Dec 31, 2018

नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति


महारुद्र जे मारूती रामदास ।

कलीमाजिं जे जाहले रामदास ।|

जनां उद्धराया पुन्हा प्राप्त होती ।

नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ १॥


महाराष्ट्री या माणगंगातीरातें ।

असे पुण्य गोंदवले क्षेत्र तेथें ।|

यजुर्वेदी विप्रगृहीं जन्म घेती

नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ २॥


न लिंपे कदा बालक्रीडाउपाधी ।

विवेके सदा ज्ञान वैराग्य साधी ।।

जया सद्गुरुभेटिची होय स्फूर्ती ।

नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ ३॥


समर्थानुयायी तुकाराम सिद्ध ।

जया पूर्ण वैराग्य अध्यात्मबोध ॥

तया प्रार्थुनी राममंत्रासी घेती ।

नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ ४॥


तपें तोषिला सद्गुरू ज्ञानियांचा ।

वदे वाढवीं पंथ या राघवाचा ।।

कलीमाजी मंदावली धर्मभक्ती ।

नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ ५॥


विदेहापरी चालवोनी प्रपंचा ।

मुमुक्षूजनांलागीं अध्यात्मचर्चा ।।

करोनी बहु लोक ते मेळवीती ।

नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ ६॥


जशी माऊली ग्रास देते मुलाला ।

तसे बोधुनि ज्ञान पाजी जनांला ।।

धरेसारिखी ज्यां वसे नित्य शांति ।

नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ ७॥


किती प्रार्थिती कामना पूर्ण व्हावया ।

किती भाविती देहव्याधी हराया ।।

कृपादृष्टीनें त्यांसि आनंद देती ।

नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ ८ ॥


जयें गोधना संकटीं रक्षियेलें ।

किती जीव अन्नोदकें तृप्त केलें ।।

बहू मंदिरें स्थापिलीं धन्य कीर्ती ।

नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ ९॥


बहू अज्ञ जीवांप्रती उद्धरीलें ।

तसे नास्तिकां सत्पथा लावियेलें ।।

समस्तामुखें नाम हे बोलवीती ।

नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ १०॥


तनू जीर्ण झाली, बहू कार्य केलें ।

रघूनायके शीघ्र पाचारियेलें ।।

तदा रामरूपीं समाधिस्थ होती ।

नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ ११॥


समाधी पहातां समाधान होते ।

तनू कष्टवी त्यासि आनंद देते ।।

मनी भाविता कामना पूर्ण होती ।

नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ १२॥


मुखें बोलवी सद्गुरू बुद्धीदाता ।

अहंभार हा वागवी कोणा माथा ।।

जडो भावना रामदासी सदा ती ।

नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ १३॥


हाचि सुबोध गुरूंचा ...


नाम सदा बोलावे, गावे भावे, जनांसि सांगावे ।

हाचि सुबोध श्रीगुरूंचा, नामापरते न सत्य मानावे ॥१॥


नामात रंगुनीया व्यवहारी सर्व भोग सेवावे ।

हाचि सुबोध श्रीगुरूंचा, भोगासंगे कुठे न गुंतावे ॥२॥


आंनदात असावे, आळस भय द्वेष दूर त्यागावे ।

हाचि सुबोध श्रीगुरूंचा, अनुसंधाना कधी न चुकवावे ॥३॥


गोड सदा बोलावे, नम्रपणे सर्वलोकप्रिय व्हावे ।

हाचि सुबोध श्रीगुरूंचा, भक्तीने रघुपतीस आळवावे ॥४॥


स्वांतर शुद्ध असावे, कपटाचरणा कधी न वश व्हावे ।

हाचि सुबोध श्रीगुरूंचा, मन कोणाचे कधी न दुखवावे ॥५॥


’माझा राम सखा, मी रामाचा दास’ नित्य बोलावे ।

हाचि सुबोध श्रीगुरूंचा, रामपाशी अनन्य वागावे ॥६॥


यत्न कसून करिन मी, यश दे, रामा, न दे तुझी सत्ता ।

हाचि सुबोध श्रीगुरूंचा, मानावा राम सर्वथा कर्ता ॥७॥


आचार संयमाने युक्त असा नीतिधर्म पाळावा ।

हाचि सुबोध श्रीगुरूंचा, खेळाएसा प्रपंच मानावा ॥८॥


दाता राम सुखाचा, संसारा मान तू प्रभूसेवा ।

हाचि सुबोध श्रीगुरुंचा, संतोषा सर्वादा मनी ठेवा ॥९॥


स्वार्थ खरा साधा रे, नित्य तुम्ही नामगायनी जागा ।

हाचि सुबोध श्रीगुरूंचा, मीपण जाळोनिया जगी वागा ॥१०॥


अभिमान शत्रु मोठा सर्वाना जाचतो सुखाशेने ।

हाचि सुबोध श्रीगुरूंचा, मारावा तो समूळ नामाने ॥११॥


राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धन मान ।

हाचि सुबोध श्रीगुरूंचा, भंगावे ना कदा समाधान ॥१२॥


प्रेमात राम रमतो, प्रेमाला मोल ना जगामाजी ।

हाचि सुबोध श्रीगुरूंचा, गुरुरायाला तहान प्रेमाची ॥१३॥


II  जानकीजीवनस्मरण जय जय राम II  


II श्री अनंतकोटी ब्रह्माण्डनायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय II 


