॥ ॐ नम: शिवाय ॥ श्री पार्वतीपरमेश्वरार्पणमस्तु ॥
॥ ॐ नम: शिवाय ॥ श्री पार्वतीपरमेश्वरार्पणमस्तु ॥
॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
॥ ॐ ऐं ह्रीं श्रीं श्रीमात्रे नमः ॥
श्रीललितासहस्त्रनाम म्हणजेच ब्रह्मांडपुराणातील उत्तरखंडामधील हयग्रीव व अगस्तीमुनींमधील संवाद आहे. हे एक मंत्ररहस्य असून ते श्रीव्यासांनी ब्रह्मांडपुराणात साक्षात श्रीविष्णु यांचा अवतार असलेल्या हयग्रीवांच्या मुखातून प्रकट केले आहे. या दिव्य स्तोत्राचे माहात्म्य अपार आणि अपूर्व आहे. श्रीललितासहस्त्रनाम स्तोत्राच्या नित्य पठणाने रोग-व्याधीतून मुक्तता प्राप्त होते, तसेच पठणकर्त्याची गंडांतरेही दूर होतात व श्रीललितामातेच्या कृपेने चारही पुरुषार्थ आणि दीर्घायुष्य लाभते.
हे स्तोत्र म्हणजे एक स्तोत्रमहौषधी असून याचे सर्वात मोठे फळ हे हृदयरोग शांती आहे. सर्वसामान्यांनी हे स्तोत्र रोज म्हणावे, ज्यांना हे स्तोत्र रोज म्हणणे शक्य नसेल त्यांनी २२ जून (वर्षांतील सर्वांत मोठा दिवस) व २२ डिसेंबर (वर्षांतील सर्वांत लहान दिवस), आपली जन्मतिथी, शुद्ध अष्टमी- चतुर्दशी या दिवशी अवश्य वाचावे अथवा ऐकावे. पौर्णिमेला, चैत्र नवरात्रात आणि आश्विन नवरात्रात या स्तोत्राचे नित्यपठण विशेष लाभदायक ठरते. तसेच ज्या साधकांना शक्य असेल त्यांनी दर शुक्रवारी श्रीललिताम्बिका महात्रिपुरसुंदरीच्या चरणीं अनन्यभावें प्रार्थना करून हे दिव्य स्तोत्र वाचावे/श्रवण करावे. या स्तोत्राचे वाचन शुद्ध आणि भक्तिपूर्वक करावे. जाणता-अजाणता घडलेले सर्व दोष व पातके ह्या सहस्त्रनामाने नष्ट होतात.
श्रीललितासहस्रनाम हा एक महामालामंत्र आहे. या मंत्राचे ऋषी वशिन्यादि वाग्देवता आहेत. या प्रासादिक स्तोत्राचा अनुष्टुप हा छंद आहे. त्याला नमस्कार करून त्याचे ध्यान मस्तकात करावे. अनुष्टुप छंदाचे स्थान मुख आहे. त्यालाही मनोभावे नमस्कार करावा. या महामालामंत्राची देवता श्रीललितामहात्रिपुरसुंदरी आहे. तिचे निवासस्थान हृदय आहे. श्रीमद्-वाग्भवकूट हे या मंत्रांचे बीज असून त्याचे स्थान नाभीत आहे. मध्यकूट ही शक्ती असून तिचे स्थान मूलाधारात आहे. तसेच शक्तिकूट कीलक असून त्याचे स्थान चरणांत आहे. त्यांना नमन करून त्यांचे ध्यान करावे. तदनंतर श्रीललितामहात्रिपुरसुंदरीच्या प्रसाद अर्थात् कृपेच्या सिद्धीने चिंतित फलप्राप्तीसाठी (मी) हा जप करत आहे, अशी प्रार्थना करावी. या दिव्य स्तोत्राच्या फलश्रुतीत जी विविध फले कथन केली आहेत ती फले सर्वच पठणकर्त्यांना श्रीललितासहस्रनामाच्या पठणाने अवश्य मिळावीत, हीच श्रीदत्तमहाराजांच्या आणि श्रीललितामातेच्या चरणीं मनःपूर्वक प्रार्थना !
