॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ह्या अत्यंत प्रासादिक ग्रंथाचे रचनाकार श्री. शंकर भट ( मराठी अनुवाद : श्री. हरिभाऊ जोशी निटूरकर ) सतराव्या अध्यायांत लिहितात - श्री बापनाचार्युलुंना ( श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे मातामह ) श्री दत्तात्रेयांचे दर्शन घडले व त्यांनी ''सिद्धमंगल'' स्तोत्र लिहिले.
प्रत्यक्ष दत्ताच्या दर्शनाच्या अनुभूतीने गायिली जाणारी या स्तोत्रातील अक्षरें अत्यंत प्रभावशाली आहेत. त्या अक्षरांमधील चैतन्य हे युगानुयुगें विलसत राहील. या स्तोत्रात व्याकरणदृष्टया कोणताही दोष अथवा त्रुटी नाही. या स्तोत्राचे पठण करण्यासाठी कोणताही विधिनिषेध नाही. मला ते स्तोत्र श्री. बापनाचार्युलूच्या मुखातून ऐकण्याचे भाग्य लाभले. हे स्तोत्र माझ्या हृदयावर अंकित झाले आहे. याच्या पठणाने मनातील सर्व कामना पूर्ण होतात. जे भक्त मन, काया आणि कर्म आदिंनी श्री दत्तात्रेयांची आराधना करून या स्तोत्राचे पठण करतात ते श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेस पात्र होतात. तसेच, याच्या नियमितपणे गायनाने सूक्ष्म वायुमंडलातील अदृश्य रूपाने संचार करणाऱ्यास सिद्धी प्राप्त होतात. तसेच, परम पवित्र अशा या सिद्धमंगल स्तोत्राचे पठण अनघाष्टमीचे व्रत करून केल्यास सहस्त्र ब्राह्मण जेवू घातल्याचे पुण्य प्राप्त होते. तसेच स्वप्नात सिद्ध पुरुषांचे दर्शनही होते.
श्री मदनंत, श्रीविभूषित, अप्पल लक्ष्मीनरसिंह राजा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥१॥
श्री विद्याधरि, राधा, सुरेखा श्रीराखीधर श्रीपादा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥२॥
माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥३॥
सत्यऋषीश्वर-दुहितानंदन बापनार्यनुत श्रीचरणा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥४॥
सवितृकाठकचयन-पुण्यफल भारद्वाजऋषी गोत्र संभवा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥५॥
दो चौपाती देव लक्ष्मीगण संख्या-( लक्ष्मी धनस्ख्या ) बोधित श्रीचरणा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥६॥
पुण्यरूपिणी राजमांबा सुत-गर्भपुण्यफलसंजाता ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥७॥
सुमतीनंदन, नरहरीनंदन, दत्तदेव प्रभू श्रीपादा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥८॥
पीठिकापूरा नित्यविहारा, मधुमतीदत्ता, मंगलरूपा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥९॥
॥ श्रीपादराजम् शरणम् प्रपद्ये ॥
No comments:
Post a Comment