Oct 21, 2016

॥ श्री दत्त स्तुती ॥


श्रीदत्तराया गिरनार वासी |

अस्तित्व आहे गाणगापुरासी |

औदुंबरीही तुझी नित्य फेरी |

तुजवीण दत्ता मज कोण तारी || १ ||


कषाय वस्त्रे जटाभार झोळी |

पायी खडावा शुभ्र भस्म भाळी |

शिरें तीन सहा हस्त शस्त्रधारी |

तुजवीण दत्ता मज कोण तारी || २ ||


गोरूप भूमाय श्वानरुप वेद |

दुर्लक्षी माझे सहस्त्र प्रमाद |

शास्त्रे पुराणे तुझे भाट सारी |

तुजवीण दत्ता मज कोण तारी || ३ ||


ह्रदयी असावी तुझी मूर्ती देवा |

मनी हिच इच्छा घडो तुझी सेवा |

विरक्ती असावी असोनी संसारी |

तुजवीण दत्ता मज कोण तारी || ४ ||


भवदु:ख आता क्षणी दूर व्हावे |

आयुष्य आरोग्य सकळांसी द्यावे |

तव दर्शनाची मला आस भारी |

तुजवीण दत्ता मज कोण तारी || ५ ||


कृपा दृष्टी होता जळे पापराशी |

सदा सर्वदा सर्वही सौख्य देसी |

परब्रह्मरूपी गुरू मोक्षकारी |

तुजवीण दत्ता मज कोण तारी || ६ ||


दत्तगुरू जय दत्तगुरू हा |

महामंंत्र हृदयी सुरू असे पहा |

कैवारी माझा तू दंडधारी |

तुजवीण दत्ता मज कोण तारी || ७ ||


तुझा दास मी दीन दत्ता दयाळा |

मन:शांती लाभो मज विश्वपाळा |

धावून ये रे हो देहधारी |

तुजवीण दत्ता मज कोण तारी || ८ ||


एकांती ये रे गुरूदत्तराया |

इच्छित माझे वरदान द्याया |

विनंती पदी सर्व चिंता निवारी |

तुजवीण दत्ता मज कोण तारी || ९ ||


|| अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||



No comments:

Post a Comment