Oct 27, 2020

श्री दत्तभावसुधारस स्तोत्र - ( श्लोक ६१ ते ७० )


|| श्री गणेशाय नमः ||

दत्तभक्तहो, ह्या श्री टेम्ब्ये स्वामीरचित स्तोत्राचा भावार्थ जर आपणांस चुकीचा आहे असे आढळल्यास, तर त्या श्लोकाचा योग्य अर्थ आम्हांस ' संपर्क ' वापरून कळवावा, आम्ही तुमचा नामनिर्देश करून योग्य ते बदल जरूर करू. जेणे करून सर्व दत्तभक्तांना त्याचा लाभ होईल.


महत्वाचे, आपले नांव प्रकाशित करण्यास आपली अनुमती नसेल तर कृपया प्रतिसादांत तसे स्पष्ट लिहावे.

|| श्री गुरुदेव दत्त ||


रजकायापि दास्यन्यो राज्यं कुरुपुरे प्रभुः । तिरोऽभूदज्ञदृष्ट्या स श्रीदत्तः शरणं मम ॥६१॥ भावार्थ : ज्या श्रीपादयतींनी आपला भक्त असलेल्या धोब्यालादेखील राज्यप्राप्तीचा वर दिला आणि अज्ञानी लोकांच्या दृष्टीनें जे कुरवपुरांत अदृश्य झालें, असे श्री दत्तात्रेय माझे रक्षणकर्ता आहेत. (लौकिकार्थाने श्रीपाद श्रीवल्लभ जरी अदृश्य झाले असले, तरी श्रद्धावंत भक्तांस ते अजूनही दर्शन देतात, हेच थोरल्या महाराजांना इथे अभिप्रेत आहे.) विश्वासघातिनश्चोरान्स्वभक्तघ्नान्निहत्य यः । जीवयामास भक्तं स श्रीदत्तः शरणं मम ॥६२॥

भावार्थ : ज्या भक्तवत्सल श्रीपादराजांनी, विश्वासघातानें आपल्या भक्ताला ठार करणाऱ्या चोरांचा वध करून आपल्या भक्ताला (वल्लभेश ब्राह्मणास) पुनर्जीवित केले, ते श्री दत्तात्रेय माझे रक्षणकर्ता आहेत.

करञ्जनगरेऽम्बायाः प्रदोषव्रतसिद्धये । योऽभूत्सुतो नृहर्याख्यः श्रीदत्तः शरणं मम ॥६३॥

भावार्थ : जे दत्तात्रेय करंज नगरांत अंबा ह्या विप्र स्त्रीनें भक्तिभावाने केलेल्या शनिप्रदोषव्रताच्या फलप्राप्तीसाठी, तिच्या पोटी नरहरि नामक पुत्ररूपाने जन्म घेते झाले, ते श्री दत्तात्रेय माझे आश्रयदाता आहेत.

Oct 19, 2020

उपासना आदिशक्तीची - श्री दुर्गा सप्तशती, श्री देवी माहात्म्य


॥ श्रीगणेशाय नमः ॥ ॐ ऐं र्‍हीं क्लीं चामुण्डायै विच्चे ॥

आतां नवमंत्रांचे स्तोत्र । सांगतों मी तुम्हां विचित्र । त्यांचे पठण करितां पवित्र । देवी प्रसन्न होतसे ॥  यांत जें जें मंत्र आले । त्यांचे अर्थ पूर्वीचि केले । व्यासेंचि हे निवडिले । अनुग्रहार्थ देवीच्या ॥  अथ स्तोत्रं  या माया मधुकैटभ प्रमथनी या माहिषोन्मूलिनी । या धूम्रेक्षण चण्डमुंडमथनी या रक्तबीजाशनी ।  शक्तिः शुम्भनिशुम्भ दैत्यदलिनी या सिद्धिलक्ष्मीः परा । सा चण्डी नवकोटिमूर्तिसहिता मां पातु विश्वेश्वरी ॥ १ ॥ स्तुता सुरैः पूर्वमभीष्टसंश्रयात्तथा सुरेन्द्रेण दिनेषु सेविता । करोतु सा नः शुभहेतुरीश्वरी शुभानी भद्राण्यभिहंतु चापदः ॥ २ ॥ या सांप्रतं चोद्धतदैत्यतापितैरस्माभिरीशा च सुरैर्नमस्यते । करोतु सा नः शुभहेतुरिश्वरी शुभानि भद्राण्यभिहंतु चापदः ॥ ३ ॥ या च स्मृता तत्क्षणमेव हंति नः सर्वापदो भक्तिविनम्रमूर्तिभिः । करोतु सा नः शुभहेतुरीश्वरी शुभानि भद्राण्यभिहंतु चापदः ॥ ४ ॥  सर्वबाधाप्रशमनं त्रैलोक्यस्याखिलेश्वरि । एवमेव त्वया कार्यमस्मद्वैरिविनाशनम् ॥ ५ ॥ सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके । शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोऽस्तु ते ॥ ६ ॥ सृष्टिस्थितिविनाशानां शक्तिभूते सनातनि । गुणाश्रये गुणमये नारायणि नमोऽस्तु ते ॥ ७ ॥ शरणागतदीनार्तपरित्राणपरायणे ।  सर्वस्यार्तिहरे देवि नारायणि नमोऽस्तु ते ॥ ८ ॥ सर्वस्वरुपे सर्वेशे सर्वशक्तिसमन्विते । भयेभ्यस्त्राहि नो देवि दुर्गे नमोऽस्तु ते ॥ ९ ॥ यांत ध्यानाचा एक मंत्र जाण । पांचव्या अध्यायांतील तीन । अकराव्यांतील पांच प्रमाण । नवमंत्र या स्तोत्रीं ॥  जगन्मातेची पूजा करुन । हें स्तोत्र अवश्य करावें पठण । हें सप्तशतीचें सार जाण । व्यासें निवडोन काढिलें ॥  असो सप्तशतीचा पाठ । जयासी न करवे स्पष्ट । तेणें हे म्हणावें उत्कृष्ट । फळ सर्व मंत्रांचें ॥ एक करितां आवर्तन । सर्व सिद्धि प्राप्त जाण । नित्य द्विरावृत्ती करुन । पुत्र प्राप्त होतसे ॥  पीडा-उपसर्गाची शांती । नित्य करावी त्रिरावृत्ती । पंचावर्तनेंकरुनि निश्र्चितीं । ग्रहशांती होतसे ॥  महाभय जाहलें उत्पन्न । तरी करावें सप्तावर्तन ।  नवावर्तनें करितां जाण । वाजपेयफल असे ॥  राजा वश व्हावा म्हणोन । आणि सर्व ऐश्वर्यालागुन । अकरा आवर्तनें करावी जाण । अकरावृत्या काम्यसिद्धि । बारा आवर्तनें करितां । वैरिनाश होय तत्त्वतां ॥  बारा आवर्तनें करितां । वैरिनाश होय तत्त्वतां । चतुर्दश आवर्तनें करितां । स्त्रीपुरुष वश होतसे ॥  पंचदशावर्तनेंकरुन । सौख्य श्री प्राप्त होय जाण । पुत्रपौत्र धान्यादि धन । सोळा आवर्तनेंकरुनियां ॥  सतरा आवर्तनें करुन । मुक्त होय राजापासून । शत्रूचें व्हावया उच्चाटन । अष्टादश करावीं ॥  वीस आवर्तनें करुन । वनसंबंधी भयापासून । मुक्त होय न लागतां क्षण । यासी संशय असेना ॥  पंचवीस आवर्तनें करितां । बंधापासूनि होय मुक्तता । आतां शतावृत्यांचें तत्त्वतां । फळ ऐकें पार्वती ॥  महासंकट जाहलेम प्राप्त । किंवा चिकित्सा होतां निश्र्चित । क्षयरोग होता अद्भुत । शतावृत्ती कराव्या ॥  प्रजानाश कुलोच्छेद जाण । आयुष्यनाश असतां पूर्ण । शत्रुवृद्धि होतां प्रमाण । शतावृत्ती कराव्या ॥  व्याधिवृद्धि धननाश होत । तथा त्रिविध महोत्पात । अधिपातक होतां प्राप्त । शतावृत्ती कराव्या ॥  शतावृत्ती करितां पूर्ण । प्राप्त होय शुभलक्षण । सर्व मनोरथपूरक जाण । अष्टोत्तरशतावृत्ती ॥  सहस्त्रावर्तनें करितां । शताश्वमेधफल ये हाता । परंपरालक्ष्मी प्राप्त तत्त्वतां । मोक्षही होय निश्चयें ॥ 



