॥ श्रीगणेशाय नम: ॥ ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॥ श्री स्वामी समर्थाय नमः ॥
भव्यमूर्ती कसा शोभे उंच धिप्पाड साजरा मोद होई जनांलागी मुखडा पाहता बरा ॥१॥ विशाल नेत्र कैसे ते कर्ण खांद्यास लागती गौरकांती जयाचे ते बाहू जानुस टेकती ॥२॥ लंबोदर पहा त्याचे गजास्या परी भासते वक्षस्थल तसे मोठे नास अव्यंग शोभते ॥३॥ रेशमासारखे ऐसे पाद ज्याचे अति मृदू ब्रह्मादि जाहले मुग्ध काय मी त्या मुखे वदू ॥४॥ एक रुद्राक्ष कंठी तो कौस्तुभापरी भासतो मोतियाच्या कुंडलाने कर्णही बहु शोभतो ॥५॥ तुलसीकाष्ठमाला ती वैजयंतीच दुसरी पहा ती योगीरायाची ज्ञानमुद्रा तशी बरी ॥६॥ कपाळी केशरी गंध कस्तुरीचा टिळा तसा कटी कौपिन लेवोनी स्वामिनाथ दिसे कसा ॥७॥ पूर्णावतार विष्णूचा बुद्धिग्रामासी पातला भक्त तारावया लागी यतीचा वेष घेतला ॥८॥ स्तोत्र हे स्वामीदासाचे नित्य कोणीही वाचील शीघ्र त्या स्वामीनाथाचा कृपावर्षाव होईल ॥९॥
॥ इति श्री गजानन महाराज (राजीमवाले) विरचित श्री अक्कलकोट स्वामी समर्थ ध्यानाष्टक ॥
॥ श्री स्वामी समर्थार्पणमस्तु ॥
No comments:
Post a Comment