II जय जय रघुवीर समर्थ II  


Dec 7, 2018

श्री गजानन महाराज बावन्नी




॥ श्री गणेशाय नमः ॥


जय जय सद्गुरू गजानना । रक्षक तुची भक्तजना ॥१॥ 

निर्गुण तू परमात्मा तू । सगुण रूपात गजानन तू ॥२॥

सदेह तू परि विदेह तू । देह असूनि देहातीत तू ॥३॥

माघ वद्य सप्तमी दिनी । शेगांवात प्रगटोनी ॥४॥

उष्ट्या पत्रावळी निमित्त । विदेहत्व तव हो प्रगट ॥५॥

बंकटलालावरी तुझी । कृपा जाहली ती साची ॥६॥

गोसाव्याच्या नवसासाठी । गांजा घेसी लावुनी ओठी ॥७॥

तव पदतीर्थें वाचविला । जानराव तो भक्त भला ॥८॥

जानकीरामा चिंचवणे । नासवुनी स्वरूपी आणणे ॥९॥

मुकिन चंदुचे कानवले । खाऊनि कृतार्थ त्या केले ॥१०॥

विहिरीमाजी जलविहिना । केले देवा जलभरणा ॥११॥

मधमाश्यांचे डंख तुवा । सहन सुखे केले देवा ॥१२॥

त्यांचे काटे योगबले । काढुनि सहजी दाखविले ॥१३॥

कुस्ती हरिशी खेळोनी । शक्ती दर्शन घडवोनी ॥१४॥

वेद म्हणुनी दाखविला । चकित द्रविड ब्राह्मण झाला ॥१५॥

जळत्या पर्यकावरती । ब्रह्मगिरीला ये प्रचिती ॥१६॥

टाकळीकर हरिदासाचा । अश्व शांत केला साचा ॥१७॥

बाळकृष्ण बाळापूरचा । समर्थ भक्तचि जो होता ॥१८॥

रामदासरूपे त्याला । दर्शन देवुनि तोषविला ॥१९॥

सुकलालाची गोमाता । द्वाड बहू होती ताता ॥२०॥

कृपा तुझी होतांच क्षणी । शांत जाहली ती जननी ॥२१॥ 

घुडे लक्ष्मण शेगांवी । येता व्याधी तूं निरवी ॥२२॥

दांभिकता परि ती त्याची । तू न चालवूनि घे साची ॥२३॥

भास्कर पाटील तव भक्त । उद्धरिलासी तू त्वरीत ॥२४॥

आज्ञा तव शिरसा वंद्य । काकहि मानति तुज वंद्य ॥२५॥

विहिरीमाजी रक्षियला । देवां तु गणु जव-याला ॥२६॥

पितांबराकरवी लीला । वठला आंबा पल्लविला ॥२७॥

सुबुद्धी देशी जोश्याला । माफ करी तो दंडाला ॥२८॥

सवडड येथील गंगाभारती । थुंकुनी वारिली रक्तपिती ॥२९॥

पुंडलिकांचे गंडांतर । निष्ठा जाणुनि केले दूर ॥३०॥

ओंकारेश्वरी फुटली नौका । तारी नर्मदा क्षणात एका ॥३१॥

माधवनाथा समवेत । केले भोजन उच्छिष्ट ॥३२॥

लोकमान्य त्या टिळकांना । प्रसाद तूंची पाठविला ॥३३॥

कवर सुताची कांदा भाकर । भक्षिलीस त्वा प्रेमाखातर ॥३४॥

नग्न बैसुनी गाडीत । लीला दाविली विपरीत ॥३५॥

बायजें चित्ती तव भक्ती । पुंडलिकावर विरक्त प्रीती ॥३६॥

बापुना मनी विठ्ठल भक्ती । स्वये होशि तू विठ्ठल मूर्ती ॥३७॥

कवठ्याच्या त्या वारक-याला । मरीपासूनी वाचविला ॥३८॥

वासुदेव यति तुज भेटे । प्रेमाची ती खुण पटे ॥३९॥

उद्धट झाला हवालदार । भस्मिभूत झाले घरदार ॥४०॥ 

देहांताच्या नंतरही । कितीजणा अनुभव येई ॥४१॥

पडत्या मजुरा झेलियले । बघती जन आश्चर्य भले ॥४२॥

अंगावरती खांब पडे । स्त्री वाचे आश्चर्य घडे ॥४३॥

गजाननाच्या अद्भुत लीला । अनुभव येती आज मितीला ॥४४॥

शरण जाऊनी गजानना । दु:ख तयाते करी कथना ॥४५॥

कृपा करी तो भक्तांसी । धावुनी येतों वेगेसी ॥४६॥

गजाननाची बावन्नी । नित्य असावी ध्यानीमनी ॥४७॥

बावन्न गुरूवारी नेमे । करा पाठ बहू भक्तीने ॥४८॥

विघ्ने सारी पळती दूर । सर्वसुखाचा येई पुर ॥४९॥

चिंता साऱ्या दूर करी । संकटातूनी पार करी ॥५०॥

सदाचार रत सद्भक्ता । फळ लाभे बघता बघता ॥५१॥

सुरेश बोले जय बोला । गजाननाची जय बोला ॥५२॥

सु. ग. शेवडे

(हे स्तोत्र प्रत्येक गजानन भक्ताने म्हणावे.)


