Jul 29, 2016

॥ श्रीगुरुचरित्र अध्याय ५२ - अवतरणिका ॥


॥ श्री गणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीगुरुदेवदत्तात्रेयचरणारविन्दाभ्यां नमः

॥ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः I गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥ ॐ ॥

श्रोते व्हावे सावधान I श्रीगुरुचरित्राध्याय एकावन्न I ऐकोनि नामधारकाचे मन I ब्रह्मानंदी निमग्न पै ॥१॥ सेवूनि गुरूचरित्रामृत I नामधारक तटस्थ होत I अंगी धर्म-पुलकांकित I रोमांचही ऊठती ॥२॥ कंठ झाला सद्‌गदित I गात्रे झाली संकपित I विवर्ण भासे लोकांत I नेत्री वहाती प्रेमधारा ॥३॥ समाधिसुखे न बोले I देह अणुमात्र न हाले I सात्विक अष्टभाव उदेले I नामधारक-शिष्याचे ॥४॥ देखोनि सिद्ध सुखावती I समाधि लागली यासी म्हणती I सावध करावा मागुती I लोकोपकाराकारणें ॥५॥ म्हणोनि हस्ते कुरवाळिती I प्रेमभावें आलिंगिती I देहावरी ये ये म्हणती I ऐक बाळा शिष्योत्तमा ॥६॥ तूं तरलासि भवसागरी I रहासी ऐसा समाधिस्थ जरी I ज्ञान राहील तुझ्या उदरीं I लोक तरती कैसे मग ॥७॥ याकारणें अंतःकरणी I दृढता असावी श्रीगुरुचरणीं I बाह्य देहाची रहाटणी I शास्त्राधारें करावी ॥८॥ तुवां विचारिले म्हणोनि I आम्हां आठवली अमृताची वाणी I तापत्रयाते करी हानि I ऐशी अनुपम्या प्रगटली ॥९॥ तुजमुळे आम्हां आठवले I तुवां आम्हां बरवें केलें I त्वांही एकाग्रत्वे ऐकिलें I आता हेंच विस्तारी ॥१०॥ नामधारका ऐशियापरी I सिद्ध सांगती परोपरी I मग तो नेत्रोन्मीलन करी I कर जोडोनि उभा ठाके ॥११॥ म्हणे कृपेचे तारुं I तूंचि या विश्वास आधारू I भवसागर पैलपारु I तूंचि करिसी श्रीगुरुराया ॥१२॥ ऐसे नामधारक विनवीत I सिद्धाचे चरणी लागत I म्हणे श्रीगुरूचरित्रामृत I अवतरणिका मज सांगा ॥१३॥ या श्रीगुरूचरित्रामृती I अमृताहूनि परमामृती I भक्तजनांची मनोवृत्ति I बुडी देवोनि स्थिरावली ॥१४॥ मी अतृप्त आहे अजूनि I हेचि कथा पुनः सुचवोनि I अक्षयामृत पाजूनि I आनंदसागरी मज ठेवा ॥१५॥ बहु औषधींचे सार काढोन I 'त्रैलोक्यचिंतामणी' - रसायण I संग्रह करिती विचक्षण I तैसे सार मज सांगा ॥१६॥ ऐकोनि शिष्याची प्रार्थना I आनंद सिद्धाचिया मना I म्हणती बाळका तुझी वासना I अखंड राहो श्रीगुरूचरित्री ॥१७॥ श्रीगुरूचरित्राची ऐका I सांगेन आतां अवतरणिका I प्रथमपासूनि सारांश निका I एकावन्नाध्यायपर्यंत ॥१८॥ प्रथमाध्यायी मंगलाचरण I मुख्य देवतांचे असे स्मरण I श्रीगुरूमूर्तीचे दर्शन I भक्ताप्रती जाहलें ॥१९॥ द्वितीयाध्यायी ब्रह्मोत्पत्ती I चारी युगांचे भाव कथिती I श्रीगुरुसेवा दीपकाप्रती I घडली ऐसे कथियेले ॥२०॥ नामधारका अमरजासंगमा I श्रीगुरू नेती आपुले धामा I अंबरीष दुर्वास यांचा महिमा I तृतीयाध्यायी कथियेला ॥२१॥ चतुर्थाध्यायी अनसूयेप्रती I छळावया त्रैमूर्ति येती I परी तियेचे पुत्र होती I स्तनपान करिती आनंदे ॥२२॥ पंचमी श्रीदत्तात्रेय धरी I स्वयें अवतार पीठापुरी I ' श्रीपाद-श्रीवल्लभ ' नामधारी I तीर्थयात्रेसी निघाले ॥२३॥ सहाव्यांत लिंग घेऊनि I रावण जातां गोकर्णी I विघ्नेश्वरें विघ्न करूनि I स्थापना केली तयाची ॥२४॥ गोकर्णमहिमा असंख्यात I रायाप्रती गौतम सांगत I चांडाळी उद्धरिली अकस्मात I सातव्या अध्यायी वर्णिती ॥२५॥ माता पुत्र जीव देत होतीं I तयांप्रती गुरु कथा सांगती I शनिप्रदोष व्रत देती I ज्ञानी करिती अष्टमीं ॥२६॥ नवमाध्यायीं रजकाप्रती I कृपाळू गुरु राज्य देती I दर्शन देऊं म्हणती पुढती I गुप्त झाले मग तेथें ॥२७॥ तस्करीं मारिला भक्त ब्राह्मण I तस्करां वधिती श्रीगुरु येऊन I ब्राह्मणाला प्राणदान I देती दशमाध्यायांत ॥२८॥ " माधव " ब्राह्मण करंजपुरीं I " अंबा " नामें त्याची नारी I 'नरसिंह-सरस्वती ' तिचे उदरीं I एकादशीं अवतरले ॥२९॥ द्वादशाध्यायी मातेप्रति I ज्ञान कथूनि पुत्र देती I काशीक्षेत्रीं संन्यास घेती I यात्रा करिती उत्तरेची ॥३०॥ माता-पित्यांतें करंजपुरी I भेटोनि येती गोदातीरीं I कुक्षिव्यथेच्या विप्रावरी I कृपा करिती त्रयोदशीं ॥३१॥ क्रूर यवनाचें करूनि शासन I सायंदेवास वरदान I देती श्रीगुरु कृपा करून I चौदाविया अध्यायीं ॥३२॥ पंचदशीं श्रीगुरूमूर्ति I तीर्थे सांगती शिष्यांप्रती I यात्रे दवडूनि गुप्त होती I वैजनाथी श्रीगुरू ॥३३II षोडशीं ब्राह्मणा गुरुभक्ति I कथूनि दिधली ज्ञानशक्ति I श्रीगुरू आले भिल्लवडीप्रती I भुवनेश्वरी-संनिध ॥३४॥ भुवनेश्वरीला मूर्ख ब्राह्मण I जिव्हा छेदोनि करी अर्पण I त्यास श्रीगुरुंनीं विद्या देऊन I धन्य केला सप्तदशीं ॥३५॥ घेवडा उपटूनि दरिद्रियाचा I कुंभ दिधला हेमाचा I वर्णिला प्रताप श्रीगुरूचा I अष्टादशाध्यायांत ॥३६॥ औदुंबराचें करूनि वर्णन I योगिनींस देऊनि वरदान I गाणगापुरास आपण I एकुणविंशीं श्रीगुरू गेले ॥३७॥ स्त्रियेचा समंध दवडून I पुत्र दिधले तिजला दोन I एक मरतां कथिती ज्ञान I सिद्धरुपें विसाव्यांत ॥३८॥ तेचि कथा एकविंशीं I प्रेत आणिलें औदुंबरापाशीं I श्रीगुरू येऊनि तेथे निशीं I पुत्र उठविती कृपाळू ॥३९॥ भिक्षा दरिद्र्या-घरी घेती I त्याची वंध्या महिषी होती I तीस करून दुग्धवती I बेविसाव्यांत वर दिधला ॥४०॥ तेविसाव्यांत श्रीगुरूस I राजा नेई गाणगापुरास I तेथे उद्धरती राक्षस I त्रिविक्रम करी गुरुनिंदा ॥४१॥ भेटों जाती त्रिविक्रमा I दाविती विश्वरूपमहिमा I विप्र लागे गुरुपादपद्मा I चोविसाव्यांत वर देती ॥४२॥ म्लेंछापुढें वेद म्हणती I विप्र ते त्रिविक्रमा छळती I त्याला घेऊनि सांगातीं I गुरूपाशी आला पंचविशीं ॥४३॥ सव्विसाव्यांत तया ब्राह्मणा I श्रीगुरू सांगती वेदरचना I त्यागा म्हणती वादकल्पना I परी ते उन्मत्त नायकती ॥४४॥ सत्ताविशीं आणूनि पतिता I विप्रासीं वेदवाद करितां I कुंठित करोनि शापग्रस्ता I ब्रह्मराक्षस त्यां केलें ॥४५॥ अष्टाविंशीं तया पतिता I धर्माधर्म सांगोनि कथा I पुनरपि देऊनि पतितावस्था I गृहाप्रती दवडिला ॥४६॥ एकोनत्रिंशीं भस्मप्रभाव I त्रिविक्रमा कथिती गुरुराव I राक्षसा उद्धरी वामदेव I हा इतिहास तयांतचि ॥४७॥ त्रिंशाध्यायीं पति मरतां I तयाची स्त्री करी बहु आकांता I तीस श्रीगुरू नाना कथा I कथूनि शांतवूं पहाती ॥४८॥ एकतिसाव्यांत तेचि कथा I पतिव्रतेचे धर्म सांगतां I सहगमनप्रकार बोधिता I तें स्त्रियेतें जगद्‌गुरु ॥४९॥ सहगमनीं निघतां सती I श्रीगुरूस झाली नमस्कारिती I आशीर्वाद देवोनि तिचा पति I बत्तिसाव्यांत उठविला ॥५०॥ तेत्तिसाव्यांत रुद्राक्षधारण I कथा कुक्कुट-मर्कट दोघेजण I वैश्य-वेश्येचें कथन I करिती रायातें पराशर ॥५१॥ रुद्राध्यायमहिमा वर्णन I चौतिसाव्यांत निरुपण I राजपुत्र केला संजीवन I नारद भेटले रायातें ॥