॥ श्री गणेशाय नमः ॥
॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
॥ ॐ श्रीपादश्रीवल्लभ-श्रीनृसिंहसरस्वती-श्रीस्वामीसमर्थमहाराजाय नमः ॥
॥ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥
स्वयंभू मुखांभोरु हा दिव्यकांती । विराजित जे शुद्ध चैतन्यज्योती ।
स्वदासां सदा सार निःसार दावी । महाराज श्रीस्वामीमूर्ती नमावी ॥१॥
निराकार साकार झाले पहा हो । विदेही सुदेहाकृतीतें वरी हो ।
चिदानंद आनंद कैवल्य दावी । महाराज श्रीस्वामीमूर्ती नमावी ॥२॥
शिरी टोपी भाळीं टिळा गंधरेखा । सुकंठीं दिसे मुक्तमाला सुरेखा ।
सुमुक्ता हृदयीं वास सर्वांस दावी । महाराज श्रीस्वामीमूर्ती नमावी ॥३॥
दिसे अंगुली मुद्रिकायुक्त जी ती । नखाग्रीं वसे कोटी कंदर्पदीप्ती ।
सभक्तां खुणा व्यक्त अव्यक्त दावी । महाराज श्रीस्वामीमूर्ती नमावी ॥४॥
दिसे साजिरे गोजिरें रूप कैसे । करी दर्शनें शांत नेत्रां अपैसें ।
अभोगीपणें भोग संभोग दावी । महाराज श्रीस्वामीमूर्ती नमावी ॥५॥
सुदेहावरी वृत्ति देहावरी ना । कृती ते करी प्रकृती स्वीकरीना ।
असंभाव्य रूपांतरीं भक्ति दावी । महाराज श्रीस्वामीमूर्ती नमावी ॥ ६ ॥
जगदोद्धारणीं कारणीभूत व्हावें । अजानुकरा स्वीकरीलें स्वभावें ।
असाधारणें धारणाशक्ति दारी । महाराज श्रीस्वामीमूर्ती नमावी ॥७॥
स्वयें दत्त हा सांडुनी स्वात्मतेला । करी भक्तकाजीं अनातर्क्य लीला ।
भला लाभला लाभ भक्तां सुदैवी । महाराज श्रीस्वामीमूर्ती नमावी ॥८॥
सदा स्वांतरीं भ्रांति संमोहविते । वदा अष्टका नित्य मृत्युंजयातें ।
न बाधेल ती ही 'सखा' खूण दावी । महाराज श्रीस्वामीमूर्ती नमावी ॥९॥
॥ श्रीस्वामीसमर्थार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
आवडे दत्तभक्तांसी ...
