Apr 28, 2022

॥ जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था ॥


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥

जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था । आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा ॥धृ.॥ छेली-खेडेग्रामीं तू अवतरलासी । जगदुद्धारासाठी, राया तू फिरसी । भक्तवत्सल खरा, तू एक होसी । म्हणूनी शरण आलो, तुझिया चरणांसी ॥१॥ त्रैगुणपरब्रह्म तुझा अवतार । याची काय वर्णू लीला पामर । शेषादिक शिणले, नलगे त्या पार । तेथे जडमूढ कैसा करु विस्तार ॥२॥  देवाधिदेव तू स्वामीराया । निर्जर मुनिजन ध्याती, भावे तव पाया । तुजसि अर्पण केली आपली ही काया । शरणागता तारी तू स्वामीराया ॥३॥ अघटित लीला करुनी जडमूढ उध्दरीले । कीर्ती ऐकुनी कानी चरणी मी लोळे । चरणप्रसाद मोठा, मज हे अनुभवले । तुझ्या सूता न लगे, चरणावेगळे ॥४॥
 ॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥

 



श्री स्वामी समर्थ मंत्रराज आणि प्रार्थना


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥

मंत्रराज
प्रत्यक्ष नृसिंह सरस्वतीचे । जे रुप श्रीपाद श्रीवल्लभाचे । अवधूत मूर्ती अवतार झाला । नमो सद्‌गुरु दत्त स्वामीपदांला ॥१॥  महाशक्ती जेथे उभ्या ठाकताती । जिथे सर्व सिद्धी, पदी लोळताती । असे सर्व सामर्थ्य तो हा समर्थ । परब्रह्म साक्षात गुरूदेव दत्त ॥२॥  प्रत्यक्ष घ्या रे गड्या अनुभवास । विश्वास तेथेची स्वामी निवास “स्वामी समर्थ” अशी मंत्र शक्ती । श्वासातही वास देई प्रचीती ॥३।। साक्षात् परब्रह्म परमात्मतेज । अवतार नामातला मंत्रराज । या कल्पवृक्षाचि सोडोनि छाया । नको भटकु रे साधका अन्य ठाया ॥४॥ पवित्र प्रेमाचे पारिजात फूल । एकदा फुलेल हे अन्तरात । देवपूजेसाठी तयाला ठेवावे । कधीही न हुंगावे वासनेने ॥५॥  सदा सर्वदा योग तुझा घडावा । तुझे कारणी देह माझा पडावा । उपेक्षू नको गुणवंता अनंता । रघुनायका मागणे हेचि आता ॥६॥ प्रार्थना 
दीनदयाळा श्रीगुरुराया अर्जी ही ऐका । जोडूनि कर हे विनवितसें तुज न मागे पैका ॥धृ.॥ आत्मस्वरूपी ध्यान निरंतर हें द्यावें मजला । प्रेमानंदे करून खरा हा देह अर्पिला तुजला ॥१॥  विश्वारंगी रंग खरा हा एकचि मजला भासो । सदया सदय हृदय निरंतर तुजला बा असो ॥२॥ देहा-देहीं देह विराला मग जीवा पार पाहे । आत्मस्वरूपीं रूप निरंतर रंगुनियां राहे ॥३॥ अनंतभुवनीं भरा भरली अवधी तव सत्ता । नाम वाणिनें घेतां जगिं हे हरली भवव्यथा ॥४॥ आनंदानें अर्जी केली घ्या पायापाशीं । नाम तुझें बा खरें बळें हें तारी जगतासी ॥५॥ 

॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥


Apr 26, 2022

श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्रं


॥ श्री गणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्री कुलदेवताभ्यो नमः ॥ श्री इष्टदेवताभ्यो नमः ॥ श्री ग्रामदेवताभ्यो नमः ॥ श्री स्थानदेवताभ्यो नमः ॥ श्री सर्वदेवदेवताभ्यो नमः ॥ श्री नवग्रहदेवताभ्यो नमः ॥ श्री मातापितृभ्यां नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ श्री अक्कलकोट स्वामी राजाय नमः ॥ सर्व गुणांचा नायक । बुद्धीज्ञानाचा दायक । अखिल विघ्नांचा हारक । गजानना मी नमितसे ॥१॥ नमन माझें मयुरेश्वरी । विद्यादेवी वागेश्वरी । ग्रंथ लिहावया मजवरी । कृपा करी जगदंबे ॥२॥ श्री गुरुदत्ता वंदीतसे । त्रिगुणाचा अवतार असे । कलियुगी जो नांदतसे । प्रगटरूप होऊनी ॥३॥ स्वामी दत्ताचा अवतार । सर्व भाविका आधार । करितो वंदन साभार । कृपा प्रसाद मिळावया ॥४॥ भिन्न विषयांचे भिन्न गुरू । त्यांच्या ठिकाणी धरुनी आदरू । वंदुनी तया मागतो वरू । कार्यसिद्धी व्हावया ॥५॥ मी तो आहे मतिहीन । परि इच्छा गावया तव गुण । तुझ्या नांवें स्तोत्र करून । सेवा करावी आपुली ॥६॥ नाहीं वाचन नाहीं लिखाण । नाहीं ज्ञान नाहीं घ्यान । कोणतें करू आकर्षण । तव प्रीति मिळावया ॥७॥ कामादि षड्रिपू छळिती । मायेनें गात्रें गळती । मनींचे मांडे मनीं राहती । निराशा ती चहूंकडे ॥८॥ मन चंचल वाऱ्यापरी । स्थिर होत नाहीं ध्यानावरी । तव कृपा नच हो जरी । व्यर्थ आयुष्य जाईल हें ॥९॥ संसारि सुख व्हावे म्हणुनी । अहोरात्र कष्टा करूनी । दुःख होतें शतगुणी । धन दौलत येतां परी ॥१०॥ नकळत आयुष्य चाललें । इंद्रियावरी ताबा न चले । किती एक निश्चयो ढळले । काय करावे न कळे ॥११॥ संसार यातना कठीण । कनक कांता मोह दारुण । किती पापें घडती हातून । स्मरतां भिती वाटतसे ॥१२॥ माझें माझें करितों निशिदिनी । परी विचारित नाहीं कोणी । सुखाचे असती सर्वधनी । व्यवहार हा जगींचा ॥१३॥ ज्ञानाच्या गोष्टी सांगती । आचारीं ज्या कधी न येती । मृगजळापरी सर्व भासती । तृप्ती कधी न होतसे ॥१४॥ स्वानुभवावाचून बोलती । उपदेशामृता पाजिती । परी भाव तो नाहीं चित्तीं । बोल तें फोल होतसे ॥१५॥ गर्वोक्तीने बोलतसे । सर्वांना तुच्छ मानीतसे । शहाणा काय तो मीच असे । मनीं ऐसे समजतो ॥१६॥ पुस्तकी ज्ञान वाचिलें । ज्ञानवंती सांगितलें । परी हृदयीं ठसावलें । काय करू महाराजा ॥१७॥ नियम केले बहुतापरी । न होतां यथासांग जरी । फलश्रुति नच ये करी । व्यर्थ कष्ट होत असे ॥१८॥ किती काळ नेत्रा मिटतो । तव मूर्ती ध्यानीं आणितो । परी न खोले अंतःचक्षू तो । उपाय कोणता करू मी ॥१९॥ नामस्मरण करितां जरी । कार्य होते भराभरी । ऐशी भाषा ऐकतो परी । अनुभव कां तो येईना ॥२०॥ वाचतो ऐकतो बहू ते । परी ध्यानीं मुळी न राहते । पाठ्य ते विसरुनी जाते । काय करावे समजेना ॥२१॥ पूर्वार्जित असती भोगाभोग । ते भोगण्यासि हा जन्मयोग । तरावयाचा कधीं ये सुयोग । कोणी कांहीं सांगेना ॥२२॥ पापपुण्याचा हिशोब न कळे । भ्रांत होते मन त्यामुळे । कार्याकार्यी नित्य गोंधळे । प्राणिमात्र या जगीं ॥२३॥ आयुष्य आले संपावया । हा जन्म जाईल की वाया । याची चिंता नित्य हृदया । स्वामी माते वाटतसे ॥२४॥ आतां करितो एक विनंती । गुणावगुणा नाणी चित्तीं । सदय हृदय धरुनी हातीं । हेतु सफल करावा ॥२५॥ अनन्यभावें शरण तुजशी । जागृती स्वप्नीं त्या वाचविशी । त्यांची चिंता नित्य वहासी । हे तो सर्वां ठाऊक ॥२६॥ तूं ही माता तूं ही पिता । पाळिता सर्वां सांभाळितां । सर्व संकटी रक्षणकर्ता । स्वामी अमुचा आहेस तूं ॥२७॥ केलें तें विसरूनि जाई । क्षमा करी मज लवलाही । शरण आलो तुज पाही । भेट द्यावी स्वामी मला ॥२८॥ तुझ्या नांवाची केली नौका । मध्ये बसुनी मारितो हाका । डळमळे तारू वाटे धोका । घे मज स्वामी परतीरा ॥२९॥ मी तो आहे पूर्ण अज्ञानी । परी शरण तुज लागोनी । पाही मज कृपा दृष्टीनी । धन्य होईल स्वामिया ॥३०॥ स्वामी केव्हां कोठे उद्भवले । हे तो कोणा नाही कळले । दत्तावतार मानियले । सर्व थोर विभुतींनी ॥ ३१ ॥ प्रथम दत्त श्रीपाद दुसरे । नृसिंह सरस्वती हे तिसरे । चवथे स्वामी साजरे । चार अवतार पुरुष हे ॥ ३२ ॥ तेजःपुंज कांति दिव्य । गौरवर्ण शरीर भव्य । आजानबाहू महाभाग्य । देहसौष्ठव न वर्णवे ॥३३॥ नासिका सरल कर्ण विशाल । छाती भरघोस गती चपल । कौपीन कधीं नग्न नवल । सर्व भाविका वाटतसे ॥३४॥ शिरोत्तम सुंदर भिवया । नेत्रकमल भरले कृपया । स्फटिक माला शोभे हृदया । कमरशोभा मेखला करी ॥३५॥ कमलैव चरण भासती । कांती पाहनि नेत्र दीपती । वदन शोभा चंद्रापरि ती । रेखीव सर्व स्वरूप तें ॥३६॥ स्वामीच्या त्या लीला बहुत । वर्णितो तेथें किंचित । तेणे वाढे भक्ति मनांत । हेतु साध्य व्हावया ॥३७॥ स्वामीने दृष्टी फिरविता । वांछित आपुले ये हाता । स्वामीतें शरण जाता । दुरित जाती पळोनी ॥