Dec 12, 2016

प्रार्थना


।। श्री गणेशाय नमः ।।


सदा संतापाशी जावे I त्यांचे जवळी बैसावे II

उपदेश ते न देती I तरी ऐकाव्या गोष्टि II

तेचि उपदेश होती I त्याही कष्ट नष्ट होती II

वासुदेव म्हणे संत I संगे करिती प्रसन्न II

-श्रीसद्गुरु प.प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज


गुरु सेवा घडे ज्यासी,काळ दंडीना तयासी ll

ऐका भोळे भाविक जन, नित्य करा गुरुचिंतन

महादोष होती दहन,स्मरण मात्रें करुनी ll

गुरु ज्ञानाचा सागर,गुरु धैर्याचे आगर

गुरु नेईल पैल पार,नामस्मरण केलिया ll

गुरुच मुक्तीचा दाता,गुरु देह चालविता

हरे पातकाची व्यथा,गुरुचे स्मरण केलिया ll

गुरु संतांचे निजगुज,गुरु मंत्राचा निजबीज

गुरुचें ध्यानें चरणांबुज,अनेक तीर्थे त्याचे ठाई ।।

गुरु मायेचे निरसन,गुरु मायेचे अंजन

गुरुचे अघाध महिमान,मुखे किती वर्णावे?।।

जय जय गुरु मायबापा,चुकवी ८४च्या खेपा

बोधराज घेतो गुरु बापा,परब्रम्ही लय लावूनिया ll

।। जय गुरुदेव दत्त l। 

।।श्री स्वामी समर्थ ll


No comments:

Post a Comment