन्मोजन्मेसीं I म्हणोनि लागतसे चरणांसी I एकोभावेंकरोनियां II११II स्वामींनीं निरोपिला धर्म-अर्थ I अधिक झाला मज स्वार्थ I उपजला मनीं परमार्थ I गुरुसी भजावें निरंतर II१२II प्रयागी असतां गुरुमूर्ति I माधवसरस्वतीस दीक्षा देती I पुढें काय वर्तली स्थिति I आम्हांप्रती विस्तारावें II१३II ऐकोनि शिष्याचें वचन I सिद्धमुनि संतोषोन I मस्तकीं हस्त ठेवून I आश्वासिती तया वेळीं II१४II धन्य धन्य शिष्या सगुण I तुज लाधले श्रीगुरुचरण I संसार तारक भवार्ण I तूंचि एक परियेसा II १५II तुवां ओळखिली श्रीगुरुची सोय I म्हणोनि पुससी भक्तिभावें I संतोष होतो आनंदमय I तुझ्या प्रश्नेंकरूनियां II१६II सांगेन ऐक एकचित्तें I चरित्र गुरुचें विख्यातें I उपदेश देऊनि माधवातें I होते क्वचित्काळ तेथेंचि II१७II असतां तेथें वर्तमानीं I प्रख्यात झाली महिमा सगुणी I शिष्य झाले अपार मुनि I मुख्य माधवसरस्वती II१८II तया शिष्यांची नामें सांगतां I विस्तार होईल बहु कथा I प्रख्यात असतीं नामें सात I सांगेन ऐक एकचित्तें II१९II बाळसरस्वती कृष्णसरस्वती I उपेंद्र-माधवसरस्वती I पांचवा असे आणीक यति I सदानंदसरस्वती देखा II२०II ज्ञानज्योतिसरस्वती एक I सातवा सिद्ध आपण ऐक I अपार होते शिष्य आणिक I एकाहूनि एक श्रेष्ठ पैं II२१II त्या शिष्यांसमवेत I श्रीगुरू निघाले दक्षिणपंथ I समस्त क्षेत्रें पावन करित I आले पुन्हा कारंजनगरासी II२२II भेटी झाली जनकजननी I येवोनि लागताति चरणीं I चतुर्वर्ग भ्राते भगिनी I समस्त भेटिती स्वामिया II२३II देखोनियां श्रीगुरुमूर्तीसी I नगरलोक अत्यंत हर्षी I आले समस्त भेटीसी I पूजा करिती परोपरी II२४II घरोघरीं श्रीगुरूसी I पाचारिती भिक्षेसी I जाहले रूपें बहुवसी I घरोघरीं पूजा घेती II२५II समस्त लोक विस्मय करिती I अवतार हा श्रीविष्णु निश्चितीं I वेषधारी दिसतो यति I परमपुरुष होय जाणा II२६II यातें नर जे म्हणती I तें जाती नरकाप्रती I कार्याकारण अवतार होती I ब्रह्माविष्णुमहेश्वर II२७II जननीजनक येणें रीतीं I पूजा करिती भावभक्तीं I श्रीगुरू झाले श्रीपादयति I जातिस्मृति जननीसी II२८II देखोनी जननी तये वेळीं I माथा ठेवी चरणकमळीं I सत्यसंकल्प चंद्रमौळी I प्रदोषपूजा आली फळा II२९II पतीस सांगे तया वेळीं I पूर्वजन्माचें चरित्र सकळीं I विश्ववंद्य पुत्र प्रबळी I व्हावा म्हणोनि आराधिलें म्यां II३०II याचि श्रीपाद-ईश्वराचें I पूजन केलें मनोवाचें I प्रसिद्ध झालें जन्म आमुचें I साफल्य केलें परियेसा II३१II म्हणोनि नमिती दोघेजणीं I विनविताति कर जोडूनि I उद्धारावें या भवार्णी I जगन्नाथा यतिराया II३२II श्रीगुरू म्हणती तयांसी I एखादे काळी परियेसीं I पुत्र होय संन्यासी I उद्धरील कुळें बेचाळीस II३३II त्यासी शाश्वत ब्रह्मलोक I अचळ पद असे देख I त्याचे कुळीं उपजतां आणिक I त्यासीही ब्रह्मपद परियेसा II३४II यमाचे दुःखें भयाभीत I नोहे त्याचे पितृसंततींत I पूर्वज जरी नरकीं असत I त्यांसी शाश्वत ब्रह्मपद II३५II याकारणें आम्हीं देखा I घेतला आश्रम विशेखा I तुम्हां नाही यमाची शंका I ब्रह्मपद असे सत्य II३६II ऐसें सांगोनि तयांसी I आश्वासितसे बहुवसी I तुमचे पुत्र शतायुषी I अष्ट ऐश्वर्ये नांदती II३७II त्यांचे पुत्रपौत्र तुम्ही I पहाल सुखें तुमचे नयनी I पावाल क्षेम काशीभुवनी I अंतःकाळी परियेसा II३८II मुक्तिस्थान काशीपुर I प्रख्यात असे वेदशास्त्र I न करा मनी चिंता मात्र I म्हणोनि सांगती तये वेळी II३९II त्यांची कन्या असे एक I नाम तिचें 'रत्नाई ' विशेष I श्रीगुरूसी नमूनि ऐक I विनवीतसे परियेसा II४०II विनवीतसे परोपरी I स्वामी मातें तारीं तारीं I बुडोनि जात्यें भवसागरीं I संसारमाया वेष्टोनियां II४१ II संसार-तापत्रयासी I आपण भीतसें परियेसीं I निर्लिप्त करी गा आम्हांसी I आपण तपासी जाईन II४२II ऐकोनि तियेचें वचन I श्रीगुरू निरोपिताति आपण I स्त्रियांसी पतिसेवाचरण I तेंचि तप परियेसा II४३II येणें या भवार्णवासी I कडे पडती परियेसीं I जैसा भाव असे ज्यासी I तैसें होईल परियेसा II४४II उतरावया पैल पार I स्त्रियांसी असे तो भ्रतार I मनें करोनि निर्धार I भजा पुरुष शिवसमानी II४५II त्यासी होय उद्धार गति I वेदपुराणें वाखाणिती I अंतःकरणीं न करी खंती I तूंतें गति होईल जाण II४६II ऐकोनि श्रीगुरूचें वचन I विनवीतसे कर जोडून I श्रीगुरुमूर्ति ब्रह्मज्ञान I विनवीतसें अवधारीं II४७II तूं जाणसी भविष्यभूत I कैसें मातें उपदेशीत I माझें प्रारब्ध कवणगत I विस्तारावें मजप्रति II४८II श्रीगुरू म्हणती तियेसी I तुझी वासना असे तपासी I संचित पाप असे तुजसी I भोगणें असे परियेसा II४९II पूर्वजन्मीं तूं परियेसी I चरणीं लाथिलें धेनूसी I शेजारी स्त्रीपुरुषांसी I विरोधें लाविला कलह जाणा II५०II तया दोषास्तव देखा I तूंतें बाधा असे अनेका I गायत्रीसी लाथिलें ऐका I तूं सर्वांगीं कुष्ठी होशील II५१II विरोध केला स्त्रीपुरुषांसी I तुझा पुरुष होईल तापसी I तुतें त्यजील भरंवसीं I अर्जित तुझें ऐसें असे II५२II ऐकोनि दुःख करी बहुत I श्रीगुरुचरणीं असे लोळत I मज उद्धरावें गुरुनाथा त्वरित I म्हणोनि चरणीं लागली II५३II श्रीगुरु म्हणती ऐक बाळे I क्वचित्काळ असाल भले I अपरवयसा होतांचि काळें I पति तुझा यति होये II५४II तदनंतर तुझा देह I कुष्टी होईल अवेव I भोगूनि स्वदेही वय I मग होईल तुझ गति II५५II नासतां तुझा देह जाण I भेटी होईल आमुचे चरण I तुझें पाप होईल दहन I सांगेन क्षेत्र ऐक पां II५६II भीमातीर दक्षिण देशीं I असे तीर्थ पापविनाशी I तेथें जाय तूं भरंवसीं I अवस्था तुज घडलियावरी II५७II या भूमंडळीं विख्यात I तीर्थ असे अति समर्थ I गंधर्वपुर असे ख्यात I अमरजासंगम प्रसिद्ध जाण II५८II ऐसें सांगोनि तियेसी I श्रीगुरु निघाले दक्षिण देशीं I त्र्यंबक-क्षेत्रासी I आले, गौतमी-उद्भव जेथें II५९II शिष्यांसहित गुरुमूर्ति I आले नासिकक्षेत्राप्रती I तीर्थमहिमा असे ख्याति I पुराणांतरीं परियेसा II६०II तीर्थमहिमा सांगता I विस्तार होईल बहु कथा I संक्षेपमार्गे तुज आतां I सांगतसें परियेसीं II६१II त्या गौतमीची महिमा I सांगतां अपार असे आम्हां I बहिरार्णव-उदक उगमा I ब्रह्मांडाव्यतिरिक्त II६२II जटामुकुटीं तीर्थेश्वर I धरिली होती प्रीतिकर I मिळोनी समस्त ऋषीश्वर I उपाय केला परियेसा II६३II ब्रह्मऋषि