श्री देवी सप्तशतीमधील काही सिद्ध संपुट मंत्र संस्कृत सप्तशतीचे देख । सातशे मंत्रही सिद्धिदायक । तरी त्यांतूनि कारणिक । संक्षेपें सविधान सांगू पैं ॥ ज्ञानिनामपि चेतांसी हि सा । बलादाकृष्य मोहाय महामाया प्रयच्छति ॥ हा महामायेचा मोहिनीमंत्र । याचा जप पवित्र । अथवा प्रतिश्लोकीं पढतां सर्वत्र । जगत् वश्य होतसे ॥ स्वशत्रूसी व्हावें मरण । ऐसें मनीं वाटतां जाण ।संस्कृत सप्तशतीचे देख । सातशे मंत्रही सिद्धिदायक । तरी त्यांतूनि कारणिक । संक्षेपें सविधान सांगू पैं ॥ ज्ञानिनामपि चेतांसी हि सा । बलादाकृष्य मोहाय महामाया प्रयच्छति ॥ हा महामायेचा मोहिनीमंत्र । याचा जप पवित्र । अथवा प्रतिश्लोकीं पढतां सर्वत्र । जगत् वश्य होतसे ॥ स्वशत्रूसी व्हावें मरण । ऐसें मनीं वाटतां जाण । सर्वबाधाप्रशमनं त्रैलोक्यस्याखिलेश्वरि। एवमेव त्वया कार्यमस्मद्वैरिविनाशनम् ॥ हा मंत्र आधीं जपावा ॥ देवि प्रपन्नार्तिहरे प्रसीद प्रसीद मातर्जगतोऽखिलस्य । प्रसीद विश्वेश्वरि पाहि विश्वं त्वमीश्वरी देवि चराचरस्य ॥ हा मंत्र । लक्ष अथवा अयुतमात्र । किंवा जपतां सहस्त्र । सर्व आपदा नासती ॥ जयन्ती मङ्गला काली भद्रकाली कपालिनी । दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तु ते ॥ हा मंत्र महामारीनाशासाठी म्हणावा. शरणागतदीनार्तपरित्राणपरायणे । सर्वस्यार्तिहरे देवि नारायणि नमोऽस्तु ते ॥ हा मंत्र जपतां निश्चित । सर्व कार्यसिद्धि होत । संशय न धरी सर्वथा ॥ करोतु सा नः शुभहेतुरीश्वरी शुभानि भद्राण्यभिहन्तु चापदः । हा अर्धमंत्र । याचा जप करितां पवित्र । सर्वकामाची सिद्धि शीघ्र । येणें होय निर्धारें ॥ एवं देव्या वरं लब्ध्वा सुरथ: क्षत्रियर्षभ: ॥ हा मंत्र । याचा जप करितां पवित्र । स्वाभीष्ट वरप्राप्ति सर्वत्र । येणें होय निर्धारें ॥ सर्वबाधाप्रशमनं त्रैलोक्याखिलेश्वरि । एवमेव त्वया कार्यमस्मद्वैरिविनाशनम् ॥ या मंत्राच्या लक्षजपें जाण । मंत्रीं सांगितलें फळ पूर्ण । प्राप्त होय निर्धारे ॥ दारिद्र्यदुःखभयहारिणि का त्वदन्या सर्वोपकारकरणाय सदाऽऽर्द्रचित्ता ॥ हा अर्धमंत्र । याचा जप करितां पवित्र । दारिद्र्यादिनाश सर्वत्र । येणेंकरुनि होतसे ॥ दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः स्वस्थैः स्मृता मतिमतीव शुभां ददासि । दारिद्र्यदुःखभयहारिणि का त्वदन्या सर्वोपकारकरणाय सदाऽऽर्द्रचित्ता ॥ देवि प्रपन्नर्तिहरे प्रसीद प्रसीद मातर्जगतोऽखिलस्य । प्रसीद विश्वेश्वरि पाहि विश्वं त्वमीश्वरी देवि चराचरस्य ॥ येणें दुःख । नाशे हेंही निवेदिलें ॥ रोगानशेषानपहंसि तुष्टा रुष्टा तु कामान् सकलानभीष्टान् । त्वामाश्रितानां न विपन्नराणां त्वामाश्रिता ह्याश्रयतां प्रयान्ति ॥ हा मंत्र निश्र्चित । जपतां सर्वरोगनाश होत । देहि सौभाग्यमारोग्यं देहि मे परमं सुखम् । रुपं देहि यशो जयं देहि यशो देहि द्विषो जहि ॥ आरोग्य आणि सौभाग्यप्राप्तीसाठी सर्वबाधाविनिर्मुक्तो धनधान्यसुतान्वितः । मनुष्यो मत्प्रसादेन भविष्यति न संशयः ॥ सर्व बाधामुक्ती आणि धन-पुत्रादि प्राप्तीसाठी करोतु सा नः शुभहेतुरीश्वरी शुभानि भद्राण्यभिहन्तु चापदः । आपत्ती निवारणार्थ आणि शुभ- कल्याणदायक सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्तिसमन्विते । भयेभ्यस्त्राहि नो देवि दुर्गे देवि नमोऽस्तु ते ॥ भय निवारणार्थ सर्वमङ्गलमङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तु ते ॥ सर्व कल्याणप्राप्तीसाठी

संदर्भ : रामबाबा वर्णेकररचित श्री देवी माहात्म्य मराठी ग्रंथ

श्री देवी उपासना ग्रंथ


Oct 8, 2020

श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत - अध्याय - १


श्री  व्याघ्रेश्वर  शर्माचा  वृतांत

॥ श्री गणेशाय नम: ॥  ॐ दत्तात्रेयाय नमः ॥ श्री  गुरुवे  नम:  ॥ 

॥  श्रीपादराजं  शरणं  प्रपद्ये  ॥

श्री  महागणपती,  श्री  महासरस्वती,  श्रीकृष्ण  भगवान,  सर्व  चराचरवासी  देवी-देवता  आणि  सकल  गुरु  परंपरेच्या  चरणी  नतमस्तक  होऊन,  मी  त्या  अनंत  कोटी  ब्रह्मांड  नायक  श्री  दत्तप्रभुंच्या,  कलियुगातील,  श्रीपाद  श्रीवल्लभ  स्वामींच्या  अवतार  लीलांचे  वर्णन  करण्याचा  संकल्प  केला  आहे.

