॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥ या श्री स्वामी समर्थ अथर्वशीर्षाचे ब्रह्मा ऋषी । परमात्मा देवता ॥ गायत्री हा छंद । मूळ पुरुष । वडाचे झाड । दत्तनगर । मूळ मूळ हे अग्नीनारायणयुक्त बीज । आदिमाया शक्ती । सर्व तापहर सप्ताक्षरयुक्त मंत्र हा कीलक ॥ धर्म-अर्थ-काम-मोक्ष या पुरुषार्थ प्राप्तीसाठी जपाचा विनियोग ॥ ॐ लं ॐ हं । ॐ यं ॐ वं । ॐ रं ॐ सं । या बीजाक्षरांसह षडंग न्यास ॥ ॐ नमोजी परब्रह्मा । परमात्मा प्राणदाता । ओंकार स्वरूपा श्री स्वामी समर्था नमो नमो हे कवच ॥ ऐसा हा मंत्र जाणावा ॥ ॐ इह-पर-सुरलोकी ॐ । ॐ श्री स्वामी समर्था नमो नमो । रक्ष रक्ष मज । रक्ष रक्ष मज ॥
तू कर्ता तू धर्ता । तूचि परिपाता । तूचि संहर्ता । या अनंत विश्वाचा ॥
भय मज मरणाचे । भय चिंतातुर जगण्याचे । भय शीलभ्रष्ट या जगताचे । सांभाळी देवा मला ॥
देवा रक्षी मज क्षणोक्षणी । रक्षी मज दिनोदिनी । रक्षी मज निशीदिनी । शरण शरण आलो तुला ॥ ॐ इह-पर-सुरलोकी ॐ ॥ तूचि सत्यज्ञान । सृष्टीचे विज्ञान । तू मूळ कारण । “अहं ब्रह्मास्मि"चे ॥ तू ब्रह्मा विष्णु रुद्र । अग्नी वायु इंद्र । आपो भूमी सूर्य चंद्र । व्योम तू ॥ तू ऋग्वेद यजुर्वेद । तू अथर्व सामवेद । पुराण आणि उपनिषद । सर्वही तूच तू ॥ देवा तू वाङ्मय । तू चिन्मय । अणुरेणू हिरण्मय । ब्रह्ममय तूचि ॥
ॐ इह-पर-सुरलोकी ॐ ॥ सोहं आत्माराम । कोहं मायाभ्रम । दाविशी उत्तम । नामाच्या आदर्शी ॥ ॐ हे एकाक्षरी ब्रह्म । ते तुझेचि निजरूप । प्रकाशे अपरंपार । वर्णिता वर्णवेना ॥ दोन अक्षरी दत्त । स्मर्तृगामी नाथ । आर्तांचा आधार । परोपकारी ॥ तीन अक्षरी श्रीपाद । वैराग्य प्रखर । जाळिला विकार । शिव तेजे ॥ नरसिंह अक्षरे चार । आश्रम धर्म । वेदांचा विचार । विवरिला ॥ स्वामी समर्थ पंचाक्षर । मोक्षाचे द्वार । तोडिला आचार । दांभिकांचा ॥ ॐ दत्त । श्रीपाद नरसिंह । स्वामी समर्थ । पंधरा अक्षरी मंत्र हा ॥ जपता निरंतरी । आबाल-थोरी । कोणी असो जरी । प्रपंची विकारी ॥ तयासी सत्वरी । स्वामी दत्त अंतरी । होईल तमारी । उद्धार कर्ता ॥ साऱ्या रोगव्याधी । बाधा मनोव्याधी । घोर कष्ट सर्वांआधी । नष्टतील ॥ अक्काबाईचा फेरा । जाईल माघारा । येईल लक्ष्मी घरा । नित्य पाठे ॥ अभक्ष्य भक्षण । पापाचे कारण । जाईल विरून । अथर्व पाठाने ॥ अपेय पान । दुर्गुण महान । जाईल निरसून । अथर्व पाठाने ॥ अगम्य गमन । नरक दारुण । जाईल जळून । अथर्व पाठाने ॥ व्रात्य संभाषण । बुद्धीचे ग्रहण । जाईल सुटून । अथर्व पाठाने ॥ पंचमहापापे । भस्मसात आपोआपे । अथर्व प्रतापे । होतील पै ॥ सहस्त्रावर्तन । हे सहस्त्रभोजन । वा शतयज्ञाहून । पुण्यदायी ॥ आता येणे होवो आरोग्यवृद्धी- ऐश्वर्यवृद्धी- शांतिवृद्धी- वंशवृद्धी- धनवृद्धी- ज्ञानवृद्धी- योगवृद्धी- कीर्तीवृद्धी । दिगंत पाठकाची ॥ हरि ॐ तत्सत् ॥ ऐसा हा मंत्र जाणावा ॥ इति श्री उपनिषदस्वरूप श्री स्वामी समर्थ अथर्वशीर्ष स्तोत्र संपूर्ण ॥ श्री स्वामी समर्थ ॥ श्री स्वामी समर्थ ॥ श्री स्वामी समर्थ ॥
रचनाकार - श्रीयुत् नागेश करंबेळकर
No comments:
Post a Comment