Jan 15, 2017

दत्ता मजला प्रसन्न होसी...



दत्ता मजला प्रसन्न होसी जरि तूं वर देसी ।

तरि मी आनन मागें तुजसी निर्धारुनी मानसी ।।धृ।। 

स्मरण तुझें मज नित्य असावे तव गुण भावे गावे।

अनासक्तिने मी वागावे ऐसे मन वळवावे ।।।। 

सर्व इंद्रिये आणि मन हें तुझे हाती आहे । 

यास्तव आतां तू लवलाहें स्वपदी मन रमवावे ।।।। 

विवेक आणि सत्संगति हे नेत्रद्वय आहे । 

वासुदेव निर्मल देहें जेणें त्वत्पदीं राहे ।।।। 

दत्ता मजला प्रसन्न होसी जरि तूं वर देसी।

तरि मी आनन मागें तुजसी निर्धारुनी मानसी ।।




No comments:

Post a Comment