॥ ॐ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
दत्ता दिगंबरा या हो, स्वामी मला भेट द्या हो ।
दत्ता दिगंबरा या हो, सावळ्या मला भेट द्या हो ।
दत्ता दिगंबरा या हो, दयाळा मला भेट द्या हो ॥धृ.॥
तापलो गड्या त्रिविध तापे, बहुविध आचरलो पापे ।
मनाच्या संकल्प-विकल्पे, काळीज थरथरथर कापे ।
कितीतरी घेऊ जन्म फेरे, सावळ्या मला भेट द्या हो ॥१॥
दत्ता दिगंबरा या हो…
तुम्हांला कामकाज बहुत, वाट पाहू कुठवरपर्यंत ।
प्राण आला कंठागत, कितीतरी पाहशील बा अंत ।
दीनाची करुणा येऊ द्या हो, नाथा मला भेट द्या हो ॥२॥
दत्ता दिगंबरा या हो…
संसाराचा हा वणवा, कितीतरी आम्ही सोसावा ।
वेड लागले या जीवा, कोठे न मिळे विसावा ।
आपुल्या गावा तरी न्या हो, दयाळा मला भेट द्या हो ॥३॥
दत्ता दिगंबरा या हो…
स्वामी मला भेट द्या हो, दयाळा मला भेट द्या हो ।
सावळ्या मला भेट द्या हो, दत्ता दिगंबरा या हो ।
स्वामी मला भेट द्या हो ॥
गायक : श्री. आर. एन. पराडकर
No comments:
Post a Comment