Nov 30, 2016

॥ श्रीगुरुपादुकाष्टक ॥


ज्या संगतीनेंच विराग झाला । मनोदरींचा जडभास गेला ।

साक्षात् परात्मा मज भेटविला । विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥ १ ॥


सद्योगपंथें घरि आणियेलें । अंगेच मातें परब्रह्म केलें ।

प्रचंड तो बोधरवि उदेला । विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥ २ ॥


चराचरीं व्यापकता जयाची । अखंड भेटी मजला तयाची ।

परं पदीं संगम पूर्ण झाला । विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥ ३ ॥


जो सर्वदा गुप्त जनांत वागे । प्रसन्न भक्ता निजबोध सांगे ।

सद्भक्तिभावांकरितां भुकेला । विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥ ४ ॥


अनंत माझे अपराध कोटी । नाणी मनीं घालुनि सर्व पोटीं ।

प्रबोध करितां श्रम फार झाला । विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥ ५ ॥


कांहीं मला सेवनही न झालें । तथापि तेणें मज उद्धरीलें ।

आता तरी अर्पिन प्राण त्याला । विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥ ६ ॥


माझा अहंभाव वसे शरीरीं । तथापि तो सद्गुरु अंगिकारीं ।

नाहीं मनीं अल्प विकार ज्याला । विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥ ७ ॥


आतां कसा हा उपकार फेडूं । हा देह ओवाळुनि दूर सांडूं ।

म्यां एकभावें प्रणिपात केला । विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥ ८ ॥


जया वानितां वानितां वेदवाणी । म्हणे ' नेति नेतीति ' लाजे दुरुनी ।

नव्हे अंत ना पार ज्याच्या रुपाला । विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥ ९ ॥


जो साधुचा अंकित जीव झाला । त्याचा असे भार निरंजनाला ।

नारायणाचा भ्रम दूर केला । विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥ १० ॥

॥ इति गुरुपादुकाष्टक संपूर्ण ॥


॥ मज भेटुनि जा हो....॥


मज भेटुनि जा हो दत्तसख्या अवधूता ||


का तुम्ही कमंडलु विसरून आला इथे

प्रिय श्वान आज ते तुम्हांसवे का नसे

काखेची झोळी ती विसरून गेला कुठे

परि तुम्हास पुरते ओळखिले मी आता ।। १ ।।


किती व्याकुळतेने तुम्हास मी आळविले

ह्रदयीचे भावही व्यथितपणे कळविले

इंद्रियास दमुनी चित्ताला वळविले

का उगाच असली सत्वपरीक्षा घेता ।। २ ।।


किती सुयोग सुंदर भेटीचा मज दिला

ना वियोग तुमचा कधी घडावा मला

सर्वस्व भाव मी चरणी तव वाहिला

मन रंगुनि गेले गुरुराया हे आता ।। ३ ।।

****************************



Nov 25, 2016

॥ श्री दत्तमाला मंत्र ॥


॥ श्री गणेशाय नमः ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ 


ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय, स्मरणमात्रसन्तुष्टाय, महाभयनिवारणाय, महाज्ञानप्रदाय,

चिदानन्दात्मने बालोन्मत्तपिशाचवेषाय, महायोगिने अवधूताय , अनसूयानन्दवर्धनाय अत्रिपुत्राय, सर्वकामफलप्रदाय, ॐ भवबन्धविमोचनाय, आं असाध्यसाधनाय, ह्रीं सर्वविभूतिदाय, क्रौं असाध्याकर्षणाय, ऐं वाक्प्रदाय, क्लीं जगत्रयवशीकरणाय, सौः सर्वमनःक्षोभणाय, श्रीं महासम्पत्प्रदाय, ग्लौं भूमंडलाधिपत्यप्रदाय, द्रां चिरंजीविने, वषट्वशीकुरु वशीकुरु, वौषट् आकर्षय आकर्षय, हुं विद्वेषय विद्वेषय, फट् उच्चाटय उच्चाटय, ठः ठः स्तंभय स्तंभय, खें खें मारय मारय, नमः सम्पन्नय सम्पन्नय, स्वाहा पोषय पोषय, परमन्त्रपरयन्त्रपरतन्त्राणि छिंधि छिंधि, ग्रहान्निवारय निवारय, व्याधीन् विनाशय व्याधीन् विनाशय, दुःखं हर हर, दारिद्र्यं विद्रावय विद्रावय, देहं पोषय पोषय, चित्तं तोषय तोषय, सर्वमन्त्रस्वरूपाय, सर्वयन्त्रस्वरूपाय, सर्वतन्त्रस्वरूपाय, सर्वपल्लवस्वरूपाय, ॐ नमो महासिद्धाय स्वाहा 