५२॥ पंचत्रिंशत्प्रसंगांत I कचदेवयानी कथा वर्तत I आणिक सोमवारव्रत I सीमंतिनीच्या प्रसंगें ॥५३॥ छत्तिसीं ब्रह्मनिष्ठ ब्राह्मणा I स्त्रियेनें नेलें परान्नभोजना I कंटाळूनि धरिती श्रीगुरूचरणा I त्याला कर्ममार्ग सांगती ॥५४॥ सप्तत्रिंशीं नाना धर्म I विप्रा सांगोनि ब्रह्मकर्म I प्रसन्न होऊनि वर उत्तम I देती श्रीगुरु तयातें ॥५५॥ अष्टत्रिंशीं भास्कर ब्राह्मण I तिघांपुरतें शिजवी अन्न I जेविले बहु ब्राह्मण I आणिक गांवचे शूद्रादि ॥५६॥ सोमनाथाची गंगा युवती I साठ वर्षांची वंध्या होती I तीस दिधली पुत्रसंतति I एकुणचाळिसावे अध्यायीं ॥५७॥ नरहरीकरवीं शुष्ककाष्ठा I अर्चवूनि दवडिलें त्याच्या कुष्ठा I शबरकथा शिष्य-वरिष्ठां I चाळिसाव्यांत सांगती ॥५८॥ एकेचाळिशीं सायंदेवा- I हस्ते घेती श्रीगुरू सेवा I ईश्वर पार्वतीसंवाद बरवा I काशीयात्रा निरुपण ॥५९॥ पुत्रकलत्रेसीं सायंदेव I येऊनि करिती श्रीगुरूस्तव I त्याला कथिती यात्राभाव I वरही देती एकेचाळिसीं ॥६०॥ बेचाळिसीं अनंतव्रत I धर्मराया कृष्ण सांगत I तेचि कथा सायंदेवाप्रत I सांगोनि व्रत करविती ॥६१॥ त्रेचाळिसीं तंतुकार भक्तासी I श्रीपर्वत दावूनि क्षणेंसीं I शिवरात्रि-पुण्यकथा त्यासी I विमर्षण राजाची कथियेली ॥६२॥ चव्वेचाळिसीं कुष्ठी ब्राह्मण I आला तुळजापुराहून I त्याला करवूनि संगमी स्नान I कुष्ठ नासूनि ज्ञान देती ॥६३॥ कल्लेश्वर हिप्परगे ग्रामास I श्रीगुरू भेटती नरहरी कवीस I आपुला शिष्य करिती त्यास I पंचेचाळिसावे अध्यायी ॥६४॥ शेचाळिसीं दिवाळी सण I गुरूसी आमंत्रिती सात जण I तितुकीं रूपे धरुनि आपण I गेले, मठिंही राहिले ॥६५॥ सत्तेचाळिसीं शूद्रशेतीं I त्याचा जोंधळा कापूनि टाकिती I शतगुणे पिकवूनि पुढती I आनंदविलें तयातें ॥६६॥ अठ्ठेचाळिसीं श्रीगुरूमूर्ति I अमरजासंगममाहात्म्य कथिती I स्नान करवूनि दवडिती I कुष्ठ दैवार्जिती रत्नाबाईचें ॥६७॥ ईश्वरपार्वती-संवाद शुद्ध I मंत्रराज गुरुगीता प्रसिद्ध I नामधारका सांगे सिद्ध I एकूणपन्नासावे अध्यायीं ॥६८॥ म्लेंच्छाचा स्फोटक दवडिती I भक्तीस्तव त्याचे नगरा जाती I पुढे श्रीपर्वतीं भेटों म्हणती I पन्नासावे अध्यायीं ॥६९॥ एकावन्नांत गुरुमूर्ति I देखोनियां क्षितीं पापप्रवृत्त्ति I उपद्रवितील नानायाती I म्हणोनि गुप्तरूपें रहावे ॥७०॥ ऐसा करूनि निर्धार I शिष्यांसी सांगती गुरुवर I आजि आम्ही जाऊ पर्वतावर I मल्लिकार्जुनयात्रेसी ॥७१॥ ऐसें ऐकूनि भक्तजन I मनीं होती अति उद्विग्न I शोक करिती आक्रंदोन I श्रीगुरूचरणीं लोळती ॥७२॥ इतुकें पाहूनि गुरुमूर्ति I वरदहस्तें तया कुरवाळिती I मद्‌भजनीं धरा आसक्ति I मठधामीं राहोनियां ॥७३॥ ऐसें बोधूनि शिष्यांसी I गुरु गेले कर्दळीवनासी I नाविकमुखें सांगूनि गोष्टीसी I निजानंदीं निमग्न होती ॥७४॥ ऐसें अपार श्रीगुरूचरित्र I अनंत कथा परम पवित्र I त्यांतील एकावन्न अध्याय मात्र I प्रस्तुत कथिले तुजलागीं ॥७५॥ सिद्ध म्हणे नामधारका I तुज कथिली अवतरणिका I श्रीगुरू गेले वाटती लोकां I परी गुरु गुप्त असती गाणगापुरीं ॥७६॥ कलियुगीं अधर्म वृद्धि पावले I म्हणोनि श्रीगुरू गुप्त झाले I भक्तजनांला जैसे पहिले I तैसेच भेटती अद्यापि ॥७७॥ हे अवतरणिका सिद्ध माला I श्रीगुरू भेटती जपे त्याला I जैसा भावार्थ असे आपुला I तैसी कार्ये संपादिती ॥७८॥ नामधारका तूं शिष्य भला I अवतरणिकेचा प्रश्न केला I म्हणोनि इतिहाससारांशाला I पुनः वदलों सत्शिष्या ॥७९॥ पूर्वी ऐकिलें असेल कानीं I त्यांतें तात्काळ येईल ध्यानीं I इतरां इच्छा होईल मनीं I श्रीगुरूचरित्रश्रवणाची ॥८०॥ ऐसी अवतरणिका जाण I तुज कथिली कथांची खूण I इचें सतत करितां स्मरण I कथा अनुक्रमें स्मरतसे ॥८१॥ ऐसें वदे सिद्धमुनि I नामधारक लागे चरणीं I विनवीतसे कर जोडोनि I तुझे वचनें सर्वसिद्धि ॥८२॥ आता असे विनवणी I श्रीगुरू-सप्ताहपारायणीं I किती वाचावे प्रतिदिनीं I हें मज सांगा श्रीगुरुराया ॥८३॥ सिद्ध म्हणती नामधारका I तुवां प्रश्न केला निका I परोपकार होईल लोकां I तुझ्या प्रश्नेंकरोनियां ॥८४॥ अंत:करण असतां पवित्र I सदाकाळ वाचावें गुरुचरित्र I सौख्य होय इहपरत्र I दुसरा प्रकार सांगेन ॥८५॥ सप्ताह वाचावयाची पद्धती I तुज सांगों यथास्थिती I शुचिर्भूत होवोनि शास्त्ररीतीं I सप्ताह करितां बहु पुण्य ॥८६॥ दिनशुद्धि बरवी पाहून I आवश्यक स्नानसंध्या करून I पुस्तक वाचावयाचें स्थान I रंगवल्लादि शोभा करावी ॥८७॥ देशकालादि संकल्प करून I पुस्तकरुपी श्रीगुरुचें पूजन I यथोपचारेंकरून I ब्राह्मणासही पूजावें ॥८८॥ प्रथम दिवसापासोन I बसावया असावें एक स्थान I अतत्वार्थ भाषणी धरावें मौन I कामादि नियम राखावे ॥८९॥ दीप असावे शोभायमान I देव-ब्राह्मण-वडिलां वंदून I पूर्वोत्तर मुख करून I वाचनीं आरंभ करावा ॥९०॥ सप्त संख्या अध्याय प्रथम दिनीं I अष्टादश द्वितीय दिनीं I अष्टाविंशति तृतीय दिनीं I चतुर्थ दिवशीं चौतीस पैं ॥९१॥ सदतीसपर्यंत पांचवे दिनीं I त्रेचाळीसवरी सहावे दिनीं I सप्तमीं एकावन्न वाचोनि I अवतरणिका वाचावी ॥९२॥ नित्य पाठ होतां पूर्ण I करावें उत्तरांग-पूजन I श्रीगुरुतें नमस्कारून I उपाहार कांहीं करावा ॥९३॥ याप्रकारें करावें सप्त दिन I रात्रीं करावें भूमिशयन I सारांश शास्त्राधारेंकरून I शुचिर्भूत असावें ॥९४॥ एवं होतां सप्त दिन I ब्राह्मणसुवासिनी-भोजन I यथाशक्त्या दक्षिणा देऊन I सर्व संतुष्ट करावे ॥९५॥ ऐसें सप्ताह-अनुष्ठान I करीतां होय श्रीगुरूदर्शन I भूतप्रेतादि-बाधा निरसन I होवोनि, सौख्य होतसे ॥९६॥ ऐसें सिद्धाचें वचन ऐकोनि I नामधारक लागे चरणीं I म्हणे बाळाची आळी पुरवोनि I कृतकृत्य केलें गुरुराया ॥९७॥ श्रोते म्हणती वंदूनि पायीं I श्रीगुरू केली बहु नवलाई I बाळका अमृत पाजी आई I तैसें आम्हां पाजिलें ॥९८॥ प्रति अध्याय एक ओंवी I ओंविली रत्नमाळा बरवी I मनाचे कंठीं घालितां, पदवी I सर्वार्थाची पाववी ॥९९॥ सिद्धाचें वचन रत्नखाणी I त्यांतूनि नामधारक रत्नें आणी I एकावन्न भरोनि रांजणीं I भक्त-याचकां तोषविलें ॥१००॥ किंवा सिद्ध हा कल्पतरू I नामाधारकें पसरिला करू I यांच्छा करोनि परोपकारु I भक्तांकरितां बहु केला ॥१०१॥ किंवा सिद्धमुनि बलाहक I नामधारक शिष्य चातक I मुख पसरोनि बिंदू एक I मागतां अपार वर्षला ॥१०२॥ तेणें भक्तां अभक्तां फुकाचा I सकळां लाभ झाला अमृताचा I हृदयकोश खळजनांचा I पाषाणसमही पाझरे ॥१०३॥ श्रीगुरुरायाचे धरुं चरण I सिद्धमुनीतें करूं वंदन I नामधारका करूं नमन I ऐसें करीं नारायणा ॥१०४॥ श्रीगुरुरूपी नारायणा I विश्वंभरा दीनोद्धारणा I आपण आपली दावूनि खुणा I गुरुशिष्यरूपें क्रीडसी ॥१०५॥