*** अथ श्रीललितासहस्रनामस्तोत्र ***
॥ श्रीगणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय । लम्बोदराय सकलाय जगद्धिताय । नागाननाय श्रुतियज्ञविभूषिताय । गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते ॥१॥ भक्तार्तिनाशनपराय गणेश्वराय । सर्वेश्वराय शुभदाय सुरेश्वराय । विद्याधराय विकटाय च वामनाय । भक्तप्रसन्न-वरदाय नमो नमस्ते ॥२॥ नमस्ते ब्रह्मरूपाय विष्णुरूपाय ते नम: । नमस्ते रुद्ररूपाय करिरुपाय ते नम: । विश्वरूपस्वरूपाय नमस्ते ब्रह्मचारिणे । भक्तप्रियाय देवाय नमस्तुभ्यं विनायकम् ॥३॥ लम्बोदर नमस्तुभ्यं सततं मोदकप्रिय । निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥४॥ त्वां विघ्नशत्रुदलनेति च सुन्दरेति । भक्तिप्रदेति सुखदेति फलप्रदेति । विद्याप्रदेत्यघहरेति च ये स्तुवन्ति । तेभ्यो गणेशवरदो भव नित्यमेव ॥५॥
॥ श्रीगजाननार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥
॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥
सर्व दत्तभक्तांना श्री गणेश चतुर्थी आणि 'श्रीदत्तप्रभूंचे संपूर्ण योगावतार' या नांवाने जगतविख्यात असलेले, श्री भगवान दत्तात्रेयांचे प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज यांच्या जन्मोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा !!
श्रीसमर्थ रामदासस्वामीकृत श्रीगणेश स्तवन :
ॐ नमोजी गणनायका । सर्व सिद्धि फळदायका । अज्ञानभ्रांति छेदका । बोधरूपा ॥१॥ वंदूनिया मंगळनिधी । कार्य करितां सर्व सिद्धि । आघात अडथळे उपाधी । बाधूं शकेना ॥२॥ ऐसा सर्वांगे सुंदरू । सकळ विद्यांचा आगरू । त्यासी माझा नमस्कारू । साष्टांग भावें ॥३॥ ध्यान गणेशाचे वर्णितां । मति प्रकाश होये भ्रांता । गुणानुवाद श्रवण करितां । वोळे सरस्वती ॥४॥ जयासी ब्रह्मादिक वंदिती । तेथे मानव बापूडे किती । असो प्राणी मंदमती । तेहीं गणेश चिंतावा ॥५॥
श्रीपाद श्रीवल्लभ अवतार कथन
श्रीपाद श्रीवल्लभ यांचा चरित्रग्रंथ म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ! या अक्षरसत्य ग्रंथामध्ये श्रीपाद स्वामींच्या जन्माचे विस्तृतपणें वर्णन केले आहे.
आंध्र प्रदेशात मल्याद्रीपूर नामक एक गाव होते. तेच मल्याद्रीपुर सध्या मल्लादि या नावाने ओळखले जाते. त्या ग्रामांत मल्लादि नावाची दोन वेदशास्त्रपारंगत घराणी होती. मल्लादि बापन्नावधानि या नांवाचे विद्यावंत हरितस गोत्रीय तर मल्लादि श्रीधरअवधानी या नांवाचे विद्वान कौशिक गोत्रीय होते. श्रीधरअवधानी यांची बहिण राजमांबा हिचा विवाह बापन्नावधानी यांच्या बरोबर झाला होता. गोदावरी तटांवर असलेल्या आइनविल्लि या गांवात गणपती महायाग संपन्न होणार होता. त्या यज्ञासाठी हे दोन्ही प्राज्ञ पंडित तिथे गेले होते. यज्ञ सर्वथा शास्त्रोक्त विधींनुसार पार पडल्यास, शेवटची आहुती यज्ञवेदींत अर्पण