॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
मौनत्वें करितो विचित्र मग जो नानाविलासे हरा ॥
मौंजीबंधन झालीया तदुपरीं काशीपुरा चालिला ।
तो हा सद्गुरुराज श्रीनरहरी औदुंबरी राहिला ॥१॥
गंगास्नान निरंतरा करितसे कालत्रया साधुनीं ।
चिन्मुद्रा करितो दृढासनी वसे काशीस ध्यातो मुनी ॥
येती थोर यतीं नमुनी म्हणती आम्हासि तो आगळा ।
तो हा सद्गुरुराज श्रीनरहरी औदुंबरी राहिला ॥२॥
वृद्ध कृष्ण सरस्वती यतिवरा सर्वांसी मानी भला ।
त्यातें वंदूनि बोलतो निजगुजां संन्यास देणे मला ॥
चतुर्थाश्रम घेऊनि गुरुचिये आज्ञे स्वयें चालिला ।
तो हा सद्गुरुराज श्रीनरहरी औदुंबरी राहिला ॥३॥
काषायांबर दंड हस्तकमलीं कमंडलु मेखला ।
भस्मोद्धुलित केवळा शशीकला रुद्राक्षमाळा गळा ॥
तीर्थाला करुनी पुनित सकळा पृथ्वीवरीं चालिला ।
तो हा सद्गुरुराज श्रीनरहरी औदुंबरी राहिला ॥४॥
मेरू सव्य करूनियां मनगती जातो कसा निर्गुणी ।
मायामोह त्यजुनि निर्मळ मनें तीर्थें बहू वंदुनी ॥
सुक्षेत्रापुर गाणगाप्रति गुरू तात्काळ जो पातला ।
तो हा सद्गुरुराज श्रीनरहरी औदुंबरी राहिला ॥५॥
स्थाने उत्तम शोधुनी त्रिभुवनीं नाहीं असे पाहुनीं ।
आला सत्वर पावला कुरुपुरीं एकांत राहे वनीं ॥
रजकें जाऊनि वंदिता प्रतिदिनीं राज्यास्पदी स्थापिला ।
तो हा सद्गुरुराज श्रीनरहरी औदुंबरी राहिला ॥६॥
होती ब्राह्मणि साठ वर्षे तिजसी कन्या-कुमारही दिधला ।
वांझ महिषीसी दुभविले फुलविले शुष्क काष्ठही तीराला ॥
अंत्यजामुखी वेदहीं पढविला त्रिविक्रमा भेटला ।
तो हा सद्गुरुराज श्रीनरहरी औदुंबरी राहिला ॥७॥
त्रैमूर्ती अवतार हा यतिवरा वेषा धरी मानवा ।
त्यासी जे नर लोक मूढ म्हणती होई यमा बांधवा ॥
जाणे कुंभजवंशी तो गुरुपदी कृष्णातटी पाहिला ।
तो हा सद्गुरुराज श्रीनरहरी औदुंबरी राहिला ॥८॥
एवं हे गुरूअष्टक प्रतिदिनी त्रिकाळ जे पठती ।
पापे नासती पुण्य पावति अतीं कीर्ती बहू वाढती ॥
विद्या गोधन संतती दृढमतीं सत्त्वें गुणे राहती ।
एवं नित्य करिती जे गुरुस्तुती अंति गती पावती ॥
तो हा सद्गुरुराज श्रीनरहरी औदुंबरी राहिला ॥९॥
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥
No comments:
Post a Comment