अनसूया-अत्रिनंदन  भगवान  श्री  दत्तात्रेय  यांनी  आंध्र  प्रदेशातील  पीठिकापुरम्  या  गावी  श्रीपाद  श्रीवल्लभ  या  नावाने  अवतार  घेतला.  त्यांच्या  दिव्य  चरित्राचे  वर्णन  यथायोग्य  करणे  अनेक  पंडितांना,  विद्वानांनासुद्धा जमले  नाही.  ते  करण्याचे  मी  धाडस  करीत  आहे,  ते  केवळ  आपणासारख्या  थोर,  विद्वान  श्रोत्यांच्या  आशिर्वादामुळेच.

मी  शंकरभट्ट,  देशस्थ  कर्नाटकी  स्मार्त  ब्राह्मण.  माझा  जन्म  भारद्वाज  गोत्रात  झाला.  मी  श्रीकृष्ण  दर्शनासाठी  ''उडपी''  तीर्थस्थानी  गेलो  असताना  तेथील  नयन  मनोहारी,  मोरमुकुटधारी  कृष्णाने  मला  मंत्रमुग्ध  केले.  त्याने  मला  कन्याकुमारीस  जाऊन  कन्यका  परमेश्वरीचे  दर्शन  घेण्याची  आज्ञा  केली.  त्याप्रमाणे  मी  कन्याकुमारीस  जाऊन  त्रिवेणी  सागरात  स्नान  करून  श्रीकन्यका  देवीचे  दर्शन  घेतले.  मंदिरातील  पुजारी  मोठ्या  भक्तीभावाने  देवीची  पूजा  करीत  होता.  मी  आणलेले  लाल  फूल  त्याने  मोठ्या श्रद्धेने  देवीस  अर्पण  केले.  देवी  अंबा  माझ्याकडे  मोठ्या स्नेहपूर्ण  नजरेने  पहात  असल्याचे  जाणवले.  ती  म्हणत  होती  '' शंकरा,  तुझ्या  अंतरंगातील  भक्तीभावावर  मी  प्रसन्न  झाले  आहे.  तू  कुरवपूर  क्षेत्रास  जा  आणि  श्रीपाद  श्रीवल्लभ  स्वामींच्या  दर्शनाने  आपल्या  जीवनाचे  सार्थक  कर.  त्यांच्या  दर्शनाने  मनाला,  अंतर  आत्म्याला  जो  आनंदाचा  अनुभव  येतो,  तो  अवर्णनीय  असतो.''  अंबामातेचा  आशिर्वाद  घेऊन  मी  प्रवास  आरंभ  केला  आणि  थोडया  अंतरावर  असलेल्या  ''मरुत्वमलै''  या  गावी  येऊन  पोहोंचलो.  लंकेतील  राम-रावण  संग्रामात  लक्ष्मणास  इंद्रजीताची  शक्ति  लागून  तो  अचेतन  अवस्थेत  असताना,  श्री  हनुमंताने  संजीवनी  बुटीसाठी  द्रोणागिरी  पर्वत  उचलून  आणला  होता.  लक्ष्मण  संजीवनी  बुटीने  सजीव  झाल्यावर  हनुमंत  तो  पर्वत  स्वस्थानी  घेऊन  जात  असताना  त्याचा  एक  मोठा   तुकडा  येथे  पडला.  त्याचेच  नाव  ''मरुत्वमलै''  असे  पडले.  हे  स्थान  अत्यंत  रम्य  आहे.  येथे  अनेक  गुहा  असून  त्यात  सिद्ध  पुरुष  गुप्तरुपाने  तप:श्चर्या  करीत  असतात.  मी  साऱ्या  गुहेचे  दर्शन  घेण्यास  आरंभ  केला.  एका  गुहेच्या  आत  गेलो  तेव्हा  आत  एक  वाघ  शांत  बसलेला  दिसला.  त्याला  पहाताच  माझ्या  अंगात  कापरे  भरले  आणि  घाबरुन  मी  एकदम  '' श्रीपाद  !  श्रीवल्लभा  !'' असे जोराने  ओरडलो.  त्या  निर्जन  अरण्यात  माझ्या  आरोळीचा  प्रतिध्वनी  तितक्याच  मोठ्या   आवाजात  ऐकू  आला.  त्या  आवाजाने  त्या  गुहेतून  एक  वृद्ध तपस्वी  बाहेर  आले  आणि  म्हणाले  '' बाबारे,  तू  धन्य  आहेस.  या  अरण्यात  श्रीपाद  श्रीवल्लभ  या  नावाचा  प्रतिध्वनी  आला.  श्री  दत्तप्रभूंनी  कलीयुगात  श्रीपाद  श्रीवल्लभ  या  नांवाने  अवतार  घेतल्याचे  योगी,  ज्ञानी,  परमहंस  लोकांनाच  माहीत  आहे.  तू  भाग्यवान  असल्याने  या  पुण्यस्थळी  आलास.  तुझ्या  सर्व  कामना  पूर्ण  होतील.  तुला  श्रीपाद  श्रीवल्लभांच्या  दर्शनाचा  लाभ  होईल.  ह्या  गुहेच्या  दाराजवळ  बसलेला  वाघ  एक  ज्ञानी  महात्मा  आहे.  त्याला  नमस्कार  कर.''  मी  अत्यंत  नम्रभावाने  त्या  वाघास  नमस्कार  केला.  त्या  वाघाने  लगेच  ॐ  काराचा  उच्चार  केला.  त्या  आवाजाने  सारा  मरुत्वमलै  पर्वत  दुमदुमला.  नंतर  त्या  व्याघ्राने  '' श्रीपाद  राजं  शरणं  प्रपद्ये ''  असे  सुस्वरात  प्रभूंना  आळविले.  याच  वेळी  एक  चमत्कार  झाला.  त्या  वाघाच्या  ठिकाणी  एक  दिव्य  कांतीमान  पुरुष  प्रगट  झाला.  त्याने  त्या  वृद्ध तपस्व्यास  साष्टांग  प्रणिपात  केला  आणि  क्षणार्धात  आकाश  मार्गाने  निघून  गेला.  त्या  वृद्ध तपस्व्याने  मला  त्यांच्या  गुहेत  मोठ्या  आग्रहाने  नेले.  गुहेत  गेल्यावर  त्यांनी  केवळ  संकल्पाने  अग्नि  प्रज्वलित  केला.  त्यात  आहुती  देण्या साठी   लागणारे  पवित्र  साहित्य,  मधुर  फळे  यांची  निर्मिती  केली.  वैदिक  मंत्रोच्चारासह  या  पदार्थांची  अग्नित  आहुती  दिली.

