॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ ऐं र्हीं क्लीं चामुण्डायै विच्चे ॥
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥
अवश्य वाचावे असे काही -
*** उपासना आदिशक्तीची - श्री दुर्गा सप्तशती, श्री देवी माहात्म्य ***
॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ ऐं र्हीं क्लीं चामुण्डायै विच्चे ॥
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥
अवश्य वाचावे असे काही -
*** उपासना आदिशक्तीची - श्री दुर्गा सप्तशती, श्री देवी माहात्म्य ***
॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ ऐं र्हीं क्लीं चामुण्डायै विच्चे ॥
नमोऽस्तु ते महादेवि शिवे कल्याणि शाम्भवि।
प्रसीद वेदविनुते जगदम्ब नमोऽस्तु ते ll१ll
हे प्रभू शिवशंकरांची शक्ति असलेली आदिमाया महादेवी, अखिल विश्वाचे कल्याण करणारी कल्याणी, शंभुची पत्नी शाम्भवि तुला माझे नमन असो. हे आदिशक्ति, सकल वेदही तुझी प्रार्थना करतात. तुझ्या कृपाप्रसादाचा लाभ मला प्राप्त व्हावा, हीच तुझ्या चरणीं प्रार्थना ! हे जगदम्बे, तुला माझा नमस्कार असो.
जगतामादिभूता त्वं जगत्त्वं जगदाश्रया ।
एकाप्यनेकरूपाऽसि जगदम्ब नमोऽस्तु ते ll२ll
या जगताचे मूळ स्वरूप असलेली तू आदिमाया आहेस. तू विश्वव्यापक असून या सर्व चराचर सृष्टीचा आश्रय आहेस. तू परमात्म्याची शक्ति असून अनेक रूपांत प्रगट होत असते. हे जगदम्बे, तुला मी नमन करतो.
सृष्टिस्थितिविनाशानां हेतुभूते मुनिस्तुते ।
प्रसीद देवविनुते जगदम्ब नमोऽस्तु ते ll३ll
हे महामाये, केवळ तुझ्याच संकल्पमात्रें या सृष्टीची उत्पत्ती, पालन आणि विनाश या प्रक्रिया होत असतात. हे भगवती, सर्व ऋषीमुनी तुझेच नित्य स्तवन करतात. सर्व देवही तुझ्या कृपेची प्रार्थना करतात. हे जगन्माते, माझ्यावर कृपादॄष्टी कर. हे जगदम्बे, तुला माझा नमस्कार असो.
सर्वेश्वरि नमस्तुभ्यं सर्वसौभाग्यदायिनि ।
सर्वशक्तियुतेऽनन्ते जगदम्ब नमोऽस्तु ते ll४ll
हे आदिशक्ति, तू सर्व चराचराची परमेश्वरी असून भक्तांना सर्व सौभाग्य प्रदान करणारी आहेस. तूच सर्व शक्तिस्वरूपिणी आहेस. हे जगदम्बे, तुला मी नमन करतो.
विविधारिष्टशमनि त्रिविधोत्पातनाशिनि ।
प्रसीद देवि ललिते जगदम्ब नमोऽस्तु ते ll५ll
हे भगवती, केवळ तुझ्या कृपादृष्टीनें सर्व अरिष्टांचे शमन होते आणि त्रिविध तापांचा नाश होतो. हे ललितादेवी, मला तुझा कृपाप्रसाद दे. हे जगदम्बे, तुला माझा नमस्कार असो.
प्रसीद करुणासिन्धो त्वत्तः कारुणिका परा ।
यतो नास्ति महादेवि जगदम्ब नमोऽस्तु ते ll६ll
हे जगज्जननी, तू करुणासागर आहेस. हे महादेवी, तू परमश्रेष्ठ असून तुझ्याइतके कृपाळू इतर कोणीही नाही. हे जगदम्बे, तुला मी नमन करतो.
