Sep 22, 2017

|| श्री आनंदनाथमहाराजकृत संकटशमनार्थ श्रीस्वामीशक्ती स्तोत्र ||


।। श्री गणेशाय नमः ।।

।। श्री दत्तात्रेयाय नमः ।।

।। श्री स्वामीं समर्थाय नमः ।।


विश्वमाया तू मम अंबिके ll निजभक्त हो जाण पाळके ll

निर्गुणे तुला कैसे आठवू ll निज हृदयी कोठे साठवू  ll१ll 

काय ते मुनी कष्टती सदा ll तुजविणे नसे जाण फायदा ll 

धीपुरी खरा वास करुनी ll रूप दाविले पाप मर्दनी  ll२ll 

भक्त हे तुझे तूच रक्षिसी ll प्रेम देवोनी नित्य पोषिसी ll 

काय मी वंदू शेष शीणला ll कैसे बोलवू सांग त्या मुला  ll३ll 

चारी वेद ते नेति म्हणती ll तेथे हो खरी अल्पही मती ll 

तूच बोलसी जग कारणा ll देऊनी तरी नाम तारणा  ll४ll 

म्हणुनी स्तविता तुज माय हो ll दावि दावि तू आजि पाय हो ll

 रूप ते जसे गुण हा तसे ll योगी ध्यान ते नित्य पाहतसे  ll५ll 

आकृती कशी निर्गुण तरी ll मूर्ति ही तुझी जाण साजिरी ll 

स्वामी माय तू सत्य लेकरा ll रक्षिसी खरे करूनि आसरा  ll६ll 

बहुत तारिले भक्त या जनी ll धरुनी रूप ते सगुण कारणी ll 

दुरित जाळुनि भव तारिले ll नामी भक्त ते जाण हो भले  ll७ll

म्हणूनिया तुला देव नमिती ll पाय वंदुनी सौख्य पावती ll 

तीच तू खरी धीपुरी बरी ll पाय लाउनी जग उद्धरी  ll८ll 

कितीक तारिले जड ते बहु ll पाप जाळुनी दिधले नऊ ll 

ऐसे गे तुला कैसे आठवू ll शेषपुष्ठिसी ठाव हा मऊ  ll९ll 

बाळ हा तुझा तुज आठवी ll विश्वजननी हृदयी साठवी ll 

पावतो जना भक्ती करीता ll कलियुगी हो पायी सरिता  ll१०ll 

भक्ती करीता मुक्ती ही खरी ll स्वामीद्वारीची जाण पायरी ll 

नवनिधी हे हात जोडिती ll द्वारी ते उभे नित्य कष्टती  ll११ll 

काय हो उणे तुझिया घरा ll पाव पाव तू आजि लेकरा ll 

धरिले बाळ पाय अंतरी ll वचन देऊनी बोलली खरी  ll१२ll 

सत्य ते करी आजि तत्वता ll माझे देऊनी मज रक्षिता ll 

बद्री ते खरी नाम पावली ll बोरी म्हणती जन हो भली  ll१३ll 

पावन जनी स्नान करिता ll पळून जाय ते दुरित तत्वता ll 

स्वामी पायी ती वास पावली ll तारण्या जना कलियुगी भली  ll१४ll 

म्हणुनिया जनी जावे तत्वता ll वेळ हा असा जाईल हाता ll 

चुकल्या तरी वेळ ही बरी ll करिल बा पुढे जाण घाबरी  ll१५ll 

काळ दंड तो चुकणे तरी ll स्वामीद्वारीची नमी पायरी ll 

सावध तुला करितो मुला ll घेई घेई रे घेई दाखला  ll१६ll 

आपण तरुनी कूळ तारिसी ll प्रेमभावे हे स्तोत्र वाचिसी ll 

दुःख ते तुझे वाचिता बरे ll जाईल खरे प्रेम पाझरे  ll१७ll 

कामना मनी धरुनी जरी ll वाचिती तया पावे लवकरी ll 

एक शत ते आठ हो बरे ll पाठ करीता दुःख ते सरे  ll१८ll 

जन तरती घेतल्या करी ll भवनौका हो नाम लौकरी ll 

म्हणूनिया तुम्हा सांगतो सुखे ll भक्ती ती करा स्वामींची सुखे  ll१९ll 

स्तोत्र वाचिता पावे लौकरी ll तीन काळ ते साधी लौकरी ll 

तीन मंडळे दुःख ते हरे ll नित्य वाचिता भव हा तरे  ll२०ll 

पुत्र संतती सौख्य पावती ll स्वामी भक्ती हो केलिया प्रिती ll

 धनधान्य ते गृही साठवे ll द्वारी झुलती गाईचे थवे  ll२१ll 

अश्वकुंजरी वन दाटले ll मुक्ती ठाव हा पायी की झुले ll 

चुकती जरी जन फासती ll येईल पुढे काय वेळ ती  ll२२ll 

म्हणुनि सांगतो तुमच्या हिता ll ठेवा भाव हो पायी तत्वता ll 

तारण्या तुम्हा साधन बरे ll कलियुगी हा स्वामी अवतरे  ll२३ll 

आनंदनाथ तो भक्ती करिता ll सांगतो खरे तुमच्या हिता ll

 घेतल्या जरी सौख्य पावती ll स्तोत्र वाचिता साधिती गती  ll२४ll


ll अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त ।। श्रीस्वामी समर्थ महाराज की जय ll

ll श्रीगुरुस्वामीसमर्थापर्णमस्तु ll



Sep 6, 2017

॥ श्री साईलीलामृत ( हिंदी ) ॥



साभार  : श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट , शिर्डी 


http://www.saibabashirdi.co/