Oct 15, 2016

॥ श्रीगुरू दत्तात्रेय प्रार्थना ॥ 


॥ श्रीगणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥


येई बा गुरुराया, मज घें पदरीं । लोटेना भवसिंधु, बळिया लहरी ।। येई बा गुरुराया

मायेचा पूर लोटे, मज वाहवितो । काळाचें भय वाटे, तुज आळवितो । 

युगसम बहु कष्टी बा, दिस घालवितों । तुजसाठीं ऊर दाटे , जीव कालवतों येई बा गुरुराया  


कोठें न गमे देवा, हरि काय करू । कोणातें दु:ख सांगू, गुरू कल्पतरू ।

आतां तुजविण दत्ता, किती धीर धरू । भेटायां गुरूराशी, तप कोण करू येई बा गुरुराया 


कोण दुजा प्रणिता बा, प्रतिपाळ करी । तुज विरहित मज नाहीं, गति बा दुसरी ।

बुडतों या भवडोही, करि कोण धरी । देवा बहु श्रम झालें, मम दु:ख हरी येई बा गुरुराया 


योगीजनमनरमणा, जननी जनिता । देवा बहु दिसं झालें, मज चाळवितां ।

कैसें मम दु:ख न ढळें , शिरी तू असतां । स्वामी तू गुरू माझा, भव उद्धरितां येई बा गुरुराया 


प्राण विसावा माझा, हरि तू अससी । सागर तू करुणेचा, मज कां छळिसी ।

सूरनरमुनि सकळांच्या, हृदयीं वससी। सेवक मी हरि तुझा, दूरि कां धरिशी येई बा गुरुराया 


तव विरहित मम नयनीं, जळ पाझरतें । लव पळ आयुष्य हे माझें, हरि हें सरतें ।  

साधन काय करू मी, मनना परतें । जिवलग तू कधिं येशी, मन घाबरतें येई बा गुरुराया 


यत्नांची हद्द झालीं, मति हें भ्रमली । नाहीं धीर दयाळा, वृत्ति डळमळली । 

तव पद सेवा कांही, मज ना घडली । निरपेक्षा हरि माझी, भूलि कां पडली येई बा गुरुराया 


कैसा तरी गुरुवर्या, तव दास असें । सम्यक सगुण रूप तुझें, नयनीं विलसे ।

नारायण तुज विनवी, पथ पाहतसें । स्वामीं निरंजन दत्ता, पदी लागतसें येई बा गुरुराया   


॥ श्रीगुरुदेव दत्त


2 comments:

  1. माझ्या आवडीच पद पाठ नाही. माझे वडील अनेकदा हे गायचे त्यामुळे search केलं

    ReplyDelete