॥ श्रीगणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॥ ॐ श्री स्वामी समर्थाय नमः ॥
॥ श्री आनंदनाथ महाराजाय नमः ॥
क्रमश:
॥ श्रीगणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॥ ॐ श्री स्वामी समर्थाय नमः ॥
॥ श्री आनंदनाथ महाराजाय नमः ॥
क्रमश:
॥ श्री गणेशाय नमः ॥ श्री सरस्वत्यै नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
भक्त कामकल्पद्रुम कामधेनुम् । स्वामी समर्थ शिरस: नमामि ॥
॥ श्री गणेशाय नमः ॥ श्री सरस्वत्यै नमः ॥ श्री गुरुभ्यो नमः ॥ नामधारक भक्तासी । सिद्ध सांगे विस्तारेसीं । अवतार झाले मानुषी । भक्तजन तारावया ॥१॥ ऐक भक्ता नामधारका । अंबऋषीकारणें विष्णु ऐका । अंगीकारिले अवतार देखा । मानुषीं नाना रुपें घेतसे ॥२॥ मत्स्य कूर्म वराह देख । नराचा देह सिंहाचें मुख । वामनरुप झाला भिक्षुक । झाला ब्राह्मण क्षत्रियकर्मी ॥३॥ दशरथकुळीं जन्म । प्रख्यात अवतार श्रीरघुराम । राजा होऊनि मागुती जन्म । गौळियां घरीं गुरें राखी ॥४॥ वस्त्रें फेडूनि झाला नग्न । बौद्धरुपी झाला आपण । होऊनि कलंकी अवतार जाण । तुरंगारुढ काय आवडी ॥५॥ नाना प्रकारें नाना वेष । अवतार धरीं हृषीकेश । तारावया साधु मानुष । दुष्टनिग्रह करावया ॥६॥ द्वापार जाऊनी जाहला कली । अज्ञान लोक ब्राह्मणकुळीं । आचारहीन होऊनि प्रबळीं । वर्तती, महिमा कलियुगीं ॥७॥भक्तजनरक्षणार्थ । अवतरला श्रीगुरुनाथ । सगरांकारणें भगीरथ । आणी गंगा भूमंडळीं ॥८॥ तैसी एक विप्रवनिता । आराधिलें श्रीविष्णु-दत्ता । तिचे उदरीं अवतार धरितां । आश्चर्य झालें परियेसा ॥९॥ ' पीठापूर ' पूर्वदेशीं । होता ब्राह्मण उत्तमवंशी । आपस्तंब शाखेसी । नाम ' आपळराज ' जाण ॥१०॥ त्याची भार्या नाम ' सुमता ' । असे आचार पतिव्रता ।अतिथी आणि अभ्यागता । पूजा करी भक्तिभावें ॥११॥ ऐसें असतां वर्तमानीं । पतिसेवा एक मनीं । अतिथीपूजा सगुणी । करी निरंतर परियेसा ॥१२॥ वर्ततां ऐसें एके दिवशीं । आला दत्त अतिथीवेषीं । श्राद्ध होतें अमावास्येसी । तया विप्राघरीं देखा ॥१३॥ न जेवितां ब्राह्मण घरीं । दत्तात्रेया भिक्षा घाली ते नारी । दत्तात्रेय साक्षात्कारी । प्रसन्न झाला तये वेळीं ॥१४॥ त्रिमूर्तींचें रुप घेऊनि । स्वरुप दाविलें अतिगहनी । पतिव्रता धरुनि चरणीं । नमन करी मनोभावें ॥१५॥ दत्तात्रेय म्हणती तियेसी । माग वो माते जें वांछिसी । जे जे वासना तुझे मानसीं । पावेल त्वरित म्हणितले ॥१६॥ऐकोनि स्वामीचें वचन । विप्रवनिता करी चिंतन । विनवीतसे कर जोडून । नानापरी स्तवोनियां ॥१७॥ जय जया जगन्नाथा । तूं तारक विश्वकर्ता । माझे मनीं असे आर्ता । पुरवावी ते देवराया ॥१८॥ तूं कृपाळू सर्वांभूतीं । वेद पुराणें वाखाणिती । केवीं वर्णूं तुझी कीर्ति । भक्तवत्सल कृपानिधि ॥१९॥ मिथ्या नव्हे तुझा बोल । जें कां ध्रुवासी दिधलें अढळ । बिभीषणासी स्थापियलें । राज्यीं लंकाद्वीपीचे ॥२०॥ भक्तजनां तूं आधार । व्हावया धरिसी अवतार । ब्रीद असे सचराचर । चौदा भुवनांमाझारीं ॥२१॥ आतां मातें वर देसी । वासना असे मानसीं । नव्हा अन्यथा बोलासी । कृपासिंधु देवराया ॥२२॥ माझे मनींची वासना । तुवां पुरवावी जगत्रजनना । अनाथतारका नारायणा । म्हणोनि चरणीं लागली ॥२३॥ ऐकोनि तिचें करुणावचन । संतोषला त्रयमूर्ति आपण । कर धरुन आश्वासोन । माग जननी म्हणतसे ॥२४॥ तंव बोलिली पतिव्रता । स्वामी जें निरोपिलें आतां । ' जननी ' नाम मज ठेवितां । कर निर्धार याचि बोलाचा ॥२५॥ मज पुत्र झाले बहुत । नव्हती स्थिरजीवित । जे राहिले असती आतां सजीवित । अक्षहीन पादहीन ॥२६॥ योग्य झाला नाहीं कोणी । काय करावे मूर्ख प्राणी । असोनि नसती येणे गुणीं । पुत्रावीण काय जन्म ॥२७॥व्हावा पुत्र आम्हां ऐसा । ज्ञानवंत परमपुरुषा । जगद्वंद्य देवसदृशा । तुम्हांसारिखा मज आतां ॥२८॥ ऐकोनि तियेचें वचन । प्रसन्न झाला दत्त आपण । पुढें असे कार्याकारण । दीक्षार्थ भक्तजनांसी ॥२९॥ म्हणे तापसी तियेसी । पुत्र होईल तुज तापसी । उद्धरील तुझ्या वंशासी । ख्यातिवंत कलियुगीं ॥३०॥ असावें तुम्हीं त्याचिया बोलीं । येर्हवीं न राहे तुम्हांजवळी । ज्ञानमार्गें अतुर्बळी । तुमचें दैन्यहारक देखा ॥३१॥ इतुके सांगोनि तापसी । अदृश्य झाला परियेसीं । विस्मय करीतसे मानसीं । विप्रवनिता तये वेळीं ॥३२॥ विस्मय करोनि घरांत । पतीसी सांगे वृत्तांत । दोघें हर्षनिर्भर होत । म्हणती होईल दत्तात्रेय ॥३३॥ माध्यान्हसमयीं अतिथिकाळीं । दत्तात्रेय येताति तये वेळी । विमुख न व्हावें तये काळीं । भिक्षा मात्र घालिजे ॥३४॥ दत्तात्रेयांचें स्थान जाण । माहूर करवीर क्षेत्र खूण । सदा वास याचि ग्रामा । पांचाळेश्वर नगरांत ॥३५॥ नाना रुपें भिक्षुकवेषें । दत्तात्रेय येताति हरुषें । न पुसतां माझ्या निरोपास । भिक्षा मात्र घालिजे ॥३६॥ विप्रस्त्री म्हणे पतीसी । आजि अवज्ञा केली मीं तुम्हांसी । ब्राह्मण न जेवितां तयासी । भिक्षा घातली म्हणतसे ॥३७॥ ऐकोनि सतीचे बोल । विप्रमन संतोषलें । म्हणे पतिव्रते भलें केलें । पितर जाहले माझे तृप्त ॥३८॥करुनि कर्म पितरांचे नामीं । समर्पावें विष्णूसी आम्हीं ।साक्षात्कारें आपण येऊनि । भिक्षा केली आम्हां घरीं ॥३९॥कृतार्थ झाले पितृ समस्त । निर्धारें झाले स्वर्गस्थ । साक्षात् विष्णु भेटला दत्त । त्रयमूर्ति-अवतार ॥४०॥ धन्य धन्य तुझी मातापिता । जो वर लाधलीस मुख्य आतां । पुत्र होईल तुज निभ्रांता । न धरीं चिंता मनासीं ॥४१॥ हर्षें निर्भर होवोनि । राहिली दोघें निश्चिन्त मनीं । वर्ततां जाहली अंतर्वत्नी । विप्रस्त्री परियेसा ॥४२॥ ऐसे नव मास क्रमोनि । प्रसूत जाहली शुभदिनीं । विप्रें स्नान करुनि । केलें जातकर्म तये वेळीं ॥