॥ इति श्रीगुरूचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे एकपंचाशदध्यायसारे अवतरणिका नाम द्विपंचाशत्तमोSध्यायः ॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 

॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥

॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥


Jul 16, 2016

॥ नमस्काराष्टक ॥


॥ श्रीगणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

अथ श्रीगुरुदत्तात्रेयनमस्कारस्तोत्र प्रारंभ: I 


सदा प्रार्थितो श्रीगुरूच्या पदासी I 

धरितो शिरी वंदितो आदरेसी I 

धरोनी करी तारी या बाळकासी I 

नमस्कार हा स्वामी दत्तात्रेयासी ।।१।।


मती हीन मी दीन आहे खरा हो I 

परी दास तुझा करी पांखरा हो I 

जसे लेकरू पाळीते माय कुशी I 

नमस्कार हा स्वामी दत्तात्रेयासी ।।२।।


लडिवाळ मी बाळ अज्ञान तुझा I 

गुरुवाचुनी पांग फेडील माझा I 

तुझ्यावीण दुजा कुणी ना आम्हासी I 

नमस्कार हा स्वामी दत्तात्रेयासी ।।३।।


पिता माय बंधु सखा तूची देवा I 

मुले मित्रही सोयरे व्यर्थ हेवा I 

कळोनी असे भ्रांती होई आम्हासी I 

नमस्कार हा स्वामी दत्तात्रेयासी ।।४।।


चरित्रे गुरूची करी नित्य पाठ I

जया भक्ती लागे पदी एकनिष्ठ I 

तयाचे कुळी दीप सज्ञानराशी I 

नमस्कार हा स्वामी दत्तात्रेयासी ।।५।।


बसे उंबरासन्निधी सर्वकाळ I 

जनी काननी घालवी नित्यकाल I 

तया सदगुरुचे नाम कल्याणराशी I 

नमस्कार हा स्वामी दत्तात्रेयासी ।।६।।


श्रमोनी गुरूपाशी तो म्लेंच्छ आला I

तया स्फोटरोगातुनी मुक्त केला I 

कृपेने तसे स्वामी पाळी आम्हासी I 

नमस्कार हा स्वामी दत्तात्रेयासी ।।७।।


सती अनसूया सुधी आदिमाता I 

त्रयमूर्ती ध्यानी मनी नित्य गाता I 

हरे रोगपीडा दारिद्रसी नाशी I 

नमस्कार हा स्वामी दत्तात्रेयासी ।।८।।


करोनी मनी निश्चयो अष्टकांचा I 

जनानो करा पाठ दत्तस्तुतीचा I 

करी माधवाच्या सुता रामदासी I

नमस्कार हा स्वामी दत्तात्रेयासी ।।९।।

।।इति श्रीगुरू श्रीगुरुदत्तात्रेयनमस्कारस्तोत्र संपूर्णम II


Jul 15, 2016

Gurucharitra Adhyay 51 श्रीगुरुचरित्र अध्याय - ५१


श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्योः नमः ॥ नामधारक विनवी सिद्धासी । मागें कथा सांगितली आम्हांसी । म्लेंच्छराजानें श्रीगुरुसी । नेलें होतें नगरासी ॥ १ ॥ तेथूनि आले गाणगाभुवनासी । पुढील कथा सांगा आम्हांसी । करुणावचन-अमृतेंसी । श्रीगुरुचरित्र आद्यंत ॥ २ ॥ सिद्ध म्हणे ऐक वत्सा । कथा असे अतिविशेषा । ऐकतां जाती सकळ दोषा । चिंतिलें काम्य पाविजे ॥ ३ ॥ राजाची भेटी घेऊनि । श्रीगुरु आले गाणगाभुवनीं । योजना करिती आपुल्या मनीं । गौप्य रहावें म्हणोनियां ॥ ४ ॥ प्रगट झालों बहुवसी । राजा आला भेटावयासी । उपजली भक्ति म्लेंच्छासी । नाना याती येतील ॥ ५ ॥ म्हणोनि आतां गौप्य व्हावें । लौकिकमतें निघावें । पर्वतयात्रा म्हणोनि स्वभावें । निघाले श्रीगुरु परियेसा ॥ ६ ॥ गौप्य राहिले गाणगापुरीं । प्रकट दावणें लोकाचारी । निघाले स्वामी श्रीपर्वतगिरी । शिष्यांसहित अवधारा ॥ ७ ॥ भक्तजन बोळवीत । चिंता करिताति बहुत । श्रीगुरु त्यांसी संबोखित । राहावविती अतिप्रीतीं ॥ ८ ॥ दुःख करिती सकळ जन । लागताति श्रीगुरुचरण । स्वामी आम्हांतें सोडुन । केवीं जातां यतिराया ॥ ९ ॥ तूं भक्तजनांची कामधेनु । होतासी आमुचा निधानु । आम्हां बाळकां सोडून । जातां म्हणोन विनविताति ॥ १० ॥ नित्य तुझे दर्शनीं । दुरितें जातीं पळोनि । जे जे आमुची कामना मनीं । त्वरित पावे स्वामिया ॥ ११ ॥ बाळकांते सोडूनि माता । केवीं जाय अव्हेरिता । तूंचि आमुचा मातापिता । नको अव्हेरुं म्हणताति ॥ १२ ॥ ऐसें नानापरी विनविती । हांसते झाले श्रीगुरुमूर्ति । संबोखिती अतिप्रीतीं । न करावी चिंता म्हणोनि ॥ १३ ॥ आम्ही असतों याचि ग्रामीं । नित्य स्नान अमरजासंगमीं । वसों मठीं सदा प्रेमीं । गौप्यरुपें अवधारा ॥ १४ ॥ जे भक्त असती माझ्या प्रेमीं । त्यांसी प्रत्यक्ष दिसों आम्ही । लौकिकमतें अविद्याधर्मी । जातो श्रीशैल्ययात्रेसि ॥ १५ ॥ प्रातःस्नान कृष्णातीरी । पंचनदी-संगम औदुंबरी । अनुष्ठान बरवें त्या क्षेत्रीं । माध्याह्नीं येतो भीमातटीं ॥ १६ ॥ संगमी स्नान करोनि । पूजा घेऊं मठीं निर्गुणी । चिंता न करा अंतःकरणी । म्हणोनि सांगती प्रीतिकरें ॥ १७ ॥ ऐसें सांगती समस्तांसी । अनुमान न धरा हो मानसीं । गाणगाभुवनीं अहर्निशीं । वसो आम्ही त्रिवाचा ॥ १८ ॥ जे जन भक्ति करिती । त्यांवरी आमुची अतिप्रीती । मनःकामना पावे त्वरिती । ध्रुव वाक्य असे आमुचें ॥ १९ ॥ अश्वत्थ नव्हे हा कल्पवृक्ष । संगमी असे प्रत्यक्ष । जें जें तुमच्या मनीं अपेक्ष । त्वरित साध्य पूजितां ॥ २० ॥ कल्पवृक्षातें पूजोन । यावें आमुचे जेथ स्थान । पादुका ठेवितों निर्गुण । पूजा करावी मनोभावें ॥ २१ ॥ विघ्नहर चिंतामणी । त्यांतें करावें अर्चनी । चिंतिलें फळ तत्क्षणीं । पावाल तुम्ही अवधारा ॥ २२ ॥ समस्त विघ्नांचा अंतक । पूजा तुम्हीं विनायक । अष्टतीर्थे असतीं विशेख । आचरावीं मनोभावें ॥ २३ ॥ संतोषकर आम्हांप्रती । त्रिकाळ करावी आरती । भक्तजन जें इच्छिती । त्वरित पावे परियेसा ॥ २४ ॥ ऐसें सांगोनि तयांसी । निघाले स्वामी श्रीपर्वतासी । भक्त परतोनि मठासी । आले चिंतीत मनांत ॥ २५ ॥ चिंतीत निघती मठांत । तेथे दिसती श्रीगुरुनाथ । लोक झाले विस्मित । म्हणती वस्तु त्रिमूर्ति ॥ २६ ॥ यासी म्हणती जे नर । ते पावती यमपूर । सत्य जाणा हो निर्धार । न कळे महिमा आम्हांसी ॥ २७ ॥ सवेंचि पाहतां न दिसे कोणी । प्रेमळ भक्त देखती नयनीं । गौप्यरुप धरोनि । राहिले श्रीगुरु मठांत ॥ २८ ॥ दृष्टांत दाखवोनि भक्तांसी । पातले आपण श्रीपर्वतासी । पाताळगंगातीरासी । राहिले स्वामी परियेसा ॥ २९ ॥ शिष्यांतें निरोपिती अवधारा । पुष्पांचें आसन त्वरित करा । जाणें असे पैलतीरा । ऐक्य व्हावें मल्लिकार्जुनीं ॥ ३० ॥ निरोप देतां श्रीगुरुमूर्ती । आणिलीं पुष्पें शेवंती । कमळ कल्हार मालती । कर्दळीपर्णे वेष्टोनि ॥ ३१ ॥ आसन केले अतिविचित्र । घातलें गंगेमध्यें पवित्र । श्रीगुरु शिष्यां सांगत । जावें तुम्हीं ग्रामासी ॥ ३२ ॥ दुःख करिती सकळी । त्यांसी सांगती श्रीगुरु चंद्रमौळी । गाणगाग्रामीं असों जवळी । भाव न करावा दुजा तुम्हीं ॥ ३३ ॥ लौकिकमतें आम्ही जातों । ऐसें दृष्टांती दिसतों । भक्तजनां घरीं वसतों । निर्धार धरा मानसीं ॥ ३४ ॥ ऐेसें भक्तां संबोखोनि । उठले श्रीगुरु तेथूनि । पुष्पासनीं बैसोनि । निरोप देती भक्तांसी ॥ ३५ ॥ ' कन्यागतीं ' बृहस्पतीसी । ' बहुधान्य ' नाम संवत्सरेसी । सूर्य चाले ' उत्तर-दिगंते ' सी । संक्रांति ' कुंभ ' परियेसा ॥ ३६ ॥ ' शिशिर ' ऋतु , ' माघ ' मासीं । ' असित पक्ष ' , ' प्रतिपदे ' सी । ' शुक्रवारीं ' पुण्यदिवशीं । श्रीगुरु बैसले निजानंदीं ॥ ३७ ॥ श्रीगुरु म्हणती शिष्यांसी । जातों आम्ही निज-मठासी । पावतां खूण तुम्हांसीं । प्रसादपुष्पें पाठवूं ॥ ३८ ॥ येतील पुष्पें शेवंती । घ्यावा प्रसाद तुम्हीं भक्तीं । पूजा करावी अखंडिती । लक्ष्मी वसो तुमच्या घरीं ॥ ३९ ॥ आणिक सांगेन एक खूण । गायनीं करावें माझें स्मरण । त्यांचे घरीं मी असें जाण । गायनीं प्रीति बहु मज ॥ ४० ॥ नित्य जे जन गायन करिती । त्यांवरी माझी अतिप्रीति । त्यांच्या घरीं अखंडिती । आपण असें अवधारा ॥ ४१ ॥ व्याधि नसती त्यांचे घरी । दरिद्र जाय त्वरित दूरी । पुत्रपौत्र-श्रियाकरीं । शतायुषी नांदतील ॥ ४२ ॥ ऐकती चरित्र माझें जरी । अथवा वाचिती जन निरंतरी । लक्ष्मी राहे त्यांचे घरीं । संदेह न धरावा मानसीं ॥ ४३ ॥ ऐसें सांगोनि शिष्यांसी । श्रीगुरु जहाले अदृश्येसी । चिंता करिती बहुवसी । अवलोकिताति गंगेंत ॥ ४४ ॥ ऐशी चिंता करितां थोर । तटाकीं आले नावेकर । तेही सांगती विचार । श्रीगुरु आम्हीं देखिले म्हणोनि ॥ ४५ ॥ शिष्यवर्गाचें मनोहर । व्यवस्था सांगती नावेकर । होतों आम्हीं पैलतीर । तेथें देखिले मुनीश्वरा ॥ ४६ ॥ संन्यासी वेष दंड हातीं । नाम ' नृसिंहसरस्वती ' । निरोप दिधला आम्हांप्रती । तुम्हां सांगिजे म्हणोनि ॥ ४७ ॥ आम्हां सांगितलें मुनीं । आपण जातों कर्दळीवनीं । सदा वसो गाणगाभुवनीं । ऐसें सांगा म्हणितलें ॥ ४८ ॥ भ्रांतपणें दुःख करितां । आम्ही देखिले दृष्टांता । जात होतें श्रीगुरुनाथ । सुवर्णपादुका त्यांचे चरणीं ॥ ४९ ॥ निरोप सांगितला तुम्हांसी । जावें आपुलाले स्थानासी । सुखी असावें वंशोवंशीं । माझी भक्ति करोनि ॥ ५० ॥ प्रसादपुष्पें आलिया । शिष्यें घ्यावीं काढोनियां । ऐसें आम्हां सांगोनियां । श्रीगुरु गेले अवधारा ॥ ५१ ॥ ऐसें नावेकरी सांगत । प्रसादपुष्पें वाट पहात । समस्त राहिले स्थिरचित्त । हर्षे असती निर्भर ॥ ५२ ॥ इतुकिया अवसरीं । प्रसादपुष्पें आलीं चारी । मुख्य शिष्य प्रीतिकरीं । काढोनि घेती अवधारीं ॥ ५३ ॥ नामधारक म्हणे सिद्धासी । मुख्य शिष्य ते कोण श्रीगुरुसी । विस्तारोनियां आम्हांसी । सांगा पुष्पें कोण लाधले ॥ ५४ ॥ सिद्ध म्हणे नामधारका । शिष्य बहुत गुरुनायका । गाणगापुरीं असतां ऐका । शिष्य गेले आश्रमासी ॥ ५५ ॥ आश्रम घेती संन्यासी । त्यांसी पाठविलें तीर्थासी । त्यांची नामें परियेसीं । सांगेन ऐकें विस्तारें ॥ ५६ ॥ कृष्ण-बाळसरस्वती । उपेंन्द्र-माधवसरस्वती । पाठविते झाले अतिप्रीतीं । आपण राहिलों समागमें ॥ ५७ ॥ गृहस्थधर्मे शिष्य बहुत । समस्त आपुले घरीं नांदत । त्रिवर्ग आले श्रीपर्वता । आपण होतों चवथावा ॥ ५८ ॥ साखरे नाम ' सायंदेव ' । कवीश्वर-युग्म पूर्व । ' नंदी ' नामा, ' नरहरि ' देव । पुष्पें घेतलीं चतुर्वगीं ॥ ५९ ॥ श्रीगुरुप्रसाद घेऊन । आले शिष्य चौघेजण । तेंचि पुष्प माझें पूजनीं । म्हणोनि पुष्प दाखविलें ॥ ६० ॥ ऐसी श्रीगुरुची महिमा । सांगतां असे अनुपम्या । थोडें सांगितलें तुम्हां । अपार असे ऐकतां ॥ ६१ ॥ श्रीगुरुचरित्र कामधेनु । सांगितलें तुज विस्तारोनु । दरिद्र गेलें पळोनु । ऐसें जाण निर्धारीं ॥ ६२ ॥ ऐसें श्रीगुरुचें चरित्र । पुस्तक लिहिती जे पवित्र । अथवा वाचिती ऐकती श्रोत्र । लक्ष्मीवंत होती जाण ॥ ६३ ॥ धर्म-अर्थ-काम-मोक्ष । त्यासी साध्य होती प्रत्यक्ष । महानंद उभयपक्ष । पुत्रपौत्री नांदती ॥ ६४ ॥ ऐसें सिद्धें सांगितलें । नामधारक संतोषले । सकळाभीष्ट लाधलें । तात्काळिक अवधारा ॥ ६५ ॥ म्हणे सरस्वती-गंगाधर । नामधारक लाधला वर । लक्ष्मीवंत पुत्र-कुमर । शतायुषी श्रियायुक्त ॥ ६६ ॥ श्रीगुरुचरित्र ऐकतां । लाधली सकळाभीष्टता । याकारणें ऐका समस्त । श्रीगुरुचरित्र कामधेनु ॥ ६७ ॥ अमृताची असे माथणी । स्वीकारावी त्वरित सकळ जनीं । धर्मार्थ-काम-मोक्षसाधनीं । हेचि कथा ऐकावी ॥ ६८ ॥ पुत्रपौत्रीं ज्यासी चाड । त्यासी हे कथा असे गोड । लक्ष्मी राहे अखंड । श्रवण करी त्या प्राणियां-घरीं ॥ ६९ ॥ चतुर्विध पुरुषार्थ । लाधती श्रवणें परमार्थ । श्रीनृसिंहसरस्वती गुरुनाथ । रक्षी त्यांचे वंशोवंशी ॥ ७० ॥ म्हणोनि सरस्वती-गंगाधर । श्रोतयां करी नमस्कार । कथा ऐका मनोहर । सकळाभीष्ट लाधे तुम्हां ॥ ७१ ॥ 


॥ इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे श्रीगुरुनिजानंदगमनं नाम एकपंचाशत्तमोऽध्यायः ॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥


॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा



Gurucharitra Adhyay 18 श्रीगुरूचरित्र अध्याय - १८


श्री गणेशाय नमः I श्री सरस्वत्यै नमः I श्री गुरुभ्यो नमः I जय जया सिद्धमुनि I तूं तारक भवार्णी I सुधारस आमुचे श्रवणीं I पूर्ण केला दातारा II १ II गुरुचरित्र कामधेनु I ऐकतां न धाये माझें मन I कांक्षीत होतें अंतःकरण I कथामृत ऐकावया II २ II ध्यान लागलें श्रीगुरूचरणीं I तृप्ति नव्हे अंतःकरणीं I कथामृत संजीवनी I आणिक निरोपावें दातारा II ३ II येणेंपरी सिद्धासी I विनवी शिष्य भक्तीसीं I माथा लावूनि चरणांसी I कृपा भाकी तये वेळीं II ४ II शिष्यवचन ऐकोनि I संतोषला सिद्धमुनि I सांगतसे विस्तारोनि I ऐका श्रोते एकचित्तें II ५ II ऐक शिष्या-शिखामणि I धन्य धन्य तुझी वाणी I तुझी भक्ति श्रीगुरुचरणीं I तल्लीन झाली परियेसा II ६ II तुजकरितां आम्हांसी I चेतन जाहलें परीयेसीं I गुरुचरित्र आद्यंतेसीं I स्मरण जाहलें अवधारीं II ७ II भिल्लवडी स्थानमहिमा I निरोपिला अनुपमा I पुढील चरित्र उत्तमा I सांगेन ऐका कचित्तें II ८ II व्कचित्काळ तये स्थानीं I श्रीगुरू होते गौप्योनि I प्रकट जहाले म्हणोनि I पुढें निघाले परियेसा II ९ II वरुणासंगम असे ख्यात I दक्षिणवाराणसी म्हणत I श्रीगुरू आले अवलोकित I भक्तानुग्रह करावया II १० II पुढें कृष्णातटाकांत I श्रीगुरू तीर्थें पावन करीत I पंचगंगासंगम ख्यात I तेथें राहिले द्वादशाब्दें II ११ II अनुपम्य तीर्थ मनोहर I जैसें अविमुक्त काशीपुर I प्रयागासमान तीर्थ थोर I म्हणोनि राहिले परियेसा II १२ II कुरवपुर ग्राम गहन I कुरुक्षेत्र तेंचि जाण I पंचगंगासंगम कृष्णा I अत्योत्तम परियेसा II १३ II कुरुक्षेत्रीं जितकें पुण्य I तयाहूनि अधिक असे जाण I तीर्थे असतीं अग्रण्य I म्हणोनि राहिले श्रीगुरू II १४ II पंचगंगानदीतीर I प्रख्यात असे पुराणांतर I पांच नामें आहेति थोर I सांगेन ऐका एकचित्तें II १५ II शिवा-भद्रा-भोगावती I कुंभीनदी-सरस्वती I ' पंचगंगा ' ऐसी ख्याति I महापातक संहारी II १६ II ऐसी प्रख्यात पंचगंगा I आली कृष्णेचिया संगा I प्रयागाहूनि असें चांगा I संगमस्थान मनोहर II १७ II अमरापुर म्हणिजे ग्राम I स्थान असे अनुपम्य I जैसा प्रयागसंगम I तैसें स्थान मनोहर II १८ II वृक्ष असे औदुम्बरु I प्रत्यक्ष जाणा कल्पतरू I देव असे अमरेश्वरू I तया संगमा षट्कूळी II १९ II जैसी वाराणसी पुरी I गंगाभागीरथी-तीरीं I पंचनदी संगम थोरी I तत्समान परियेसा II २० II अमरेश्वर संनिधानीं I आहेति चौसष्ट योगिनी I शक्तितीर्थ निर्गुणी I प्रख्यात असे परियेसा II २१ II अमरेश्वरलिंग बरवें I त्यासी वंदूनि स्वभावें I पूजितां नर अमर होय I विश्वनाथ तोचि जाणा II २२ II प्रयागीं करितां माघस्नान I जें पुण्य होय साधन I शतगुण होय तयाहून I एक स्नानें परियेसा II २३ II सहज नदीसंगमांत I प्रयागसमान असे ख्यात I अमरेश्वर परब्रह्म वस्तु I तया स्थानीं वास असे II २४ II याकारणें तिये स्थानीं I कोटितीर्थे असतीं निर्गुणी I वाहे गंगा दक्षिणी I वेणीसहित निरंतर II २५ II अमित तीर्थें तया स्थानीं I सांगतां विस्तार पुराणीं I अष्टतीर्थ ख्याति जाग्रणी I तया कृष्णातटाकांत II २६ II उत्तर दिशीं असे देखा I वाहे कृष्णा पश्चिममुखा I शुक्लतीर्थ नाम ऐका I ब्रह्महत्यापाप दूर II २७ II औदुम्बर सन्मुखेसी I तीनी तीर्थें परियेसीं I एकानंतर एक धनुषी I तीर्थें असती मनोहर II २८ II " पापविनाशी " 'काम्यतीर्थ ' I तिसरें सिद्ध 'वरदतीर्थ ' I अमरेश्वरसंनिधार्थ I अनुपम्य असे भूमंडळीं II २९ II पुढें संगम-षट्कूळांत I ' प्रयागतीर्थ ' असे ख्यात I ' शक्तितीर्थ ' ' अमरतीर्थ ' I ' कोटितीर्थ ' परियेसा II ३० II तीर्थें असती अपरांपर I सांगतां असे विस्तार I याकारणें श्रीपाद्गुरू I राहिले तेथें द्वादशाब्दें II ३१ II कृष्णा वेणी नदी दोनी I पंचगंगा मिळोनि I सप्तनदीसंगम सगुणी I काय सांगूं महिमा त्यांची II ३२ II ब्रह्महत्यादि महा पातकें I जळोनि जातीं स्नानें एकें I ऐसें सिद्धस्थान निकें I सकळाभीष्ट होय तेथें II ३३ II काय सांगूं त्यांची महिमा I आणिक द्यावया नाही उपमा I दर्शनमात्रें होती काम्या I स्नानफळ काय वर्णूं II ३४ II साक्षात् कल्पतरु I असे वृक्ष औदुम्बरु I गौप्य होऊन अगोचरु I राहिले श्रीगुरु तया स्थानीं II ३५ II भक्तजनतारणार्थ I होणार असे तीर्थ ख्यात I राहिले तेथें श्रीगुरुनाथ I म्हणोनि प्रकट जाहले जाणा II ३६ II असतां पुढें वर्तमानीं I भिक्षा करावया प्रतिदिनीं I अमरापुरग्रामीं I जाती श्रीगुरू परियेसा II ३७ II तया ग्रामीं द्विज एक I असे वेदाभ्यासक I त्याची भार्या पतिसेवक I पतिव्रताशिरोमणी II ३८ II सुक्षीण असे तो ब्राह्मण I शुक्लभिक्षा करी आपण I कर्ममार्गी आचरण I असे सात्विक वृत्तीनें II ३९ II तया विप्रमंदिरांत I असे वेल उन्नत I शेंगा निघती नित्य बहुत I त्याणें उदरपूर्ति करी II ४० II एखादे दिवशीं त्या ब्राह्मणासी I वरो न मिळे परियेसीं I तया शेंगांतें रांधोनि हर्षी I दिवस क्रमी येणेंपरी II ४१ II ऐसा तो ब्राह्मण दरिद्री I याचकपणें उदर भरी I पंचमहायज्ञ कुसरी I अतिथी पूजी भक्तीनें II ४२ II वर्ततां श्रीगुरू एके दिवसीं I तया विप्रमंदिरासी I गेले आपण भिक्षेसी I नेलें विप्रें भक्तीनें II ४३ II भक्तिपूर्वक श्रीगुरूसी I पूजा करी तो षोडशी I घेवडे-शेंगा बहुवसी I केली होती पत्र-शाका II ४४ II भिक्षा करून ब्राह्मणासी I आश्वासिती गुरु संतोषीं I गेले तुझे दरिद्र दोषी I म्हणोनि निघती तये वेळीं II ४५ II तया विप्राचे गृहांत I जो का होता वेल उन्नत I घेवडा नाम विख्यात I आंगण सर्व वेष्टिलें असे II ४६ II तया वेलाचें झाडमूळ I श्रीगुरूमूर्ति छेदिती तात्काळ I टाकोनि देती परिबळे I गेले आपण संगमासी II ४७ II विप्रवनिता तये वेळीं I दुःख करिती पुत्र सकळी I म्हणती पहा हो दैव बळी I कैसें अदृष्ट आपुलें II ४८ II आम्हीं तया यतीश्वरासी I काय उपद्रव केला त्यासी I आमुचा ग्रास छेदुनि कैसी I टाकोनि दिल्हा भूमीवरी II ४९ II ऐसेपरी ते नारी I दुःख करी नानापरी I पुरुष तिचा कोप वारी I म्हणे प्रारब्ध प्रमाण II ५० II म्हणे स्त्रियेसी तये वेळीं I जें जें होणार जया काळीं I निर्माण करी चंद्रमौळी I तया आधीन विश्व जाण II ५१ II विश्वव्यापक नारायण I उत्पत्तिस्थितिलया कारण I पिपीलिकादि स्थूळ-जीवन I समस्तां आहार पुरवीतसे II ५२ II ' आयुरन्नं प्रयच्छति ' I ऐसें बोले वेदश्रुति I पंचानन आहार हस्ती I केवीं करी प्रत्यहीं II ५३ II चौऱ्यांशी लक्ष जीवराशी I स्थूल सूक्ष्म समस्तांसी I निर्माण केले आहारासी I मग उत्पत्ति तदनंतरे II ५४ II रंकरायासी एक दृष्टीं I करूनी पोषितो हे सर्व सृष्टि I आपुलें आर्जव बरवें वोखटी I तैसे फळ आपणासी II ५५ II पूर्वजन्मीचें निक्षेपण I सुकृत अथवा दुष्कृत जाण I आपुलें आपणचि भोगणें I पुढिल्यावरी काय बोल II ५६ II आपुलें दैव असतां उणें I पुढिल्या बोलती मूर्खपणें I जें पेरिलें तेंचि भक्षणें I कवणावरी बोल सांगे II ५७ II बोल ठेविसी यतीश्वरासी I आपलें आर्जव न विचारिसी I ग्रास हरितला म्हणसी I अविद्यासागरी बुडोनि II ५८ II तो तारक आम्हांसी I म्हणोनी आला भिक्षेसी I नेलें आमुचे दरिद्रदोषी I तोचि तारील आमुतें II ५९ II येणेंपरी स्त्रियेसी I संभाषी विप्र परियेसीं I काढोनि वेलशाखेसी I टाकीता झाला गंगेंत II ६० II तया वेलाचें मूळ थोरी I जें कां होतें आपुलें द्वारीं I काढूं म्हणूनि द्विजवरीं I खणिता झाला तया वेळीं II ६१ II काढितां वेलमूळासी I लाधला कुंभ निधानेसीं I आनंद जाहला बहुवसी I घेऊनि गेला घरांत II ६२ II म्हणती नवल काय वर्तलें I यतीश्वर आम्हां प्रसन्न झाले I म्हणोनि ह्या वेला छेदिलें I निधान लाधलें आम्हांसी II ६३ II नर नव्हे तो योगीश्वर I होईल ईश्वरीअवतार I आम्हां भेटला दैन्यहर I म्हणती चला दर्शनासी II ६४ II जाऊनि संगमा श्रीगुरूसी I पूजा करिती बहुवसी I वृतांत सांगती तयांसी I तये वेळीं परियेसा II ६५ II श्रीगुरू म्हणती तयासी I तुम्हीं न सांगणें कवणासी I प्रकट करितां आम्हांसी I नसेल लक्ष्मी तुमचे घरीं II ६६ II ऐसेपरी तया द्विजासी I सांगे श्रीगुरू परियेसीं I अखंड लक्ष्मी तुमचे वंशीं I पुत्रपौत्रीं नांदाल II ६७ II ऐसा वर लाधोन I गेली वनिता तो ब्राह्मण I श्रीगुरूकृपा ऐसी जाण I दर्शनमात्रें दैन्य हरे II ६८ II ज्यासी होय श्रीगुरूकृपा I त्यासी कैचें दैन्य पाप I कल्पवृक्ष आश्रय करितां बापा I दैन्य कैंचें तया घरीं II ६९ II दैवें उणा असेल जो नरु I त्याणें आश्रयावा श्रीगुरू I तोचि उतरेल पैलपारु I पूज्य होय सकळिकांसी II ७० II जो कोण भजेल श्रीगुरू I त्यासी लाधेल इह परू I अखंड लक्ष्मी त्याचे घरीं I अष्ट ऐश्वर्ये नांदती II ७१ II सिद्ध म्हणे नामधारकासी I श्रीगुरूमहिमा असे ऐसी I भजावें तुम्हीं मनोमानसीं I कामधेनु तुझ्या घरीं II ७२ II गंगाधराचा कुमर I सांगे श्रीगुरूचरित्रविस्तार I पुढील कथामृतसार I ऐका श्रोते एकचित्तें II ७३ II 