३८॥ राव रंका मानी समान । वागवी सर्वां प्रेमें करून । करी भक्त शंका निरसन । न बोलतां क्रिया करोनी ॥३९॥ चोळाप्पा भक्ति शिरोमणी । आणिला स्वामी चिंतामणी । अर्पिता सर्वस्व तच्चरणी । स्वामी प्रकटरूप जाहले ॥४०॥ रहिले स्वामी चोळाप्पा घरीं । लीला केल्या बहतांपरी । घेऊनि परीक्षा परोपरी । सत्पात्र केले तयाते ॥४१॥ मोडी फोडी फेकुन देई । कृष्णवत केली नवलाई । चोळप्पा पत्नी होऊन आई । सांभाळिले ब्रह्मरूप ते ॥४२॥ चोळाप्पाची एकनिष्ठ भक्ति । दिल्या पादुका दिव्य शक्ति । झाली त्यांची सर्वत्र कीर्ति । दर्शनी मुक्तजन झालें ॥४३॥ बाळाप्पा स्वामीभक्त श्रेष्ठ । मानिली स्वामीसेवा इष्ट । सांगतो त्यांची अल्पशी गोष्ट । स्वामी लीला वर्णावया ॥४४॥ संसार सोडिला बाळाप्पाने । स्वानंद मिळाया स्वामी कृपेनें । केली पदयात्रा त्याने । अक्कलकोटी पातला ॥४५॥ अनन्य भावे सेवा केली । तहान भूक हरपली । सर्वस्व देतां विरक्त झाली । बाळाप्पाची वृत्ति पहा ॥४६॥ मारुनी चापटी पाठीवर । केले बाळाप्पा मन स्थिर । करावया भक्ति दृढतर । हंसध्वज चरित्र दाविले ॥४७॥ निर्लज्ज होऊनी सेवा करावी । हिशेब ठेवोनी जपमाळ घ्यावी । गुरु येता जवळी शंका नसावी । स्वामी बोलले बाळाप्पा ॥४८॥ बाळाप्पाची पाहुनी भक्ति । कृतकृत्य केले त्यास जगतीं । वाढली बाळाप्पाची कीर्ति । अक्कलकोटी मठ स्थापितां ॥४९॥ स्वामी सूत मुंबापुरीचे । महान भक्त श्री स्वामींचे । अलौकिक प्रेम हो त्यांचे । वर्णन कसे करूं मी ॥५०॥ हरीभाऊ त्यांचे मूळ नांव । जिल्हा रत्नागिरी इलिया गांव । गांवचे खोत दृढ स्वभाव । लहानपणा पासोनी ॥५१॥ नोकरीवरी संकट आले । स्वामी कृपें दूर झालें । तत्काळ अक्कलकोटी गेले । श्री स्वामीते भेटावया ॥५२॥ हात ठेवितां मस्तकावर । षड्रिपू ते गेले दूर । वैराग्य आले अनिवार । स्वामी कृपाप्रसादें ॥५३॥ दिल्या पादुका स्वामीसुतास । स्थापावया मुंबापुरीस । सोडोनि आपुल्या नोकरीस । लोककल्याणार्थ झटावे ॥५४॥ लुटवली घरदार संपत्ती । बोलावुनी ब्राह्मणाप्रती । धन्य धन्य ती तारका सती । शुभ्र वस्त्र तें नेसली ॥५५॥ घेतली हातात तुंबरी । घेवोनि स्वामी अंतरी । भजन करी निरंतरी । स्वामी अगाध लिलांचे ॥५६॥ दादा बुवा मोर पाखरूं । मस्तकी ठेवोनिया करू । विरक्त केलें देवोनि वरू । अघटित घटना करवली ॥५७॥ आनंदनाथ वालावलचे । मस्तकीं तुकडे डहाळीचे । पडता दर्शन स्वामींचे । अक्कलकोटी जाहले ॥५८॥ दिगंबर होवुनी राहिले । सहा वर्षे तप केले । अनुज्ञा होता निघाले । स्वामी मठ स्थापावया ॥५९॥ झाले स्वामी तया प्रसन्न । आत्मपादुका स्वयंपूर्ण । काढोनि दिल्या मुखांतून । आनंदनाथ धन्य झाला ॥६०॥ तात महाराज तीन वर्षाचें । झाले भक्त बाबुलनाथाचे । तीनवेळा दृष्टांत स्वामीचे । होतां गेले अक्कलकोटीं ॥६१॥ वडाखाली जातां पाहिले । श्रीशंकराने स्वामीस वंदिलें । तत्काळ स्वामीचरणां नमिलें । स्वामी सेवक जाहले ॥६२॥ बाळकृष्ण दादर मठाचे । पूर्ण नास्तीक मूळचे । उपदेश ऐकुनि ताताचे । स्वामींचे भक्त जाहले ॥६३॥ नित्यानंद भजनांत । वैराग्यें झाले सिद्धभक्त । स्वामी चरणीं अनुरक्त । नित्य राहिले बाळकृष्ण ॥६४॥ विष्णुबुवांचा गर्व हरला । स्वप्नीं विंचवाचा मारा केला । शरण येतां मुक्त झाला । खरा मार्ग दाखविला ॥६५॥ ठाकुरदास मुंबईचे । देऊनी भस्म लाकडाचे । कुष्ट गेलें तत्क्षणी त्यांचे । स्वामीभक्त तो जाहला ॥६६॥ दादासाहेब चिंचोरकर । कुष्ठ झालें मांडीवर । बघतां घाबरले फार । गेले शरण स्वामियां ॥६७॥ आंगठी पांढऱ्या खड्याची । घडवलेली सोन्याची । जरी होती बहु मोलाची । फेकून देण्या सांगितलें ॥६८॥ कुष्ट ते गेलें तात्कालिक । पाहूनि स्वामींचे कौतुक । जडली भक्ति अत्यंतिक । संसारी सुखी जाहले ॥६९॥ दामले वकील भक्तश्रेष्ठ । मुळव्याध झाली अनिष्ट । गोमुत्राने केली नष्ट । अक्कलकोटकी स्वामीनें ॥७०॥ अनुज्ञा मागे बंडास । शरण जाऊनी स्वामींस । नकार दिला जाणूनी दुःखास । वासुदेव बळवंताते ॥७१॥ चिंतोपंत आप्पाटोळ । स्वामीतें भजती सर्वकाळ । पूजार्थ देती स्वामी दयाळ । पाटावरी पादुका उमटवूनी ॥७२॥ राधानांवें कसबीण । रूपवती कलावंतीण ।। स्वामी दर्शना लागोन । आली भाग्य तें उदेलें ॥७३ ॥ स्वामीची कांती देखतां । पडे मोह तिच्या चित्ता । मिळावा नर भोक्ता । मनीं इच्छा जाहली ॥७४॥ जों जों स्वामींकडे पाही । कामातूर राधा होई । कटाक्षे इच्छा प्रगटवी । स्वामी कौतुक पाहती ॥७५॥ तिचा तो काम जावयाते । देई स्तना ब्राह्मणाते । बोलले स्वामी तियेतें । राधा आश्चर्य जाहली ॥७६॥ स्तन जातां विरक्त झाली । अनन्यभावें शरण गेली । काशीतें जाऊनी राहिली । स्वामींची सेवा करीत ॥७७॥ श्रीरामानंद बिडकर । हनुमानाचा भक्त थोर ।। विरक्त व्हावया लौकर । श्री स्वामीतें शरण गेले ॥७८॥ स्वामींचा लागतां छंद । बिडकरा जाहला आनंद । केलें भजन होऊनी धुंद । संवत्सर एक तयाने ॥