४३॥ मिळवोनि समस्त विप्रकुळीं । जातक वर्तविती तये वेळीं । म्हणती तपस्वी होईल बळी । दीक्षाकर्ता जगद्गुरु ॥४४॥ ऐकोनि म्हणती मातापिता । हो कां आमुचा कुळउद्धरिता । आम्हांसी वर दिधला दत्ता । म्हणोनि ठेविलें तया नांव ॥४५॥ ' श्रीपाद ' म्हणोनि याकारणें । नाम ठेविलें तया ब्राह्मणे । अवतार केला त्रैमूर्ति आपण । भक्तजन तारावया ॥४६॥ वर्तत असतां त्याचे घरीं । झाला सात संवत्सरीं । मुंजीबंधन ते अवसरीं । करिता झाला द्विजोत्तम ॥४७॥ बांधितां मुंजी ब्रह्मचारी । म्हणता झाला वेद चारी । मीमांसा तर्क अतिविस्तारीं । म्हणों लागला तये वेळीं ॥४८॥ ऐकोनि समस्त नगरलोक । विस्मय करिती सकळिक । होईल अवतार कारणिक । म्हणोनि बोलती आपणांत ॥४९॥ आचार-व्यवहार-प्रायश्चित्त । समस्तांसी आपण बोलत । वेदांतभाष्य वेदार्थ । सांगता झाला द्विजवरांसी ॥५०॥ वर्ततां ऐसें परियेसीं । झाला संवत्सर षोडशी ।विवाह करुं म्हणती पुत्रासी । मातापिता अवधारा ॥५१॥ विचार करिती पुत्रासवें । बा रे विवाह तुज करावें । श्रीपाद म्हणे ऐका भावें । माझी वांछा सांगेन ॥५२॥ कराल विवाह मज तुम्ही । सांगेन ऐका, विचारिलें आम्हीं । वैराग्यस्त्री असे नेमी । काम्य आमुचे तेथें असे ॥५३॥ ते स्त्रियेवांचूनि आणिक नारी । समस्त जाणा मातेसरी । जरी आणाल ते सुंदरी । वरुं म्हणती तये वेळीं ॥५४॥ आपण तापसी ब्रह्मचारी । योगश्रियावांचोनि नारी । न लगती, हा बोल धरा निर्धारीं । ' श्रियावल्लभ ' नाम माझें ॥५५॥ ' श्रीपाद-श्रीवल्लभ ' ऐसे । नाम झालें त्रिमूर्ति कैसें । पितयातें म्हणतसे । जाऊं उत्तरपंथासी ॥५६॥ ऐकोनि पुत्राचें वचन । आठव जाहलें पूर्वील सूचन । भिक्षुकें सांगितलें निर्गुण । सत्य झालें म्हणतसे ॥५७॥ आतां याचिया बोलासी । मोडा घालितां परियेसीं । विघ्न होईल भरंवसी । म्हणोनि विचारिती तये वेळीं ॥५८॥ न म्हणावें पुत्र यासी । अवतारपुरुष तापसी । जैसें याचे वसे मानसीं । तैसें करावें म्हणती मातापिता ॥५९॥ निश्चय करुनि आपुले मनीं । पुत्रासी म्हणती जनकजननी । होतों आशाबद्ध होऊनि । प्रतिपाळिसी म्हणोनियां ॥६०॥ ऐसें मनीं व्याकुळित । डोळां निघती अश्रुपात । माता पडली मूर्च्छागत । पुत्रस्नेहेंकरोनियां ॥६१॥ देखोनि मातेचें दुःख । संबोखीतसे परमपुरुष । उठवूनि आपुल्या करकमळिकें । अश्रुपात पुसतसे ॥६२॥ अवो माते न करीं चिंता । जें जें वांछिसी तें देईन आतां । दृढ करुनियां चित्ता । रहा सुखें नांदत ॥६३॥ बा रे तुजकरितां आपण । दुःख विसरलें अंतःकरण । रक्षिसी आम्हां म्हातारपणीं । दैन्यावेगळें करिसी म्हणोनि ॥६४॥ पुत्र असती आपणा दोन । पाय पांगुळ अक्षहीन । त्यांतें पोसावें आतां कवणें । आमुतें कोण रक्षील ॥६५॥ ऐकोनि जननीचें वचन । अवलोकीतसे अमृतनयनें । पुत्र दोघे जाहले सगुण । आली दृष्टिचरणादिक ॥६६॥ जैसा चिंतामणि-स्पर्शें । लोखंड होय सुवर्णासरिसें । तैसें महात्मदृष्टि-वर्षे । योग्यता आली तत्काळीं ॥६७॥ वेदशास्त्रादि व्याकरण । सर्व म्हणती तत्क्षण । दोघे येऊनि लागती चरणा । कृतार्थ झालों म्हणोनियां ॥६८॥ आश्वासून तये वेळीं । दिधला वरु तत्काळीं । पुत्रपौत्रादीं नांदाल प्रबळीं । श्रियायुक्त सनातन ॥६९॥ सेवा कराल जनकजननी । पावाल सुख महाज्ञानी । इह सौख्य पावोनि । व्हाल मुक्त हे निश्चित ॥७०॥ ऐसें बोलोनि तयांसी । संबोखीतसे मातेसी । पाहोनि दोघां पुत्रांसी । राहतां सौख्य पावाल ॥७१॥ पुत्र दोघे शतायुषी । निर्धार धरीं वो मानसीं । कन्या पुत्र होतील त्यांसी । पौत्रपुत्र पाहाल नयनीं ॥७२॥ अखंड लक्ष्मी यांचे घरीं । यांचे वंशपारंपरीं । कीर्तिवंत सचराचरीं । संपन्न होतील वेदशास्त्रीं ॥७३॥ आमची अवज्ञा न करितां । निरोप द्यावा अवो माता । जाणें असे उत्तरपंथा । दीक्षा देणें साधुजनां ॥७४॥ ऐसें सांगोनि मातापित्यांसी । अदृश्य झाला परियेसीं । पावला त्वरित पुरी काशी । गुप्तरुपें होता तेथें ॥७५॥ निघाला तेथूनि बदरीकानना । भेटी घेऊनि नारायणा । अवतार असे आपणा । कार्याकारण मनुष्यदेहीं ॥७६॥ दीक्षा करावया साधुजनां । तीर्थें हिंडतसे आपण । मनोवेगें मार्गक्रमण । आले तीर्थ गोकर्णासी ॥७७॥ ऐकोनि सिद्धाचें वचन । विनवी नामधारक आपण । तें परिसा श्रोतेजन । म्हणे सरस्वती गंगाधरु ॥७८॥ इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे दत्तात्रेय-श्रीपादावतारकथनं नाम पंचमोऽध्यायः ॥
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥
॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥
॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥
॥ श्री गणेशाय नमः ॥ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥
अक्कलकोट-निवासी अद्भुत स्वामी समर्था अवधुता । सिद्ध-अनादि रूप-अनादि अनामया तू अव्यक्ता ।
अकार अकुला अमल अतुल्या अचलोपम तू अनिन्दिता । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥१॥
अगाधबुद्धी अनंतविक्रम अनुत्तमा जय अतवर्या । अमर अमृता अच्युत यतिवर अमित विक्रमा तपोमया ।
अजर सुरेश्वर सुहृद सुधाकर अखंड अर्था सर्वमया । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥२॥
अनल अश्विनी अर्चित अनिला ओजस्तेजो-द्युती-धरा । अंतःसाक्षी अनंतआत्मा अंतर्योगी अगोचरा ।
अंतस्त्यागी अंतर्भोगी अनुपमेय हे अतिंद्रिया । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥३॥
अमुख अमुख्या अकाल अनघा अक्षर आद्या अभिरामा । लोकत्रयाश्रय लोकसमाश्रय बोधसमाश्रय हेमकरा ।
अयोनी-संभव आत्मसंभवा भूत-संभवा आदिकरा । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥४॥
त्रिविधतापहर जगज्जीवना विराटरूपा निरंजना । भक्तकामकल्पद्रुम ऊर्ध्वा अलिप्त योगी शुभानना ।