गौतम देखा I तपस्वी असे विशेषा I व्रीहि पेरिले वृत्तीं ऐका I अनुष्ठानस्थानाजवळी II६४II पूर्वी मुनी सकळी I नित्य पेरूनि पिकविती साळी I ऐसे त्यांचे मंत्र बळी I महापुण्यपुरुष असती II६५II समस्त ऋषि मिळोनि I विचार करिती आपुले मनीं I ऋषिगौतम महामुनी I सर्वेश्वराचा मुख्य दास II६६II त्यासी घालितां सांकडें I गंगा आणील आपुलें चाडें I समस्तां आम्हां पुण्य घडे I गंगास्नानें भूमंडळी II६७II (श्लोक) या गतिर्योगयुक्तानां मुनीनामूर्ध्वरेतसाम् I सा गतिः सर्व जंतूनां गौतमीतीरवासिनाम् II६८II (टीका) ऊर्ध्वरेत मुनीश्वरांसी I कोटिवर्षे तपस्वियांसी I जे गति होय परियेसीं I ते स्नानमात्रें गौतमीच्या II६९II याकारणें गौतमीसी I आणावें यत्नें भूमंडळासी I सांकडें घालितां गौतमासी I आणितां गंगा आम्हां लाभ II७०II म्हणोनि रचिली माव एक I दुर्वेची गाय सवत्सक I करोनि पाठविली ऐक I गौतमाचे व्रीहिभक्षणासी II७१ II ऋषि होता अनुष्ठानीं I देखिलें धेनूसी नयनीं I निवारावया त्तक्षणी I दर्भ पवित्र सोडिलें II७२II तेचि कुश जाहलें शस्त्र I धेनूसी लागलें जैसे वज्रास्त्र I पंचत्व पावली त्वरित I घडली हत्या गौतमासी II७३II मिळोनी समस्त ऋषिजन I प्रायश्चित्त देती जाण I गंगा भूमंडळीं आण I याविणें तुम्हां नाहीं शुद्धि II७४II याकारणें गौतमऋषीं I तप केलें सहस्र वर्षी I प्रसन्न झाला व्योमकेशी I वर माग म्हणितलें II७५II गौतम म्हणे सर्वेश्वरा I तुवां देशील मज वरा I उद्धरावया सचराचरा I द्यावी गंगा भूमंडळासी II७६II गौतमाचे विंनतीसी I निरोप दिधला गंगेसी I घेवोनि आला भूमंडळासी I पापक्षालनार्थ मनुष्यांचे II७७II ऐसी गंगाभागीरथी I कवणा वर्णावया सामर्थ्य I याचि कारणें श्रीगुरुनाथ I आले ऐक नामधारका II७८II ऐसी गौतमीतटाकयात्रा I श्रीगुरू आपण आचरीत I पुढें मागुती लोकानुग्रहार्थ I आपण हिंडे परियेसा II७९II तटाकयात्रा करितां देख I आले श्रीगुरू मंजरिका I तेथें होता मुनि एक I विख्यात 'माधवारण्य' II८०II सदा मानसपूजा त्यासी I नरसिंहमूर्ति परियेसीं I देखता झाला श्रीगुरूसी I मानसमूर्ति जैसी देखे II८१II विस्मित होऊनि मानसीं I नमिता झाला श्रीगुरूमूर्तीसी I स्तोत्र करी बहुवसी I अतिभक्ती करूनियां II८२II (श्लोक) यद्दिव्यपादद्वयमेवसाक्षाद्, अधिष्ठितं देवनदीसमीपे I य उत्तरे तीरनिवासिरामो, लक्ष्मीपतिस्त्वं निवसन्स नित्यम् II८३II (ओंव्या) येणेंपरी श्रीगुरूसी I विनवी माधवारण्य हर्षी I श्रीगुरू म्हणती संतोषीं I तया माधवारण्यासी II८४II अत्यंतमार्गस्थितिमार्गरूपं, अत्यंतयोगादधिकारतत्त्वम् I मार्गं च मार्गं च विचिन्वतो मे मार्गोदयं माधव दर्शय ते II८५II (ओंव्या) ऐसें श्रीगुरु तयासी I आश्वासोनि म्हणती हर्षी I निजस्वरूप तयासी I दाविते झाले परियेसा II८६II श्रीगुरूचें स्वरूप देखोनि I संतोषी झाला तो मुनि I विनवीतसे कर जोडूनि I नानापरी स्तुति करी II८७II जय जया जगद्‌गुरु I त्रयमूर्तीचा अवतारू I लोकां दिससी नरु I परमपुरुषा जगज्योति II८८II तूं तारक विश्वासी I म्हणोनि भूमीं अवतरलासी I कृतार्थ केलें आम्हांसी I दर्शन दिधलें चरण आपुले II८९II ऐसेपरी श्रीगुरूसी I स्तुति करी तो तापसी I संतोष होऊन अति हर्षी I आश्वासिती तया वेळीं II९०II म्हणती श्रीगुरू तयासी I सिद्धि झाली तुझ्या मंत्रासी I तुज सद्गती भरंवसीं I ब्रह्मलोक प्राप्त होय II९१II नित्यपूजा तूं मानसीं I करिसी नृसिंहमूर्तीसी I प्रत्यक्ष होईल परियेसीं I न करीं संशय मनांत II९२II ऐसें सांगोनि तयासी I श्रीगुरू निघाले परियेसीं I आले वासरब्रह्मेश्वरासी I गंगातीर महाक्षेत्र II९३II तया गंगातटाकांत I श्रीगुरू समस्त शिष्यांसहित I स्नान करितां गंगेंत I आला तेथें विप्र एक II९४II कुक्षिव्यथा असे बहुत I तटाकीं असे लोळत I उदरव्यथा अत्यंत I त्यजूं पाहे प्राण देखा II९५II पोटव्यथा बहु त्यासी I नित्य करी तो उपवासासी I भोजन केलिया दुःख ऐसी I प्राणांतिक होतसे II९६II याकारणें द्विजवर I सदा करी फलाहार I अन्नासी त्यासी असे वैर I जेवितां प्राण त्यजूं पाहे II९७II पक्षमासां भोजन करी I व्यथा उठे त्याचे उदरीं I ऐसा किती दिवसवरी I कष्टत होता तो द्विज II९८II पूर्व दिवसीं तया ग्रामीं I आला सण महानवमी I जेविला मिष्टान्न मनोधर्मी I मासें एक पारणें केलें II९९II भोजन केलें अन्न बहुत I त्याणें पोट असे दुखत I गंगातीरीं असे लोळत I प्राण त्वरित त्यजूं पाहे II१०० II दुःख करी द्विज अपार I म्हणे गंगेंत त्यजीन शरीर I नको आतां संसार I पापरूपें वर्तत II१०१II अन्न प्राण अन्न जीवन I कवण असेल अन्नावीण I अन्न वैरी झालें जाण I मरण बरवें आतां मज II१०२II मनीं निर्धार करोनि I गंगाप्रवेश करीन म्हणोनि I पोटीं पाषाण बांधोनि I गंगेमध्यें निघाला II१०३II मनीं स्मरे कर्पूरगौर I उपजलों आपण भूमिभार I केले नाहीं परोपकार I अन्नदानादिक देखा II१०४II न करीं पुण्य इह जन्मांत I जन्मांतरी पूर्वी शत I पुण्यफळ नसे दिसत I मग हे कष्ट भोगीतसें II१०५II ग्रास हरितले ब्राह्मणाचे I किंवा धेनु-कपिलेचे I घात केले विश्वासियाचे I मग हे भोग भोगीतसें II१०६II अपूर्ती पूजा ईश्वराची I केली असेल निंदा गुरूची I अवज्ञा केली मातापितयांची I मग हे भोगीतसें II१०७II अथवा पूर्वजन्मीं आपण I केलें असेल द्विजधिक्कारण I अतिथी आलिया न घालीं अन्न I वैश्वदेवसमयासी II१०८II अथवा मारिलें वोवरांसी I अग्नि घातला रानासी I वेगळें सांडूनि जनक-जननींसी I स्त्रियेसहित मी होतों II१०९II मातापिता त्यजोनियां I असों सुखें जेवूनियां I पूर्वार्जवापासोनियां I मग हे कष्ट भोगीतसें II११०II ऐसीं पापें आठवीत I विप्र जातो गंगेंत I तंव देखिलें श्रीगुरूनाथें I म्हणती बोलवा ब्राह्मणासी II१११II आणा आणा त्या ब्राह्मणासी I प्राण त्यजितो कां सुखेसीं I आत्महत्या महादोषी I पुसों कवण कवणाचा II११२II श्रीगुरूवचन ऐकोनि I गेले शिष्य धांवोनि I द्विजवरातें काढोनि I आणिलें श्रीगुरूसन्मुख II११३II अनाथासी कल्पतरू I दुःखिष्टासी कृपासागरू I पुसतसे श्रीगुरू I तया दुःखिष्ट विप्रासी II११४II श्रीगुरू म्हणती तयासी I प्राण कां गा त्यजूं पाहसी I आत्महत्या महादोषी I काय वृतांत सांग आम्हां II११५II विप्र म्हणे गा यतिराया I काय कराल पुसोनियां I उपजोनि जन्म वायां I भूमिभार जाहलों असें II११६II मास-पक्षां