७९॥ करण्या पाद संवाहनाते । बिडकर बैसले रात्रीतें । जानुमध्ये द्वय नागाते । फणा काढतां देखिलें ॥८०॥ निर्भयपणे सेवा केली । स्वामी उठले निद्रा झाली । क्रोधानें थप्पड दिली । जिंदा राक्षस बोलले ॥८१॥ बिडकर बेशुद्ध पडले । शुद्धीवर येतां ज्ञान झाले । प्रखर वैराग्य प्राप्त झाले । तेव्हापासूनि बिडकरा ॥८२॥ बोटे स्वामी चवदा वर्षांचे । प्रीतीपात्र चिदंबराचें । दर्शन घेण्या श्रीस्वामींचें । पायी चालत निघाले ॥८३॥ स्वामींसाठी पेढा घेतला । परी दर्शनी तल्लीन झाला । पेढा विसरातां घेतला । स्वामीने त्याच्या पासोनी ॥८४॥ नृसिंह सरस्वती आळंदीचे । प्रयोग करिती हटयोगाचे । मार्ग न मिळता समाधीचें । गेलें शरण स्वामींया ॥८५॥ लोक अज्ञा चक्र भेदाचा । सांगता योग शास्त्राचा । साधला योग समाधीचा । नृसिंह सरस्वतीतें ॥८६॥ समाधीने सिद्धी मिळाली । शिष्य परंपरा वाढली । कीर्ती सर्वत्र पसरली । साधु साधु म्हणोनी ॥८७॥ रावजी पाटील विठाबाई । स्वामी प्रसन्न पूर्व पुण्याई । अजब केली कारवाई । रामपूर ग्रामांमध्ये ॥८८॥ चाळीस माणसांचा नवस । फेडावया धरूनी उद्देश । स्वामी यावे जेवावयास । हात जोडोनी विनविले ॥८९॥ घातले मंगल स्नानांते । मनोभावे पूजिता श्रीतें । बोलले स्वामी दाम्पत्याते । भोजन सर्वां घालावे ॥९०॥ दाम्पत्य साशंकमनीं झालें । स्वामीनें तत्क्षणी जाणले । सर्वान्न आणाया सुचविलें । रावजी विठाबाईस ॥९१॥ देवी खंडोबादि टाक आणिले । अन्नामाजी ते ठेविले । अन्नपूर्णा पूजन करविले । पंक्ती बसविल्या जेवावया ॥९२॥ चार हजार वृंद जेविला । स्वामींचा जयजयकार झाला । अद्भुत चमत्कार पाहिला । आबाल वृद्ध जनांनी ॥९३॥ पाण्याच्या गुळण्या टाकिल्या । अग्निज्वाळा प्रदीप्त झाल्या । जैशा कां घृत आहुती दिल्या । होम कुंडा माझारी ॥९४॥ आला न्यावया काळपुरुष । बाबा जाधव भक्तास । धरी घट्ट स्वामी चरणास । सेवा पुरी करावया ॥९५॥ यमातें परत पाठविले । वृषभातें नेण्या सांगितले । जाधवातें वाचविले । वृषभ केला मुक्त तो ॥९६॥ इटगीचा रावण्णा वाणी । सर्प दंशे पडला धरणीं । मारिल्या हाका त्रिवार कर्णीं । उठला स्वामी प्रतापे ॥९७॥ श्री गुरुकाका महाराजांनें । नोकरी सोडली स्वामी आज्ञेनें । मठ स्थापिला प्रेमाने । गोवित्री गांवीं जाऊन ॥९८॥ गोवित्री गायत्रीचे स्थान । करावया अनुष्ठान । गायत्री मंत्राचे ज्ञान । लाधलें स्वामी कृपेनें ॥९९॥ लीला तो अगणित असती । परी किंचित दाविल्या स्तोत्रीं । त्या योगें ठसावें चित्तीं । स्वामी तो पूर्णावतार ॥१००॥ अनंत कोटी ब्रह्मांड नायक । न वर्णावे वर्णितां लौकीक । शरण आलो मारितो हाक । मार्ग तो मज दाखवी ॥१०१॥ ध्यानांत आणोनी स्वामीतें । पूजन करा एकाग्र चित्तें । लावोनी धूपदीप नैवेद्याते । आदरें स्वामींस अर्पावे ॥१०२॥ सुप्रभातीं शयन काळीं । स्तोत्र म्हणावे एकांत स्थळीं । येईल प्रेमाची उकळी । आनंदभाव दाटतील ॥१०३॥ भावे वंदुनी प्रार्थना करा । जयजय समर्था स्वामी वरा । कैवारी दीनांचा आसरा । स्वामी राया तूं असे ॥१०४॥ कर्तुमकर्तुं तुझी शक्ति । दुर्गुणाचीही सद्‌गुण मूर्ति । घडविशी तूं सहजगती । हें तो मी जाणतसे ॥१०५॥ कोणा कैसे उद्धरावे । ही तो रीति तुज ठावें । मज विषयी मी काय सांगावें । जाणतोसी तूं सर्व ॥१०६॥ या जगीचें महागूढत्व । उकलूनी दावी मज तत्त्व । किती तळमळती तव । भक्त, कृपा करी महाराजा ॥१०७॥ तूं अससी अक्कलकोटकीं । अज्ञानाच्या सारूनि पुटी । भवसागर परतटाकी । नेण्या समर्थ तूं एक ॥१०८॥ तूंचि मालक तूंचि चालक । भक्तांचा संकट निवारक । दुर्जनांचा संहारक । शरण आलो मी तुला ॥१०९॥ स्वामी समर्था तूंचि एक । दृढावला हाचि विवेक । तूंचि होई मार्गदर्शक । परमार्थ साधावयासी ॥११०॥ प्रतिदिनीं पाठ म्हणावया । स्फूर्ति दिली स्तोत्र करावया । समर्पण हे तव पाया । गोड करूनी ते घ्यावें ॥१११॥ जे जे म्हणतील या स्तोत्रातें । प्रेमें पाळुनी स्वयंमाते । त्यांची इच्छा पुरविण्यातें । स्वामी समर्थ आहेत ॥११२॥ संसारियासी सुख व्हावया । सर्व चिंता नष्ट व्हाया । आरोग्य संतती मिळावया । स्तोत्राधार तो होवो ॥११३॥ विद्यार्थियाला विद्या मिळावी । धनार्थीकडे संपत्ति यावी । मन:कामना पूर्ण व्हावी । स्तोत्र म्हणतां स्वामीराया ॥११४॥ नियमाने जे पाठ करिती । त्यांची चिंता स्वामी वहाती । दृढभाव असावा चित्तीं । मनीं संशय नसावा ॥११५॥ स्तोत्र म्हणतां एकाग्र मनीं । व्हावे नम्र स्वामी चरणीं । मूर्ति दिसेल नयनीं । जागृती स्वप्नीं प्रत्यक्ष ॥११६॥ स्तोत्रे व्हावें सर्वाचे कल्याण । न पडावी कशाची वाण । स्वार्थ परार्थ मिळवून । स्वामी समर्थ देतील ॥११७॥ स्वामींनी स्फूर्ति दिधली । भास्करें कृतिही केली । स्वामी चरणीं ठेविली । अगाध शक्ति स्वामींची ॥११८॥ ॥ इति श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्रं संपूर्ण ॥  ॥ शुभं भवतु ॥ सौजन्य - https://sanskritdocuments.org/