संगविवर्जित कर्मविवर्जित भावविनिर्गत परमेशा । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥५॥
ऊर्जितशासन नित्य सुदर्शन शाश्वत पावन गुणाधिपा । दुर्लभ दुर्धर अधर धराधर श्रीधर माधव परमतपा ।
कलिमलदाहक संगरतारक मुक्तिदायक घोरतपा । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥६॥
निस्पृह निरलस निश्चल निर्मल निराभास नभ नराधिपा । सिद्ध चिदंबर छंद दिगंबर शुद्ध शुभंकर महातपा ।
चिन्मय चिद्घन चिद्गति सद्गति मुक्तिसद्गति दयावरा । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥७॥
धरणीनंदन भूमीनंदन सूक्ष्म सुलक्षण कृपाघना । काल कलि कालात्मा कामा कला कनिष्ठा कृतयज्ञा ।
कृतज्ञ कुंभा कर्ममोचना करुणाघन जय तपोवरा । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥८॥
कामदेव कामप्रद कुंदा कामपाल कामघ्निकारणा । कालकंटका काळपूजिता क्रम कळिकाळा काळनाशना ।
करुणाकर कृतकर्मा कर्ता कालांतक जय करुणाब्धे । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपानिधे ॥९॥
करुणासागर कृपासागरा कृतलक्षण कृत कृताकृते । कृतांतवत् कृतनाश कृतात्मा कृतांतकृत हे काल-कृते ।
कमंडलूकर कमंडलूधर कमलाक्षा जय क्रोधघ्ने । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपानिधे ॥१०॥
गोचर गुप्ता गगनाधारा गुहा गिरीशा गुरुत्तमा । कर्मकालविद् कुंडलिने जय कामजिता कृश कृतागमा ।
कालदर्पणा कुमुदा कथिता कर्माध्यक्षा कामवते । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपानिधे ॥११॥
अनंत गुणपरिपूर्ण अग्रणी अशोक अंबुज अविनाशा । अहोरात्र अतिधूम्र अरूपा अपर अलोका अनिमिषा ।
अनंतवेषा अनंतरूपा करुणाघन करुणागारा । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥१२॥
जीव जगत् जगदीश जनेश्वर जगदादिज जगमोहन रे । जगन्नाथ जितकाम जितेंद्रिय जितमानस तूं जंगम रे ।
जरारहित जितप्राण जगत्पति ज्येष्ठा जनका दातारा । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥१३॥
चला चंद्र-सूर्याग्निलोचना चिदाकाश चैतन्य चरा । चिदानंद चलनांतक चैत्रा चंद्र चतुर्भुज चक्रकरा ।
गुणौषधा गुह्येश गिरीरुह गुणेश गुह्योत्तम घोरा । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥१४॥
गुणभावन गणबांधव गुह्या गुणगंभीरा गर्वहरा । गुरु गुणरागविहीन गुणांतक गंभीरस्वर गंभीरा ।
गुणातीत गुणकरा गोहिता गणा गणकरा गुणबुद्धे । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपानिधे ॥१५॥
एका एकपदा एकात्मा चेतनरूपा चित्तात्मा । चारुगात्र तेजस्वी दुर्गम निगमागम तूं चतुरात्मा ।
चारुलिंग चंद्रांशू उग्रा निरालंब निर्मोही निधे । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपानिधे ॥१६॥
धीपति श्रीपति देवाधिपति पृथ्वीपति भवतापहरे । धेनुप्रिय ध्रुव धीर धनेश्वर धाता दाता श्री नृहरे ।