करतेवेळीं प्रत्यक्ष महागणपती स्वर्णकांतीयुक्त स्वरूपांत दर्शन देईल आणि आहुती स्वीकारेल, अशी ग्वाही वेदोक्त मंत्र पठण करणाऱ्या ब्राह्मणांनी दिली होती. त्या विधीवत संपन्न झालेल्या यज्ञाची सांगता सुफळ झाली देखील - वेदमंत्र उच्चारून यज्ञपूर्ततेची आहुती देताच त्या यज्ञकुंडातून सुवर्णकांतीयुक्त, दैदीप्यमान श्रीगणेश प्रगट झाले आणि आपल्या सोंडेत त्यांनी ती आहुती स्वीकारली. श्री गणेश महायाग यथासांग पार पडल्याचे ते फलित पाहून सर्वच तुष्ट झाले. तिथे उपस्थित असलेल्या सर्व भाविकांनी हर्षित होऊन गजाननास नमस्कार केला. प्रसन्न होऊन श्री महागणपती वरदान देत म्हणाले, " मी स्वतः गणेश चतुर्थीच्या दिवशी संपूर्ण कलेने श्रीपाद श्रीवल्लभ रुपाने अवतार घेईन." गणेशाचे आशीर्वचन ऐकून सर्वांनी त्यांचा जयजयकार केला, मात्र त्या सभेतील तीन नास्तिकांचा त्यावर विश्वास बसला नाही. ते शंकित स्वरांत म्हणाले, " हे दृश्य नक्कीच इंद्रजाल अथवा महेंद्रजाल असावे. हे प्रत्यक्ष महागणपती असतील तर त्यांनी परत एकदा दर्शन द्यावे. " त्या नास्तिकांचे हे वक्तव्य ऐकताच होमकुंडातील विभूती महागणपतीच्या स्वरुपात दृश्यमान झाली आणि आपल्या दिव्य वाणींत बोलू लागली, " मीच परब्रह्म आहे. मीच या सकल ब्रह्माण्डाचा स्वामी असून ईश-पार्वतीनंदन म्हणून या जगतांत प्रसिद्ध आहे. त्रिपुरासुराच्या वधाच्या वेळी श्रीशंकरांनी, शिवाचे आत्मलिंग घेऊन जाणाऱ्या रावणास अटकाव करतेवेळी श्री विष्णूंनी, महिषासुराशी युद्ध करण्यापूर्वी श्री आदिमाया जगदंबेनी तसेच सकल देवता, योगी, तपस्वी आणि ऋषी- मुनी यांनीही माझेच स्मरण आणि आराधना करून अभीष्ट प्राप्त केले. ब्रह्मा आणि रुद्र श्री विष्णुरूपात विलीन झाले, तेच त्रैमूर्ति दत्तात्रेय आहेत. शास्त्रांच्या वचनांनुसार मीच दत्तरूप आहे. तेच महागणपतीरूपी श्री दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूपांत गणेशचतुर्थीच्या दिवशी अवतार घेतील. माझ्या आजच्या दर्शनाप्रमाणेच दिव्य ज्योतीच्या स्वरूपांत ते प्रगट होतील."
मल्लादि बापन्नावधानि यांच्या राजयोगावर जन्मलेल्या कन्येच्या जन्मपत्रिकेत सर्वच ग्रह शुभस्थानीं होते. त्यांनी तिचे सुमती महाराणी असे नामकरण केले. तिचा विवाह अप्पललक्ष्मी नरसिंहराज शर्मा नामक भारद्वाज गोत्रीय विप्राशी झाला होता. आपळराज आणि सुमती यांच्या पूर्वजन्मीच्या दत्तभक्तीचे, पुण्यकर्मांचे फलित म्हणूनच त्यांना श्रीपाद श्रीवल्लभांचे माता-पिता होण्याचे सद्भाग्य लाभले होते. त्या सत्शील दाम्पत्याचा पूर्वजन्म वृत्तांत थोडक्यात असा - पूर्वयुगीं सह्य पर्वताजवळील माहूर गांवी विष्णुदत्त नामक कर्मनिष्ठ ब्राह्मण रहात होता. तो श्री दत्तप्रभूंचा भक्त होता. त्याची पत्नी सोमदेवम्मा ( श्री दत्तमाहात्म्यात हिचे नाव सुशीला असे आले आहे.) थोर पतिव्रता होती. साक्षात श्री दत्तात्रेय