॥ श्री गणेशाय नमः ॥
॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः॥
नाही जन्म नाही नाम । नाही कुणी माता पिता ।
प्रगटला अदभुतसा । ब्रह्मांडाचा हाच पिता ॥१॥
नाही कुणी गुरुवर । स्वयें हाच सुत्रधार ।
नवनाथी आदिनाथ । अनाथांचा जगन्नाथ ॥२॥
नरदेही नरसिंह । प्रगटला तरुपोटी ।
नास्तिकाच्या कश्यपूला । आस्तिकाची देण्यागती ॥३॥
कधी चाले पाण्यावरी । कधी धावे अधांतरी ।
यमा वाटे ज्याची भीती । योगीश्वर हाच यती ॥४॥
कधी जाई हिमाचली । कधी गिरी अरवली ।
कधी नर्मदेच्या काठी । कधी वसे भीमातटी ॥५॥
कालीमाता बोले संगे । बोले कन्याकुमारीही ।
अन्नपूर्णा ज्याचे हाती । दत्तगुरु एकमुखी ॥६॥
भारताच्या कानोकानी । गेला स्वये चिंतामणी ।
सुखी व्हावे सारे जन । तेथे धावे जनार्दन ॥७॥
प्रज्ञापुरी स्थिर झाला । माध्यान्हीच्या रविप्रत ।
रामानुज करी भावे । स्वामी पदा दंडवत ॥८॥
॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥
॥ ॐ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥
No comments:
Post a Comment