Apr 18, 2022

श्रीधर स्वामी नित्यपाठ


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

ॐ नमो भगवते श्रीधराय

 

जय जय श्रीगुरुमाऊली । तुझ्या कृपेची जिवा साऊली । तुजविण न कोणी वाली । भवतप्ताया ॥१

तूं नारी नरासी अभेद । सर्वात्मरूप आनंदकंद । तुज भजतां विषयछंद । नासोनि जाये ॥२ जय जय श्रीसद्‌गुरु । भवाब्धीचे तूं सुदृढ तारू । मज या पाववी पैलपारु । अनाथनाथा ॥३ अज्ञाननिशीच्या अंती । निजात्मरूपेची तुझी प्राप्ती । तूं चित्सुखसूर्य दिनराती । प्रकाशसी स्वप्रभे ॥४ ‘मी’ ‘माझे हे दयाळा । नुरवोनि प्रतिपाळी बाळा । उपेक्षा करू नेणसी कृपाळा । शरणागताची ॥५ माझे शरीर, इंद्रिये प्राण । सकळ वासनेसह हें मन । ससर्व कर्म बुद्धि ही जाण । अर्पियली तुज ॥६ तूं शुद्ध, बुद्ध, सच्चिदानंद । निष्कलंक निर्लेप अभेद । स्वरूपबोधे नाशिसी खेद । शरणागताचा ॥७ मज दीना अभय द्यावें । माया निर्मुक्त मज करावे । भवभय घालवूंनि न्यावें । मज निजधामा ॥८ बाधा कसलीहि नसावी । सकळ आपदा नष्ट व्हावी । निर्विघ्नपणेचि गा मज मिळवी । ब्रह्मपदी तुझ्या ॥९ तूं निराकार ब्रह्म निर्गुण । होसी बा ! साकार आणि सगुण । सद्‌गुरुरूपे आले कळून । आम्हा सोडविण्या ॥११ जय जयाजी दीनदयाळा । घालवी संसारसुखाचा हा चाळा । मिळवी निजरूपीं निर्मळा । शिघ्रचि आता ॥११ माया अविद्येहूनि पर । जीवेशी कल्पना विदूर । सृष्टिस्थितिलयादि वेव्हार । तुजमाजी नसे ॥१२ गुरुराया ! तूं आमचे स्वरूप । अरूप सुखसमुद्र अमूप । अद्वय तव चिद्रूपी ऐक्यरूप । आम्ही सर्वदा ॥१३ सदाचारे श्रीगुरुभक्ति युक्त । नित्यपाठ करता होई मुक्त । तेरा ओव्या या श्रीधरोक्त । भवदुःख विनाशिती ॥१४


आदिनारायणं विष्णूं ब्रह्माणं च वसिष्ठकम् । श्रीरामं मारुती वन्दे रामदासं च श्रीधरम् नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे । स्वानंदामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः

॥ श्री श्रीधर स्वामी महाराजार्पणमस्तु


Apr 9, 2022

श्री साईरक्षास्तोत्रम्


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
॥ श्री साईनाथाय नमः

प्रणम्य श्री गणेशं च, गुरूं कुलस्वामिनीं तथा । रक्षामिमां पठेत प्राज्ञः श्रद्धा धैर्य समन्वितः ॥  शिरो में साईनाथ पातु, भालं शिलधी वासीनः । परमेश्वरः दृशौ पातु, परम सुखदायः श्रुतिः ॥ घ्राणं पातु योगेश्वरः, मुखं भक्तवत्सलः । जिह्वां जयिने पातु, कण्ठं अनुग्रह कातरः॥  स्कन्धौ अपराजितः पातु, भुजौ अमित पराक्रमः। करौ मृत्युंजयः पातु, हदयं भक्तहृदालयः ॥  मध्यं पातु परब्रह्मः, नाभिं सत्यतत्वबोधकः । ब्रह्मचारीः कटि पातु, सक्थिनी सुलभदुर्लभः ॥ उरू पुरुषोत्तमः पातु, रक्षः लोकनायकः । जानुनी सर्वाधारः पातु, जंघे सत्परायणः ॥  पातु पादौ साईरामः, सर्वांगं सकलेश्वरः । पुत्र मित्रः स्वजनः पातु, सर्व मंगल कारकः ॥  एतां साईबलोपेतां, रक्षां यः सुकृती पठेतः । स दीर्घायुस्सुखीपुत्री, यशोवान् मेधावान् वेत् ॥

॥ इति श्री मुकेशशर्मणाविरचितं साईरक्षास्तोत्रम् संपूर्णम् ॥

साई गायत्री ॐ सत्पुरुषाय विद्महे । सच्चिदानंदाय धीमहि, तन्नो साई प्रचोदयात् ॥

॥ श्री साईनाथार्पणमस्तु


Apr 6, 2022

सार्थ श्रीरामरक्षास्तोत्र


॥ श्रीगणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

भारतभू दैवी समृद्धिनें समृद्ध आहेच. ही दैवी संपत्ती ज्या अनेक साधनातून मिळविता येते, त्यांत स्तोत्र हे एक महान साधन आहे. या स्तोत्राच्या परिपाठाने सर्वसत्ताधीश बनता येते असा विख्यात अनुभव पूर्वसूरींनी नमूद केला आहे.
या स्तोत्रांचे खरे सामर्थ्य त्यांच्या विनियोगांत आहे. " देवता प्रीत्यर्थे जपे विनियोगः ।" असा जो संकल्प आहे यांतच या स्तोत्राचे सर्व रहस्य आहे. या स्तोत्राच्या जपाने आपली आकर्षण शक्ती वाढत जाते. आपल्या उपास्य देवतेचे तेज आपण या शरीराने ग्रहण करतो. शरीर आणि त्या बरोबर आपले मन तेजोमय बनते. त्या तेजांत पूर्वी प्रत्ययाला न आलेल्या अनेक गोष्टी आपल्या प्रत्ययाला येतात. त्यांच्या अस्तित्वाचा अनुभव येतो. यालाच आपण आपली देवता आपणास प्रसन्न झाली असे म्हणतो. आपल्या या शरीरांत ते देवताचें तेज ग्रहण करण्याची शक्ती आहे, हे सांगूनही सामान्य माणसाला पटणार नाही. परंतु अनुभवाची कास धरली तर त्याची सत्यता प्रत्ययाला तेव्हांच येते. त्याचे प्रत्यंतर सर्वांना सुलभपणे घेता यावे हा एकमेव उद्देश आहे. 
- श्री. स. कृ. देवधर


श्रीगणेशाय नमः ॥

अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य । बुधकौशिकऋषिः । श्रीसीतारामचन्द्रो देवता । अनुष्टुप् छन्दः । सीता शक्तिः । श्रीमद्हनुमान कीलकम् । श्रीरामचन्द्रप्रीत्यर्थे रामरक्षास्तोत्रजपे विनियोगः ॥ ह्या रामरक्षा स्तोत्राचा बुधकौशिक ऋषी हा कर्ता आहे. श्री सीतारामचंद्र ही स्तव्य देवता आहे, स्तोत्रातील (बहुतेक) श्लोक अनुष्टुप् छंदात आहेत, श्रीमान् हनुमान ही या स्तोत्रांत प्रवेश करण्याची किल्ली आहे आणि श्रीरामचंद्राची प्रीती लाभावी म्हणून या स्तोत्राचा सारखा पाठ करणे हा या स्तोत्राचा उपयोग आहे.