त्या ब्राह्मणाच्या गृही दर्श श्राद्धदिनीं भोजन करण्यासाठी आले होते. त्या पंक्तीला श्री सूर्यनारायण आणि अग्निदेवही यांनीही भोजन स्वीकारले होते. त्यावेळीं, या तीनही देवतांचे उत्तमोत्तम आशीर्वाद त्या धर्मपरायण ब्राह्मण पती-पत्नीस मिळाले होते आणि त्यांच्या पितरांनाही सद्गती प्राप्त झाली होती. पुढें, याच पती-पत्नींनी पीठापुरी आपळराज आणि सुमती म्हणून पुन्हा जन्म घेतला होता. सुमतीचे अहोभाग्य असे की या जन्मींदेखील सुमतीला पुनःश्च श्री दत्तप्रभूंचे दर्शन घडले होते आणि भक्तकामकल्पद्रुम श्री दत्तात्रेय, आपळराज-सुमती यांचा पुत्र म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतार घेते झाले. श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थी रोजी सूर्योदयाच्या वेळी झाला. या अवताराचे वेगळेपण अथवा असाधारणत्व असे की श्रीपादांचा जन्म मातेच्या उदरातून सामान्य मुलासारखा न होता, दिव्य ज्योतीरूपाने झाला. त्यावेळी प्रसूतिगृहात मंगल वाद्ये वाजू लागली. पवित्र अशा वेदमंत्रांचा घोष बाहेर सर्वांना ऐकू येऊ लागला. त्यांच्या जन्मानंतर सतत नऊ दिवस, तीन फणा असलेला नाग त्यांच्या मस्तकी छत्र धरीत असे. भक्तजनरक्षणार्थ श्रीगुरुनाथ या भूतलावर अवतरला होता.
॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥
अवश्य वाचा :
अथ श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार - श्रीपादावतारकथन
विश्वेश्वराय नरकार्णवतारणाय कर्णामृताय शशिशेखरधारणाय ।
कर्पूरकान्तिधवलाय जटाधराय दारिद्र्यदुःखदहनाय नमः शिवाय ॥१॥
गौरीप्रियाय रजनीशकलाधराय कालान्तकाय भुजगाधिपकङ्कणाय । गङ्गाधराय गजराजविमर्दनाय दारिद्र्यदुःखदहनाय नमः शिवाय ॥२॥ भक्तिप्रियाय भवरोगभयापहाय उग्राय दुर्गभवसागरतारणाय । ज्योतिर्मयाय गुणनामसुनृत्यकाय दारिद्र्यदुःखदहनाय नमः शिवाय ॥३॥ चर्माम्बराय शवभस्मविलेपनाय भालेक्षणाय मणिकुण्डलमण्डिताय । मञ्जीरपादयुगलाय जटाधराय दारिद्र्यदुःखदहनाय नमः शिवाय ॥४॥ पञ्चाननाय फणिराजविभूषणाय हेमांशुकाय भुवनत्रयमण्डिताय । आनन्दभूमिवरदाय तमोमयाय दारिद्र्यदुःखदहनाय नमः शिवाय ॥५॥ भानुप्रियाय भवसागरतारणाय कालान्तकाय कमलासनपूजिताय । नेत्रत्रयाय शुभलक्षणलक्षिताय दारिद्र्यदुःखदहनाय नमः शिवाय ॥६॥ रामप्रियाय रघुनाथवरप्रदाय नागप्रियाय नरकार्णवतारणाय । पुण्येषु पुण्यभरिताय सुरार्चिताय दारिद्र्यदुःखदहनाय नमः शिवाय ॥७॥ मुक्तेश्वराय फलदाय गणेश्वराय गीतप्रियाय वृषभेश्वरवाहनाय । मातङ्गचर्मवसनाय महेश्वराय दारिद्र्यदुःखदहनाय नमः शिवाय ॥८॥ वसिष्ठेनकृतं स्तोत्रं सर्वरोगनिवारणम् सर्वसम्पत्करं शीघ्रं पुत्रपौत्रादिवर्धनम् ।
॥ ॐ नम: शिवाय ॥ श्री पार्वतीपरमेश्वरार्पणमस्तु ॥
॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
श्री सत्यदत्त व्रत करतांना या दिव्य स्तोत्राचे पठण अवश्य करावे.
॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
॥ श्रीमन्नृसिंहसरस्वती महाराजाय नमः ॥
‘ संन्यासी वेषधारी श्रीदत्तप्रभू ’ या नांवाने जगतविख्यात असलेले, श्री भगवान दत्तात्रेयांचे द्वितीय अवतार ‘ श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज ’ यांच्या जन्मोत्सवाच्या सर्वांना भक्तिमय शुभेच्छा !!
॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
॥ परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम् ॥ ॐ नमो भगवते श्रीज्ञानदेवाय ॥
महती ज्ञानेश्वरीची । प्राकृतग्रंथीं अनुपम साची ॥ ध्रु०॥ रत्ने शब्दाब्धीचीं । वेंचुन रचना केली जियेची ॥१॥
उपमा उपमेयांची । गर्दी, ज्याला गोडी सुधेची ॥२॥
आठवण करवित साची । शुचिपण ज्याचें गोदावरीची ॥३॥
वाणी दासगणूची । कुंठित झाली गति शब्दांची ॥४॥
श्री संतकवि दासगणु महाराजांनी श्रीज्ञानेश्वरीचे माहात्म्य किती सुरेख शब्दांत वर्णिले आहे. श्री ज्ञानेश्वरी - अवघ्या मराठी जनांची माउली असलेल्या ज्ञानदेवांची साक्षात वाङ्मय-मूर्ती ! प्रत्यक्ष श्रीगुरु निवृत्तिनाथ महाराजांचा आशीर्वाद लाभलेल्या आणि माऊलींप्रमाणेच कृपेचा, मायेचा वर्षाव करणाऱ्या या दिव्य-पावन ग्रंथाच्या पठण-मनन-चिंतनाने भाविकांचे परम कल्याणच होते, अशी ग्वाही अनेक अधिकारी महात्म्यांनी दिली आहे. असंख्य भक्तांनी याची प्रचितीही अनुभवलीही आहे.
तथापि, या ग्रंथाची प्राकृत भाषा, ज्ञानदेवांच्या दृष्टांतांतील गुढार्थ, ग्रंथवाचनासाठी लागणारा वेळ आणि अशाच इतर अनेक कारणांमुळे कित्येक भाविकांची, श्रद्धाळूंची इच्छा असूनही ते याचा वाचनलाभ घेऊ शकत नाही अथवा ही प्रासादिक श्रीज्ञानेश्वरी वाचूनही त्यांना पूर्णतः समाधान मिळत नाही. यासाठीच, सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद यांनी श्रीज्ञानेश्वरीतील निवडक ओव्या घेऊन भावार्थदीपिकासार-स्तोत्र अर्थात श्रीज्ञानेश्वरी नित्यपाठाची रचना केली आहे.
आम्हां सामान्य जनांवर कृपा करण्यासाठीच जणू भगवती श्री ज्ञानदेवी अतिशय सुलभ होऊन प्रकटली आहे.
या श्रीज्ञानेश्वरीला अनन्य भक्तिभावाने शरण जाऊन श्रीसंत एकनाथ महाराजांनीही दिव्यानुभव घेतला होता. म्हणूनच, संत एकनाथ अभंग गाथेमध्ये श्रीज्ञानदेवांच्या या वाङ्मय विग्रहाची स्तुती करतांना ते लिहितात - भाव धरूनियां वाची ज्ञानेश्वरी । कृपा करी हरी तयावरी ॥१॥ स्वमुखें आपण सांगे तो श्रीविष्णु । श्रीगीता हा प्रश्नु अर्जुनेसी ॥२॥ तोचि ज्ञानेश्वरी वाचे वदतां साचे । भय कळिकाळाचें नाही तया ॥३॥ एका जनार्दनीं संशय सांडोनी । दृढ धरा मनीं ज्ञानेश्वरी ॥४॥
सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंदकृत हे दिव्य स्तोत्र नित्य पठणांत ठेवल्यास भाविकांचे इह-पर कल्याण होणारच, यात तिळमात्र शंका नाही.
सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंदकृत श्रीभावार्थदीपिकासार-स्तोत्र अर्थात श्रीज्ञानेश्वरी नित्यपाठ
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥
आवडे दत्तभक्तांसी ...
श्री स्वामी समर्थ श्रीकरुणास्तोत्र - प्रथमोऽध्यायः
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥
॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