देव दयार्णव दम-दर्पध्नि प्रदीप्तमूर्ते यक्षपते । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपानिधे ॥१७॥
ब्रह्मसनातन पुरुषपुरातन पुराणपुरुषा दिग्वासा । धर्मविभूषित ध्यानपरायण धर्मधरोत्तम प्राणेशा ।
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती तारक त्रिशूळधारी तीर्थकरा । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥१८॥
भावविवर्जित भोगविवर्जित भेदत्रयहर भुवनेशा । मायाचक्रप्रवर्तित मंत्रा वरद विरागी सकलेशा ।
सर्वानंदपरायण सुखदा सत्यानंदा निशाकरा । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥१९॥
विश्वनाथ वटवृक्ष विरामा विश्वस्वरूपा विश्वपते । विश्वचालका विश्वधारका विश्वाधारा प्रजापते ।
भेदांतक निशिकांत भवारि द्विभुज दिविस्पृश परमनिधे । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपानिधे ॥२०॥
विश्वरक्षका विश्वनायका विषयविमोही विश्वरते । विशुद्ध शाश्वत निगम निराशय निमिष निरवधि गूढरते ।
अविचल अविरत प्रणव प्रशांता चित्चैतन्या घोषरते । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपानिधे ॥२१॥
ब्रह्मासदृश स्वयंजात बुध ब्रह्मभाव बलवान महा । ब्रह्मरूप बहुरूप भूमिजा प्रसन्नवदना युगावहा ।
युगाधिराजा भक्तवत्सला पुण्यश्लोका ब्रह्मविदे । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपानिधे ॥२२॥
सुरपति भूपति भूत-भुवनपति अखिल-चराचर-वनस्पते । उद्भिजकारक अंडजतारक योनिज-स्वेदज-सृष्टिपते ।
त्रिभुवनसुंदर वंद्य मुनीश्वर मधुमधुरेश्वर बुद्धिमते । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपानिधे ॥२३॥
दुर्मर्षण अघमर्षण हरिहर नरहर हर्ष-विमर्षण रे । सिंधू-बिंदू-इंदु चिदुत्तम गंगाधर प्रलयंकर रे ।
जलधि जलद जलजन्य जलधरा जलचरजीव जलाशय रे । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपानिधे ॥२४॥
गिरीश गिरिधर गिरीजाशंकर गिरिकंदर हे गिरिकुहरा । शिव शिव शंकर शंभो हरहर शशिशेखर हे गिरीवरा ।
उन्नत उज्ज्वल उत्कट उत्कल उत्तम उत्पल ऊर्ध्वगते । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपानिधे ॥२५॥
भव-भय-भंजन भास्वर भास्कर भस्मविलेपित भद्रमुखे । भैरव भैगुण भवधि भवाशय भ्रम-विभ्रमहर रुद्रमुखे ।
सुरवरपूजित मुनिजनवंदित दीनपरायण भवौषधे । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपानिधे ॥२६॥
कोटीचंद्र सुशीतल शांता शतानंद आनंदमया । कामारि शितिकंठ कठोरा प्रमथाधिपते गिरिप्रिया ।
ललाटाक्ष विरुपाक्ष पिनाकी त्रिलोकेश श्री महेश्वरा । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥२७॥
भुजंगभूषण सोम सदाशिव सामप्रिय हरि कपर्दिने । भस्मोध्दूलितविग्रह हविषा दक्षाध्वरहर त्रिलोचने ।
