Oct 8, 2019

श्रीपाद श्रीवल्लभ स्तोत्रम्


॥ श्रीगणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥


श्रीपाद वल्लभ गुरोः वदनारविन्दं

वैराग्य दीप्ति परमोज्ज्वलं अद्वितीयम । 

मन्द स्मितं सुमधुरं करुणार्द्र नेत्रं 

संसार ताप हरणं सततं स्मरामि ॥


श्रीगुरु श्रीपाद श्रीवल्लभ यांचे मुखकमल वैराग्य कांतीयुक्त, परम तेजस्वी, एकमेव अद्वितीय, सुमधुर मंद हास्ययुक्त असून डोळे करुणेने ओलावलेले (व) संसार ताप नाशक आहेत, त्यांचे मी सतत स्मरण करतो.


श्रीपाद वल्लभ गुरोः कर कल्पवृक्षं 

भक्तेष्ट दान निरतं रिपु संक्षयं वै। 

संस्मरण मात्र चिति जागरणं सुभद्रं 

संसार भीति शमनं सततं भजामि॥


श्रीगुरु श्रीपाद श्रीवल्लभ यांचे हात कल्पवृक्षाप्रमाणे असून भक्तांना इष्ट ते देण्यात तत्पर व शत्रुचा नाश करणारे व केवळ मनात स्मरण केल्याने देखिल बोध करुन उत्तम कल्याण करणारे तसेच संसार भयाचे शमन करणारे आहेत. त्यांचे मी सतत भजन करतो.


श्रीपाद वल्लभ गुरोः परमेश्वरस्य 

योगीश्वरस्य शिव शक्ति समन्वितस्य। 

श्रीपर्वतस्य शिखरं खलु सन्निविष्टं 

त्रैलोक्य पावन पदाब्जं अहं नमामि॥ 


श्रीपाद श्रीवल्लभ गुरु परमेश्वर योगेश्वर शिव-शक्तीसह असलेले, श्रीशैल पर्वताच्या शिखरावर खरोखर निवास करणारे, त्रैलोक्याला पावन करणारे मल्लिकार्जुन आहेत, त्यांच्या चरण कमलांना मी नमस्कार करतो.


No comments:

Post a Comment