Jan 19, 2023

श्री सद्‌गुरु-स्तवन


श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥


जयजयाजी श्रीगुरुराया । ब्रह्मस्वरूप सगुण काया । देवात्मशक्ति कृपा कराया । तुम्हांरूपे प्रकटली ॥१॥
सकलहि तीर्थांचे सार । श्रीगुरुचरणींचे नीर । आत्मज्ञानाची शांत धार । सद्‌गुरुंचे मौनही ॥२॥ 
बंधमुक्तिचे मिथ्या प्रवाद । विद्याविद्येचा विफलवाद । द्वैत अद्वैत शब्दभेद । कृपाकटाक्षे निमाले ॥३॥ 
आलस्य निद्रादि तमोगुण । राजस तैसे सात्त्विक गुण । केले हरोनी मज उन्मन । ऐसी पौर्णिमा कृपेची ॥४॥ 
अज्ञानतमही लवलाहे । ब्रह्मज्ञानाचा चंडांशु पाहे । श्रीकृपे भेदोनी मायामोहे । आत्मस्वरूप देखिले ॥५॥ 
शिष्यतत्त्वभावें सूक्ष्म होणे । गुरुतत्त्वें स्वयं प्रकाशणे । दोहों तत्त्वीं अद्वैत देखणे । श्रीगुरुकृपे साधले ॥६॥ 
पूर्णातूनी पूर्ण उपजले । येथ श्रुतिवाक्य फळा आले । श्रीगुरुचरणीं श्री बैसले । शिष्यरूपे नम्रभावे ॥७॥ 
आनंदे जावे आनंदाघरी । तेवी श्रींच्या जयजयकारी । श्रीपादचरणद्वयांवरी । मस्तक भावें ठेविले ॥८॥ 

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 

No comments:

Post a Comment