श्रीरामांची ध्यानमूर्ती अशी आहे. । अथ ध्यानम् ।  ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं । पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नम् । वामाङ्कारूढसीतामुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं । नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटामण्डनं रामचन्द्रम् ॥ ॥ इति ध्यानम् ॥ गुडघ्यापर्यंत लांब हात असलेल्या आणि ज्याने धनुष्य व बाणही हाती घेतली आहेत, जो मांडी घालून बसला असून ज्याने पीतांबर नेसलेला आहे, नवीनच उमललेल्या कमळाच्या पाकळीशी स्पर्धा करणारे असे सुंदर आणि आनंद ओसंडणारे ज्याचे डोळे आहेत, डाव्या मांडीवर बसलेल्या जानकीच्या मुखाकडे जो पाहात आहे, जलपूर्ण मेघाप्रमाणे ज्याची श्यामवर्ण कांती आहे, अनेक प्रकारच्या अलंकारांनी जो सुशोभित झाला आहे आणि ज्याने भव्य जटामंडळ मस्तकावर धारण केले आहे, अशा रामाच्या मूर्तीचे ध्यान करावे. (अंतश्चधूंनी पाहावे.) चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् । एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् ॥१॥ ज्याचे एक एक अक्षर मानवाच्या महाभयंकर पापकर्माचा नाश करते, अशा रघुकुल श्रेष्ठाच्या (रामाचे) चरित्राचा विस्तार शंभर कोटी श्लोकांचा आहे. ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनम् । जानकीलक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितम् ॥२॥ निळ्या कमळाप्रमाणे ज्याचा श्यामल वर्ण आहे, कमळाप्रमाणे ज्याचे डोळे आहेत, ज्याच्या समवेत लक्ष्मण आणि सीता आहेत, आणि जटांच्या मुकुटामुळे जो शोभून दिसतो, सासितूणधनुर्बाणपाणिं नक्तंचरान्तकम् । स्वलीलया जगत्त्रातुं आविर्भूतं अजं विभुम् ॥३॥ ज्याच्या हाती तलवार आणि धनुष्य असून पाठीला बाणभाता बांधलेला आहे, राक्षसांचा संहारक, आणि जगाच्या रक्षणासाठी जन्मरहित सर्वव्यापी असतांनासुद्धा सहज लीलेने अवतीर्ण झालेल्या रामाचे ध्यान करून,

Apr 3, 2022

श्री आनंदनाथ महाराजकृत अभंग आणि एकारती


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥
॥ श्री आनंदनाथ महाराजाय नमः

अभंग
आधी नमूं तुमच्या पायां । भक्तवत्सल स्वामिराया ॥१॥ तूंचि माझा बुद्धिदाता । शरण शरण हो समर्था ॥२॥ चौदा विद्यांच्या दातारा । शिरीं ठेवा अभय करा ॥३॥ चौसष्ट कळांचा हा रंग । तुझ्या पायींचा सुरंग ॥४॥ आनंद म्हणे आदि अंत । आम्ही नमिला समर्थ ॥५॥

देह रंग रंगुनि जावा । ठायीं ठायीं स्वामी पाहावा ॥१॥ हीच भक्तिची कसोटी । खरी राखा रे लंगोटी ॥२॥ कैंची संचिताची जोडी । धन वेंची कवडी कवडी ॥३॥ आनंद म्हणे बंड झाले । भक्तीविणें नरका गेले ॥४॥
धन्य अक्कलकोट, धन्य ही बा पेठ । सत्य भुवैकुंठ देखीयले ॥१॥ सुंदर देऊळ समर्थाचे जाण । शोभा ही बा पूर्ण आणीतसे ॥२॥ काय वानूं आतां तेथिल हें भाग्य । मुक्ति लागे वेगें पायरीसी ॥३॥ जोडोनिया कर देव लोटांगणी । लोळती चरणी समर्थाच्या ॥४॥ आनंद म्हणे ऐसे पूर्ण परब्रह्म । अक्कलकोटी वर्म राहीलेंसे ॥५॥ एकारती  प्रेमभावे श्रीगुरुपायी एकारती करूं । अनंत ब्रह्मे रोमी त्यासी कैसे हो धरूं ॥१॥  सर्व ठाव भाव पायीं ओवाळीला । एकारतीचे ध्यान प्रभु ओवाळूं तुजला ॥२॥  तनमन अवघें एकत्र केलें। निजानंद भावें तुजला हो भुलवीलें ॥३॥  सोहं शब्द स्वरूपी समरूप झालों । निजानंदी आनंद रूपासीं मिळलों ॥४॥

॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥


Apr 2, 2022

श्री स्वामी समर्थांचे नित्य आराधन ( श्री स्वामी चरित्र सारामृत )


। श्री स्वामी चरित्र सारामृत । या श्री. विष्णू बळवंत थोरात रचित पारायण पोथीतील श्री स्वामी समर्थांची नित्य उपासना

॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥

नामस्मरण आणि पूजन
प्रातःकाळी उठोन । आधी करावे नामस्मरण । अंतरी ध्यावे स्वामीचरण । शुद्ध मन करोनी ॥१॥ प्रातःकर्मे आटपोनी । मग बैसावे आसनी । भक्ती धरोनी स्वामीचरणी । पूजन करावे विधियुक्त ॥२॥ एकाग्र करोनी मन । घालावे शुद्धोदक स्नान । सुगंध चंदन लावोन । सुवासिक कुसुमे अर्पावी ॥३॥ धूप-दीप-नैवेद्य । फल तांबूल दक्षिणा शुद्ध । अर्पावे नाना खाद्य । नैवेद्याकारणे स्वामींच्या ॥४॥ षोडशोपचारे पूजन । करावे सद़्भावे करुन । धूप-दीपार्ती अर्पून । नमस्कार करावा ॥५॥ जोडोनिया दोन्ही कर । उभे रहावे समोर । मुखे म्हणावे प्रार्थना स्तोत्र । नाममंत्र श्रेष्ठ पै ॥६॥ आजानुबाहु सुहास्यवदन । काषायवस्त्र परिधान । भव्य आणि मनोरम । मूर्ती दिसे साजिरी ॥७॥
स्तुती-प्रार्थना
मग करावी प्रार्थना । जयजयाजी अघहरणा । परात्परा कैवल्यसदना । ब्रह्मानंदा यतिवर्या ॥८॥ जयजयाजी पुराणपुरुषा । लोकपाला सर्वेशा । अनंत ब्रह्मांडधीशा । वेदवंद्या जगद़्गुरु ॥९॥ सुखधामनिवासिया । सर्वसाक्षी करुणालया । भक्तजन ताराया । अनंतरुपे नटलासी ॥१०॥ तू अग्नि तू पवन । तू आकाश तू जीवन । तूची वसुंधरा पूर्ण । चंद्र सूर्य तूच पै ॥११॥ तू विष्णू आणि शंकर । तू विधाता तू इंद्र । अष्टदिक्पालादि समग्र । तूच रुपे नटलासी ॥१२॥ कर्ता आणि करविता । तूच हवी आणि होता । दाता आणि देवविता । तूच समर्था निश्चये ॥१३॥ जंगम आणि स्थिर । तूच व्यापिले समग्र । तुजलागी आदि-मध्याग्र । कोठे नसे पाहता ॥१४॥ असोनिया निर्गुण । रुपे नटलासी सगुण । ज्ञाता आणि ज्ञान । तूच एक विश्वेशा ॥१५॥ वेदांचाही तर्क चाचरे । शास्त्रांतेहि नावरे । विष्णू शंकर एकसरे । कुंठित झाले सर्वहि ॥१६॥ मी केवळ अल्पमती । करु केवी आपुली स्तुती । सहस्त्रमुखही निश्चिती । शिणला ख्याती वर्णिता ॥१७॥ दृढ ठेविला चरणी माथा । रक्षावे मजसी समर्था । कृपाकटाक्षे दीनानाथा । दासाकडे पहावे ॥१८॥ आता इतुकी प्रार्थना । आणावी जी आपुल्या मना । कृपासमुद्री या मीना । आश्रय देईजे सदैव ॥१९॥ पाप ताप आणि दैन्य । सर्व जावो निरसोन । इहलोकी सौख्य देवोन । परलोकसाधन करवावे ॥२०॥ दुस्तर हा भवसागर । याचे पावावया पैलतीर । त्वन्नाम तरणी साचार । प्राप्त होवो मजला ते ॥२१॥ आशा मनीषा तृष्णा । कल्पना आणि वासना । भ्रांती भुली नाना । न बाधोत तुझ्या कृपे ॥२२॥ किती वर्णू आपुले गुण । द्यावे मज सुख साधन । अज्ञान तिमिर निरसोन । ज्ञानार्क हृदयी प्रगटो पै ॥२३॥ शांती मनी सदा वसो । वृथाभिमान नसो । सदा समाधान वसो । तुझ्या कृपेने अंतरी ॥२४॥ भवदुःख हे निरसो । तुझ्या भजनी चित्त वसो । वृथा विषयांची नसो । वासना या मनाते ॥२५॥ सदा साधु-समागम । तुझे भजन उत्तम । तेणे होवो हा सुगम । दुर्गम जो भवपंथ ॥२६॥ व्यवहारी वर्तता । न पडो भ्रांती चित्ता । अंगी न यावी असत्यता । सत्ये विजयी सर्वदा ॥२७॥ आप्तवर्गाचे पोषण । न्याय मार्गावलंबन । इतुके द्यावे वरदान । कृपा करुनी समर्था ॥२८॥ असोनिया संसारात । प्राशीन तव ज्ञानामृत । प्रपंच आणि परमार्थ । तेणे सुगम मजलागी ॥२९॥ ऐशी प्रार्थना करिता । आनंद होय समर्था । संतोषोनि तत्त्वता । वरप्रसाद देतील ॥३०॥
स्वामीभक्ती
गुरुवार उपोषण । विधियुक्त करावे स्वामीपूजन । प्रदोषसमय होता जाण । उपोषण सोडावे ॥३१॥ तेणे वाढेल बुद्धी । सत्यसत्य हे त्रिशुद्धी । अनुभवाची प्रसिद्धि । करिताती स्वामीभक्त ॥३२॥ श्री स्वामी समर्थ । ऐसा षडाक्षरी मंत्र । प्रीतीने जपावा अहोरात्र । तेणे सर्वार्थ पाविजे ॥३३॥ ब्राह्मणा क्षत्रियांदिका लागोनी । मुख्य जप हा चहूवर्णी । स्त्रियांनीही निशिदिनी । जप याचा करावा ॥३४॥ प्रसंगी मानसपूजा करिता । तेहि प्रिय होय समर्था । स्वामीचरित्र वाचिता ऐकता । सकल दोष जातील ॥३५॥ कैसी करावी स्वामीभक्ती । हे नेणे मी मंदगती । परी असता शुद्धचित्ती । तेची भक्ती श्रेष्ठ पै ॥३६॥ आम्ही आहो स्वामीभक्त । मिरवू नये लोकांत । जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ । निष्फळ भक्ती तयाची ॥३७॥ दंभे षोडशोपचारे । ते प्रिय नव्हेचि समर्था । भावें पत्र-पुष्प अर्पिता । समाधान स्वामीते ॥३८॥


॥ श्रीस्वामीसमर्थार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥


Apr 1, 2022

॥ श्री आनंदनाथ महाराजकृत श्रीगुरुस्तव ॥


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥
॥ श्री आनंदनाथ महाराजाय नमः


