॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
दत्त दिगंबर दैवत माझे l हृदयी माझ्या नित्य विराजे ॥धृ.॥
अनसूयेचे सत्त्व आगळे l तिन्ही देवही झाली बाळें l त्रैमूर्ती अवतार मनोहर l दीनोद्धारक त्रिभुवनी गाजे ॥१॥ तीन शिरे, कर सहा शोभती l हास्य मधुर शुभ वदनावरती l जटाजूट शिरी, पायी खडावा l भस्मविलेपित कांती साजे ॥२॥ पाहुनि प्रेमळ सुंदर मूर्ती l आनंदाचे आसू झरती l सारे सात्विक भाव उमलती l हळूहळू सरते मीपण माझे ॥३॥
गीतकार : सुधांशु
गायक, संगीतकार : आर.एन.पराडकर
No comments:
Post a Comment