॥ श्रीगणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
॥ ॐ श्री स्वामी समर्थाय नमः ॥
विपत्त्तीत वा वैभवी दीनानाथा l तुला प्रार्थितो प्रेमभावें समर्था ॥१॥
तुला नाठवें मी क्षणीं ज्या दयाळा l नुरो अर्थ काही अशा जीवनाला ॥
करी त्वत्पदीं दीन मी लीन माथा l तुला प्रार्थितो प्रेमभावें समर्था ॥२॥
तुला विस्मरोनि न मी घास घ्यावा l तुला नाठवोनि न मी श्वास घ्यावा ॥
तुझ्या चिंतनी व्यग्र व्हावे अनंता l म्हणोनी तुला प्रार्थितो मी समर्था ॥३॥
जगीं जन्मलो घेऊनी कर्म-ओझें l तया भोगितां रक्षिते नाम तुझे ॥
अशांता करी शांत आता प्रशांता l म्हणोनी तुला प्रार्थितो मी समर्था ॥४॥
तुला सेवितां फक्त सेवा घडावी l नुरो याविना कामना अन्य काही ॥
मला ठाव दे त्वत्पदीं विश्वनाथा l म्हणोनी तुला प्रार्थितो मी समर्था ॥५॥
॥ श्री स्वामी समर्थार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
रचनाकार - श्री. मंगेश करंबेळकर
No comments:
Post a Comment