॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
रात्रंदिवसा देवा, तुमची मूर्ती ध्यानांत ।
त्याचा लागे ना अंत, त्याचा लागे ना अंत ।
स्वप्नांत आले माझ्या गुरुदेव दत्त llधृ.ll
दिव्यस्वरूपी सडा टाकत होते अंगणांत ।
'अल्लख' म्हणुनी भिक्षा मागत आले दारात । दत्तगुरूंचे पाऊल उठले माझ्या अंगणात ll१ll भगवी झोळी होती त्यांच्या डाव्या बगलेत । रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात । कुण्या वाटेने गेले माझे गुरुदेव दत्त ll२ll श्वानांची फौज होती त्यांच्या संगत । श्वानांना भाकर टाकत होते भगवंत । बघा बघा ते अत्रिनंदन आले भजनात ll३ll भक्तांचा मेळा होता त्यांच्या संगत । खडावांचा नाद घुमतो माझ्या कानांत । 'गुरुदेव दत्त' मंत्र ठेवा, ठेवा ध्यानांत ll४ll
No comments:
Post a Comment