II इति श्रीगुरूचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे अमरापुरमहिमानं-द्विजदैन्यहरणं नाम अष्टादशोSध्यायः II

II श्रीपादश्रीवल्लभ-नृसिंहसरस्वती-दत्तात्रेयार्पणमस्तु II

II श्रीगुरुदेवदत्त II शुभं भवतु II II दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा II दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा II दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा II



Gurucharitra Adhyay 14 श्रीगुरुचरित्र अध्याय - १४


श्री गणेशाय नमः ॥ श्री सरस्वत्यै नमः ॥ श्री गुरुभ्यो नमः ॥ नामधारक शिष्य देखा । विनवी सिद्धासी कवतुका । प्रश्न करी अतिविशेखा । एकचित्ते परियेसा ॥१॥ जय जयाजी योगीश्वरा । सिद्धमूर्ति ज्ञानसागरा । पुढील चरित्र विस्तारा । ज्ञान होय आम्हांसी ॥२॥ उदरव्यथेच्या ब्राह्मणासी । प्रसन्न जाहले कृपेसी । पुढे कथा वर्तली कैसी । विस्तारावे आम्हांप्रति ॥३॥ ऐकोनि शिष्याचे वचन । संतोष करी सिद्ध आपण । श्रीगुरुचरित्र कामधेनु जाण । सांगता जाहला विस्तारे ॥४॥ ऐक शिष्या शिखामणि । भिक्षा केली ज्याचे भुवनी । तयावरी संतोषोनि । प्रसन्न जाहले परियेसा ॥५॥ गुरुभक्तीचा प्रकारु । पूर्ण जाणे तो द्विजवरू । पूजा केली विचित्रु । म्हणोनि आनंद परियेसा ॥६॥ तया सायंदेव द्विजासी । श्रीगुरू बोलती संतोषी । भक्त होय रे वंशोवंशी । माझी प्रीति तुजवरी ॥७॥ ऐकोनि श्रीगुरुंचे वचन । सायंदेव विप्र करी नमन । माथा ठेवूनि चरणी । न्यासिता झाला पुनःपुन्हा ॥८॥ जय जया जगद्‌गुरु । त्रयमूर्तींचा अवतारू । अविद्यामाया दिससी नरु । वेदां अगोचर तुझी महिमा ॥९॥ विश्वव्यापक तूंचि होसी । ब्रह्मा-विष्णु-व्योमकेशी । धरिला वेष तूं मानुषी । भक्तजन तारावया ॥१०॥ तुझी महिमा वर्णावयासी । शक्ति कैंची आम्हांसी । मागेन एक आता तुम्हांसी । तें कृपा करणे गुरुमूर्ति ॥११॥ माझे वंशपारंपरी । भक्ति द्यावी निर्धारी । इह सौख्य पुत्रपौत्री । उपरी द्यावी सद्‌गती ॥१२॥ ऐसी विनंति करुनी । पुनरपि विनवी करुणावचनी । सेवा करितो द्वारयवनी । महाशूरक्रुर असे ॥१३॥ प्रतिसंवत्सरी ब्राह्मणासी । घात करितो जीवेसी । याचि कारणे आम्हांसी । बोलावीतसे मज आजि ॥१४॥ जातां तया जवळी आपण । निश्चये घेईल माझा प्राण । भेटी जाहली तुमचे चरण । मरण कैचे आपणासी ॥१५॥ संतोषोनि श्रीगुरूमूर्ति । अभयंकर आपुले हाती । विप्रमस्तकी ठेविती । चिंता न करी म्हणोनिया ॥१६॥ भय सांडूनि तुवां जावे । क्रुर यवना भेटावे । संतोषोनि प्रियभावे । पुनरपि पाठवील आम्हांपाशी ॥१७॥ जंववरी तू परतोनि येसी । असो आम्ही भरंवसी । तुवां आलिया संतोषी । जाऊ आम्हीं येथोनि ॥१८॥ निजभक्त आमुचा तू होसी । पारंपर-वंशोवंशी । अखिलाभीष्ट तू पावसी । वाढेल संतति तुझी बहुत ॥१९॥ तुझे वंशपारंपरी । सुखे नांदती पुत्रपौत्री । अखंड लक्ष्मी तयां घरी । निरोगी होती शतायुषी ॥२०॥ ऐसा वर लाधोन । निघे सायंदेव ब्राह्मण । जेथे होता तो यवन । गेला त्वरित तयाजवळी ॥२१॥ कालांतक यम जैसा । यवन दुष्ट परियेसा । ब्राह्मणाते पाहतां कैसा । ज्वालारूप होता जाहला ॥२२॥ विमुख होऊनि गृहांत । गेला यवन कोपत । विप्र जाहला भयचकित । मनीं श्रीगुरूसी ध्यातसे ॥२३॥ कोप आलिया ओळंबयासी । केवी स्पर्शे अग्नीसी । श्रीगुरूकृपा होय ज्यासी । काय करील क्रुर दुष्ट ॥२४॥ गरुडाचिया पिलीयांसी । सर्प तो कवणेपरी ग्रासी । तैसे तया ब्राह्मणासी । असे कृपा श्रीगुरुची ॥२५॥ कां एखादे सिंहासी । ऐरावत केवीं ग्रासी । श्रीगुरुकृपा होय ज्यासी । कलिकाळाचे भय नाही ॥२६॥ ज्याचे हृदयीं श्रीगुरुस्मरण । त्यासी कैंचे भय दारुण । काळमृत्यु न बाधे जाण । अपमृत्यु काय करी ॥२७॥ ज्यासि नांही मृत्यूचे भय । त्यासी यवन असे तो काय । श्रीगुरुकृपा ज्यासी होय । यमाचे मुख्य भय नाही ॥२८॥ ऐसेपरी तो यवन । अन्तःपुरांत जाऊन । सुषुप्ति केली भ्रमित होऊन । शरीरस्मरण त्यासी नाही ॥२९॥ हृदयज्वाळा होय त्यासी । जागृत होवोनि परियेसी । प्राणांतक व्यथेसी । कष्टतसे तये वेळी ॥३०॥ स्मरण असे नसे कांही । म्हणे शस्त्रे मारितो घाई । छेदन करितो अवेव पाही । विप्र एक आपणासी ॥३१॥ स्मरण जाहले तये वेळी । धांवत गेला ब्राह्मणाजवळी । लोळतसे चरणकमळी । म्हणे स्वामी तूंचि माझा ॥३२॥ येथे पाचारिले कवणी । जावे त्वरित परतोनि । वस्त्रे भूषणे देवोनि । निरोप दे तो तये वेळी ॥३३॥ संतोषोनि द्विजवर । आला ग्रामा वेगवक्त्र । गंगातीरी असे वासर । श्रीगुरुंचे चरणदर्शना ॥३४॥ देखोनिया श्रीगुरूसी । नमन करी तो भावेसी । स्तोत्र करी बहुवसी । सांगे वृत्तांत आद्यंत ॥३५॥ संतोषोनि श्रीगुरूमूर्ति । तया द्विजा आश्वासिती । दक्षिण देशा जाऊ म्हणती । स्थान-स्थान तीर्थयात्रे ॥३६॥ ऐकोनि श्रीगुरुंचे वचन । विनवीतसे कर जोडून । न विसंबे आतां तुमचे चरण । आपण येईन समागमे ॥३७॥ तुमचे चरणाविणे देखा । राहो न शके क्षण एका । संसारसागर तारका । तूंचि देखा कृपासिंधु ॥३८॥ उद्धरावया सगरांसी । गंगा आणिली भूमीसी । तैसे स्वामी आम्हासी । दर्शन दिधले आपुले ॥३९॥ भक्तवत्सल तुझी ख्याति । आम्हा सोडणे काय नीति । सवे येऊ निश्चिती । म्हणोनि चरणी लागला ॥४०॥ येणेपरी श्रीगुरूसी । विनवी विप्र भावेसी । संतोषोनि विनयेसी । श्रीगुरू म्हणती तये वेळी ॥४१॥ कारण असे आम्हा जाणे । तीर्थे असती दक्षिणे । पुनरपि तुम्हां दर्शन देणे । संवत्सरी पंचदशी ॥४२॥ आम्ही तुमचे गांवासमीपत । वास करू हे निश्चित । कलत्र पुत्र इष्ट भ्रात । मिळोनी भेटा तुम्ही आम्हां ॥४३॥ न करा चिंता असाल सुखे । सकळ अरिष्टे गेली दुःखे । म्हणोनि हस्त ठेविती मस्तके । भाक देती तये वेळी ॥४४॥ ऐसेपरी संतोषोनि । श्रीगुरू निघाले तेथोनि । जेथे असे आरोग्यभवानी । वैजनाथ महाक्षेत्र ॥४५॥ समस्त शिष्यांसमवेत । श्रीगुरू आले तीर्थे पहात । प्रख्यात असे वैजनाथ । तेथे राहिले गुप्तरूपे ॥४६॥ नामधारक विनवी सिद्धासी । काय कारण गुप्त व्हावयासी । होते शिष्य बहुवसी । त्यांसी कोठे ठेविले ॥४७॥ गंगाधराचा नंदनु । सांगे गुरुचरित्र कामधेनु । सिद्धमुनि विस्तारून । सांगे नामकरणीस ॥४८॥ पुढील कथेचा विस्तारू । सांगता विचित्र अपारु । मन करूनि एकाग्रु । ऐका श्रोते सकळिक हो ॥४९॥
॥ इति श्रीगुरूचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे क्रुरयवनशासनं-सायंदेववरप्रदानं नाम चतुर्दशोSध्यायः ॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 

॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥

॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥


अवश्य वाचावे असे काही -


Jul 14, 2016

॥ श्री दत्त अथर्वशीर्ष ॥


॥ हरिः ॐ ॥

ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय अवधूताय

दिगंबराय विधिहरिहराय आदितत्त्वाय आदिशक्तये ॥१॥


त्वं चराचरात्मकः सर्वव्यापी सर्वसाक्षी

त्वं दिक्कालातीतः त्वं द्वन्द्वातीतः ॥२॥


त्वं विश्वात्मकः त्वं विश्वाधारः विश्वेशः

विश्वनाथः त्वं विश्वनाटकसूत्रधारः

त्वमेव केवलं कर्तासि त्वं अकर्तासि च नित्यम् ॥३॥


त्वं आनन्दमयः ध्यानगम्यः त्वं आत्मानन्दः

त्वं परमानन्दः त्वं सच्चिदानन्दः

त्वमेव चैतन्यः चैतन्यदत्तात्रेयः

ॐ चैतन्यदत्तात्रेयाय नमः ॥४॥


त्वं भक्तवत्सलः भक्ततारकः भक्तरक्षकः

दयाघनः भजनप्रियः त्वं पतितपावनः

करुणाकरः भवभयहरः ॥५॥


त्वं भक्तकारणसंभूतः अत्रिसुतः अनसूयात्मजः

त्वं श्रीपादश्रीवल्लभः त्वं गाणगग्रामनिवासी

श्रीमन्नृसिंहसरस्वती त्वं श्रीनृसिंहभानः

अक्कलकोटनिवासी श्रीस्वामीसमर्थः

त्वं करवीरनिवासी परमसद्गुरु श्रीकृष्णसरस्वती

त्वं श्रीसद्गुरु माधवसरस्वती ॥६॥


त्वं स्मर्तृगामी श्रीगुरूदत्तः शरणागतोऽस्मि त्वाम् ।

दीने आर्ते मयि दयां कुरु

तव एकमात्रदृष्टिक्षेपः दुरितक्षयकारकः ।

हे भगवन । वरददत्तात्रेय।

मामुद्धर । मामुद्धर । मामुद्धर इति प्रार्थयामि ।

ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥७॥


॥  ॐ दिगंबराय विद्महे अवधूताय धीमहि तन्नो दत्तः प्रचोदयात् ॥

॥ ॐ र्‍हीं क्रीं र्‍हीं असाध्यसाधकाय दत्तात्रेयाय नमः


Jul 13, 2016

॥ श्री गुरुचरित्र सार ॥


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ 


जगद्वंद्य अवधूत दिगंबर, दत्तात्रेय गुरु तुम्हीच ना ? अनन्यभावे शरणागत मी, भवभय-वारण तुम्हीच ना ? कार्तवीर्य यदु परशुरामही, प्रबोधिले गुरु तुम्हीच ना ? स्वामी जनार्दन एकनाथ तरी, कृतार्थ केले तुम्हीच ना ? नवनारायण सनाथ करुनी, पंथ निर्मिला तुम्हीच ना ? मच्छिंन्द्रादि जति प्रवृत्त केले, जन उद्धारा तुम्हीच ना ? दासोपंता घरी रंगले, परमानंदे तुम्हीच ना ? नाथ सदनीचे चोपदार तरी, श्री गुरूदत्ता तुम्हीच ना ? युगायुगी निजभक्त रक्षणा, अवतरता गुरु तुम्हीच ना ? बालोन्मत्त पिशाच्चवृत्ती, धारण करता तुम्हीच ना ?  स्नान काशीपुरी चंदन पंढरी, संध्या सागरी तुम्हीच ना ? करुनी भिक्षा करविरी भोजन, पांचाळेश्वरी तुम्हीच ना ? तुळजापुरी करशुद्धी तांबुल, निद्रा माहुरी तुम्हीच ना ? करुनी समाधी मग्न निरंतर, गिरनारी गुरु तुम्हीच ना ? विप्र स्त्रियेच्या वचनी गुंतले, पीठापुरी गुरु तुम्हीच ना ? श्रीपादवल्लभ नृसिंह सरस्वती, करंजनगरी तुम्हीच ना ? जन्मताच ओंकार जपुनी, मौन धरियेले तुम्हीच ना ? मौजी बंधनी वेद वदोनी, जननी सुखविली तुम्हीच ना ? चतुर्थाश्रमा जीर्णोद्धारा, आश्रम घेऊनी तुम्हीच ना ? कृष्ण सरस्वती सद्गुरू वंदुनी, तीर्था गमले तुम्हीच ना ? माधवारण्य कृतार्थ केला, आश्रम देऊनी तुम्हीच ना ? पोटशुळाची व्यथा हरोनी, विप्र सुखविला तुम्हीच ना ? वेल उपटुनी विप्रा दिधला, हेमकुंभ गुरु तुम्हीच ना ? तस्कर वधूनि विप्र रक्षिला, भक्तवत्सला तुम्हीच ना ? विप्रस्त्रियेचा पुत्र उठविला, निष्ठा देखुनी तुम्हीच ना ? हीनजिव्हा वेदपाठी केला, सजीव करुनी तुम्हीच ना ?  वाडी नरसिंह औदुंबरही, वास्तव्य करुनी तुम्हीच ना ? भीमा-अमरजा संगमी आले, गाणगापुरी गुरु तुम्हीच ना ? राममुहूर्ती संगमस्थानी, अनुष्ठानी रत तुम्हीच ना ? भिक्षा ग्रामी करुनी राहतां, माध्याह्नी मठीं तुम्हीच ना ? ब्रह्मराक्षसा मोक्ष देऊनी, उद्धरिले मठीं तुम्हीच ना ? वांझ महिषी दुभविली, फुलविले शुष्क काष्ठ गुरु तुम्हीच ना ? नंदीनामा कुष्ठी केला, दिव्यदेही गुरु तुम्हीच ना ? त्रिविक्रमा विश्वरूपा दाऊनी, कुमसी ग्रामी तुम्हीच ना ? अगणित दिधले धान्य कापुनी, शूद्रा क्षेपुर तुम्हीच ना ? रत्नाईचे कुष्ठ दवडिले, तीर्थे वर्णित तुम्हीच ना ? आठही ग्रामी भिक्षा केली, दीपवाळी दिनी तुम्हीच ना ? भास्कर हस्ते चार सहस्रा, भोजन दिधले तुम्हीच ना ? निमिषमात्रे तंतुक नेला, श्रीशैल्यासी तुम्हीच ना ? सायंदेवां काशीयात्रा, दाखविली गुरु तुम्हीच ना ? चांडाळा मुखी वेद वदविले, गर्व हराया तुम्हीच ना ? साठ वर्षे वांझेसी दिधले, कन्यापुत्रही तुम्हीच ना ? कृतार्थ केला मानसपूजनी, नरकेसरी गुरु तुम्हीच ना ? माहूरचा सतिपती उठवोनी, धर्म कथियला तुम्हीच ना ? रजकाचा यवनराज बनवुनी, उद्धरिला गुरु तुम्हीच ना ? अनन्यभावे भजता सेवक, तरतिल वदले तुम्हीच ना ? कर्दळीवनीचा बहाणा करुनी, गाणगापुरी स्थित तुम्हीच ना ? निर्गुण पादुका दृष्य ठेवूनि, गुप्त स्वामी मठी तुम्हीच ना ? विठाबाईचा दास मूढ परि, अंगीकारिला तुम्हीच ना ? आत्मचिंतनी रमवा निशिदिनी, दीनानाथ गुरु तुम्हीच ना ?


॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥





॥ श्री दत्त बावनीं ॥


जय योगीश्वर दत्त दयाळ | तुज एक जगमां प्रतिपाळ ||१||

हे योगीश्वर दयाळु दत्तप्रभू! तुझा जयजयकार असो! तूच एकमात्र या जगामधे रक्षणकर्ता आहेस.


अत्र्यनसूया करी निमित्त | प्रगट्यो जगकारण निश्चित ||२||

अत्रि ऋषी आणि अनसूयामाता यांना निमित्त करुन या जगासाठी खरोखर तू प्रगट झाला आहेस.


ब्रह्माहरिहरनो अवतार । शरणागतनो तारणहार ||३||

तू ब्रह्मा, विष्णु आणि शंकर यांचा अवतार आहेस आणि शरणागतांना तू या भवसागरातुन तारुन नेतोस.


अन्तर्यामि सत चित सुख | बहार सद्गुरु द्विभुज सुमुख् ||४||

तू अंतरंगात सच्चिदानंदरुपाने नियमन करणारा आहेस आणि बाह्य स्वरुपात दोन हात आणि सुंदर मुख असलेला असा सद्गुरु रुप आहेस.


झोळी अन्नपुर्णा करमांह्य | शांति कमन्डल कर सोहाय ||५||

तुझ्या हातात असलेली ही झोळी साक्षात अन्नपुर्णा आहे आणि तुझ्या हाती असलेले हे कमण्डलु शांतीचे प्रतिक आहे.


क्यांय चतुर्भुज षडभुज सार | अनंतबाहु तु निर्धार ||६||

कधी तू चतुर्भुज स्वरुपात असतोस तर काही वेळेस तू षडभुजा धारण करतोस, पण खरे पाहता तू अनंत बाहुधारी आहेस.


आव्यो शरणे बाळ अजाण | उठ दिगंबर चाल्या प्राण ||७||

मी अजाण बालक तुला शरण आलो आहे. हे दिगंबरा ! तू उठ. आता प्राण जाईल अशी स्थिती आहे.


सूणी अर्जुण केरो साद | रिझ्यो पुर्वे तुं साक्षात  ||८||

दिधी ऋद्धि सिद्धि अपार | अंते मुक्ति महापद सार ||९||

पुर्वी तू सहस्त्रार्जुनाचा धावा ऐकुन प्रसन्न झाला होतास आणी त्याला ऋद्धी- सिद्धी दिल्या होत्या. त्यानंतर त्याला मुक्ती देऊन महापद दिले होते.


कीधो आजे केम विलम्ब ? । तुजविण मुजने ना आलम्ब ||१०||

मग आजच एवढा विलंब का करीत आहेस? मला तुझ्याशिवाय कुणाचा आधार नाही.


विष्णुशर्म द्विज तार्यो एम | जम्यो श्राद्धमां  देखी प्रेम ||११||

विष्णुशर्मा ब्राह्मणाचे प्रेम बघुन तू श्राद्धामधे जेवण केलेस आणि त्यांचा उद्धार केलास.


जम्भदैत्यथी त्रास्या देव | कीधी म्हेर ते त्यां ततखेंव ||१२||

विस्तारी माया दितिसुत | इन्द्र करे हणाव्यो तूर्त ||१३||

जंभ राक्षसामुळे देव त्रासले होते तेव्हा तुच त्यांना ताबडतोब मदत केली होती. तू त्यावेळी आपल्या मायेने इंद्राकरवी त्या राक्षसाचा वध केला होतास.