भोजन करितों I उदरव्यथेनें कष्टतों I साहूं न शकें प्राण देतों I काय सांगू स्वामिया II११७II आपणासी अन्न वैरी असतां I केवीं वांचावें गुरुनाथा I शरीर सर्व अन्नगता I केवीं वांचूं जगद्‌गुरु II११८II श्रीगुरू म्हणती ब्राह्मणासी I तुझी व्यथा गेली परियेसीं I औषध असे आम्हांपासीं I क्षण एकें सांगों तुज II११९II संशय न धरीं आतां मनीं I भिऊ नको अंतःकरणीं I व्याधि गेली पळोनि I भोजन करीं धणीवरी II१२०II श्रीगुरूवचन ऐकोनि I स्थिर झाला अंतःकरणीं I माथा ठेवूनि श्रीगुरूचरणीं I नमन केलें तया वेळीं II१२१II इतुकिया अवसरीं I तया ग्रामींचा अधिकारी I विप्र एक अवधारीं I आला गंगास्नानासी II१२२II तंव देखिलें श्रीगुरूसी I येऊनि लागला चरणांसी I नमन केलें भक्तीसीं I मनोवाक्कायकर्मे II१२३II आश्वासोनि तये वेळीं I पुसती श्रीगुरू स्तोममौळी I कवण नाम कवण स्थळीं I वास म्हणती तयासी II१२४II ऐकोनि श्रीगुरूचें वचन I सांगतसे तो ब्राह्मण I गोत्र आपलें कौडिण्य I आपस्तंब शाखेसीं II१२५II नाम मज 'सायंदेव' असे I वास-स्थळ आपलें 'कडगंची'स I आलों असे उदरपूर्तीस I सेवा करितों यवनांची II१२६II अधिकारपणें या ग्रामीं I वसों संवत्सर ऐका स्वामी I धन्य धन्य झालों आम्ही I तुमचे दर्शनमात्रेसीं II१२७II तूं तारक विश्वासी I दर्शन दिधलें आम्हांसी I कृतार्थ झालों भरंवसी I जन्मांतरीचे दोष गेले II१२८II तुझा अनुग्रह होय ज्यासी I तरेल या भवार्णवासी I अप्रयत्नें आम्हांसी I दर्शन दिधलें स्वामिया II१२९II ( श्लोक ) गंगा पापं शशी तापं दैन्यं कल्पतरूस्तथा I पापं तापं च दैन्यं च हरेत्श्रीगुरुदर्शनम् II१३०II ( टीका ) गंगा देखितांचि पापें जाती I चंद्रदर्शनें ताप नासती I कल्पतरूची ऐसी गति I दैन्यावेगळा करी जाण II१३१II तैसे नव्हती तुमचे दर्शनगुण I पाप-ताप-दैन्यहरण I देखिले आजि तुमचे चरण I चतुर्वर्गफल पावलों II१३२II ऐशी स्तुति करूनि I पुनरपि लागला श्रीगुरूचरणीं I जगद्‌गुरु आश्वासोनि I निरोप देती तया वेळीं II१३३II श्रीगुरु म्हणती तयासी I आमुचें वाक्य परियेसीं I जठरव्यथा ब्राह्मणासी I प्राणत्याग करीतसे II१३४II उपशमन याचे व्याधीसी I सांगो औषध तुम्हांसी I नेवोनि आपुले मंदिरासी I भोजन करवीं मिष्टान्न II१३५II अन्न जेवितां याची व्यथा I व्याधि न राहें सर्वथा I घेऊनि जावें आतां त्वरिता I क्षुधाक्रांत विप्र असे II१३६II ऐकोनि श्रीगुरुंचे वचन I विनवीतसे कर जोडून I प्राणत्याग करितां भोजन I या ब्राह्मणासी होतसे II१३७II जेविला काल मासें एका I त्याणें प्राण जातो ऐका I अन्न देतां आम्हांसी देखा I ब्रह्महत्या त्वरित घडेल II१३८II श्रीगुरू म्हणती सायंदेवासी I आम्ही औषधी देतों यासी I अपूपान्न-माषेसीं I क्षीरमिश्रित परमान्न II१३९II अन्न जेवितां त्वरितेसीं I व्याधि जाईल परियेसीं I संशय न धरीं तूं मानसीं I त्वरित न्यावें गृहासी II१४०II अंगीकारोनि तया वेळीं I माथा ठेवी चरणकमळीं I विनवीतसे करुणाबहाळी I यावें स्वामी भिक्षेसी II१४१II अंगीकारोनि श्रीगुरुनाथ I निरोप देती हो कां त्वरित I सिद्ध म्हणे ऐक मात I नामधारक शिष्योत्तमा II१४२II आम्ही होतों तये वेळीं I समवेत शिष्य सकळीं I जठरव्यथेचा विप्र जवळी I श्रीगुरू गेले भिक्षेसी II१४३II विचित्र झालें त्याचे घरी I पूजा केली परोपरी I पतिव्रता त्याची नारी I 'जाखाई ' म्हणिजे परियेसा II१४४II पूजा करिती श्रीगुरूसी I षोडशोपचारे परियेसीं I तेणेचि रीती आम्हांसी I शिष्यां सकळिकां वंदिलें II१४५II श्रीगुरूपूजा-विधान I विचित्र केलें अतिगहन I मंडळ केलें रक्तवर्ण I एकेकासी पृथक्-पृथक् II१४६II पद्म रचूनि अष्टदळी I नानापरींचे रंगमाळी I पंचवर्ण चित्रमाळी I रचिली तियें परियेसा II१४७II चित्रासन श्रीगुरूसी I तेणेंचिपरी सकळिकांसी I मंडळार्चन विधीसी I करिती पुष्पगंधाक्षता II१४८II संकल्पोनि विधीसीं I नमन केलें अष्टांगेसीं I माथा ठेवूनि चरणीं, न्यासी I पाद सर्वही अष्टांगी II१४९II षोडशोपचार विधीसीं I पंचामृतादि परियेसीं I रुद्रसूक्तमंत्रेसीं I चरण स्नापिले तये वेळीं II१५०II श्रीगुरुचरणीं अतिहर्षी I पूजा करीत षोडशी I तया विप्रा ज्ञान कैसी I चरणतीर्थ धरिता झाला II१५१II तया चरणतीर्थासी I पूजा करीत भक्तीसीं I गीतवाद्यें आनंदेसीं I करी आरती नीरांजन II१५२II अनुक्रमें श्रीगुरुपूजा I करिता झाला विधिवोजा I पुनरपि षोडशोपचारें पूजा I करीतसे भक्तीनें II१५३II अक्षय वाणें आरती I श्रीगुरूसी ओंवाळिती I मंत्रघोष अतिभक्तीं I पुष्पांजळी करिता झाला II१५४II अनेकपरी गायन करी I नमन करी प्रीतिकरीं I पतिव्रता असे नारी I पूजा करिती उभयवर्ग II१५५II ऐसेपरी श्रीगुरूसी I पूजा केली परियेसीं I तेणेंची विधीं शिष्यांसी I आम्हां समस्तांसी वंदिलें II१५६II संतोषोनि श्रीगुरूमूर्ति I वर देती अतिप्रीती I तुझी संतती होईल ख्याति I गुरुभक्ति वंशोवंशी II१५७II तूं जाणसी गुरुचा वास I अभिवृद्धि होय वंशोवंश I पुत्रपौत्री नांदाल हर्षी I गुरुभक्ति येणेंपरी II१५८II ऐसें बोलोनि द्विजासी I आशीर्वचन देती अतिहर्षी I नमन करूनि श्रीगुरूसी I ठाय घातले तये वेळीं II१५९II नानापरींचे पक्कान्न I अपूपादी माषांन्न I अष्टविध परमान्न I शर्करासहित निवेदिलें II१६०II शाक पाक नानापरी I वाढताति सविस्तारीं I भोजन करिती प्रीतीकरीं I श्रीगुरुमूर्ति परियेसा II१६१II जठरव्यथेच्या ब्राह्मणें I भोजन केलें परिपूर्ण I व्याधि गेली तत्क्षण I श्रीगुरुचे कृपादृष्टीनें II१६२II परीस लागतां लोहासी I सुवर्ण होय परियेसीं I दर्शन होतां श्रीगुरूसी I व्याधि कैंची सांग मज II१६३II उदय जाहलिया दिनकरासी I संहार होतो अंधकारासी I श्रीगुरुकृपा होय ज्यासी I दैन्य कैंचे तया घरीं II१६४II ऐसेपरी श्रीगुरुनाथें I भोजन केलें शिष्यासहित I आनंद झाला तेथें बहुत I विस्मय करिती सकळै जन II१६५II अभिनव करिती सकळ जन I द्विजासी वैरी होते अन्न I औषध झालें तेंचि अन्न I व्याधि गेली म्हणताति II१६६II सिद्ध म्हणे नामधारकास I श्रीगुरुकृपा होय ज्यास I जन्मांतरीचे जाती दोष I व्याधि कैंची त्याचे देहीं II१६७II गंगाधराचा नंदन I सरस्वती सांगें विस्तारोनि I गुरुचरित्र कामधेनु I ऐका श्रोते एकचित्तें II१६८II जे ऐकती भक्तीनें I व्याधि नसती त्यांचे भुवना I अखिल सौख्य पावती जाणा I सत्यं सत्यं पुनः सत्यम् II१६९II

II इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे करंजनगराभिगमनं तथा विप्रोदरव्यथानिरसनं नाम त्रयोदशोSध्यायः II श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥


॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 

॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥

॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥


Aug 26, 2021

श्रीस्वामी समर्थ गुरूकथामृत - अध्याय ८


॥ श्रीगणेशाय नम:। श्रीसरस्वत्यै नम: । श्रीलक्ष्मीनृसिंहाय नम: । नारायण नमोस्तुते ॥१॥ मागील अध्यायीं वाचले । रावजीस आशीर्वाद दिधले । गोमती तीर्थ माहात्म्य कथिले । आणि निघाले तीर्थाटणा ॥२॥ नृसिंहस्वामी विश्वसंचारी । उद्धारास्तव तयांची फेरी । द्दश्याद्दश्य विश्वांतरी । प्रकट होती अकस्मात ॥३॥ निज भक्तांच्या आग्रहे कथिती । दत्तगुरुंची दिव्य महती । कमंडलू तीर्थाची महती । स्वामी वर्णिती सप्रेमे ॥४॥ कमंडलू या तीर्थावरी । दत्तगुरुंची वसे स्वारी । प्रल्हाद आणि अलर्कावरी । ज्ञान देऊनी करिती कृपा ॥५॥ गोरक्ष, मत्स्येंद्र आदि सारे । सिद्वपुरुषा निर्मिले खरे । प्रत्यक्ष परब्रह्म गुरुवरे । सिद्ध जाणती आत्मरुपा ॥६॥ नृसिंहस्वामी भक्तांसि वदती । कठिण कलियुगीं हो सांप्रती । दत्तात्रेय दर्शनास्तव करिती । नाना साधने भक्तजन ॥७॥ करीती कोणी अखंड जप । गुरुचरित्र पारायणे खूप । दत्तदर्शना अत्युग्र तप । करिती कुणी गिरिकंदरीं ॥८॥ वृक्षासि उलटे कुणी टांगुनी । बाहुद्वय ते उभारोनी । भूमीस एक तो पद ठेवुनी । घोर तपासी आचरती ॥९॥ वाढवोनी कोणी जटा । फासोनि रक्षा, करीं लोटा । कुणी घेती त्रिशूळ, चिमटा । अलख निरंजन वदती मुखे ॥१०॥ कटिस वेलिचा करदोटा । कसोनि हिंडती लंगोटा । जटाभार तो शिरी मोठा । जय दत्तदिगंबर गर्जती ॥११॥ लोहकंटक आसनावरी । राहती पडोनी ते दिनभरी । रुद्राक्षमाळा अंगावरी । धारण करोनी फिरती जगीं ॥१२॥ कांहीं वर्तस्थ ते राहती । कुणी पक्के मौन धरिती । कुणी गर्जना सदा करिती । गुरुदेव दत्त म्हणोनिया ॥१३॥ सभोवताली लावुनी धुनी । मग्न होती उग्र साधनी । प्रखर अग्नीवरि चालुनी । दाविती करितो घोर तप ॥१४॥ तपाचरणे किरकोळ सिद्धी । भविष्यकथने हो प्रसिद्धी । जडीबुटीची अल्प बुद्धी । सांगती जनां ही दत्तकृपा ॥१५॥ यात्रा करिती चारही धाम । अन्नोदकस्तव श्रीमंत ग्राम । निवडुनी साधिती आपुले काम । सांगती लोकां दत्तकृपा ॥१६॥ करोनिया नित्य मुंडण । कौपिन आणि कफनी घालुन । करी कटोरा तो घेऊन । भिक्षांदेही करिती सदा ॥१७॥ किमया थोडी साध्य करिती । दत्तकृपा ती हीच म्हणती । ब्रह्मज्ञान जनां वदती । मानिती आपणां वेदान्ती ॥१८॥ असे मी मोठा तपाचरणी । नसावी अशी विचारसरणी । अखंड असावी नम्र वाणी । मनीं असावे दत्तप्रेम ॥१९॥ देव घेई सेवा करोनी । हेचि माझे भाग्य मानुनी । जपतप करितो मी मी म्हणूनी । ऐसा नसावा अहंकार ॥२०॥ जडदेहरुप देवदर्शन । कलियुगीं या अशक्य म्हणून । संत-महंत होऊन । ईश्वर नांदे पृथ्वीवरी ॥२१॥ सर्वाअंतरीं एक परमात्मा । परदुःखाने तळमळे आत्मा । जयाचा त्यासी वदती महात्मा । सकल शास्त्रे वर्णिती ॥२२॥ दत्तगुरुंचा सत्य अवतार । नृसिंहस्वामी अवनीवर । जैशी जयाची इच्छा अपार । दर्शन देती त्या रुपे ॥२३॥ जाया पुढे उद्युक्त होती । हनुमंतधारी तीर्थावरती । भक्तजनांच्या आग्रहे करिती । वसती पवित्र क्षेत्रासी ॥२४॥ देखतां तेथली बजरंग मूर्ती । संतोषले अत्यंत चित्तीं । वाट तेथली सानुली ती । भोंवती दाटले अरण्य ते ॥२५॥ वनीं दरवळे पुष्पगंध । समीर वाहे मंद मंद । पक्षीगायनें रान धुंद । स्थान रमणीय वाटले ॥२६॥ पादचारी भक्त कित्येक । विरगी, तपस्वी, साधुलोक । भीमदर्शनें निमाली भूक । तृप्त मानस जाहले ॥२७॥ अनेक साधू संत तपती । स्वामी पाहता हर्ष चित्तीं । घालोनि दंडवत तयां नमिती । धन्य जाहले तद्‌दर्शने ॥२८॥ साष्टांग नमनांचा सोहळा । दुरोनि पाही एक पांगळा । हर्ष जाहला त्या आगळा । वाटे जावोनि वंदावे ॥२९॥ दुर्दैवी त्या पांगळयासी । जागेवरोनी उठायासी । नसे शक्यता म्हणोनि श्रींसी । प्रार्थना करी करुणा करा ॥३०॥ जन्मसिद्धहो मी पांगळा । पडलो इथे होऊनी गोळा । अन्नोदकही न मिळे वेळा । ऐसा असे मी हतभागी ॥३१॥ सर्वही जन वंदिती पाय । पांगळ्या वाटे हाय हाय । उठायाची शक्ति ना सोय । अरेरे! केवढा करंटा मी ॥३२॥ पातके केली काय न कळे । उठो जाता बळे बळे । देह भूमींवर कोसळे । स्वामी सेवा कैशी करु ॥३३॥ आर्त होउनी निज अंतरीं । करी आक्रंदन धावा हरी । तुम्हाविण प्रभू मला तारी । कोण त्रिभुवनीं समर्थ हो ॥३४॥ पामराचा न बघा अंत । दुर्बलाते वाचवा तात । नातरी माझा जन्म गर्तेत । जाईल ऐसे न घडावे ॥३५॥ आक्रंदता तो कंठ फुटला । आसवें नेत्रीं ती घळघळा । दया न केलिया अशा वेळा । प्राणार्पण करीन मी ॥३६॥ जाणुनी तयाची ती तळमळ । द्रवलें यतीचे ह्रदयकमळ । हांक मारिती अति प्रेमळ । ये ये उठोनी मजपाशी ॥३७॥ तव तो कर जोडुनी । उठवेना मातें स्थलावरुनी । सांगता कैसे ये ये म्हणुनी । चेष्टा न करा गरिबाची ॥३८॥ टवाळ, निंदक भोंवताली । वदती पांगळ्या बैसे स्थली । उठो जाता पडशील खाली । आणखी संकटीं पडशील ॥३९॥ जोगी यासम रे अनेक । नादी लाविती व्याकूळ लोक । चेटूक करिता, भुलताति लोक । फसता पस्तावती जन ॥४०॥ उठता उठता भूमीस पडता । रक्तबंबाळ होशील पुरता । घेशील करुनी घात नसता । ऐके आमुचा उपदेश ॥४१॥ स्वामी उच्च स्वरे वदती । अरे उठाया विलंब किती । संशय धरु नको चित्तीं । अल्प प्रयत्ने उठशील ॥४२॥ प्रयत्न करिता तो उठाया । तया हांसती बुवा, बाया । तोंचि पांगळा निघे जाया । आपुल्या यत्नें स्वामींकडे ॥४३॥ स्वामी सन्निध येतां स्वये । कवटाळिले चरणां तये । वाचवी मज गे माये । अश्रूंनी न्हाणिले चरणद्वय ॥४४॥ स्वामी तयासी गोंजारिती । न धरी कसली आतां भीती । कृपा केली रे तुजवरती । चिंता अंतरीं न करावी ॥४५॥ धावा ऐकता हदय द्रवले । पाहिजे पामरा उद्धरिले । विश्वासाचे फळ हे मिळे । ऐसे हवेति विश्वासू ॥४६॥ पांगळ्या पायावरी हात । फिरविता राहिला उभा ताठ । ऐसा न पाहिला कधीं संत । उभ्या जन्मांत मी कधी ॥४७॥ तयाची देखता उत्तम स्थिती । भयग्रस्त ते टवाळ होती । अरे हा ईश्वर ऐशी मती । जाहली तेधवा टवाळांची ॥४८॥ व्यर्थ निंदिले आपण अती । आम्ही न जाणिली योग्यता ती । क्षमा असावी आम्हांप्रती । साष्टांग नमने प्रार्थिती ॥४९॥ पश्चात्ताप पावतां जन । यतींचे जाहले मन प्रसन्न । निश्चिंत असणे हो आपण । कल्याण होईल सर्वांचे ॥५०॥ नेम सर्वानी पाळावे । संत-महंत न निंदावे । पारखोनी मात्र घ्यावे । संत-असंता दोघांही ॥५१॥ स्वर्ण समजुनी धरिता व्याळ । घात तेणेचि होय सकळ । सावध असणे सर्व काळ । साधाल तेणे निज हिता ॥५२॥ दिसते तैसे कदा नसते । हे न जाणल्या सदा फसते । सावध राहोनि वर्तवेते । आपुले हित साधाया ॥५३॥ हिरा म्हणोनी कांच वरिता । फसल्यावरी पस्तावता । विचारपूर्वक परीक्षा करिता । दुःख बाधेल ना कदा ॥५४॥ ऐसा यतींचा हितोपदेश । संतोषले जन विशेष । धर्मात्मा किंवा हा जगदीश । प्रकटला जणू स्थलासी या ॥५५॥ अवलोकिता साधुची शक्ती । करु लागले लोक भक्ती । दत्तावतार ही पवित्र उक्ती । मान्य जाहली सर्वासी ॥५६॥ गर्भांधासी दिली दृष्टी । पांगळ्यासी निकोप यष्टी । हर्ष पावले पूर्वीचे कष्टी । सामर्थ्य ऐसे स्वामींचे ॥५७॥ मूकांसि देती दिव्य वाणी । प्रकटे मुखीं वेदवाणी । ऐसे सामर्थ्य चक्रपाणी । तुमचे नृसिंहयतीश्वरा ॥५८॥ अनेक संत आले नि गेले । तयांचे म्या चरण धुतले । पंगुत्व परि ना लया नेले । एकाही साधु-संतानी ॥५९॥ कोणत्या जन्मीचा मला न कळे । पुण्यांश ठेवा मी दुर्बळे । होता ठेविला, तोंच कीं फळे । लाभती मातें श्रीचरण ॥६०॥ वर्णील आपणां असा ज्ञानी । सांप्रत मज ना दिसे कोणी । जिथे श्रमलिसे वेदवाणी । तिथे मज मतिमंदा बळ कोठचे ॥६१॥ पांगळा नामे गणेशपुरी । वदे समर्था परोपरी । आज आपुला मी श्रीहरी । ऋणी असे की चरणांचा ॥६२॥ चंचलभारती आनंदगिरी । सवे श्रीस्वामींची असे स्वारी । तयां संगे तो गणेशपुरी । गिरिवरी चढला लीलेने ॥६३॥ कृष्णानंद श्रीसरस्वती । रामपर्वत विश्वानंद यती । हेही असती त्यां संगती । पवित्र पर्वत चढावया ॥६४॥ जातां चढोनी तिथे बघती । बजरंगबलीची दिव्य मूर्ती । गणेशपुरीसह सर्व करिती । साष्टांग दंडवत बजरंगा ॥६५॥ कमंडलुतीर्थ ते नजिक । शोभा तेथली हर्षदायक । धर्मकर्मादि जन अनेक । करिती पावन व्हावया ॥६६॥ गिरनार नामे पर्वतावरी । असती अत्यंत उच्च शिखरी । दत्तात्रेयांच्या पादुका परी । स्वयंभू असती तेथे कीं ॥६७॥ तयांचे घेतां कीं दर्शन । पावन होती पापी जन । अपूर्व ऐसे ते महिमान । संत तेथील वर्णिती ॥६८॥ मूर्ती सिद्धिविनायकाची । मनोहर ती दिसे साची । दर्शन घडतां परमसुखाची । प्राप्ती होतसे तात्काळ ॥६९॥ मंदिरीं घंटानाद करितां । दिव्य आनंद हो चित्ता । भक्तांची ती भक्त्युत्कटता । उचंबळे कीं अनिवार ॥७०॥ जय जयदेवा श्रीगणेशा । तोडी आमुच्या मोहपाशा । अज्ञानाची हरुनी निशा । ज्ञान प्रकाशे उद्धरी गा ॥७१॥ स्वामी स्वये विश्वंभर । असतां परिवाराबरोबर । कासया प्रार्थना प्रभुसमोर । शंका मानसीं उपजेल ॥७२॥ प्रार्थना, सेवा वारंवार । व्हावया खरा आत्मोद्धार । अध्यात्ममार्गीं यत्न थोर । केलेचि पाहिजे भक्तांनी ॥७३॥ भक्तजनांसी ज्ञान द्याया । तत्वज्ञान मनीं ठसाया । भक्तकल्याण साधाया । स्वामी योजितो उपायांसी ॥७४॥ पवित्रस्थानी शिष्यांसवे । हिंडुनी देती अनुभव नवे । अद्‍भुत अनुभव घ्याया हवे । नित्य नूतन हिंडोनी ॥७५॥ अनुभवाविणे शब्दज्ञान । मना न देई समाधान । स्वामी समर्था शरण रिघुन । प्राप्त करोनि घ्यावे ते ॥७६॥ असो, ऐका पुढील कथन । वंदोनिया स्वामीचरण । पुढे निघाले जगज्जीवन । सवे घेऊनी अनुयायी ॥७७॥ गोमुख तीर्थासि ते आले । जगदंबेचे पद वंदिले । माता भवानी त्यांसि बोले । स्वामी समर्था इकडे कुठे ॥७८॥ सगुण रुप हे परब्रह्म । प्रत्यक्ष देखतां आज परम । हर्ष जाहला मज अनुपम । आदिमाये तुज देखतां ॥७९॥ सुहास्य वदने वदे माता । आता पुढे कुठे जाता । करित चाललो तीर्थयात्रा । सवें घेऊनी अनुयायी ॥८०॥ महन्मंगला जगदंबेसी । सांगोनि वदती निज शिष्यांसी । चलावे पुढे तीर्थाटनांसी । विविध ऐशा पावन स्थली ॥८१॥ गोरक्षनाथ ते महासिद्ध । अवघड नाथही अति प्रसिद्ध । आलिंगनीं स्वामीस बद्ध । केले तयें सत्प्रेमे ॥८२॥ अवर्ननीय कीं तयांची भेट । प्रेमोर्मींचा अपूर्व थाट । वर्णील ऐसा कोण भाट । शेषासही ते शक्य नसे ॥८३॥ समर्थचरणीं लोटांगण । घालुनी उभे कर जोडुन । गुह्याति गुह्य ते ज्ञान सांगुन । समर्थ घेती निरोपासी ॥८४॥ कमंडलू या तीर्थासमीप । देखता तयाचें प्रसन्न रुप । सर्वास जाहला हर्ष अमूप । त्रिकाल करिती स्नान तिथे ॥८५॥ पुष्पलतांनी वन दाटले । फळभारांनी वृक्ष लवले । पक्षीगण गायनीं रमले । दृश्य मनोहर स्वर्गीय ॥८६॥ अमृताहुनी मधुर अती । कमंडलू तीर्थाचे जल प्राशिती । तेणे तृषार्त तृप्त होती । वानिती त्या जलाशया ॥८७॥ वन्यफुलांचा दरवळे गंध । निर्झर धावती ते स्वच्छंद । खळखळ नादे होय धुंद । वनश्री ती सर्वही ॥८८॥ आजूबाजूस भव्य पर्वत । विलोकितां हो चित्त तृप्त । क्रीडती वनचरें तीं सर्वत्र । ऐसी नटली वनश्री ती ॥८९॥ गिरनार पर्वता महत्त्व थोर । महंत योगी, सिद्ध अपार । गुहेंत बसुनी साधने घोर । वर्षानुवर्षे करिताती ॥९०॥ इष्ट प्राप्तीचे समाधान । न मिळे म्हणोनी ऋषी खिन्न । गुहेंत होतां स्वामीदर्शन । ऋषीगण सारा आनंदला ॥९१॥ अहाहा! दयाळा श्रीसमर्था । आज लाधली कृतार्थता । दिव्य आपुला कर ठेविता । आपण आमुच्या मस्तकावरी ॥९२॥ विश्वव्यापका विश्वेश्वरा । द्यावा आम्हा निज आसरा । दिव्य स्वरुपी परमेश्वरा । गुहेंत वर्तणे आम्हा सवे ॥९३॥ परंतु स्वामी तयां वदती । जरा न वाटो मना खंती । सदैव आमुची असे प्रीती । सर्वांवरी हो सुनिश्चित ॥९४॥ अडल्या-नडल्या उद्धराया । जावे लागते अन्य ठाया । प्राप्तव्य त्यांते व्हाया । सांगणे लागते उपायासी ॥९५॥ स्वामी निघती मनोवेगे । ऋषी धांवती तयां मागे । अंतर्धान पावती जागे । कवणांसही ते दिसती ना ॥९६॥ समर्थ स्वामी कुठे जाती । जाणावया ते आतुर अति । श्रोतियांची मनोस्थिती । जाहली असे मी जाणतो ॥९७॥ असा श्रोते सावचित्त । पुढील अध्यायीं कथा स्तुत्य । शंकाकुशंका पावती अस्त । व्हाल वाचिता आनंदी ॥९८॥ इति श्रीस्वामीगुरुकथामृत । त्यांतील अध्याय पूर्ण होत । रामचंद्र गोविंद हे लिहित । स्वामीकृपे सर्वथा ॥९९॥ ॥ श्रीस्वामीसमर्थार्पणमस्तु ॥ सौजन्य : https://www.transliteral.org/


