॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥
जयदेव जयदेव जय जय अवधुता । अगम्य लीला स्वामी त्रिभुवनी तुझी सत्ता ॥धृ.॥ तुझे दर्शन होता जाती ही पापे । स्पर्शनमात्रे विलया जाती भवदुरिते । चरणी मस्तक ठेवुनी मनी समजा पुरिते । वैकुंठीचें सुख नाही यापरते ॥१॥ सुगंध केशर भाळी वर टोपी टिळा । कर्णी कुंडल शोभती वक्षस्थळी माळा । शरणागत तुज होता भय पडले काळा । तुझे दास करिती सेवा सोज्वळा ॥२॥ मानवरूपी काया दिससी आम्हांस । अक्कलकोटी केला यतिवेषे वास । पूर्णब्रह्म तूची अवतरलासी खास । अज्ञानी जीवास विपरित हा भास ॥३॥ निर्गुण निर्विकार विश्वव्यापक । स्थिरचर व्यापुनि अवघा उरलासी एक । अनंत रूपे धरिसी करणे मायिक । तुझे गुण वर्णिता थकले विधिलेख ॥४॥ घडता अनंत जन्मी सुकृत हे गांठी । त्याची ही फलप्राप्ती सद्गुरुची भेटी । सुवर्ण ताटी भरली अमृतरस वाटी । शरणागत दासावरी करी कृपादृष्टी ॥५॥
No comments:
Post a Comment