विष्णुवल्लभा नीललोहिता वृषांक शर्वा अनीश्वरा । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥२८॥
वामदेव कैलासनिवासी वृषभारूढा विषकंठा । शिष्ट विशिष्टा त्वष्टा सुष्टा श्रेष्ठ कनिष्ठा शिपिविष्टा ।
इष्ट अनिष्टा तुष्टातुष्टा तूच प्रगटवी ऋतंभरा । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥२९॥
श्रीकर श्रेया वसुर्वसुमना धन्य सुमेधा अनिरुद्धा । सुमुख सुघोषा सुखदा सूक्ष्मा सुहृद मनोहर सत्कर्ता ।
स्कन्दा स्कन्दधरा वृद्धात्मा शतावर्त शाश्वत स्थिरा । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥३०॥
सुरानंद गोविंद समीरण वाचस्पति मधु मेधावी । हंस सुपर्णा हिरण्यनाभा पद्मनाभ केशवा हवी ।
ब्रह्मा ब्रह्मविवर्धन ब्रह्मी सुंदर सिद्धा सुलोचना । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥३१॥
घन घननीळ सघन घननादा घनःश्याम घनघोर नभा । मेघा मेघःश्याम शुभांगा मेघस्वन मनभोर विभा ।
धूम्रवर्ण धूम्रांबर धूम्रा धूम्रगंध धूम्रातिशया । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥३२॥
महाकाय मनमोहन मंत्रा महामंत्र हे महद्रुपा । त्रिकालज्ञ हे त्रिशूलपाणि त्रिपादपुरुषा त्रिविष्टपा ।
दुर्जनदमना दुर्गुणशमना दुर्मतिमर्षण दुरितहरा । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥३३॥
प्राणापाना व्यान उदाना समान गुणकर व्याधिहरा । ब्रह्मा विष्णू रुद्र इंद्र तूं अग्नि वायू सूर्य चंद्रमा ।
देहत्रयातीत कालत्रयातीत गुणातीत तूं गुरुवरा । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥३४॥
मत्स्य कूर्म तू वराह शेषा वामन परशूराम महान । पंढरी विठ्ठल गिरिवर विष्णू रामकृष्ण तू श्री हनुमान ।
तूच भवानी काली अंबा गौरी दुर्गा शक्तिवरा । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥३५॥
सर्वेश्वरवर अमलेश्वरवर भीमाशंकर आत्माराम । त्रिलोकपावन पतीतपावन रघुपति राघव राजाराम ।
ओंकारेश्वर केदारेश्वर वृद्धेश्वर तू अभयकरा । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥३६॥
शेषाभरणा शेषभूषणा शेषाशायी महोदधे । पूर्णानंदा पूर्ण परेशा षड्भुज यतिवर गुरुमूर्ते ।
शाश्वतमूर्ते षड्भुजमूर्ते अखिलांतक पतितोद्धारा । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥३७॥
सभा सभापति व्रात व्रातपति ककुभ निषङ्गी हरिकेशा । शिवा शिवतरा शिवतम षङ्गा भेषजग्रामा मयस्करा ।
उर्वि उर्वरा द्विपद चतुष्पद पशुपति पथिपति अन्नपते । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपानिधे ॥३८॥
वृक्ष वृक्षपति गिरिचर स्थपति वाणिज मंत्रि कक्षपति । अश्व अश्वपति सेनानी रथि रथापती दिशापती ।
श्रुत श्रुतसेना शूर दुंदुभि वनपति शर्वा इषुधिमते । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपानिधे ॥३९॥