Aug 20, 2021

महर्षी अण्णासाहेब पटवर्धनविरचित श्रीगुरुपासष्टी


दत्तभक्तांसाठी पाचवा वेद असलेला श्री सरस्वती गंगाधर रचित श्री गुरुचरित्र या ग्रंथातील निवडक ६५ ओव्या म्हणजेच श्रीगुरुपासष्टी ! नित्यपठणाने श्री दत्तप्रभूंच्या कृपेची अनुभूती देणाऱ्या या प्रासादिक ओव्यांचे खास वैशिष्ट्य म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रांत थोर अधिकार असलेले महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांनी त्या संकलित केल्या आहेत.

श्रीगणेशाय नमः

मुख्य भाव कारण । प्रेमें करितां श्रवण पठण । निजध्यास आणि मनन । प्रेमें करोनि साधिजे ॥१॥ श्रीनृसिंह सरस्वती शंकर । त्याचे चरणीं अर्पण साग्र । त्याचेचि प्रसादें समग्र । समस्त प्रजा सुखी असती ॥२॥ ग्रंथ ठेवावा शुद्ध स्थानीं । शुद्ध वस्त्रीं शुद्ध मनीं । नित्य पूजा करोनि । ग्रंथ गृहामाजीं ठेवावा ॥३॥
हरये नमः । हरये नमः । हरये नमः ।
॥ श्री गणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्री गुरुभ्यो नमः ॥ श्रीकुलदेवतायै नमः ॥
॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ श्रीपाद श्रीवल्लभाय नमः ॥ श्रीनृसिंहसरस्वत्यै नमः ॥

ॐ नमोजी विघ्नहरा । गजानना गिरिजाकुमरा । जय जय लंबोदरा । एकदंता शूर्पकर्णा ॥४॥ हालविशी कर्णयुगुले । तेथूनि जो का वारा उसळे । त्याचेनि वातें विघ्न पळे । विघ्नांतक म्हणती तुज ॥५॥ तुझे शोभे आनन । जैसे तप्त कांचन । किंवा उदित प्रभारमण । तैसें तेज फाकतसे ॥६॥ विघ्नकाननच्छेदनासी । हाती फरश धरिलासी । नागबंद कटीसी । उरग यज्ञोपवीत ॥७॥ चतुर्भुज दिससी निका । विशालाक्षा विनायका । प्रतिपाळिसी विश्वलोका । निर्विघ्नें करूनिया ॥८॥ वत्सालागी धेनु । जैशी ये धावोनु । तैसे श्रीगुरु आपणु । आले जवळी ॥९॥ येतांचि गुरुमुनि । वंदी नामकरणी । मस्तक ठेवोनि । चरणयुग्मी ॥१०॥ केश तो मोकळी । झाडी चरणधुळी । आनंदाश्रुजळी । अंघ्री क्षाळी ॥११॥ ह्रदयमंदिरात । बैसवोनि व्यक्त । पूजा उपचारित । षोडशविधि ॥१२॥ आनंदभरित । झाला नामांकित । ह्रदयी श्रीगुरुनाथ । स्थिरावला ॥१३॥ भक्तांच्या ह्रदयांत । राहे श्रीगुरुनाथ । संतोष बहुत । सरस्वतीसी ॥१४॥
हरये नमः । हरये नमः । हरये नमः ।
प्रसिद्ध होसी वेळ दहा । उपर अवतार पूर्ण पहा । सहज तू विश्वात्मा महा । स्थूळ सूक्ष्मी वससी तू ॥१५॥ भक्ति करावी दृढतर । गंभीरपणे असावे धीर । तरीच उतरिजे पैलपार । इहपरत्री सौख्य पावे ॥१६॥ निजस्वरुप जननीसी । दाविता झाला परियेसीं । श्रीपादश्रीवल्लभ-दत्तात्रेयासी । देखते झाले जनकजननी ॥१७॥ त्रयमूर्तीचा अवतार । झाला नरहरी नर । निजरुपें दिसे कर्पूरगौर । पाहतां नमिलें चरणासी ॥१८॥ ज्ञानमूर्ती श्रीगुरुनाथ । सर्वांच्या मनीचे जाणत । यतीश्वर निंदा आपुली करीत । म्हणोनि ओळखे मानसी ॥१९॥ ज्ञानवंत श्रीगुरुमूर्ति । विश्वाच्या मनीचे ओळखती । नराधिपासी सांगती । निंदा करितो म्हणोनि ॥२०॥ होणार झाली ब्रह्मकरणी । काळासी जिंकिलें नाहीं कोणीं । जैसी ईश्वराची मांडणी । तेणेंपरी होतसे ॥२१॥ ब्रह्मलिखित न चुके जाण । जे जे भोगणे असेल आपण । घडे तैसे श्रुतिवचन । दुःख कोणी करू नये ॥२२॥ हरिश्चंद्र राजा देखा । डोंबाघरी वाहे उदका । बळी अजिंक्य तिही लोका । तोही पाताळा घातला ॥२३॥ सहस्त्रकोटी वर्षें ज्यासी । आयुष्य असे रावणासी । काळ तयाप्रति ग्रासी । दुर्योधना काय झाले ॥२४॥ भीष्म द्रोण इच्छामरणी । तेही पडले रणांगणी । परीक्षिती सर्पाभेणी । लपता काय झाले तया ॥२५॥ अनंत अवतार येणेपरी । होऊनि गेले संसारी । देव दानव येणेपरी । सकळ काळा आधीन ॥२६॥ या कारणें काळासी । कोणी जिंकिले नाही क्षितीसी । सकळ देवदानवांसी । काळ जिंकी निर्धारे ॥२७॥ काळा जिंकिता नाही कोणी । एका श्रीगुरुवाचोनि । भाव असे ज्याचें मनीं । त्यासी प्रत्यक्ष असे जाणा ॥२८॥ शेष म्हणे रे बाळा । तू आहेसी मन निर्मळा । तुमचे घरी सर्वकाळा । दैवत कवण पूजितसा ॥२९॥ ऐसे ऐकोनि राजकुमार । हर्षे जाहला निर्भर । सांगतसे विस्तार । आपुला देव शंकर देखा ॥३०॥ समस्त देवांचा देव । नाम ज्याचे सदाशिव । वामांगी उमा अपूर्व । त्यातें पूजितों निरंतर ॥३१॥ ज्यापासोनि जनिता ब्रह्मा । सृष्टि सृजितो अनुपमा । तो सदाशिव आम्हा । निज दैवत निर्धारें ॥३२॥ तयाच्या सत्त्वगुणे सृष्टीसी । विष्णु उपजला परियेसी । जीव पाळी निश्चयेसी । तो सदाशिव आराधितो ॥३३॥ ज्याच्या तामसगुणे जाण । एकादश रुद्रगण । उपजले प्रलयाकारण । उत्पत्ती स्थिती नाशाते ॥३४॥ धाता विधाता आपण । उत्पत्ति स्थिति लयाकारण । तेजासी तेज असे जाण। तोचि ईश्वर पूजितसों ॥३५॥ पृथ्वी-आप-तेजासी । जो पूर्ण वायु आकाशी । तैसा पूजितसों शिवासी । म्हणे राजकुमार देखा ॥३६॥ सर्वांभूती असे संपूर्ण । चिन्मय आपण निरंजन । जो रूपे असे अचिंतन । तो ईश्वर पूजितसों ॥३७॥ ज्याची कंथा व्याघ्राची । तक्षक शेष कुंडले ज्याची । त्रिनेत्रें सूर्यचंद्राग्नीची । मौळी चंद्र शोभत ॥३८॥ ऐसे ऐकोनि वचन । तक्षक संतोषला अतिगहन । राजकुमारा आलिंगोन । तुष्टलो तुष्टलो म्हणतसे ॥३९॥ ईश्वर म्हणे गिरिजेसी । गुरुभक्ति आहे ऐसी । एकभाव असे ज्यासी । सकळाभीष्‍टें पावती ॥४०॥ भवरूप हा सागर । उतरावया पैल पार । समर्थ असे एक गुरुवर । त्रिमूर्तींचा अवतार ॥४१॥ या कारणें त्रैमूर्ति । गुरुचरणीं भजती । वेदशास्त्रें बोलती । गुरुविणें सिद्धि नाहीं ॥४२॥
श्लोक ॥ यस्य देवे पराभक्तिर्यथा देवे तथा गुरौ । तस्यैते कथिता ह्यर्था: प्रकाशन्ते महात्मनः ॥४३॥
ऐसें ईश्वर पार्वतीसी । सांगता झाला विस्तारेंसी । म्हणोनि श्रीगुरु प्रीतीसी । निरोपिलें द्विजातें ॥४४॥ इतुकें होतां रजनीसी । उदय झाला दिनकरासी । चिंता अंधकारासी । गुरुकृपा ज्योती जाणा ॥४५॥ संतोषोनि द्विजवर । करिता झाला नमस्कार । ऐसी बुद्धि देणार । तूंचि स्वामी कृपानिधि ॥४६॥ नमन करुनि श्रीगुरुसी । विनवीतसे भावेंसी । स्वामी कथा निरोपिलीसी । अपूर्व मातें वाटलें ॥४७॥ काशीयात्राविधान । निरोपिलें मज विस्तारोन । तया वेळीं होतों आपण । तुम्हांसहित तेथेंचि ॥४८॥ पाहिलें आपण दृष्‍टान्तीं । स्वामी काशीपुरीं असती । जागृतीं कीं सुषुप्तीं । न कळे मातें स्वामिया ॥४९॥ म्हणोनि विप्र तये वेळीं । वंदी श्रीगुरुचरणकमळीं । विनवीतसे करुणा बहाळी । भक्तिभावेंकरोनिया ॥५०॥ आतां करीन नेम एक । जंव भेटेल लक्ष्मीनायक । श्रीमदनंत देखेन मुख । तंव अन्नोदक न घेई ॥५१॥ निर्वाण झाला तो ब्राह्मण । त्यजूं पाहे आपुला प्राण । अनंत अनंत म्हणोन । धरणीवरी पडियेला ॥५२॥ इतुकिया अवसरीं । वृद्ध ब्राह्मण वेषधारी । जवळ येवोनि हांक मारी । उठीं उठीं म्हणतसे ॥५३॥ उठ विप्रा काय पुससी । श्रीमदनंत कोठें असें विचारिसी । दाखवीन चल आम्हांसरसीं । म्हणोनि धरिलें उजवें करीं ॥५४॥ उठवूनिया कौंडिण्यासी । घेऊनि जाई गव्हरासी । नगरी पाहे अपूर्व तैसी । महदाश्चर्य पाहतसे ॥५५॥ घेऊनि गेला नगरांत । सिंहासन रत्नखचित । नेऊनि तेथें बैसवीत । आपण दाखवी निजस्वरुप ॥५६॥ रुप देखोनि कौंडिण्य । स्तोत्र करी अतिगहन । चरणीं माथा ठेवून । विनवीतसे कर जोडुनी ॥५७॥
" नमो नमस्ते गोविंदा । श्रीवत्सला सच्चिदानंदा । तुझे स्मरणमात्रें दुःखमदा । हरोनि जातीं सर्व पापें ॥५८॥ तूं वरेण्य यज्ञपुरुष । ब्रह्मा-विष्णु-महेश । तुझे दर्शनमात्रें समस्त दोष । हरोनि जातीं तात्काळीं ॥५९॥ नमो नमस्ते वैकुंठवासी । नारायण लक्ष्मीनिवासी । जगद्व्यापी प्रतिपाळिसी । अनंतकोटि ब्रह्मांडे ॥६०॥ पापी आपण पापकर्मीं । नेणों तुझी भक्ति धर्मीं । पापात्मा पापसंभव अधर्मी । क्षमा करीं गा गोविंदराया ॥६१॥ तुजवांचोनि आपण । अनाथ असें दीन । याचि कारणें धरिले चरण । शरणागत मी तुम्हांसी ॥६२॥ आजि माझा जन्म सफळ । धन्य माझें जिणें सकळ । तुझें देखिलें चरणकमळ । भ्रमर होवोनि वास घेतों " ॥६३॥
ऐसें स्तवितां कौंडिण्य । प्रसन्न झाला लक्ष्मीरमण । भक्तजन चिंतामणिरत्न । वरत्रय देता झाला ॥६४॥ धर्मबुद्धी दारिद्र्यनाश । शाश्वत वैकुंठनिवास । वरत्रय देत हृषीकेश । ऐक युधिष्ठिरा कृष्ण म्हणे ॥६५॥
हरये नमः । हरये नमः । हरये नमः ।
॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

