Jul 7, 2016

॥ श्री दत्त पंचपदी ॥


करुणात्रिपदी

(श्रीमद्वासुदेवानन्‍दसरस्वतीस्वामीविरचित)

शांत हो श्रीगुरुदत्ता । मम चित्ता शमवी आता ॥धृ.॥
तू केवळ माता जनिता । सर्वथा तू हितकर्ता ॥
तू आप्तस्वजन भ्राता । सर्वथा तूचि त्राता ॥
भयकर्ता तू भयहर्ता । दंडधर्ता तू परिपाता ॥
तुजवाचुनि न दुजी वार्ता । तू आर्ता आश्रय दत्ता ॥
शांत हो । शांत हो श्रीगुरुदत्ता ॥१॥
अपराधास्तव गुरुनाथा । जरि दंडा धरिसी यथार्था ॥
तरि आम्ही गाऊनि गाथा । तव चरणीं नमवू माथा ॥
तू तथापि दंडिसी देवा । कोणाचा मग करूं धावा ॥
सोडविता दुसरा तेव्हां । कोण दत्ता आम्हां त्राता ॥
शांत हो । शांत हो श्रीगुरुदत्ता ॥२॥
तू नटसा होऊनि कोपी । दंडिताहि आम्ही पापी ॥
पुनरपिही चुकत तथापि । आम्हांवरी न च संतापी ॥
गच्छतः स्खलनं क्वापि । असें मानुनि नच होऊ कोपी ॥
निजकृपा लेशा ओपी । आम्हांवरि तू भगवंता ॥
शांत हो । शांत हो श्रीगुरुदत्ता ॥३॥
तव पदरीं असता ताता । आडमार्गीं पाऊल पडतां ॥
सांभाळुनि मार्गावरता । आणिता न दूजा (दुसरा) त्राता ॥
निजबिरुदा आणुनि चित्ता । तू पतितपावन दत्ता ॥
वळे आतां आम्हांवरता । करुणाघन तू गुरुनाथा ॥
शांत हो । शांत हो श्रीगुरुदत्ता ॥४॥
सहकुटुंब सहपरिवार । दास आम्ही हें घरदार ॥
तव पदी अर्पू असार । संसाराहित हा भार ॥
परिहरिसी करुणासिंधो । तू दीनानाथ सुबन्‍धो ॥
आम्हां अघलेश न बाधो । वासुदेव-प्रार्थित दत्ता ॥
शांत हो श्रीगुरुदत्ता । मम चित्ता शमवी आता ॥५॥
=================================