महाकल्प कालाक्ष आयुधा सुखद दर्पदा गुणभृता । गोपतनु देवेश पवित्रा सात्त्विक साक्षी निर्वासा ।
स्तुत्या विभवा सुकृत त्रिपदा चतुर्वेदविद समाहिता । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥४०॥
नक्ता मुक्ता स्थिर नर धर्मी सहस्रशीर्षा तेजिष्ठा । कल्पतरू प्रभू महानाद गति खग रवि दिनमणि तू सविता ।
दांत निरंतर सांत निरंता अशीर्य अक्षय अव्यथिता । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥४१॥
अंतर्यामी अंतर्ज्ञानी अंतःस्थित नित अंतःस्था । ज्ञानप्रवर्तक मोहनिवर्तक तत्त्वमसि खलु स्वानुभवा ।
पद्मपाद पद्मासन पद्मा पद्मानन हे पद्मकरा । जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥४२॥
॥ जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥
॥ जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपाकरा ॥
॥ श्री गुरुदेव दत्त ॥ श्री गुरुदेव दत्त ॥
॥ श्री स्वामी समर्थ महाराज की जय ॥
रचनाकार - श्रीयुत् नागेश करंबेळकर
॥ श्री गणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥
॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
ॐ अस्य श्रीदत्तात्रेयस्तोत्रमन्त्रस्य नारदऋषिः । दत्तात्रेयो देवता । अनुष्टुप् छन्दः ।
सकलकामनासिद्ध्यर्थे जपे विनियोगः ॥ नारद उवाच -
अत्रिपुत्रो महातेजा दत्तात्रेयो महामुनिः । तस्य स्मरणमात्रेण सर्वपापैः प्रमुच्यते ॥१॥ मुण्डनं कौपिनं भस्मं योगपट्टं च धारयन् । शैली श्रृङ्गी तथा मुद्रा दण्ड पात्र जिनासनम् ॥२॥ कन्थादो पञ्च आधारी कण्ठमालां च पादुकाम् । कर्णकुण्डलधारी च सिद्धोही भ्रमते महिम् ॥३॥ दत्तात्रेयो महादेवो विष्णुरूपो महेश्वरा । स्मरणात् सर्वपापानि नश्यन्ते नात्र संशयः ॥४॥ मातापूरनिवासी च देवो दत्तात्रेयो मुनिः । नित्य स्नानं प्रकुरुते भागीरथ्यां दिने दिने ॥५॥ दत्तात्रेयो हरिः साक्षात् वसन्ते सह्यपर्वते । भक्तानां वरदो नित्यं सः देवश्चिन्तितं मया ॥६॥ नागहार धरो देवो मुकुटादि समन्विता । पुष्पमालाधरो देवो सः देवो वरदो मम ॥७॥ अत्रिजो देवदेवेषो मातुर्लिङ्गधर प्रभु । सर्वसौभाग्ययुक्तश्च भक्तानां वरदः सदा ॥८॥ ॥ इति श्रीनारदोक्तं श्रीदत्तात्रेयस्तोत्रं सम्पूर्णम् ॥
॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
सद्गुरूनाथा, हात जोडीतो अंत नको पाहू । उकलुनि मनीचे हितगुज सारे, वद कवणा दावू ॥धृ.॥ निशिदिनी श्रमसी मम हितार्थ तू, किती तुज शीण देऊ । हृदयी वससि परि नच दिससी, कैसे तुज पाहू ॥१॥ उत्तीर्ण नव्हे तुज उपकारा जरी, तनु तुज वाहू । बोधुनि दाविसी इहपर नश्वर, मनीं उठला बाऊ ॥२॥ कोण कुठील मी कवण कार्य मम, जनी कैसा राहू । करी मज ऐसा निर्भय निश्चल, सम सकला पाहू ॥३॥ अजाण, हतबल, भ्रमित मनीची तळमळ कशी साहू । निरसूनि माया दावी अनुभव, प्रचिती नको पाहू ॥४॥
॥ श्री गुरुदेव दत्त ॥