ते  वृद्ध तपस्वी  सांगू  लगले,  '' या  कली  युगात  यज्ञ,  याग  सत्कर्मे  सारे  लुप्त  झाले  आहेत.  पंचभुतात्मक सृष्टीतून  सर्व  लाभ  करुन  घ्यायचा,  परंतु  त्या  दैवतांचे  मात्र  विस्मरण  करायचे  असा  मानवाचा  धर्म  झाला  आहे.  देवांची  प्रीति  प्राप्त  करण्यासाठी   यज्ञ  करावेत  व  त्यांना  संतुष्ट  करावे.  त्यांच्या  कृपाप्रसादानेच  प्रकृती  अनुकुल  होते.  प्रकृतीमधील  कोणत्याही  शक्तीचा   प्रकोप  मानव  सहन  करु  शकत  नाही.  प्रकृतीमधील  शक्तींची   मानवाने  यथायोग्य  मार्गाने  शांती  करावी,  नसता  अनेक  संकटे  उद्भवतात.  मानवाने  धर्माचरण  न  केल्यास  प्रकृति  शक्ती  त्याची  शिक्षा  यथाकाली  देते.  लोकहितासाठी   मी  हा  यज्ञ  केला  आहे.  या  यज्ञाचे  फल  स्वरूप  म्हणून  तुला  श्रीपाद  श्रीवल्लभ  स्वामींचे  दर्शन  होईल.  जन्मजन्मांतरीचे  पुण्य  फळास  आले  म्हणजे  असे  लाभ  घडतात.''  त्या  वृद्ध तपस्व्याच्या  मुखातून  वहाणाऱ्या  या  पवित्र  वाकगंगा   प्रवाहाने  मी  अगदी  भाराऊन  गेलो  आणि  अत्यंत  नम्रतेने  त्यांना  साष्टांग  दंडवत  घातले.  मी  त्या  तपस्व्याच्या  चरणी  प्रार्थना  केली  ''हे ऋषिवर,  मी  पंडित  नाही,  योगी  नाही,  साधक  नाही,  मी  एक  अल्पज्ञ  आहे.  माझ्या  मनातील  संदेहाची  निवृत्ती   करुन  आपण  आपला  वरदहस्त  माझ्या  मस्तकी  ठेवावा .''  त्या  महापुरुषाने  माझ्या  शंकेचे  समाधान  करण्याचा  मनोदय  दर्शविला.

मी  म्हटले  ''हे  सिद्ध मुनिवर्या,  मी  कन्यका  देवीचे  दर्शन  घेताना  देवीने  सांगितले  होते  की  कुरवपुरी  जाऊन  श्रीपाद  श्रीवल्लभ  स्वामींचे  दर्शन  घ्यावे.  मी  तेथे  जाण्यासाठी   निघालो  असताना  मार्गात  आपले  व  व्याघ्ररूपी  महात्म्याचे  दर्शन  झाले.  ते  कोण  होते  ?  तसेच  दत्तप्रभू  म्हणजे  कोण  ?  या  विषयी  कृपया  विस्तारपूर्वक  सांगावे  ''  तेव्हा  त्या  वृद्ध तपस्व्याने  सांगण्यास  सुरवात  केली.

या  आंध्र  प्रांतातील,  गोदावरी  मंडलातील  अत्री  मुनींची  तपोभूमी  अशा  नांवाने  प्रसिद्ध  असलेल्या  आत्रेयपूर  ग्रामात  एक  काश्यप  गोत्रीय  ब्राह्मण  कुटुंब  वास्तव्य  करीत  होते.  त्यांना  परमेश्वराच्या  कृपाप्रसादाने  एका  पुत्राचा  लाभ  झाला.  ब्राह्मण  अत्यंत  विद्वान,  आचार  संपन्न  होता  परंतु  पुत्र  मात्र  मतिमंद  होता.  आई  वडिलांनी  त्याचे  नांव  व्याघ्रेश्वर  असे ठेवले .  व्याघ्रेश्वर  मोठा   होऊ  लागला.  परंतु  त्याच्या  बुद्धीची  वाढ  मात्र  होत  नव्हती.  पित्याने  त्याला  शिकविण्याचे  खूप  प्रयत्न  केले.  परंतु  त्यास  संपूर्ण  संध्यावंदनसुद्धा करता  येत  नसे. एवढया  विद्वान  ब्राह्मणाचा  पुत्र  असा  अज्ञानी,  अशी  गावातील  लोकांची  सारखी  टोचणी  त्याला  अत्यंत  दु:खदायक  वाटे.  एका  ब्रह्ममुहूर्तावर  त्यास  स्वप्न  पडले,  त्यात  त्याला  एका  दिव्य  बालकाचे  दर्शन  झाले.  ते  बालक  आकाशातून  खाली  येत  होते.  त्याचे  चरण  कमल  भूमीस  लागताच  भूमीसुद्धा दिव्य  कांतीमान  झाली.  तो  बालक  हळू  हळू  पावले  टाकीत  व्याघ्रेश्वराकडे  आला  आणि  म्हणाला,  मी  असताना  तुला  भय  कशाचे  ?  या  ग्रामाचे  व  माझे ऋणानुबंध  आहेत.  तू  हिमालयातील  बदरिकारण्यात  जा.  तेथे  तुझे  सारे  शुभ  होईल.  एवढे  सांगून  तो  बालक  अंतर्धान  पावला.  त्या  दिव्य  बालकाच्या  संदेशानुसार  व्याघ्रेश्वर  शर्मा  हिमालयातील  बदरिकारण्यात  जाण्यास  निघाला.  मार्गात  त्यास  अन्नपाण्याची  काहीच  अडचण  पडली  नाही.  श्रीदत्तकृपेने  त्याला  वेळेवर  अन्नपाणी  मिळे.  मार्गात  एक  कुत्रा  भेटला  व  तो  त्याच्या  बरोबर  बदरीवनापर्यंत  सोबत  होता.  या  प्रवासात  त्यांनी  उर्वशी  कुंडात  स्नान  केले.  याच  वेळी  एक  महात्मा  आपल्या  शिष्य  समुदायासह  उर्वशी  कुंडात  स्नाना साठी  आले.  व्याघ्रेश्वराने  त्या  गुरुवर्यांना  साष्टांग  नमस्कार  केला  आणि  माझे  शिष्यत्व  स्विकारावे  अशी  नम्र  प्रार्थना  केली.  त्या  महान  गुरुवर्याने  शिष्य  करुन  घेण्याचे  मान्य  केले  आणि  आश्चर्य  असे  की  तत्काळ  बरोबर  आलेले  ते  कुत्रे  अंतर्धान  पावले.  त्यावेळी  ते  महात्मा  म्हणाले  ''हे  व्याघ्रेश्वरा  तुझ्याबरोबर  आलेला  तो  श्वान  तुझ्या  पुर्वजन्मातील  केलेल्या  पुण्याचे  द्योतक  होते.  त्याने  तुला  आमच्या  स्वाधीन  करून  ते  अंतर्धान  पावले.  श्रीपाद  श्रीवल्लभ  स्वामींच्या  कृपे  मुळेच  तू  येथे  आलास  आणि  या  पुण्यप्रद  कुंडात  स्नान  करु  शकलास.  ही  नरनारायणाच्या  वास्तव्याने  पुनीत  झालेली  तपोभूमी  आहे.  यावर  व्याघ्रेश्वर  म्हणाला  हे  गुरुदेवा,  श्रीपाद  श्रीवल्लभ  कोण  आहेत  ?  त्यांनी  माझ्यावर  एवढी  कृपा  का  केली  ?  गुरुदेव  म्हणाले,  '' ते  साक्षात  दत्त  प्रभूच  आहेत.  त्रेतायुगात  भारद्वाज  महर्षीनी  ''सावित्र  काठक  चयन''  नावाचा  महायज्ञ  श्री  क्षेत्र  पीठिकापुरम   येथे  संपन्न  केला  होता.  त्या  यज्ञ  प्रसंगी  शिव-पार्वतींना  आमंत्रित  केले  होते.  त्यावेळी  शिवानी  महर्षींना  आशिर्वाद  दिला  की  ''तुमच्या  कुलामध्ये  अनेक  महात्मा,  सिद्धपुरुष,  योगीपुरुष  अवतार  घेतील''  अनेक  जन्मांच्या  पुण्य  कर्माने  दत्तभक्तीचा   अंकुर  फुटतो  व  तो  पुढे  सातत्याने  वाढत  गेल्यास  श्रीपाद  श्रीवल्लभ  स्वामींचे  दर्शन  होते.  त्यांच्या  चरण  स्पर्शाचे,  संभाषणाचे  भाग्य  लाभते.  हे  व्याघ्रेश्वरा  तुझ्यावर  स्वामींची  कृपा  झाली  आहे.  मी  आता  माझ्या  गुरुदेवांच्या  दर्शनास  जात  आहे.  पुन:  एक  वर्षाने  येईन.  तुम्ही  तुमच्या  गुहेत  आत्मज्ञान  प्राप्तीसाठी   तप:श्चर्या  करावी.''  असे  सांगून  ते  महान  गुरुदेव  द्रोणागिरी  पर्वताकडे  गेले.  व्याघ्रेश्वर  गुहेत  ध्यान  करु  लागला  परंतु  त्याचे  सारे  ध्यान  व्याघ्ररुपाकडेच  असे.  याचा  असा  परिणाम  झाला  की  त्याला  इच्छित  असलेले  वाघाचे  रूपच  प्राप्त  झाले.  एक  वर्षाचा  काळ  लोटला.  गुरुदेव  यात्रा  करुन  परत  आले.  त्यांनी  सर्व  गुहा  बघितल्या. 

प्रत्येक  शिष्याच्या  एका  वर्षात  झालेल्या  प्रगतीचा  ते  आढावा  घेत  होते.  एका  गुहेच्या  आत  गेले,  तेथे  त्याना  एक  वाघ  ध्यानस्थ  बसलेला  दिसला.  त्यांना  अत्यंत  आश्चर्य  वाटले.  त्यांनी  अंतर्ज्ञानाने ओळखले  की  तो  वाघ  दुसरा  कोणी  नसून  व्याघ्रेश्वरच  आहे.  व्याघ्ररूपाचेच  सतत  ध्यान  केल्याने  त्याला  व्याघ्ररूपच  प्राप्त  झाले,  हे  त्यांनी  जाणले.  त्यांनी  त्याला  आशिर्वाद  देऊन  ॐ  काराचा  मंत्र  शिकविला  व  '' श्रीपाद  राजं  शरणं  प्रपद्ये ''  हा  मंत्र  जपण्यास  सांगितला.  गुरूआज्ञेनुसार  व्याघ्रेश्वर  त्या  रूपातच  मंत्राचा  जप  करू  लागला.  वाघाच्या  रूपातच  त्याने  कुरवपूरला  प्रयाण  केले.  यथाकाली  तो  कुरवपूर  ग्रामाजवळ  येऊन  पोहोचला.  मध्ये  कृष्णा  नदी  वहात  होती.  तो  अलिकडील  तीरावर  बसून  ''श्रीपाद  राजं  शरणं  प्रपद्ये''  या  मंत्राचा  जप  करू  लागला.  श्रीपाद  श्रीवल्लभ  कुरवपूर  ग्रामात  आपल्या  शिष्यासह  बसले  होते.  ते  एकदम  उठले   आणि  माझा  परमभक्तच  मला  हाक  मारतो  आहे, असे  म्हणून  नदीच्या  पैलतीरास  येण्यास  निघाले.  ते  पाण्यातून  चालतांना  त्यांच्या  पदकमलांची  चिन्हे  पाण्यावर  उमटत  होती  व  ती  फारच  सुंदर  दिसत  होती.  स्वामी  पैलतीरावर  पोहोचल्यावर,  व्याघ्रेश्वराने  त्यांच्या  दिव्य  चरणांवर  आपले  मस्तक  ठेवून   अत्यंत  भक्तीभावाने   नमस्कार  केला.  स्वामींनी  अत्यंत  आनंदाने  त्या  वाघाचे  मस्तक  कुरवाळले  व  त्यावर  स्वार  होऊन  पाण्यातून  ते  कुरवपूरला  पोहोचले.  वाघावर  बसून  आलेले  बघून  सर्वांना  आश्चर्य  वाटले.  ते  वाघावरुन  उतरताच  त्या  वाघाच्या  शरीरातून  एक  दिव्य  पुरुष  बाहेर  आला.  त्याने  आपल्या  देहाचे  व्याघ्राजिन  (वाघाचे  कातडे)  स्वामींनी  आसन  म्हणून  स्वीकार  करावा  अशी  विनंती  केली.  तो  श्रींच्या  चरणी  अत्यंत  भक्तीभावाने   नतमस्तक  झाला.  त्याचे  अष्टभाव  जागृत  होऊन  प्रेमभावाने  त्याने  स्वामींच्या  चरणांवर  आपल्या  नेत्रातील  अश्रूंनी  अभिषेक  केला.  मोठ्या  प्रेमभराने  स्वामींनी  त्याला  उठवले  आणि  म्हणाले,  ''हे  व्याघ्रेश्वरा  !  तू  एका  जन्मात  अत्यंत  बलशाली  असा  मल्ल  होतास.  तेव्हा  तू  वाघांशी  युद्ध करून  त्यांना  अतिक्रूरतेने  वागवीत  होतास.  त्यांना  वेळेवर  अन्न  पाणीसुद्धा देत  नव्हतास.  त्यांना  साखळीने  बांधून  लोकांच्या  प्रदर्शनासाठी   ठेवीत  होतास.  या  दुष्कर्मामुळे  तुला  अनेक  नीच  जीव  जंतुंच्या  योनीत  जन्म  घ्यावा  लागला  असता  परंतु  माझ्या  अनुग्रहाने  ते  सारे  दुष्कर्म  हरण  झाले  आहेत.  तू  दीर्घकाळ  व्याघ्ररूपात  राहिल्यामुळे  तुला  इच्छेनुसार  वाघाचे  रूप  धारण  करता  येईल  व  सोडताही  येईल.  हिमालयात  कित्येक  वर्षापासून  माझी  तप:श्चर्या  करणाऱ्या  महान  सिद्धांचे तुला  दर्शन   होईल  आणि  आशिर्वादही  मिळतील.  योग  मार्गात  तू  अत्यंत  प्रज्ञावंत  होशील.''  असा  स्वामींनी  आशिर्वाद  दिला.

स्वामी  पुढे  म्हणाले  '' तू  हिमालयात  एक  वाघ  अत्यंत  शांत  असलेला  पाहिला  होतास  ना  !  तो  एक  महात्मा  आहे.  तप:श्चर्या  करणाऱ्या  संत  पुरुषांना  सामान्य  लोक  व  इतर  वन्य  प्राण्यांपासून  त्रास  होऊ  नये  म्हणून  त्याने  ते  व्याघ्ररूप  धारण  केले  होते  व  तो  त्यांचे  संरक्षण  करीत  होता.  गुहेतील  तप:श्चर्या  करणाऱ्या  संतांचे  परस्पर  वर्तमान  कळविण्याचे  कामसुद्धा तो  वाघ  मोठ्या  आनंदाने  करीत  असे,  ही  सगळी  दत्त  प्रभूंची  लीलाच ! '' 

॥  श्रीपादराजं  शरणं  प्रपद्ये  ॥


श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत



॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ 

॥  श्रीपादराजं  शरणं  प्रपद्ये  ॥

॥ॐ  सर्वजगद्रक्षाय  गुरु  दत्तात्रेयाय  श्रीपाद  श्रीवल्लभ  परमात्मने  नम: ॥

॥  दिगंबरा  दिगंबरा  श्रीपाद  श्रीवल्लभ  दिगंबरा  ॥


*** मूळ  ग्रंथ  रचनाकार  - श्री  शंकर  भट ***


*** मराठी अनुवाद - श्री. हरिभाऊ  जोशी  निटूरकर  ( भाऊ  महाराज ) ***


श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथाच्या प्रत्येक अध्याय-पठणाचे फल

  • अध्याय १ - घरात शांती नांदते, सुखाची प्राप्ती
  • अध्याय २ - मन:क्लेश निवारण
  • अध्याय ३ - नागदोष निवारण, संतान-प्रतिबंधक-दोष निवारण
  • अध्याय ४ - मुलींना योग्य वर प्राप्ती, गुरुनिंदा-दोष-निवारण
  • अध्याय ५ - विघ्नें दूर होण्यास, देवता कोपापासून मुक्ती
  • अध्याय ६ - पितृ शापापासून निवृत्ती
  • अध्याय ७ - अज्ञान निवृत्ती, विवेक प्राप्ती
  • अध्याय ८ - संतानप्राप्ती, लक्ष्मी-कृपा-कटाक्ष लाभ
  • अध्याय ९ - प्रारब्ध-कर्म-नाश
  • अध्याय १० - दुर्भाग्य-नाश
  • अध्याय ११ - दुर्गुणापासून मुक्ती
  • अध्याय १२ - शरीरारोग्य प्राप्ती
  • अध्याय १३ - व्यवसाय वृद्धी, पशु- वृद्धी
  • अध्याय १४ - आपदा-निवारण, उत्साह- वृद्धी
  • अध्याय १५ - अकारण कलह निवारण, पूर्व जन्म कृत दोष निवारण
  • अध्याय १६ - धनाकर्षण- शक्ती - वृद्धी
  • अध्याय १७ - सिद्धपुरुषांचे आशिर्वाद
  • अध्याय १८ - पापकर्मांचा नाश, भाग्य वृद्धी
  • अध्याय १९ - मानसिक क्लेश निवारण
  • अध्याय २० - कष्ट-नष्ट-निवारण
  • अध्याय २१ - आध्यात्मिक लाभ, पुण्य वृद्धी
  • अध्याय २२ - कर्मदोष निवारण
  • अध्याय २३ - ऐश्वर्यप्राप्ती
  • अध्याय २४ - दांपत्य-सुख
  • अध्याय २५ - आर्थिक समस्या नाशक
  • अध्याय २६ - दुर्दैव नाशक, संतान प्राप्ती
  • अध्याय २७ - ऐश्वर्य लक्ष्मी प्राप्ती
  • अध्याय २८ - विवाह अनुकूल व शीघ्र होण्यासाठी
  • अध्याय २९ - पितृदेवतांचे आशिर्वाद
  • अध्याय ३०- उज्वल भविष्य होण्यासाठी
  • अध्याय ३१ - विद्या,ऐश्वर्य यांची प्राप्ती
  • अध्याय ३२ - सद्गुरु प्राप्ती
  • अध्याय ३३ - अनुकुल विवाह होण्यासाठी
  • अध्याय ३४ - ऋण मोचनासाठी
  • अध्याय ३५ - वाक्-सिद्धीसाठी
  • अध्याय ३६ - अनुकूल दाम्पत्य जीवनासाठी
  • अध्याय ३७ - जीवनात स्थैर्य
  • अध्याय ३८ - आत्मस्थैर्य
  • अध्याय ३९ - सर्प दोष-निवारण
  • अध्याय ४० - असाध्य कार्यात यश मिळण्यासाठी
  • अध्याय ४१ - लोकनिंदा-परिहारार्थ
  • अध्याय ४२ - हरवलेले मूल सापडण्यास
  • अध्याय ४३ - अष्टैश्वर्य प्राप्ती
  • अध्याय ४४ - उज्ज्वल भविष्यासाठी
  • अध्याय ४५ - सर्व क्षेत्रात वृद्धीसाठी
  • अध्याय ४६ - त्वरित विवाहयोग
  • अध्याय ४७ - सर्व शुभफल मिळण्यासाठी
  • अध्याय ४८ - आर्त, अर्थार्थी, जिज्ञासु, मुमुक्षु यांना चारी पुरुषार्थ, सिद्धी यांसाठी
  • अध्याय ४९ - समस्त कर्म-दोषांपासून निवृत्ती
  • अध्याय ५० - गुरुनिंदा केल्यामुळे आलेले दारिद्रय दूर होण्यासाठी
  • अध्याय ५१ - जलगंडादिकापासून रक्षण
  • अध्याय ५२ - सर्व समस्या अप्रयत्नाने दूर होतील
  • अध्याय ५३ - महापातक नाशक