शत्रून्जहि जयं देहि सर्वान्कामांश्च देहि मे । भयं नाशय रोगांश्च जगदम्ब नमोऽस्तु ते ll७ll हे भगवती, तुझ्या कृपेने आमच्या सर्व शत्रूंचा नाश होऊन आम्हांला जय प्राप्त व्हावा. आमच्या सकल अभीष्ट मनोकामना पूर्ण व्हाव्यात. तसेच भय आणि रोग यांचा नाश होऊ दे.(असे तू आम्हांस वरदान दे.) हे जगदम्बे, तुला माझा नमस्कार असो. जगदम्ब नमोऽस्तु ते हिते जय शम्भोर्दयिते महामते । कुलदेवि नमोऽस्तु ते सदा हृदि मे तिष्ठ यतोऽसि सर्वदा ll८ll हे जगन्माते तुला नमन असो. हे सकल विश्वाचे कल्याण करणारी महादेवांची मूळ प्रकृति शाम्भवी, तुझा जयजयकार असो. हे कुलस्वामिनी आदिशक्ति तुला मी नमस्कार करतो. माझ्या हृदयात तुझा नित्य वास राहो, हीच प्रार्थना ! तुलजापुरवासिन्या देव्याः स्तोत्रमिदं परम् । यः पठेत्प्रयतो भक्त्या सर्वान्कामान्स आप्नुयात् ll९ll तुळजापूरवासिनी भवानी देवीचे हे स्तोत्र अतिशय श्रेष्ठ असून जो भक्तिभावाने पठण करेल, त्याच्या सर्व मनोकामना श्री भगवतीच्या कृपेने निश्चितच पूर्ण होतील. ll इति श्री प. प. श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचितं श्रीतुलजापुरवासिन्या देव्याः स्तोत्रं संपूर्णम् ll
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥
॥ ॐ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ नमः शिवाय ॥
॥ ॐ ऐं र्हीं क्लीं चामुण्डायै विच्चे ॥
प्राचीन काळी ब्रह्मादि देवांनी माहेश्वरी दुर्गेची पुष्पादि विविधोपचारांनी विधीवत पूजा केली. त्यामुळे प्रसन्न झालेली आदिशक्ती, दुर्गतिनाशिनी दुर्गा सर्व देवांना म्हणाली, “ सुरांनो, तुमच्या उपासनेने मी प्रसन्न झाले आहे. तुम्हांला हवे ते वरदान मागा. ”
श्री दुर्गेचे हे आशीर्वचन ऐकून सर्व देवगण भक्तिपूर्वक म्हणाले, - ' हे आदिमाये, त्रैलोक्याला त्रास देणाऱ्या आमच्या शत्रूशी, महिषासुराशी तू युद्ध करून त्याचा वध केला आहेस. त्यामुळे हे सर्व जगत निर्भय झाले आहे. तुझ्या कृपेने आम्हांला पुन्हा स्वर्गाचे राज्य परत मिळाले आहे. आपल्या भक्तांचे तू नेहेमीच रक्षण करतेस, तुझ्या वरदानाने त्यांच्या शुभकामना सदैव फलित होतात. तेव्हा, आता तुझी कृपा अशीच आमच्यावर निरंतर राहो, याशिवाय आमचे काहीच मागणे नाही. तरीही, तू जर आम्हांला काही वरदान देऊ इच्छिते, तर एकच प्रार्थना आहे की हे भगवती, तू त्वरित प्रसन्न प्रसन्न होण्यासाठी संकटग्रस्त, दुःखी-कष्टी भक्तांनी तुझी कशी आराधना करावी ? हे परमेश्वरी, अत्यंत गोपनीय अशी ही तुझी कुठली उपासना आहे ?'
देवांची ही लोककल्याणकारी प्रार्थना ऐकून जगदंबा संतुष्ट होऊन म्हणाली, “ माझ्या बत्तीस नामांची ही नामावली सर्व प्रकारच्या संकटांचा सत्वर नाश करणारी आहे. तिन्ही लोकांमध्ये यांसारखे प्रभावी स्तोत्र नाही. हे स्तोत्र पठण करणारा माझ्या कृपेस पात्र होऊन निःसंशयपणे भयमुक्त होतो.”