Aug 16, 2021

स्वामीन् नमस्ते अक्कलकोटवासिन् - १


॥ श्री गणेशाय नम: श्री सरस्वत्यै नम: ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः

॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥

॥ ध्यानम् ॥
अजानुबाहु विशाल नेत्रम् । अनंत ब्रह्माण्डकार स्वरुपम् ॥
भक्त कामकल्पद्रुम कामधेनुम् । स्वामी समर्थ शिरस: नमामि ॥

दत्तभक्तहो, अनेक वाचकांनी श्री स्वामी चरित्र, त्यांच्या लीला याविषयीं लिहिण्याबद्दल सूचना/अभिप्राय पाठवले. तसे पाहतां, या अक्कलकोटनिवासी अवतारी पुरुषाच्या चरित्रावर आधारित श्रीगुरुलीलामृत, श्री स्वामी समर्थ सारामृत, श्री स्वामी समर्थ बखर, श्री स्वामी समर्थ गुरुकथामृत, श्री स्वामी समर्थ सप्तशती असे अनेक सिद्ध ग्रंथ रचले आहेत. तरीही, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अफाट चरित्र सागरांतून अनेक अमौलिक रत्ने, त्यांच्या काही लीला, स्वामीभक्तांना आलेल्या अनुभूती भक्तजनांपुढे मांडण्यासाठी एक उपक्रम घेऊन येत आहोत.
स्वामीभक्तहो, आपणही या उपक्रमात सहभागी होऊ शकता. करायचे एव्हढेच आहे की आपण आपली आवडती श्री स्वामी चरित्र कथा, लीला, बोधकथा आम्हांस ' संपर्क ' वापरून अथवा Email Us इथे कळवावी. आम्ही तुमचा नामनिर्देश करून त्या प्रकाशित करू. जेणे करून सर्व श्री स्वामी भक्तांना त्याचा लाभ होईल. महत्वाचे, आपले नांव प्रकाशित करण्यास आपली अनुमती नसेल तर कृपया प्रतिसादांत तसे स्पष्ट लिहावे.

जास्तीत जास्त भाविकांना हे श्री स्वामी चरित्र वाचता यावे, श्री स्वामी/दत्तभक्तीचा प्रसार व्हावा आणि स्वामींच्या लीलांचे मनन करीत आपण सर्वजण स्वामीकृपेत रंगून जावे, केवळ हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.  

काष्ठावर पादुका उमटल्या !
चिंतोपंत टोळ स्वामी समर्थांचे एकनिष्ठ भक्त बनले होते. श्रीसमर्थ म्हणजे साक्षात दत्तप्रभू अशा भावनेनेच त्यांची सेवा चालली होती. एकदा चिंतोपंतांनी आपल्या पूजेतील श्रीविष्णूमूर्तीला एक कोटी तुलसीपत्रे वाहण्याचा संकल्प केला. त्याचप्रमाणे ते दररोज नेमाने तुलसीपत्रे वाहत होते. केव्हा केव्हा श्रीसमर्थ पूजेच्या वेळी टोळाच्या घरी येत. त्यावेळी टोळ प्रसन्न चित्ताने भक्तिपूर्वक त्यांचीही पूजा करीत व त्यांच्या चरणी तुलसीपत्रे वाहून त्यांच्या चरणावर लोटांगण घालीत. एक दिवस श्रीसमर्थांची स्वारी अशीच पूजेच्या वेळी दत्त म्हणून टोळाच्या घरी उपस्थित झाली. टोळांनी त्यांची यथासांग पूजा केली. धूप-दीप-नैवेद्य दाखविला व त्यांच्या चरण कमलावर पवित्र तुलसीपत्रे वाहिली. त्या दिवशी श्रीसमर्थांची स्वारी विशेषच प्रसन्न दिसत होती. त्यांच्या तेजोमय मुखमंडलाभोवती चांदण्यासारखे आल्हादक आणि शांत तेज पसरलेले दिसत होते. पाद्यपूजा आटोपल्यावर चिंतोपंत डोळ्यात आसवे आणून म्हणाले, " महाराज, आपले परमपवित्र चरण पूजेसाठी निरंतर सन्निध असावेत अशी इच्छा आहे. " श्रीसमर्थ पाटावरून उठत म्हणाले, " ठीक आहे, तुझी मनोकामना पूर्ण होईल. " एवढे आश्वासन देऊन समर्थ निघून गेले. काही वेळाने चिंतोपंत पाटावर पाहतात तो पाटावर समर्थांचे दोन्ही चरण उमटलेले ! त्या अदभुत चमत्कार पाहून चिंतोपंतांना विलक्षण आश्चर्य वाटले व त्यांनी त्या चैतन्यमय पादुकांवर डोके ठेऊन त्यावर प्रेमाश्रूंचा अभिषेक केला. कुशल कारागीर अनेक हत्यारे उपयोगात आणून काष्ठावर कोरीव काम करतो; परंतु श्री समर्थांना हत्यारांची काय आवश्यकता ? संकल्प हेच त्यांचे हत्यार ! हल्ली सदरच्या प्रासादिक पादुका ज्या पाटावर उमटल्या आहेत, तो पाट अक्कलकोटास जोशीबुवांच्या मठात आहे.
|| श्री स्वामी समर्थ || || श्री गुरुदेव दत्त ||

सौजन्य- ll श्री अक्कलकोट स्वामी चरित्र ll लेखक- वि.के.फडके

Aug 6, 2021

मनन श्रीगुरुस्तवन स्तोत्राचे - ओवी १६ ते २०


॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
॥ ॐ श्री स्वामी समर्थाय नमः ॥
श्री आनंदनाथ महाराजाय नमः

तेथे मी लडिवाळ । खरे जाणिजे तुझे बाळ । म्हणवोनी पुरवि माझी आळ । माय कनवाळ म्हणविसी ॥१६॥ 

श्री स्वामी समर्थांचे ' अकारणकारुण्यमूर्ती ' असेही एक नाम आहे. श्री स्वामी महाराज अकारण म्हणजे कोणत्याही कारणाशिवाय आपल्या सद्-भक्तांवर कृपा करणारे आहेत. म्हणूनच श्री आनंदनाथ महाराज आपल्या श्रीगुरुंना प्रार्थना करतात, " हे गुरुराया, मी अज्ञानी, दुर्गुणी कसाही असलो तरी तुझेच लाडके बाळ आहे. लेकरांनी आईशिवाय कुणाकडे जावे बरें ? आपले मूल कसेही असले तरी आई त्याचे लाड करतेच. तू तर करुणेचा सागर आहेस, आपल्या भक्तांवर कृपावर्षाव करणारा दयाघन आहेस. तेव्हा, तू माझा हा हट्ट पूर्ण कर." श्री स्वामींच्या कृपेची अनुभूती येतेच, मात्र त्यासाठी भावही तितकाच निर्मळ, अनन्य शरणागतीचा हवा. ' जो जो मज भजें जैसा जैसा भावें, तैसा तैसा पावे मीही त्यासी ' या वचनाच्या प्रचितीचे असंख्य दाखले सद्गुरुंच्या चरित्रांत आढळतात.              


मी अन्यायी नानापरी । कर्मे केली दुर्विचारी । ती क्षमा करोनि निर्धारी । मज तारी गुरुराया ॥१७॥

हे स्वामीराया, समस्त अवगुण माझ्या ठायीं वास करून आहेत. दुष्ट वृत्ती आणि विचारांनी माझ्या मनाला ग्रासले आहे. अनेक वाईट वासना आणि विकारांनी अंध होऊन माझ्या हातून अगणित दुष्कर्मे घडली आहेत. कित्येकांवर मी जाणता-अजाणता अन्याय केले आहेत. तुला जे जे शरण आले, त्यांना तू नेहेमीच अभय दिले आहेस. हे दयानिधी, माझ्या सर्व अपराधांबद्दल मी तुझी मनापासून क्षमा प्रार्थित आहे. ‘ भक्तकाम कल्पद्रुम ’ असे तुझे बिरुद आहे, हे लक्षांत आणून माझा उद्धार कर. हे भक्तवत्सला, मला तुझ्या चरणीं आश्रय दे ! 