॥  श्रीपादराजं  शरणं  प्रपद्ये  ॥

Oct 5, 2020

श्रीगुरुचरित्राध्यायसारांशश्लोकाः



॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥


अध्याये प्रथम इहेष्टवंदनाख्यं 

प्रोक्तं मंगलमथ नामधारकाख्यम्।

प्राप्येष्टं स्तुत इह धाम हर्षणीयं 

दत्तोऽदर्शयदु तनुः प्रहर्षिणीयम् ।।१।।

सिद्धः सृष्टियुगस्थितीरिह जगौ सर्गे द्वितीये विधेः।

संवादं कलिना च दीपकगुरूपाख्यानकं सद्विधेः।।

यच्चाकारि हि दीपकेन गुरुसत्सेवाख्यविक्रीडितम्।

कुर्यात्कोऽत्र तथा करोत्यपि शशः शार्दूलविक्रीडितम् ।।२।।

तृतीयेऽध्यायेऽम्भोनशनमिति मौनैः प्रथमतोऽ-

म्बरीषोपाद्विष्णुव्रतहतिभिया वैष्णवमतः।

व्रजानेका योनीरिति शपति दुर्वाससि हरि-

स्तमादाच्छापं यन्निजसहनताभूच्छिखरिणी ।।३।।

तुर्ये त्रीशाः सत्त्वहृत्यै यथान्नं 

स्मेहंतेऽदाच्चानसूया तथान्नम् ।।

बाला भूत्वा दुग्धमस्याः पपुस्ते 

यत्कीर्तिदिक्शालिनी सर्वदाऽऽस्ते ।।४।।

दत्ताय ददौ द्विजाङ्गनान्नं श्राद्धात्पुरतः स पञ्चमेऽभूत्।

श्रीपादाभिधः सुतोऽन्धपङ्गूद्धृद्-भद्रविराडभूत्परिव्राट् ।।५।।

शिवो दशास्याय ददौ स्वलिङ्गम् 

प्रगृह्य तस्माद्-गणपतस्ततस्तत् ।।

उपेन्द्रवज्रास्त्रमुखेरितः कौ 

महाबलेशं निदधौ स षष्ठे ।।६।।

भूपेन्द्रवंशोन्नतयेऽत्र सप्तमे 

गोकर्णमाहात्म्यमुवाच गौतमः ।।

तद्-ब्रह्महत्यालयकृद्गतिं वदन् 

चण्डालिकायाः प्रशशंस भूभते ।।७।।

सकुसुतविधवा सा मर्तुकामा प्रदोष-

व्रतकथनत ईशस्तान्निवर्त्याष्टमेऽन्तात् ।।

स विबुधमकरोत्तज्जं च जन्मान्तरेऽस्याः 

सुत इह भविता दिङ्मालिनी यस्य कीर्तिः ।।८।।

आख्यानकीर्तिश्रुतितोऽस्य मुक्तिर्भवान्तरेऽसौ रजकाय राज्यम् ।।

दास्यन्तिरोभून्नवमेऽत्र कृष्णातटेऽपि संपूरयति स्वतृष्णाम् ।।९।।

पथि तस्करघातितभक्तं सार्थमजीवयदेत्य चिरस्य।।

विनिहत्य च तान्दशमे श्रीपादातिवेगवती गतिरस्य ।।१०।।

एकादशे नृहरिसंज्ञक आस सोऽम्बा-

पुत्रः प्रदोषफलदः प्रणवं पठिष्यन् ।।

भूत्वाप्यवाक्श्रुतिगणानुपनीत ऊच 

उद्धर्षणीं स्वजननीं बहुधा परिष्यन् ।।११।।

माणवक्राक्रीडितकृद्-द्वादश आश्वास्य विभुः ।।

मातरमेत्य च काशीं न्यास्यभवत्स निराशीः ।।१२।।

प्रसूमुखैर्जनिभुवि सङ्गतः स्वकै-

स्त्रयोदशेऽनुगयुगुपेत्य गौतमीम् ।।

मृतोत्सुकं जठररुगार्तमुद्धर-

न्व्यदर्शयद् भुवि रुचिरां प्रभुर्गतिम् ।।१३।।

सायंदेवं शक्रमिताध्याय उवाच 

त्रीशो म्लेच्छं याहि न भीस्ते स तथेति ।।

गत्वा भीतम्लेच्छनृपेणार्चित एत्य नृत्यन्

रेजे मत्तमयूरो हि यथा सः ।।१४।।

चित्रपदोक्तित ईशस्तीर्थगमाय स शिष्यान् ।।

पञ्चदशे कथयित्वा तद्विधिमीरयदेव ।।१५।।

षोडशे गुरुरथोद्धृतात्मने धौम्यशिष्यचरितोपदेशतः ।।

ब्राह्मणाय विदमर्पयद् गुरुद्रोहिणेऽलमनुतप्तचेतसे ।।१६।।

आर्यावमानितोऽदादार्यायै मूढविप्र इह जिह्वां ।।

सप्तदशे तत्प्रेरित ईशमवाप्यालभत्ततो जिह्वाम् ।।१७।।

भिक्षार्थं गत्वा कुसुमितलतावेल्लितद्वारदेशम् 

गेहं विप्रस्य प्रभुरतिदरिद्रस्य भुक्त्वापि शाकम् ।।

छित्वा वल्लीं स्ववसतिमगात्तल्लतामूलदेशे 

लेभेऽर्थौघं द्विजवर इहाष्टादशे चाशिषोऽपि ।।१८।।

अमरापूर ऊनविंशकेऽनुगगङ्गानुजपा उदुम्बरे ।।

वरदे स निधाय पादुके गुरुराश्वास्य च योगिनीरगात् ।।१९।।

प्रेतार्तिहृताऽर्भौ दत्तौ मृत एकः ।

वर्ण्यापतदंबां विंशे तनुमध्याम् ।।२०।।

विद्युन्मालावत्संबंधं पुत्रादेः सन् चोक्त्वा बोधम् ।।

सत्यै चक्रे जीवोपेतं सैके विंशेऽसौ तत्पोतम् ।।२१।।

गन्धर्वं प्राप्य भीमामरदुहितृयुतिं भिक्षार्थमथ गुरु-

र्गत्वा दीनद्विजौको गतरदमहिषीं वंध्यां भरवहाम् ।।

दृष्ट्-वा दुग्धं ययाचे तदनु सुवदना स्त्रीः क्षीरमदुह-

द्-द्वाविंशेऽदात्पयोऽस्मै तदु वरदगुरुः पीत्वागमदसौ ।।२२।।

राट् त्रयोविंश आकर्ण्य सत्तद्यशः 

स्रग्विणीं स्वां पुरीमानयत्तद्वशः ।।

श्रीगुरु रक्षसेऽदाद्-गतिं राजव-

द्राजदत्ते मठे विश्ववासोऽवसत् ।।२३।।

निन्दाकर्तृयतित्रिविक्रमं प्राप्य श्रीगुरुराश्वदर्शयत् ।।

सैन्यं न्यासिवपुः क्षणं चतुर्विंशे यानगराजवद्विराट् ।।२४।।

मत्तावाप्तौ श्रुतिनयविज्ञौ म्लेच्छाज्ञप्तौ द्विजविजिगीषू ।।

भिक्षुर्निन्ये श्रितशिबिकौ तौ गुर्वग्र्यं पञ्चसहितविंशे ।।२५।।

चित्रपदोक्तिभिरीशः षड्युतविंश उवाच ।।

वेदतदङ्गविशाखा यं प्रणमन्ति हि लेखाः ।।२६।।

अपि क इह यदीक्षणादपराजिताः 