ते मी तुम्हाला सांगते. -
दुर्गा दुर्गार्तिशमनी दुर्गापद्विनिवारिणी । दुर्गमच्छेदिनी दुर्गसाधिनी दुर्गनाशिनी ॥ दुर्गतोद्धारिणी दुर्गनिहन्त्री दुर्गमापहा । दुर्गमज्ञानदा दुर्गदैत्यलोकदवानला ॥ दुर्गमा दुर्गमालोका दुर्गमात्मस्वरूपिणी । दुर्गमार्गप्रदा दुर्गमविद्या दुर्गमाश्रिता ॥ दुर्गमज्ञानसंस्थाना दुर्गमध्यानभासिनी । दुर्गमोहा दुर्गमगा दुर्गमार्थस्वरूपिणी ॥ दुर्गमासुरसंहन्त्री दुर्गमायुधधारिणी । दुर्गमाङ्गी दुर्गमता दुर्गम्या दुर्गमेश्वरी ॥ दुर्गभीमा दुर्गभामा दुर्गभा दुर्गदारिणी । नामावलिमिमां यस्तु दुर्गाया मम मानवः ॥ पठेत् सर्वभयान्मुक्तो भविष्यति न संशयः॥ १ दुर्गा, २ दुर्गार्तिशमनी, ३ दुर्गापद्विनिवारिणी, ४ दुर्गमच्छेदिनी, ५ दुर्गसाधिनी, ६ दुर्गनाशिनी, ७ दुर्गतोद्धारिणी,
८ दुर्गनिहन्त्री, ९ दुर्गमापहा, १० दर्गमज्ञानदा, ११दुर्गदैत्यलोकदवानला, १२ दुर्गमा, १३ दुर्गमालोका,
१४ दुर्गमात्मस्वरूपिणी, १५ दुर्गमार्गप्रदा, १६ दुर्गमविद्या, १७ दुर्गमाश्रिता, १८ दुर्गमज्ञानसंस्थाना,
१९ दुर्गमध्यानभासिनी, २० दुर्गमोहा, २१ दुर्गमगा, २२ दुर्गमार्थस्वरूपिणी, २३ दुर्गमासुरसंहन्त्री,
२४ दुर्गमायुधधारिणी, २५ दुर्गमाङ्गी, २६ दुर्गमता, २७ दुर्गम्या. २८ दुर्गमेश्वरी,
२९ दुर्गभीमा, ३० दुर्गभामा, ३१ दुर्गभा, आणि ३२ दुर्गदारिणी
भगवती दुर्गेच्या या बत्तीस नामांचा जो पाठ करतो, तो संकटमुक्त आणि निर्भय होतो, असे आदिमायेचे आशीर्वचन आहे.
॥ श्रीदुर्गार्पणमस्तु ॥
॥ श्रीगणेशाय नमः ॥ ॐ ऐं र्हीं क्लीं चामुण्डायै विच्चे ॥
आतां नवमंत्रांचे स्तोत्र । सांगतों मी तुम्हां विचित्र । त्यांचे पठण करितां पवित्र । देवी प्रसन्न होतसे ॥ यांत जें जें मंत्र आले । त्यांचे अर्थ पूर्वीचि केले । व्यासेंचि हे निवडिले । अनुग्रहार्थ देवीच्या ॥ अथ स्तोत्रं या माया मधुकैटभ प्रमथनी या माहिषोन्मूलिनी । या धूम्रेक्षण चण्डमुंडमथनी या रक्तबीजाशनी । शक्तिः शुम्भनिशुम्भ दैत्यदलिनी या सिद्धिलक्ष्मीः परा । सा चण्डी नवकोटिमूर्तिसहिता मां पातु विश्वेश्वरी ॥ १ ॥ स्तुता सुरैः पूर्वमभीष्टसंश्रयात्तथा सुरेन्द्रेण दिनेषु सेविता । करोतु सा नः शुभहेतुरीश्वरी शुभानी भद्राण्यभिहंतु चापदः ॥ २ ॥ या सांप्रतं चोद्धतदैत्यतापितैरस्माभिरीशा च सुरैर्नमस्यते । करोतु सा नः शुभहेतुरिश्वरी शुभानि भद्राण्यभिहंतु चापदः ॥ ३ ॥ या च स्मृता तत्क्षणमेव हंति नः सर्वापदो भक्तिविनम्रमूर्तिभिः । करोतु सा नः शुभहेतुरीश्वरी शुभानि भद्राण्यभिहंतु चापदः ॥ ४ ॥ सर्वबाधाप्रशमनं त्रैलोक्यस्याखिलेश्वरि । एवमेव त्वया कार्यमस्मद्वैरिविनाशनम् ॥ ५ ॥ सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके । शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोऽस्तु ते ॥ ६ ॥ सृष्टिस्थितिविनाशानां शक्तिभूते सनातनि । गुणाश्रये गुणमये नारायणि नमोऽस्तु ते ॥ ७ ॥ शरणागतदीनार्तपरित्राणपरायणे । सर्वस्यार्तिहरे देवि नारायणि नमोऽस्तु ते ॥ ८ ॥ सर्वस्वरुपे सर्वेशे सर्वशक्तिसमन्विते । भयेभ्यस्त्राहि नो देवि दुर्गे नमोऽस्तु ते ॥ ९ ॥ यांत ध्यानाचा एक मंत्र जाण । पांचव्या अध्यायांतील तीन । अकराव्यांतील पांच प्रमाण । नवमंत्र या स्तोत्रीं ॥ जगन्मातेची पूजा करुन । हें स्तोत्र अवश्य करावें पठण । हें सप्तशतीचें सार जाण । व्यासें निवडोन काढिलें ॥ असो सप्तशतीचा पाठ । जयासी न करवे स्पष्ट । तेणें हे म्हणावें उत्कृष्ट । फळ सर्व मंत्रांचें ॥ एक करितां आवर्तन । सर्व सिद्धि प्राप्त जाण । नित्य द्विरावृत्ती करुन । पुत्र प्राप्त होतसे ॥ पीडा-उपसर्गाची शांती । नित्य करावी त्रिरावृत्ती । पंचावर्तनेंकरुनि निश्र्चितीं । ग्रहशांती होतसे ॥ महाभय जाहलें उत्पन्न । तरी करावें सप्तावर्तन । नवावर्तनें करितां जाण । वाजपेयफल असे ॥ राजा वश व्हावा म्हणोन । आणि सर्व ऐश्वर्यालागुन । अकरा आवर्तनें करावी जाण । अकरावृत्या काम्यसिद्धि । बारा आवर्तनें करितां । वैरिनाश होय तत्त्वतां ॥ बारा आवर्तनें करितां । वैरिनाश होय तत्त्वतां । चतुर्दश आवर्तनें करितां । स्त्रीपुरुष वश होतसे ॥ पंचदशावर्तनेंकरुन । सौख्य श्री प्राप्त होय जाण । पुत्रपौत्र धान्यादि धन । सोळा आवर्तनेंकरुनियां ॥ सतरा आवर्तनें करुन । मुक्त होय राजापासून । शत्रूचें व्हावया उच्चाटन । अष्टादश करावीं ॥ वीस आवर्तनें करुन । वनसंबंधी भयापासून । मुक्त होय न लागतां क्षण । यासी संशय असेना ॥ पंचवीस आवर्तनें करितां । बंधापासूनि होय मुक्तता । आतां शतावृत्यांचें तत्त्वतां । फळ ऐकें पार्वती ॥ महासंकट जाहलेम प्राप्त । किंवा चिकित्सा होतां निश्र्चित । क्षयरोग होता अद्भुत । शतावृत्ती कराव्या ॥ प्रजानाश कुलोच्छेद जाण । आयुष्यनाश असतां पूर्ण । शत्रुवृद्धि होतां प्रमाण । शतावृत्ती कराव्या ॥ व्याधिवृद्धि धननाश होत । तथा त्रिविध महोत्पात । अधिपातक होतां प्राप्त । शतावृत्ती कराव्या ॥ शतावृत्ती करितां पूर्ण । प्राप्त होय शुभलक्षण । सर्व मनोरथपूरक जाण । अष्टोत्तरशतावृत्ती ॥ सहस्त्रावर्तनें करितां । शताश्वमेधफल ये हाता । परंपरालक्ष्मी प्राप्त तत्त्वतां । मोक्षही होय निश्चयें ॥
श्री देवी सप्तशतीमधील काही सिद्ध संपुट मंत्र
संस्कृत सप्तशतीचे देख । सातशे मंत्रही सिद्धिदायक । तरी त्यांतूनि कारणिक । संक्षेपें सविधान सांगू पैं ॥
ज्ञानिनामपि चेतांसी हि सा । बलादाकृष्य मोहाय महामाया प्रयच्छति ॥
हा महामायेचा मोहिनीमंत्र । याचा जप पवित्र ।
अथवा प्रतिश्लोकीं पढतां सर्वत्र । जगत् वश्य होतसे ॥
स्वशत्रूसी व्हावें मरण । ऐसें मनीं वाटतां जाण ।संस्कृत सप्तशतीचे देख । सातशे मंत्रही सिद्धिदायक । तरी त्यांतूनि कारणिक । संक्षेपें सविधान सांगू पैं ॥
ज्ञानिनामपि चेतांसी हि सा । बलादाकृष्य मोहाय महामाया प्रयच्छति ॥
हा महामायेचा मोहिनीमंत्र । याचा जप पवित्र ।
अथवा प्रतिश्लोकीं पढतां सर्वत्र । जगत् वश्य होतसे ॥
स्वशत्रूसी व्हावें मरण । ऐसें मनीं वाटतां जाण ।
सर्वबाधाप्रशमनं त्रैलोक्यस्याखिलेश्वरि। एवमेव त्वया कार्यमस्मद्वैरिविनाशनम् ॥
हा मंत्र आधीं जपावा ॥
देवि प्रपन्नार्तिहरे प्रसीद प्रसीद मातर्जगतोऽखिलस्य । प्रसीद विश्वेश्वरि पाहि विश्वं त्वमीश्वरी देवि चराचरस्य ॥
हा मंत्र । लक्ष अथवा अयुतमात्र । किंवा जपतां सहस्त्र । सर्व आपदा नासती ॥
जयन्ती मङ्गला काली भद्रकाली कपालिनी ।
दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तु ते ॥
हा मंत्र महामारीनाशासाठी म्हणावा.