एवी लीला कईं  कईं शर्व | किधी वर्णवे को ते सर्व ||१४||                            

अशा प्रकारच्या अनेक लीला भगवान शंकराने (शर्व) केल्या आहेत. यांचे वर्णन कोण करु शकेल?


दोड्यो आयु सुतने काम | कीधो एने तें निष्काम ||१५||

आयुराज पुत्रासाठी आपण धावत गेलात आणि त्याला निष्काम (कामनारहित) केले.


बोध्या यदु ने परशुराम | साध्यदेव प्रल्हाद अकाम ||१६||

यदुराजाला, परशुरामाला, साध्यदेवाला आणि निष्काम अशा प्रल्हादाला तू उपदेश केला होता.


एवी तारी कृपा अगाध | केम सूणे ना मारो साद ||१७||

अशी तुझी अगाध कृपा असतांना, तू माझी हाक मात्र का ऐकत नाहीस?


दोड अंत ना देख अनंत | मा कर अधवच शिशुनो अंत ||१८||

हे अनंत, धावत ये, माझा अंत पाहु नकोस. या बालकाचा असा मधेच अंत करु नकोस.


जोई द्विज स्त्री केरो स्नेह | थयो पुत्र तुं नि:संदेह  ||१९||

ब्राह्मण स्त्रीचे प्रेम पाहुन तू खरोखर तिचा पुत्र झालास.


स्मर्तृगामि कलितार कृपाळ | तार्यो धोबि छेक गमार ||२०||

स्मरण करतास धावणारा तू , कलियुगामधे तारुन नेणारा, हे कृपाळू, तू तर अगदी अडाणी अशा धोब्याला पण उद्धारले आहेस.


पेटपीडथी तार्यो विप्र | ब्राह्मणशेठ उगार्यो क्षिप्र ||२१||

पोटशुळाने त्रस्त असलेल्या ब्राह्मणास तू तारलेस, आणि व्यापारी ब्राह्मणशेठला वाचवलेस.


करे केम ना मारी व्हार ? | जो आणिगम एकज वार ||२२||

मग देवा, तू माझ्या मदतीला का बरे धावत नाहीस? एकदाच माझ्याकडे पहा!


शुष्क काष्ठने आण्यां पत्र | थयो केम उदासिन अत्र ? ||२३||

वाळलेल्या लाकडाला ही पालवी फुटावी अशी तुझी कृपा असताना, माझी मात्र तू का उपेक्षा करत आहेस ?


जर्जर वंध्या केरां स्वप्न | कर्यां सफळ ते सुतनां  कृत्स्न ||२४||

हे देवा, वृद्ध वंध्या स्त्रीला पुत्र देऊन तू तिचे स्वप्न साकार केलेस, तिचे मनोरथ पुर्ण केलेस.


करी दुर ब्राह्मणनो कोढ | कीधा पुरण एना कोड ||२५||

हे दत्तात्रेय प्रभू ! तू ब्राह्मणाचे कोड बरे करुन त्याची मनीची इच्छा पुर्ण केलीस.


वंध्या भैंस दूझवी देव | हर्युं दारिद्र्य तें ततखेव ||२६||

हे प्रभू! आपण वांझ म्हशीला दूभती केलीस आणि त्या ब्राह्मणाचे दारिद्र्य दूर केलेत.


झालर खाई रिझ्यो एम | दीधो सुवर्ण घट सप्रेम ||२७||

श्रावणघेवड्याच्या शेंगांची भाजी खावुन, आपण त्या ब्राह्मणाला प्रेमपुर्वक सोन्याने भरलेला हंडा दिलात.


ब्राह्मण स्त्रिनो  मृत भरथार | कीधो सजीवन तें निर्धार ||२८||

ब्राह्मण स्त्रीच्या मृत पतीला तू पुन्हा जीवित केलेस.


पिशाच पिडा कीधी दूर | विप्रपुत्र उठाड्यो शूर ||२९||

पिशाच्च पीडा दुर करुन, तू मृत ब्राह्मण पुत्र पुनश्च जीवंत केलास.


हरि विप्रमद  अंत्यजहाथ | रक्ष्यो भक्त त्रिविक्रम तात ||३०||

हे मायबाप ! तू एका हरिजनाचे माध्यमातुन ब्राह्मणाचे गर्वहरण केलेस आणि त्रिविक्रम नावाच्या भक्ताचे रक्षण केलेस.


निमेषमात्रे तंतुक एक | प्होंच्याडो श्रीशैले  देख ||३१||

तंतूक नामक भक्ताला तू एका क्षणांत श्रीशैल पर्वतावर पोहोचवुन दिलेस.


एकी साथे आठ स्वरूप | धरि देव, बहुरूप ,अरूप ||३२||

संतोष्या निज भक्त सुजात | आपी परचाओ साक्षात ||३३||

हे प्रभो, तू निर्गुण असुनही अनेक रुपे धारण करु शकतोस. त्यामुळे एकाच वेळी आठ भक्तांचे घरी भोजनास जाऊन तू  सर्व भक्तांना संतुष्ट केलेस आणि आपल्या साक्षित्वाची प्रचिती दिली.


यवनराजनी टाळी पीड | जातपातनी तने न चीड ||३४||

हे देवा ! तू यवन (मुसलमान) राजाची शारीरिक व्याधी दूर करुन तू जातीभेद किंवा श्रेष्ठ-कनिष्ठ यात काही फरक करत नाहीस हे दाखवुन दिलेस.


रामकृष्णरुपे तें एम | कीधी लिलाओ कंई तेम ||३५||

हे दत्त दिगंबरा ! तू राम व कृष्णाचा अवतार धारण करुन अनेक लीला केल्या आहेस.


तार्यां पथ्थर गणिका व्याध | पशुपंखी पण तुजने साध ||३६||

हे दत्तात्रेय प्रभो, दगड, वेश्या, शिकारी इ.चा पण तू  उद्धार केला आहेस. पशु पक्षी पण तुझ्यातील साधुता जाणुन आहेत.


अधमओधारण तारुं नाम | गातां सरे ना शां शां काम ? ||३७||

हे देवा, तुझे नामस्मरण पापी माणसाला पावन करणारे आहे. तुझे नामस्मरण केल्याने कुठले काम होत नाही?


आधि व्याधि उपाधि सर्व | टळे स्मरणमात्रथी शर्व  !||३८||

हे शिवशंकरा, तुझ्या नुसत्या स्मरणाने आधि-व्याधी, आणि सर्व उपाधी नष्ट होतात.


मुठचोट ना लागे जाण | पामे नर स्मरणे निर्वाण ||३९||

तुझे स्मरण केल्याने मूठ मारणे इ. प्रकारचा त्रास होत नाही, आणि मनुष्य मोक्षपद प्राप्त करतो.


डाकण शाकण भेंसासुर | भूत पिशाचो जंद असुर ||४०||

नासे मूठी दइने तूर्त | दत्तधून सांभाळतां मूर्त ||४१||

या दत्त नामाची धून म्हटल्याने डाकिण, शाकिण, महिषासुर, भूत-पिशाच्च, जंद, असुर पळुन जातात.


करी धूप गाए जे एम | दत्त-बावनी आ सप्रेम ||४२||

सुधरे तेना बंने लोक | रहे न तेने क्यांये शोक ||४३||

दासी सिद्धि तेनी थाय | दुःख दारिद्र्य तेनां जाय !||४४||

जे कोणी धूप लावुन ही दत्तबावनी प्रेमपुर्वक म्हणतात, त्यांना इहलोकी सौख्य प्राप्त होते व अंती मोक्षप्राप्ती होते. त्याला कोणत्याही प्रकारचे दु:ख रहात नाही. सिद्धी जणु त्याची दासी होते व त्याला कधीही दारिद्र्य प्राप्त होत नाही.


बावन गुरुवारे नित नेम | करे पाठ बावन सप्रेम ||४५||

यथावकाशे नित्यनियम | तेने कदि न दंडे यम ||४६||

जे कोणी बावन्न गुरुवार नियमांचे पालन करुन नेहमी दत्तबावनीचे बावन्न पाठ श्रद्धापुर्वक करतात किंवा जसा वेळ मिळेल तसे पाठ करतात त्यांना यमराज कधी दंड करत नाही.


अनेक रुपे एज अभंग | भजतां नडे न माया-रंग ||४७||

हा दत्त दिगंबर जरी अनेक स्वरुपात असला तरी त्याचे मूळ स्वरुप कायम असते, त्यात फरक पडत नाही. दत्त प्रभुंची उपासना करतांना माया-मोह त्रास देत नाहीत.


सहस्त्र नामे नामी एक | दत्त दिगंबर असंग छेक ! ||४८||

दत्तात्रेयाला हजारो नावें असुनही तो मात्र दत्त दिगंबर एकच आहे आणि तो सर्व माया मोहापासुन दूर अलिप्त आहे.


वंदुं तुजने वारंवार |  वेद श्वास तारा निर्धार ||४९||

हे प्रभो, मी तुला वारंवार वंदन करीत आहे. चारही वेद आपल्या श्वासातुनच प्रगट झाले आहेत हे निश्चित!


थाके वर्णवतां ज्यां शेष | कोण रांक हुं बहुकृतवेष ? ||५०||

जेथे हे दत्तात्रेया, तुझे वर्णन करतांना शेष सुद्धा थकुन जातो, तेथे अनेक जन्म घेणार्‍या माझ्यासारख्या पामराची काय कथा?


अनुभव-तृप्तिनो उद्गार  | सूणी हसे ते खाशे मार ||५१||

दत्तबावनी हे अनुभवाचे बोल आहेत. टिकाकाराच्या दृष्टीकोनातुन कोणी याकडे पाहिले तर त्याला प्रायश्चित्त भोगावे लागेल.


तपसी तत्त्वमसि ए देव ! | बोलो जय जय श्री गुरुदेव !! ||५२||

श्री दत्त प्रभो हे तपसी व तेच निर्गुण ब्रह्मस्वरुप आहेत. म्हणुन सर्वांनी आवर्जुन 'जय जय श्री गुरुदेव' म्हणावे.