श्री साई बावनी


॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ 


जय ईश्वर जय साईं दयाल, तू ही जगत का पालनहार ।

दत्त दिगंबर प्रभु अवतार, तेरे बस में सब संसार ।

ब्रह्माच्युत शंकर अवतार, शरणागत का प्राणाधार ।

दर्शन दे दो प्रभु मेरे, मिटा दो चौरासी फेरे ।

कफनी तेरी एक साया, झोली काँधे लटकाया ।

नीम तले तुम प्रकट हुए, फ़कीर बन के तुम आये ।

कलयुग में अवतार लिया, पतित पावन तुमने किया ।

शिर्डी गाँव में वास किया, लोगों का मन लुभा लिया ।

चिलम थी शोभा हाथों की, बंसी जैसी मोहन की ।

दया भरी थी आँखों में, अमृत धारा बातों में ।

धन्य द्वारका वह माई, समा गए जहाँ साईं ।

जल जाता है पाप वहां, बाबा की है धुनी जहाँ ।

भुला भटका मैं अनजान, दो मुझको अपना वरदान ।

करुणा सिन्धु प्रभु मेरे, लाखों बैठे दर पे तेरे ।

अग्निहोत्री शास्त्री को चमत्कार तुमने दिखलाया ।

जीवन दान शामा पाया, जहर सांप का उतराया ।

प्रलय काल को रोक लिया, भक्तों को भयमुक्त किया ।

महामारी को बेनाम किया, शिर्डीपुरी को बचा लिया ।

प्रणाम तुमको मेरे ईश, चरणों में तेरे मेरा शीश ।

मन की आस पूरी करो, भवसागर से पार करो ।

भक्त भीमाजी था बीमार, कर बैठा था सौ उपचार ।

धन्य साईं की पवित्र उदी, मिटा गयी उसकी क्षय व्याधि ।

दिखलाया तुने विट्ठल रूप, काकाजी जो को स्वयं स्वरुप ।

दामू को संतान दिया, मन उसका संतुष्ट किया ।

कृपानिधि अब कृपा करो, दीन दयालू दया करो ।

तन मन धन अर्पण तुमको, दे दो सदगति प्रभु मुझको ।

मेघा तुमको न जाना था, मुस्लिम तुमको माना था ।

स्वयं तुम बनके शिवशंकर, बना दिया उसका किंकर ।

रोशनाई की चिरागों से, तेल के बदले पानी से ।

जिसने देखा आँखों हाल, हाल हुआ उसका बेहाल ।

चाँद भाई था उलझन में, घोड़े के कारण मन में ।

साईं ने की ऐसी कृपा, घोडा वो फिर से पा सका ।

श्रद्धा सबुरी मन में रखो, साईं साईं का नाम रटो ।

पूरी होगी मन की आस, कर लो साईं का नित्य ध्यान ।

जान के खतरा तात्या का, दान दिया अपनी आयु का ।

ऋण बायजाका चूका दिया, तुमने साईं कमाल किया ।

पशुपक्षी पर तेरी लगन, प्यार में तुम थे उनके मगन ।

सब पर तेरी रहम नज़र, लेते सब की खुद ही खबर ।

शरण में तेरे जो आया, तुमने उसको अपनाया । 

दिए है तुमने ग्यारह वचन, भक्तों के प्रति ले कर आन ।

कण-कण में तुमहो भगवान, तेरी लीला शक्ति महान ।

कैसे करू तेरे गुणगान, बुद्धि हीन मैं हूँ नादान ।

दीन दयालु तुम हो दाता, हम सब के तुम हो त्राता ।

कृपा करो अब साईं मेरे, चरणों में ले लो अब तुम्हारें ।

सुबह शाम साईं का ध्यान, साईं लीला के गुणगान ।

दीन भक्ति से जो गायेगा, परम पद को वह पायेगा ।

हर दिन सुबह और शाम को, गाये साईं बावनी को ।

साईं देंगे उसका साथ, लेकर अपने हाथों में हाथ ।

अनुभव तृप्ति के यह बोल, शब्द बड़े हैं यह अनमोल ।

यकीन जिसने मान लिया, जीवन उसने सफल किया ।

साईं शक्ति विराट स्वरुप, मन मोहक साईं का रूप ।

गौर से देखो तुम भाई, बोलो जय सदगुरु साईं

॥ ॐ श्री साईनाथाय नमः ॥