Oct 5, 2019

श्री रंगावधूतमहाराज विरचितं श्री स्वामीसमर्थ स्तोत्रं


ll ॐ ll 

ll श्री गणेशाय नमः ll

ll श्री स्वामीसमर्थ स्तोत्रं ll


स्वामीन् नमस्ते अक्कलकोटवासिन् l

समर्थ नाम्ने अपर नारसिंह ll

त्रिईश अवतार त्रितय आर्ति हारिन् l 

प्रचंडकाय प्रणय एक शुल्क ll १ ll

प्रपन्न कल्पद्रुम पाप दाव l

स्फुलिंग नेत्रोदकशील साधो ll

आजानुबाहो अगमलील योगिन् l

ज्ञ स्वैराचारिन् नाती तुष्ट तिष्ठो ll २ ll

दिग् वस्त्र भूष प्रवि दग्ध पूषन् l

कारुण्य सिंधो नत दीन बंधो ll

मां बालरंगं कृपयोद्धर त्वं l

जहि इह मां मा भव सिन्धु पोत ll ३ ll 

स्तोत्रं स्वामी समर्थस्य चतुर्विशति नामभृत् l

य: पठेत् प्रयतो भक्त्या निर्भय: स सुखी भवेत् ll

ll इति श्री दत्त पादारविंद मिलिंद ब्रह्मचारि पांडुरंग (रंगअवधूत) महाराज विरचितं श्री स्वामी समर्थ स्तोत्रं संपूर्णम् ll

ll श्री स्वामी अर्पणं अस्तु ll    


भावार्थ : अहो, अक्कलकोटनिवासी स्वामी, समर्थ असे नाव असलेलें दुसरें नरसिंह तुम्हांस नमस्कार असो. ब्रह्मा, विष्णू, आणि शिव या देवांचे अवतार असलेलें, अधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक अशा तीन तापांचा नाश करणारे, रुद्ररूप धारण करणारे, केवळ प्रेमभक्ती स्वीकारणारे, शरणागतांचे कल्पवृक्ष, पातकांचे दहन करणारे, अग्नीप्रमाणे तेजस्वी असणारे, पाणीदार डोळें असलेलें, संतश्रेष्ठ, आजानुबाहू, (ज्यांच्या) अगम्य लीला आहेत असे, थोर संन्यासी, ज्ञानीं, (त्रैलोक्यांत) मुक्त संचार करणारे, आणि सदा संतुष्ट अवस्था धारण करणारे अशा (श्री स्वामी समर्थांस) नमस्कार असो. हे दिशारूपी वस्त्र धारण करणाऱ्या पूर्ण ज्ञान भास्करा, हे करुणासागरा, हे दीनांच्या कैवारी (तुम्हांस) नमस्कार असो. तुम्ही माझा,या रंगअवधूत बालकाचा कृपया उद्धार करावा. हे संसार सागरतारका, मला मारू नकोस. श्री स्वामी समर्थांचे चोवीस नावांनी युक्त असे स्तोत्र जो दृढ श्रद्धेनें वाचतो, तो निर्भय आणि सुखी होतो. असे हे श्रीदत्त महाराजांच्या चरण-कमलांतील भ्रमर असलेले, ब्रह्मचारी पांडुरंग (रंगअवधूत) महाराजांनी रचलेलें श्री स्वामी समर्थ स्तोत्र संपूर्ण झाले.


No comments:

Post a Comment