२ श्रीगुरुदत्ता जय भगवंता । ते मन निष्ठुर न करी आता ॥धृ.॥ चोरे द्विजासी मारीता मन जे । कळवळले ते कळवळो आता ॥१॥ पोटशूळाने द्विज तडफडता । कळवळले ते कळवळो आता ॥२॥ द्विजसुत मरता वळले ते मन । हो की उदासीन न वळे आता॥३॥ सतिपति मरता काकुळती येता । वळले ते मन न वळे की आता॥४॥ श्रीगुरुदत्ता त्यजी निष्ठुरता। कोमल चित्ता वळवी आता॥ श्रीगुरुदत्ता जय भगवंता । ते मन निष्ठुर न करी आता ॥५॥ ==================================== ३ जय करुणाघन निजजनजीवन । अनसूयानन्‍दन पाहि जनार्दन ॥धृ.॥ निज-अपराधे उफराटी दृष्टी । होऊनि पोटी भय धरू पावन ॥१॥ तू करुणाकर कधी आम्हांवर । रुसशी न किंकर-वरद-कृपाघन॥२॥ वारी अपराध तू मायबाप । तव मनी कोप लेश न वामन ॥३॥ बालकापराधा गणे जरी माता । तरी कोण त्राता देईल जीवन ॥४॥ प्रार्थी वासुदेव पदी ठेवी भाव । पदी देवो ठाव देव अत्रिनन्‍दन॥ जय करुणाघन निजजनजीवन । अनसूयानन्‍दन पाहि जनार्दन॥५॥ ====================================== ४ उद्धरी गुरुराया, अनसूयातनया दत्तात्रेया ॥धृ.॥ जो अनसूयेच्या भावाला, भुलूनिया सुत झाला, दत्तात्रेय अशा, नामाला, मिरवी वंद्य सुरांला, तो तू मुनीवर्या, तव पाया, स्मरता वारीसी माया उद्धरी गुरुराया, अनसूयातनया दत्तात्रेया ॥१॥ जो माहुरपुरी, शयन करी, सह्याद्रीचे शिखरी, निवसे गंगेचे स्नान करी, भिक्षा कोल्हापूरी, स्मरता दर्शन दे, वारी भया, तो तू आगमगेया उद्धरी गुरुराया, अनसूया, तनया दत्तात्रेया ॥२॥ तो तू वांझेसी सुत देसी, सौभाग्या वाढविसी, मरता प्रेतासी जीवविसी, सद्वरदाना देसी, यास्तव वासुदेव तव पाया, धरी त्या तारी सदया, उद्धरी गुरुराया, अनसूया, तनया दत्तात्रेया ॥३॥ ===================================== ५ सांगावे, कवण्या ठाया जावे, कवणा ते स्मरावे, कैसे काय करावे, कवण्या परि मी रहावे । कवण येउन, कुरुंद-वाडी, स्वामी ते मिळवावे, सांगावे ॥धृ॥ या हारि, जेवावे व्यवहारी, बोलावे संसारी, घालूनी अंगिकारी, प्रतीपाळीसि जो निर्धारी, केला जो निज निश्चय स्वामी कोठे तो अवधारी, सांगावे ॥१॥ या रानी, माझी करुणावाणी, कायाकष्टी प्राणी, ऐकुनी घेशील कानी, देशील सौख्य निदानी, संकट येऊनि, मूर्च्छित असता, पाजील कवण पाणी, सांगावे ॥२॥ त्यावेळा, सत्पुरुषांचा मेळा, पहातसे निज डोळा, लावति भस्म कपाळा, सांडी भय तू बाळा, श्रीपाद श्रीवल्लभ म्हणती, अभय तुज गोपाळा, सांगावे ॥३॥ ==================================== ६ आठविं चित्ता तूं गुरुदत्ता । जो भवसागर पतितां त्रातां ॥धृ.॥ आहे जयाचें कोमल हृदय । सदयिचा हा भव हरि वरदाता ॥१॥ पाप पदोपदिं होई जरी तरी । स्मरतां तारीं भाविकपाता ॥२॥ संकट येतां जो निज अंतरी । चित्ती तया शिरी कर धरीं त्राता ॥३॥ जो निज जिवींचे हितगूज साचें । ध्यान योगियाचे तो हा ध्याता ॥४॥ सज्जन जीवन अनसुयानंदन । वासुदेव ध्यान हा यतिभर्ता ॥५॥ ==================================== ॥ घोरकष्टोद्धरणस्तोत्रम् ॥ (अन्वय व संक्षिप्तार्थ) श्रीपाद श्रीवल्लभ त्वं सदैव । श्रीदत्तास्मान्पाहि देवाधिदेव ॥ भावग्राह्य क्लेशहारिन्सुकीर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥१॥ अन्वय: भो देवाधिदेव, श्रीदत्त, श्रीपाद श्रीवल्लभ, भावग्राह्य, क्लेशहारिन् सुकीर्ते, त्वं सदैवास्मान् पाहि, अस्मात, घोरात्कष्टात् उद्धर ते नम: ॥१॥ संक्षिप्तार्थ: हे देवाधिदेवा श्रीदत्ता, श्रीपादा, श्रीवल्लभा, भावग्राह्या – क्लेशहारका सुकिर्ते, तुं सर्वदा आमचे रक्षण कर. आमचा या घोर कष्टातून उद्धार कर. तुला नमस्कार असो. ॥१॥ त्वं नो माता त्वं पिताऽऽप्तोऽधिपस्त्वम् । त्राता योगक्षेमकृत्सद्गुरुस्त्वम् ॥ त्वं सर्वस्वं नोऽप्रभो विश्वमूर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥२॥ अन्वय: हे अप्रभो विश्वमुर्ते, त्वं नो माता त्वं न: पिता त्वं न: आप्त: त्वं नो अधिप: त्वं न: योगक्षेमकृत् त्वं न: सर्वस्वं अस्मान् घोरात्कष्टादुद्धर ते नम: ॥२॥ संक्षिप्तार्थ: हे अप्रभो (नाहि प्रभु ज्याला, तो अप्रभु म्हणजे सर्वप्रभु) सर्वप्रभो विश्वमुर्ते तू आमची माता, पिता, मालक, योगक्षेम चालविणारा सद्गुरु व सर्वस्व आहेस; म्हणुन आमचा या घोर कष्टातून उद्धार कर. तुला नमस्कार असो. ॥२॥ पापं तापं व्याधिमाधिं च दैन्यम् । भीतिं क्लेशं त्वं हराऽऽशु त्वदन्यम् ॥ त्रातारं नो वीक्ष्य ईशास्तजूर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥३॥ अन्वय: हे ईश त्वं पापं तापं व्याधिं आधिं दैन्यं भीतिं क्लेशं च आशु हर, हे अस्तजुर्ते त्वदन्यं त्रातारं नो वीक्षे अस्मान् घोरात कष्टात् उद्धर ते नम: ॥३॥ संक्षिप्तार्थ: हे ईश्वरा, तू आमचे पाप, ताप, शारीरिक व्याधी, मानसिक व्याधी, दारिद्य्र, भीती व क्लेश यांचे सत्वर हरण कर. हे पीडानाशका, तुझ्यावाचून अन्य त्राता आम्हाला दिसत नाही. याकरिता आमचा या घोर संकटातून उद्धार कर. तुला नमस्कार असो. ॥३॥ नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता । त्वत्तो देव त्वं शरण्योऽकहर्ता ॥ कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥४॥ अन्वय: हे देव त्वत्तोन्यस्त्राता न, दाता न, त्वं शरण्य : अकहर्तासि, हे आत्रेय, अनुग्रहं कुरु हे पूर्णराते घोरात्कष्टादस्मानुद्धर ते नम : ॥४॥ संक्षिप्तार्थ: हे देवा, आम्हास तुझ्याहून दुसरा त्राता नाही. दाता नाही. भर्ताही नाही. तू शरणागत-रक्षक व दु:खहर्ता आहेस. हे अत्रेया, आमच्यावर अनुग्रह कर. हे पुर्णकामा, घोर संकटापासून आमचा उद्धार कर. तुला नमस्कार असो. ॥४॥ धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिम् । सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिम् । भावासक्तिं चाखिलानंदमूर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥५॥ अन्वय: हे अखिलानंदमुर्ते दे, धर्मे प्रीतिं सन्मतिं भक्तिं सत्संगाप्तिं भुक्तिं मुक्तिं भावासक्तिं च देही, अस्मान् घोरात्कष्टादुद्धर ते नम: ॥५॥ संक्षिप्तार्थ: हे अखिलानंदकारकमुर्ते देवा, आम्हाला धर्माचे ठिकाणी प्रीती, भुक्ति, मुक्ति व भक्तिचे ठिकाणी आसक्ती दे. सर्व घोर कष्टातून आमचा उद्धार कर. तुझे चरणारविंदी आमचे शतश: प्रणाम असो. ॥५॥ श्लोकपंचकमेततद्यो लोकमङ्गलवर्धनम् । प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवेत् ॥ अन्वय: लोकमङ्गलवर्धनमेतच्छलोकपंचकं नियत: । य: भक्त्या प्रपठेत् स श्रीदत्तप्रियो भवेत् ॥६॥ संक्षिप्तार्थ: श्री सद्गुरुमहाराज म्हणतात, “सर्वांचे कल्याण करणारे हे श्लोकपंचक नियमपुर्वक नित्यश: भक्तिभावाने जो पठण करील तो मनुष्य, श्रीदत्ताला अत्यंत प्रिय होईल व श्रीदत्तही उत्तरोत्तर या भक्ताला प्रिय होईल”, असा माझा आशीर्वाद आहे ॥६॥ ॥ इति श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानन्दसरस्वतीस्वामीविरचितं घोरकष्टोद्धारणस्तोत्रं सम्पूर्णम् ॥ ============================== श्री स्वामी कृपातीर्थ तारकमंत्र नि:शंक हो, निर्भय हो मना रे, प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे । अतर्क्य अवधूत हे स्मर्तृगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी ॥१॥ जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वयें भक्त प्रारब्ध घडवी ही माय । आज्ञेविणा काळ ना नेई त्याला, परलोकीही ना भिती तयाला ॥२॥ उगाची भितोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामीशक्ती कळू दे । जगी जन्म मृत्यु असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा ॥३॥ खरा होई जागा तू श्रद्धेसहित, कसा होशी त्याविण तू स्वामीभक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ ॥४॥ विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ, श्रीस्वामीच या पंचप्राणामृतात । हे तीर्थ घे, आठवी रे, प्रचिती, न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती ॥५॥
॥ श्री स्वामी चरणाविंदार्पणमस्तु ॥

No comments:

Post a Comment