शरणागतदीनार्तपरित्राणपरायणे । सर्वस्यार्तिहरे देवि नारायणि नमोऽस्तु ते ॥
हा मंत्र जपतां निश्चित । सर्व कार्यसिद्धि होत । संशय न धरी सर्वथा ॥
करोतु सा नः शुभहेतुरीश्वरी शुभानि भद्राण्यभिहन्तु चापदः ।
हा अर्धमंत्र । याचा जप करितां पवित्र । सर्वकामाची सिद्धि शीघ्र । येणें होय निर्धारें ॥
एवं देव्या वरं लब्ध्वा सुरथ: क्षत्रियर्षभ: ॥
हा मंत्र । याचा जप करितां पवित्र । स्वाभीष्ट वरप्राप्ति सर्वत्र । येणें होय निर्धारें ॥
सर्वबाधाप्रशमनं त्रैलोक्याखिलेश्वरि । एवमेव त्वया कार्यमस्मद्वैरिविनाशनम् ॥
या मंत्राच्या लक्षजपें जाण । मंत्रीं सांगितलें फळ पूर्ण । प्राप्त होय निर्धारे ॥
दारिद्र्यदुःखभयहारिणि का त्वदन्या सर्वोपकारकरणाय सदाऽऽर्द्रचित्ता ॥
हा अर्धमंत्र । याचा जप करितां पवित्र । दारिद्र्यादिनाश सर्वत्र । येणेंकरुनि होतसे ॥
दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः स्वस्थैः स्मृता मतिमतीव शुभां ददासि ।
दारिद्र्यदुःखभयहारिणि का त्वदन्या सर्वोपकारकरणाय सदाऽऽर्द्रचित्ता ॥
देवि प्रपन्नर्तिहरे प्रसीद प्रसीद मातर्जगतोऽखिलस्य ।
प्रसीद विश्वेश्वरि पाहि विश्वं त्वमीश्वरी देवि चराचरस्य ॥
येणें दुःख । नाशे हेंही निवेदिलें ॥
रोगानशेषानपहंसि तुष्टा रुष्टा तु कामान् सकलानभीष्टान् ।
त्वामाश्रितानां न विपन्नराणां त्वामाश्रिता ह्याश्रयतां प्रयान्ति ॥
हा मंत्र निश्र्चित । जपतां सर्वरोगनाश होत ।
देहि सौभाग्यमारोग्यं देहि मे परमं सुखम् । रुपं देहि यशो जयं देहि यशो देहि द्विषो जहि ॥
आरोग्य आणि सौभाग्यप्राप्तीसाठी
सर्वबाधाविनिर्मुक्तो धनधान्यसुतान्वितः । मनुष्यो मत्प्रसादेन भविष्यति न संशयः ॥
सर्व बाधामुक्ती आणि धन-पुत्रादि प्राप्तीसाठी
करोतु सा नः शुभहेतुरीश्वरी शुभानि भद्राण्यभिहन्तु चापदः ।
आपत्ती निवारणार्थ आणि शुभ- कल्याणदायक
सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्तिसमन्विते । भयेभ्यस्त्राहि नो देवि दुर्गे देवि नमोऽस्तु ते ॥
भय निवारणार्थ
सर्वमङ्गलमङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तु ते ॥
सर्व कल्याणप्राप्तीसाठी
संदर्भ : रामबाबा वर्णेकररचित श्री देवी माहात्म्य मराठी ग्रंथ
श्री देवी उपासना ग्रंथ