Nov 17, 2016

॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥



श्री गणेशाय नमः श्री गुरवे नमः


















ब्रह्मानंद परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् । द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्वमस्यादिलक्ष्यम्

एकं नित्यं विमलमचलं सर्वंधीःसाक्षिभूतम् । भावातीतं त्रिगुणरहितं सदगुरुं तं नमामि ॥ १

काषायवस्त्रं करदंडधारिणं । कमंडलुं पद्मकरेण शंखंम् ।

चंक्रं गदाभूषितभूषणाढ्यं । श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥ २

औंदुंबरः कल्पवृक्षः कामधेनुश्च संगमः चिंतामणिर्गुरोः पादौ दुर्लभं भुवनत्रये ॥ ३

कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनंदन: । द्वापारे रामकृष्णश्च कलौ श्रीपाद श्रीवल्लभ: ॥ ४

अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त


श्रीपाद श्रीवल्लभ नरहरि तारी तारी मजला दयाळा तारि तारि मजला

श्रमलो मी या प्रपंचधामीं आलो शरण तुला धृ.

करितां आटाआटी प्रपंच अवघा दिसतो मिथ्यत्व ।

दयाळा दिसतो मिथ्यत्व म्हणवूनी भजन तुझे मज देवा भासे सत्यत्व

श्रीपाद श्रीवल्लभ नरहरि तारि तारि मजला दयाळा तारि तारि मजला

श्रमलो मी या प्रपंचधामी आलो शरण तुला

किंचित्मात्र कृपा जरिं मजवरि करिसी उदार मन । दयाळा करिसी उदार मन

चुकलो मी या विषय सुखाच्या आहारांतुनि जाण

श्रीपाद श्रीवल्लभ नरहरि तारि तारि मजला दयाळा तारि तारि मजला

श्रमलो मी या प्रपंचधामी आलो शरण तुला

कृष्णातटनिकटीं जो विलसे औदुंबरछायीं दयाळा औदुंबरछायीं हंस परात्पर भारतीनायक लीन तुझे पायीं

श्रीपाद श्रीवल्लभ नरहरि तारि तारि मजला दयाळा तारि तारि मजला

श्रमलो मी या प्रपंचधामी आलो शरण तुला


भलत्या मिषेंही दत्तनाम घेतां

फल येई हातां सत्य सत्य ॥ १

श्रुती स्मृती गाती पुराणें वदती

दत्तनामकीर्ती साधु संत ॥ २

तीर्थ प्रायश्चित्त न करी पुनीत

ज्या तोही पुनीत दत्तनामें ॥ ३

नामाविना कर्म सांग नोहे धर्म

नाम घेतां शर्म आदीं अंतीं ॥ ४

वदतां वासुदेव पितर ऋषिदेव

तृप्त होती सर्व दत्तनामें ॥ ५

( परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती विरचित श्री दत्त पद )

श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सदगुरु नाथा कृपा करा


श्री नारायण महाराज कृत पद :

बांधिला कोप मुरडुनी जटामुगुटीं । घातली दया वनमाला दिव्य कंठीं

करधृत डमरुंतुनी उपजति ज्ञानकला । गुरुदत्तराज ऋषिकुळीं अवतरला ॥ १

मृगचर्म पांघरीं शंखचक्र हातीं । श्रुति श्वानरूप होऊनी पुढें  पळती ।

भूधेनु कलिभयें चाटित चरणांला ॥ २

करि स्वजन उपाधि भस्मलेप अंगा । झोळींत भारी तज्जन्म-मरण पिंगा ।

नारायण हृदयीं रंग भरूनि गेला ॥ ३  

अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त