मनाचिया वारे । जे उठवि पापांचे फवारे । तेणें भ्रमे भ्रमलो बारे । चुकवि फेरे भवाचे ॥१८॥ 

माझे मन म्हणजे अनेक दुर्वासना, दोष यांचे आगरच आहे. तसेच, माझ्या मूढ बुद्धीमुळे अज्ञानवशात मी कधी तुझे स्मरण केले नाही. अनंत अपराध, पापकर्मे केल्यामुळे चौऱ्यांशी लक्ष योनींतून नाना क्लेश भोगत या भवसागरांत जन्म घेत राहिलो. हा दुर्लभ असा मनुष्य देह लाभल्यावरही माझ्या अल्प ज्ञानामुळे मी कधी तुझे ध्यान अथवा स्मरण  केले नाही. भोग-विषयांत रमल्यामुळे  माझ्या हातून कधी सत्कर्मे घडली नाहीत. वास्तविक पाहता, त्या परमात्म्याची प्राप्ती हीच नरजन्माची इतिकर्तव्यता आहे. मात्र ' आला आला प्राणी जन्मासि आला... ' अशीच स्थिती जन्मोजन्मी होत असते. हेच संचित-क्रियमाण माझ्या पुढील जन्मांस कारणीभूत होणार आहे. पाप-पुण्य आणि त्यांच्या परिणामांच्या चक्रातून, जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून मला मुक्त कर. हे दयाळा, ' लोटांगण घालिता मोक्ष लोळे पायात ' याची मला प्रचिती दे. तुझ्या कृपाकटाक्षाने माझ्या सर्व कर्मबंधनांचा नाश करून माझा उद्धार कर. 


कायिक वाचिक मानसिक । सर्व पापे झाली जी अनेक । ती क्षमा करुनी देख । मज तारी गुरुराया ॥१९॥ 

वेद-शास्त्रांत दहा प्रकारची पातके वर्णिली आहेत. कायिक पापे म्हणजे चोरी, हिंसा आणि परस्त्रीगमन होत. एखाद्याशी कठोरपणें बोलणे, असत्य अथवा खोटें बोलणें,  चहाडी करणे आणि शिव्या-शाप देणें अशी चार वाचिक पातके आहेत. मानसिक पापे म्हणजे इंद्रियांवाचून केलेली पापे - दुसऱ्यांच्या धनाचा अपहार करावा असे विचार, इतरांविषयी वाईट चिंतणे आणि देहाभिमान होत. हे गुरुराया, ही जी कायिक, वाचिक आणि मानसिक अशी पातके माझ्या हातून कळत-नकळत झालेली आहेत, त्याबद्दल मी तुझी क्षमा मागतो. हे कृपासिंधू, या माझ्या असंख्य कुकर्मांसाठी मला क्षमा कर. मी तुला पूर्णतः शरण आलो आहे, मला तुझ्या भवतारक चरणद्वयीं आश्रय दे अन माझा उद्धार कर !      


माता उदरी तुम्ही तारिले । ते विस्मरण जिवासी पडिले । हे क्षमा करोनि वहिले । मज तारी गुरुराया ॥२०॥

हे पूर्णब्रह्मा, मातेच्या उदरीं पूर्वजन्मींचे ज्ञान देऊन तुम्हीच रक्षण केले. जीवा-शिवाचे अद्वैतत्व अर्थात 'सोहं' ची मला जाणीव करून दिली.  तथापि, मातेच्या गर्भात मल-मूत्र-रक्त यांनी वेष्टित असा देह धारण केल्यावर मायेच्या प्रभावाने मी देहभाव स्वीकारला. या अज्ञानाच्या गर्तेत अडकल्यामुळे जन्म होताच कोहं कोहं म्हणू लागलो. हे दयाळा, या मूढ बालकावर तू सत्वर दया कर. मला तुझ्या चरणीं आश्रय दे अन माझा उद्धार कर !


॥ श्री स्वामी समर्थार्पणमस्तु ॥

॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥ 

क्रमश:


Aug 3, 2021

मनन श्रीगुरुस्तवन स्तोत्राचे - ओवी ११ ते १५


॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॥ ॐ श्री स्वामी समर्थाय नमः ॥

श्री आनंदनाथ महाराजाय नमः

कर्ण कुंडलाकृती । वदन पाहता सुहास्य मूर्ति । भ्रुकुटी पहाता मना वेधती । भक्त भाविकांचे ॥११॥
प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयांचा अवतार असलेले श्री स्वामी समर्थ यांचे स्वरूप अवर्णनीय आहे. त्यांच्या केवळ दर्शनाने भक्तांना अनिर्वचनीय असा आनंद होतो. आश्वासक, मंद सुहास्य असलेले त्यांचे वदन पाहताच भाविकांचे भान हरपते. मंगलमूर्तीप्रमाणे कुंडलाकृती विशाल कान, कोरीव भुवया आणि प्रेमळ तरीही तेजस्वी नजर असे हे परब्रह्म चैतन्य पाहता क्षणीच कोणाचे चित्त आकर्षित होणार नाही ?
भोवयांचा आकारू । जेथे भुले धनुर्धरु । ऐसे रूप निर्धारु । नाही नाही जगत्रयी ॥१२॥ सरळ दंड जानु प्रमाण । आजानुबाहु कर जाण । जो भक्तां वरद पूर्ण । ज्याचे स्मरणे भवनाश ॥१३॥
श्री स्वामी समर्थांच्या भुवयांचा आकार एखाद्या धनुष्याप्रमाणे कोरीवाकृती होता. त्यांच्यासारखे रेखीव, तेजस्वी रूप सर्व त्रैलोक्यांत इतरत्र कुठेही आढळणार नाही. श्री स्वामींची उंची सहा फुटांपेक्षाही अधिक होती. केळीच्या खांबासारखे सरळ लांब पाय, गुढघ्यापर्यंत पोहोचणारे लांब आजानुबाहु हात अशा अनेक दैवी लक्षणांनी युक्त अशी त्यांची तनु पाहताच भक्तांची दृष्टी खिळून राहत असे. सिद्ध किंवा अवतारी पुरुषांची जी शुभ लक्षणे वेदश्रुतींनी वर्णिलेली आहेत, ती सर्व स्वामी समर्थांच्या ठायीं होती. असा आपला हा वरदहस्त ते नेहेमीच भक्तांच्या मस्तकीं ठेवीत असत. गुडघ्यापर्यंत लांब असे हे हात सर्वव्यापकताही दर्शवतात. संपूर्ण स्थावर-जंगम अशा चराचराला व्यापून राहिलेल्या स्वामींचे हात भक्तांच्या उद्धारासाठी, रक्षणासाठी कोठेही पोहोचू शकतात. भक्तांनी केवळ स्मरण केले असता प्रगट होणारे, भक्तांसाठी धावत येणारे असे हे स्मर्तृगामी अवधूत आहेत. त्यांचे केवळ नाम घेतले असता या संसारतापापासून आपली सुटका होते.
ऐसा तू परात्परु । परमहंस स्वरूप सद्गुरू । मज दावुनि ब्रह्म चराचरू । बोलविला आधारू जगतासी ॥१४॥
असा तू परात्परू म्हणजेच परमात्मा, ईश्वर आहेस. तूच परमहंसरूपी सद्गुरू आहे. परमहंस ही एक योगमार्गातील सर्वोच्च अवस्था आहे. अशी अवधूत संन्यासावस्था प्राप्त करणारा महायोगीपुरुष गुणातीत तर असतोच, त्याच्या स्वरूपाचे वर्णन करणेदेखील शब्दातीत असते. हे प्रभो, सकल जीवांच्या उद्धारासाठी सदेह रूप धारण केलेले तू परब्रह्म चैतन्य आहेस. नाम, रूप, आकृती, स्थावर-जंगमादि सृष्टीमध्यें तूच अष्टधा प्रकृतीने नटलेला आहेस. या सकल ब्रह्मांडामध्ये तूच भरून राहिला आहेस. या सर्व जगताचा आधार आणि आश्रयदेखील तूच आहेस. तुझ्या या 'स्व' रूपाचे ज्ञान आणि दर्शन होताच स्वानंदरसाची तृप्ती अनुभवता येते. हे समर्था, माझ्यावर हा कृपानुग्रह करून या जगाच्या कल्याणासाठीच तू हे स्तवन रचण्याची मला प्रेरणा दिली.
ऐशा तुज स्तवुनी । मौन्य पावले सहस्त्रफणी । वेद श्वान होऊनी । सदा द्वारी तिष्ठती ॥१५॥
पुराणादिकांत कथन केल्यानुसार, आपल्या सहस्त्रमुखांनी स्तुती करण्यासाठी जो विशेष प्रसिद्ध आहे असा शेषही तुझे वर्णन न करू शकल्याने मौन झाला. हे गुरुराया, अगम्य असा तुझा महिमा गातांना जिथे वेदांनीही ' नेति नेति 'म्हणजे न-इती म्हणत गर्जून हात टेकले. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद या चार मुख्य वेदांमध्ये या सृष्टीच्या सूत्रांचे धर्मविषयक नियम विस्तारपूर्वक सांगितलेले आहेत. असे हे शुद्ध ज्ञानाने परिपूर्ण वेददेखील, श्वानरूप धारण करून तुझ्या द्वारी तिष्ठत उभे असतात. मग, मन-बुद्धी-वाचा यांना अगोचर असलेल्या या परमेश्वरी तत्त्वाचे वर्णन आम्ही अज्ञानी बालकांनी कसे करावे बरें ?

॥ श्री स्वामी समर्थार्पणमस्तु

॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

क्रमश: