॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
॥ श्रीराम समर्थ ॥
सदगुरूराया तुजपाशी । आलो काही मागावयासी । ठाव देई चरणापाशी । हेचि मागणे गुरूराया ॥१॥ कान तुझी कथा ऐको । नेत्र तुझे रूप देखो । जिव्हा नामस्मरणी टिको । हेचि मागणे गुरुराया ॥२॥ मत्सर कोणाचा न व्हावा । मनी ताठा नुपजावा । नम्रता येवो स्वभावा । हेचि मागणे गुरूराया ॥३॥ कोणाचीही नको निंदा । लबाडीचा नको धंदा । भजनाच्या लावी छंदा । हेचि मागणे गुरूराया ॥४॥ उपजोनी सात्विक भावा । नरदेह सार्थकी लावावा । सोलीव आनंद लुटावा । हेचि मागणे गुरुराया ॥५॥ दोषाची मी असे खाण । परी तुझा म्हणवितो जाण । कृपेची न पडो वाण । हेचि मागणे गुरूराया ॥६॥ देह तूचि देही तूच । जगत्रयी अवघा भरला तूच । चित्तास देई चिंतन हेच । हेचि मागणे गुरूराया ॥७॥ पुढे तूचि मागे तूच । आत बाहेरी अससी तूच । आता आणी प्रचितीस । हेचि मागणे गुरूराया ॥८॥ आता करितो तुजसी नमन । नमना वीण काही न आन । नमन 'न मन' नामस्मरण । हेचि मागणे गुरूराया ॥९॥
घडो मजसि संगती सतत सज्जनांची हरी । जडो मन पदी पडो तव कथा ही कानावरी ॥
असोच रसना सदा रत तुझ्या सुनामामृती । करोत कर सर्वदा भजन हे तुझें निश्चिती ॥
- जय जय रघुवीर समर्थ -
श्री महाराज म्हणतात -
राम नाम, अन्नदान, सगुणाची भक्ती । हीच परमार्थ साधण्याची युक्ती ॥
मुखात नाम, हाती काम, कर्ता राम । हेच साधनात साधन जाण ॥
॥ श्रीराम ॥ श्रीराम ॥ श्रीराम ॥
सौजन्य :- चैतन्योपासना, श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर (संस्थान)
No comments:
Post a Comment