॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥
ब्राह्मण्यै यो मंक्षु भिक्षान्नतोऽभूत्प्रीतस्तस्या यः कृपार्द्र: सुतोऽभूत् ।
विस्मृत्यास्मान् किं स गाढं निदद्रौ श्रीपादद्रौ वापदाहानिद्रौ ॥१॥ भावार्थ : जे सुमतीनामक ब्राह्मणीने दिलेले भिक्षान्न स्वीकारून तिच्यावर त्वरित प्रसन्न झाले, आणि कृपाप्रसाद म्हणून स्वतः तिचे पुत्र झाले. ते भक्तांच्या आपदा तत्काळ निवारण करणारे श्रीपाद श्रीवल्लभ आम्हांला विसरून दूर एखाद्या पर्वतावर अथवा औदुंबर वृक्षातळीं गाढ निद्रिस्त झाले आहेत का ? आश्वास्याम्बां प्रव्रजन्नग्रजान्यः कृत्वा स्वङ्गान् संचचारार्यमान्यः । विस्मृत्यास्मान् किं स गाढं निदद्रौ श्रीपादद्रौ वापदाहानिदद्रौ ॥२॥ भावार्थ : ज्यांनी (साधुजनांना दीक्षा देण्यासाठी) तीर्थाटनाला जातांना (केवळ आपल्या हस्तस्पर्शाने) ज्येष्ठ बंधुंच्या व्यंगाचा परिहार करून मातेला आश्वस्त केले, जे सर्व विद्वज्जनांना पूजनीय आहेत आणि जे भक्तजनांच्या कल्याणासाठी या भूमीवर संचार करू लागले, ते तत्काळ संकट निवारण करणारे श्रीपाद श्रीवल्लभ आम्हांला विसरून एखाद्या पर्वतावरील एकांत स्थळीं अथवा औदुंबर वृक्षातळीं गाढ निद्रिस्त झाले आहेत का ? सार्भा मर्तुं योद्यता स्त्रीस्तु तस्या दुःखं हर्तुं त्वं स्वयं तत्सुतः स्याः । विस्मृत्यास्मान् किं स गाढं निदद्रौ श्रीपादद्रौ वापदाहानिदद्रौ ॥३॥ भावार्थ : मंदमती मुलासह जी स्त्री प्राणत्याग करण्यास निघाली होती, तिचे दुःख दूर करण्यासाठी जे श्रीगुरु स्वतः तिचे पुत्र झाले, तेच भक्तांची अरिष्टे तत्काळ दूर करणारे श्रीपाद श्रीवल्लभ आम्हांला विसरून एखाद्या पर्वतावर अथवा औदुंबर वृक्षातळीं गाढ निद्रिस्त झाले आहेत का ? राज्यं योऽदादाशु निर्णेजकाय प्रीतो नत्या यः स्वगुप्त्यै नृकायः । विस्मृत्यास्मान् किं स गाढं निदद्रौ श्रीपादद्रौ वापदाहानिदद्रौ ॥४॥ भावार्थ : भक्तिभावाने केलेल्या केवळ नमस्काराने प्रसन्न होऊन ज्यांनी एका परिटाला राज्याचे वरदान दिले, आणि लौकिकदृष्ट्या अदृश्य होऊनही, जे अजूनही गुप्तरुपें लीलादेह धारण करून भक्तजनांच्या कामना पूर्ण करतात, ते भक्तांच्या आपदा तत्काळ निवारण करणारे श्रीपाद श्रीवल्लभ आम्हांला विसरून दूर एखाद्या पर्वतावर अथवा औदुंबर वृक्षातळीं गाढ निद्रिस्त झाले आहेत का ? प्रेतं विप्रं जीवयित्वाऽस्तजूर्ति यश्चक्रे दिक्शालिनीं स्वीयकीर्तिम् । विस्मृत्यास्मान् किं स गाढं निदद्रौ श्रीपादद्रौ वापदाहानिदद्रौ ॥५॥ भावार्थ : ज्यांनी (वल्लभेश) ब्राह्मणाला जिवंत करून त्याचे ऐहिक आणि पारलौकिक कल्याण केले, ज्यांची कीर्ती अखिल दिगंतात पसरली आहे, तेच तत्काळ संकट निवारण करणारे श्रीपाद श्रीवल्लभ आम्हांला विसरून एखाद्या पर्वतावर अथवा औदुंबर वृक्षातळीं गाढ निद्रिस्त झाले आहेत का ? ॥ श्री.प.प.श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचितं श्रीपादश्रीवल्लभस्तोत्रं संपूर्णम् ॥
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥॥ श्रीगुरुदेवदत्त ॥
॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥
॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥
No comments:
Post a Comment