॥ ॐ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
( दत्तभक्तांच्या खास आग्रहास्तव श्री टेम्ब्येस्वामीविरचित दिव्य श्रीदत्तस्तवस्तोत्र आणि त्याचा भावार्थ )
भूतप्रेतपिशाचाद्या यस्य स्मरणमात्रतः । दूरादेव पलायंते दत्तात्रेयं नमामि तम् ॥१॥ भावार्थ : ज्या दत्तमहाराजांच्या केवळ नामस्मरणमात्रें भूत, प्रेत, पिशाच्च वगैरे दूर पळून जातात आणि स्मरणकर्त्यास पुन्हा कधीही पीडा देत नाहीत अशा श्रीदत्तमहाराजांना मी नमन करतो.
यन्नामस्मरणाद्दैन्यं पापं तापश्च नश्यति । भीतिग्रहार्तिदुःस्वप्नं दत्तात्रेयं नमामि तम् ॥२॥ भावार्थ : ज्या श्रीदत्तप्रभूंच्या स्मरणमात्रें दैन्य, पाप आणि त्रास समूळ नाश पावतात, तसेच ज्या दत्तमहाराजांच्या केवळ कृपादृष्टीने सर्व प्रकारची भीती, ग्रहपीडा आणि वाईट स्वप्ने ( व त्यांची अशुभ फळे) नष्ट होतात, त्या दत्तमहाराजांना मी नमन करतो.
दद्गुस्फोटककुष्ठादि महामारी विषूचिका । नश्यन्त्यन्येऽपि रोगाश्च दत्तात्रेयं नमामि तम् ॥३॥ भावार्थ : ज्यांचे केवळ नामस्मरण केले असता स्मरणकर्त्याचे खरूज, फोड, कुष्ठादि त्वचारोग, महामारी, कॉलरा इत्यादि गंभीर रोग व अन्य प्राणघातक रोगदेखील सहजच नष्ट होतात त्या श्रीदत्तात्रेयांना मी नमन करतो.
सङ्गजा देशकालोत्था अपि साङ्क्रमिका गदाः । शाम्यंति यत्स्मरणतो दत्तात्रेयं नमामि तम् ॥४॥ भावार्थ : ज्यांच्या स्मरणाने संपर्क-देश-काल यांमुळे उद्भवणारे तसेच संसर्गजन्य रोग यांचादेखील उपशम होतो, त्या श्री दत्तात्रेय प्रभूंना मी नमन करतो.
सर्पवृश्चिकदष्टानां विषार्तानां शरीरिणाम् । यन्नाम शान्तिदं शीघ्रं दत्तात्रेयं नमामि तम् ॥५॥ भावार्थ : साप, विंचू यांसारख्या प्राण्यांच्या दंशामुळे शरीरांत विषबाधा झालेल्या मनुष्यांस ज्यांचे नाम तत्काळ शांती देते (विषाचे शमन करते), अशा श्री दत्तात्रेयांना मी नमन करतो.
त्रिविधोत्पातशमनं विविधारिष्टनाशनम् । यन्नाम क्रूरभीतिघ्नं दत्तात्रेयं नमामि तम् ॥६॥ भावार्थ : ज्यांचे नाम घेतले असता (आधिभौतिक, आध्यात्मिक व आधिदैविक) असे विविध ताप नाहीसे होतात, तसेच ज्यांच्या नामस्मरणामुळे अनेक प्रकारची अरिष्टे व क्रूर प्राण्यांपासूनचे भय यांचाही नायनाट होतो, त्या दत्तमहाराजांना मी नमन करतो.
वैर्यादिकृतमंत्रादिप्रयोगा यस्य कीर्तनात् । नश्यंति देवबाधाश्च दत्तात्रेयं नमामि तम् ॥७॥ भावार्थ : शत्रू-दुष्ट लोक यांनी केलेली करणी व जारण मारण-मोहनादि सर्व मंत्रप्रयोग तसेच देवी-देवतांचा कोपही ज्यांच्या नामसंकीर्तनाने नष्ट होतात, त्या श्रीदत्तात्रेयांना मी नमन करतो.
यच्छिष्यस्मरणात्सद्यो गतनष्टादि लभ्यते । य ईशः सर्वतस्त्राता दत्तात्रेयं नमामि तम् ॥८॥ भावार्थ : ज्यांच्या ( सहस्त्रार्जुन म्हणजेच कार्तवीर्य या ) शिष्याचे स्मरण केले असता हरवलेली अथवा न सापडणारी वस्तू मिळते, आणि जो सर्व बाजूंनी नेहेमीच आपल्या भक्तांचे रक्षण करतो, त्या श्रीदतात्रेयांना मी नमन करतो.
जयलाभयशःकामदातुर्दत्तस्य यः स्तवम् । भोगमोक्षप्रदस्येमं पठेद्दत्तप्रियो भवेत् ॥९॥ भावार्थ : जयप्राप्ती, यश आणि इच्छापूर्ती करणारे, तसेच ऐहिक भोग व पारमार्थिक सुख प्रदान करणारे श्री भगवान दत्तात्रेयांचे हे स्तोत्र जो मनुष्य श्रद्धेने पठण करेल, तो दत्तमहाराजांना अत्यंत प्रिय होईल. ( हे श्री टेम्ब्येस्वामी महाराजांचे वचन आहे.) ॥ इति श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचितं दत्तस्तवस्तोत्रं सम्पूर्णम् ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥
No comments:
Post a Comment