स बुरुडवदनाच्छ्रुतीः समवाचयत् ।।

अनयदुभमिते द्विजौ च पिशाचतां 

सुगतिमथ गतौ च तौ द्विषडद्-बतः।।२७।।

अकथयदसाविष्टाविंशे स्वकर्मविपाकतो 

विविधकुगतिं हीनत्वाप्तिं सचिह्नपुनर्भवम् ।।

तदघहृतये प्रायश्चित्तं च कृच्छ्रजपादिकं 

पतितमकरोद् भूयोऽज्ञं सा मनोहरिणी कथा ।।२८।।

नवद्वययुते नतेन मुनिना स पृष्टोऽवदत् 

विभूतिमहिमानमानतपदास्रपायावदत् ।।

कुमारहरवादमप्यथ स वामदेवो ददौ 

गतिं भसितधारणेन विधिवच्च पृथ्वीधरः ।।२९।।

गोपीनाथसुतोऽत्रिसुतभजनात्पुत्रमापोद्वहोर्ध्वं

तत्स्त्री रुग्णं तमनयदथो पत्तनं गाणगाख्यम् ।।

मन्दाक्रान्ताध्वनि स तु पुरस्योपकण्ठं ममार

त्रिंशे तत्स्त्रीनिकटमथ गतो भूतिरुद्राक्षधृक्सन् ।।३०।।

स्त्रीधर्ममुवाच कुपूर्मितेऽध्याये धिषणोक्तमुपस्थिताम् ।।

विन्ध्याद्रिचरित्रसमन्विताऽगस्त्यर्षिसतीचरितं च सन् ।।३१।।

रुक्मवतीमूचे प्रणतां तामष्टसुता सौभाग्यवती स्याः ।।

प्रेतमपि द्वात्रिंश इहास्या वल्लभमाशूत्थापयदीशः ।।३२।।

भुजगशिशुभृता नीता कुलयुगिह पुराग्न्याढ्ये ।।

स्वपुरमपि सती वेश्या तत इह विकपी भूपौ ।।३३।।

कृतकरपुटराजप्रार्थितर्षिः सुतमृतिहतये रुद्राभिषेकम् ।।

श्रुतिपुरमितसर्गेकारयद्राट्तनयमुत मृतितोऽजीवयद्द्राक् ।।३४।।

सुरहितदकचकथा वृत्ता शरपुरमित इह सोमाख्यम् ।।

व्रतमपि यत इह सीमंतिन्यलभदपि च दयितं नष्टम् ।।३५।।

तर्कपूर्युजि हलमुखी स्त्री सुशिक्षणमिषत ईट् ।।

आह्निकाचरणमवदच्छाक्त्यसंमतमु सुधिये ।।३६।।

प्रमिताक्षरोक्तिगुरुराह सुचिरसुरपूजनादिसकलाह्निकवित् ।।

अशनादिधर्मशयनादिविधिः स्वरपूर्मितेऽत्र हतभक्तविधिः ।।३७।।

त्रिलोकपर्याप्तकृतोदनेन संभोजिता विप्रमुखा अनेन।।

अष्टत्रियुक्ते ह्युपजातयोऽपि भक्ताय दत्तो गुरुणा वरोऽपि।।३८।।

नवत्रिमितसर्गे व्यधात्स्थविरवंध्याम् ।।

कुमारललितां पिप्पलार्चनत ईशः ।।३९।।

खयुगमितेऽत्र कुष्ठविनिवृत्त्यै नरहरयेऽवदत्समिदर्चाम् ।।

तदु विटपी द्विजश्च शुचिरासीदियमजकीर्तिरिन्नवमालिनी ।।४०।।

अवददिह परीक्ष्य सायंदेवं कुयुगमिते भगवान्गुरूक्तलब्ध्यै ।।

विधिजमुपगतः सुपुष्पिताग्रगमवन आर्य उवाच काशीयात्राम् ।।४१।।

वातोर्मीतिर्द्वियुगाढ्ये स सर्गे शिष्टां यात्रां कथयन्दर्शयित्वा ।।

काशीं दारादिनुतश्चानयित्वा सायंदेवं गुरुराह व्रतं सत् ।।४२।।

सायंदेवाय त्रियुगपरिमितेऽध्याये 

प्राहेशोऽनंतव्रतमिह च परत्रेष्टम् ।।

यस्याचीर्णेन व्यपगतदुरितो याया-

त्कौण्डिण्यः पार्थश्च सुगतिमितोसंबाधाम् ।।४३।।

क्षणतः श्रुतिवेदसंमितेऽस्मिन्ननयद्यतिराज एकरूपः ।।

श्र्यगमात्मरतं स तंतुकं चानयदाशु निवेद्य राट्चरित्रम् ।।४४।।

यद्धीरासीद्भ्रमरविलसिता नंद्यंबोक्त्या कुरुगुपशमधीः ।।

प्राप्येशं द्राक्स शुचिकविरभूद् गुर्वीक्षातोऽक्षयुगमित इह ।।४५।।

स्वप्न उपेत्य स आदद ईशो रसकृतयुक्त इहार्चनमग्र्यम् ।।

केसरिदत्तमभूद्द्रुतमध्यात्मकपददस्य कविः स च शिष्यः ।।४६।।

दीपावल्यां संप्रार्थितः सप्तशिष्यैः 

सप्तग्रामान्तत्क्षेत्रसंस्थोऽप्यगात्सः ।।

अष्टात्मा भूत्वा सप्तवेदाढ्यसर्गे 

लोके यन्मूर्तिर्विश्रुता वैश्वदेवी ।।४७।।

क्षेत्रं गुरूक्तवदशेषमपक्वधान्यं 

चिच्छेद शूद्र उपगां विनिवारयन्तीम् ।।

सिंहोन्नताक्ष इव चात्मवधूं निवार्य 

लेभेऽमितर्धिमिभवेदयुजीशभक्त्या ।।४८।।

सर्गेऽङ्कवाक्संमित इन्द्रवज्रालेपोपमाघक्षतिकृद्-भगिन्याः ।।

तत्क्षेत्रमाहात्म्यमुवाच सोऽष्टतीर्थानि चादर्शयदत्र सद्-भ्यः ।।४९।।

खशरयुते पुरोक्तरजकोऽभवद्यवनराज आस वृषकृत्

पृथुपिटकस्तदङ्क उदितस्तदीयशमकृद्-द्विजो नृपकथाम् ।।

अवददथो ययौ स गुरुं स्मृतिं प्रथमजन्मनोऽलभदथो

गतरुगसौ सुयानगमजं गजाश्वललितं पुरं स्वमनयत् ।।५०।।

राजपुरादेत्य स च नीजपीठं कीर्तिरभून्मम सुशुचिरतन्वी

स्थेयमिहातः परमिह न साक्षादित्यवनीषुयुजि स च विचार्य ।।

स्वानपि चाश्वास्य बहुवरदानैः पुष्पकृतासनगत इदमाह

मद्भजनाद्वः सुगतिरिह तिष्ठे सत्यमितीडरमभवददृश्यः ।।५१।।

श्रवणेच्छाश्रुतानां च तदन्येषां स्मृतिर्यतः ।।

सैकपञ्चाशदध्यायसारभूतार्थमालिका ।।५२।।

तीर्णा आशु तरन्त्यस्मात्तरिष्यन्त्यघतो नराः ।।

तीर्थं गुरुचरित्राख्यमवगाह्यमिदं बुधैः ।।५३।।

 

इति श्री प. प. श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचिता

श्रीगुरुसंहिता(समश्लोकीगुरुचरिता)ध्यायसारावतरणिका संपूर्णा ।।