ॐ नमोजी श्रीगुरुनाथा । भक्तवत्सल समर्था । तव पदी ठेवोनि माथा । स्तवितों ताता तुजलागीं ॥१॥ मूळ स्वरुप तूंचि निराकारू । अवघा जाण तुझाचि आकारू । सच्चित् आनंद आधारू । ॐकारा थारू तूंचि खरा ॥२॥ सर्वा पाहातां सर्व आपण । सर्वामाजी सर्व गुण ।  तत्वांचे केलें बंधन । चालविता खुण तूंची खरा ॥३॥ तूंचि माया अतित । तूंचि माया रहित । तूंचि मायासहित । परब्रह्म व हीत तूंचि खरा ॥४॥ योग याग आकारु । योग ब्रह्म निराकारु । तेथे केलें चराचरु । इच्छामात्रे जाण पां ॥५॥ मूळ आकार गुरु । तया माजील रुकारु । तेथें सत्य स्वरूपीं  निर्धारु । चित् कारणी पैं झालें ॥६॥ सत्चित्ताचा आल्हादु । सहज झाला आनंदु । तेथे ॐकारासि बोधु । तीन गुणा निर्मिले ॥७॥ अर्ध मातृका सबळ । सत्य स्वरूपीं केवळ । माया बळें अवघा खेळ । लीलामात्रें चालविला ॥८॥ पंच तत्वांचा भास । तेथेंचि झाला आभास । मानिती अभ्यास । शुन्यवत् जाणुनी ॥९॥ जें जें आहे तेंचि नाहीं । नाहीं तेंचि पाही । तेथेंची मुरोनी राहीं । आत्मस्वरुपा ओळखुनियां ॥१०॥ होते तें आकाराशी आलें । होणार तें स्तब्ध राहिलें । दोहोंचे ऐक्यत्व भंगलें । द्वैत शमलें त्या ठाया ॥११॥ जें पहावें तें असे । तेथोनि तेंही नसे । परी शोधितां वसे । शोधा निज गुज ॥१२॥ जें आकारा आलें । तेंचि साक्षात्कारी बोलिलें। शून्याच्या ठावा नाहीं गिळिलें । आत्म कळलें कवण्यापरी ॥१३॥ मायिक माया मोह । मायेचा बुडाला समूह । मग श्रांतीचा भाव । कवण्या परी ॥१४॥ चहुं देहीं चार झाले । चहूं माजीं चार गुंतले । ते उलटतां माघारें पावले । पांचवीं मिळाले निजरूपा ॥१५॥ आधींच अवघा भासु । याचा न करणें अभ्यासु ।  मानणे तितका नासु । भ्रांति भावें होतसे ॥१६॥ होतें तें नाही जाहले । नव्हतें तें  कोठूनि आलें । कैसे भ्रांतीत हे भुलले । मायामोहें करुनियां ॥१७॥ आधिच देह आकारु । पंचतवांचा भारु । तीन गुणे बांधिला सारु । केला वेव्हारु मायेचा ॥१८॥ तेथे उमजलिया खूण । मग होईल ओळखण । आत्मयाचे ज्ञान । समरुपीं  जाणावया ॥१९॥ भ्रांतीचा सरलिया भास । मग तो सहजचि प्रकाश । जेथें कल्पनेचा नाश । होय दास काळ पायीं ॥२०॥ तीन्हीं काळांचे बंधन । सहज मोक्ष लाधे साधन । मुक्तिचे धन । म्हणती आत्मज्ञानघन तया ॥२१॥ आत्मा आत्मींचा वेव्हार । सूक्ष्मी शोधावा बाजार । आत्मशुद्धि निरंतर । ज्ञानमार्गे होय पाहा ॥२२॥ आपला आपण जहालिया वरी । मग सहजचि निवाला अंतरी । विश्वांबरी चराचरी । होय निर्धारीं निजरूपा ॥२३॥ तेथे नाही मी-तूं पण । सहज गळाले द्वैतबंधन । मुमुक्ष मोक्षाचे बंधन । तोडिले साधन सिद्धाचें ॥२४॥ नको वेद आकारु निराकारु । स्वयं जाणे ब्रह्म चराचरु । तेथेच स्थिरावे अंतरु । येर भारु वायां पै ॥२५॥ आपण होतां सर्वां ठाई । मग वासना गळाली पाहीं । जेथे भेद नाहीं संदेही । वृत्ती वाहीं कवण्यापरी ॥२६॥ आपला आपण भरून गेला । आपणामाजीं आपण जिराला । आप-तूं-पणातें विराला । मग उरला काय सांग ॥२७॥ जेव्हां आपण तैसें व्हावें । तेव्हां त्या रुपांत मिळावे । मग ब्रह्म पाहावे । निज देहीं ॥२८॥ जरी चराचरी भरला आकारु । तरी तनुमाजी तोचि आधारु । मी-तूं-पण वेव्हारु । माया अहंकारू वागविता ॥२९॥ भी बुडलिया कारण । माया विराली सहजचि जाण । तूंपणाची तेथें खुण । नाहींच भिन्न देखिलें ॥३०॥ अवघा ऐक्यामाजी ऐक्य जाहला । तोचि चारामाजी विराला । पूर्णानंदी भरूनि राहिला । नामें गुंतला निजरूपा ॥३१॥ तरी अद्वैत ब्रह्मीची खूण । न कळे जिरलिया वांचून । जेव्हा जाईल वितळून । तेव्हां मिळणे समरूपी ॥३२॥ जरी हा राहे देहीं । तरी सहज पडे संदेहीं। माया भ्रांति तेथे पाही । भ्रम भलीं घालितसे ॥३३॥ देह तत्वीं गोविला । व्यवहार गुणीं वाहिला । आपण स्वयेंचि राहिला । निजानंद भोगावया ॥३४॥ आप नाहीं आपण । तेथें नेणेचि जाणीवपण । उणीवपणाची खूण । गळोनि केली सर्वथा ॥३५॥ स्वयंजोतीचा प्रकाश । तेजोमय भासवी भास । जंववरि नसे तेथें वास । तंववरी अभ्यासें कवण लाभे ॥३६॥ सर्वां ठाई सर्व भरला । सम विषम स्वयेंचि झाला । निजरूपारूपीं मिळाला । तोचि उरला निज ठाया ॥३७॥ शोधिता न कळे कदां । जो अबोध झाला वेदां । तो स्थिरचरीं वागे सदां । ज्ञानें खूण जाणती ॥३८॥ स्वयं स्वरूपी रंगावे । ब्रह्मांड स्वरूपीं ऐक्य व्हावें । विश्वामाजी भरून जावें । मग पहावे आत्मसुख ॥३९॥ ऐसी विघडलिया सोय । नरदेही जाहला हो अपाय । वृथा शिणविली माय । करील हाय बापुडा ॥४०॥ आणावे तें काय । तेथे वसे काय । कवण त्याची बापमाय । सांग पाय सुदरोनियां ॥४१॥ जरी ब्रह्मी ब्रह्मांड बोलिला । तरी ब्रह्म कैसा कळला । कळतां मग वळला । बोलावया कवण्यापरी ॥४२॥ नेणे आणणे जया नसे । जें स्वयं सर्वी वसे । तें बोलवे भासे । कवण्यापरी ॥४३॥ तया देशील काय । घेणार घेईल कैसे पाय । वृथा भ्रांतिचा ऊपाय । भरली माय अर्भकाची ॥४४॥ जरी नाहीं समाधान । तरी कैचें ब्रह्मज्ञान । ब्रह्मब्रह्मीची ती खूण | आत्म आत्मीं काय निवडीली ॥४५॥ नाहीं तुझें तुज कळले । मग नेणार काय नेईल वहिलें । देणार देतो काय लिहिलें । अक्षर बोधीं बोध नव्हे ॥४६॥ जरी जाणसी आनंदाचा छंदु । तरीच जोडेल ब्रह्मानंदु । फुका न करी वादु । चावटा परी ॥४७॥ 

॥ राजाधिराज योगीराज श्रीगुरुस्वामी समर्थ महाराज की जय ॥