Jun 26, 2018

श्री नृसिंहसरस्वती प्रार्थना


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥


अनसूयात्मज हे जगपालका । तुजविण न जगी कुणी बालका । तरी कथी स्मरु मी कवणा प्रती । शरण मी नरसिंह सरस्वती ॥१॥ मग मला गमला पथ हा बरा । तव पदीच असो नित्य आसरा । पुरती हेतू कधीं मम हे कथीं । करी दया नरसिंह सरस्वती ॥२॥ मज कडोनिच घेऊनी चाकरी । मग ही देशील योग्य न ते जरी । शिशुस मोबदला कुणि मागती । कथीं बरे नरसिंह सरस्वती ॥ ३॥ नति तुझ्या पदीं अर्पिती किंकर । अभय दे शिरी ठेवी गुरु कर । स्थिरमती रमती नित्य प्रार्थिती । करी दया नरसिंह सरस्वती ॥ ४॥ मदीय लोचन सार्थक जाहले । सगुण सद्‌गुरु सतरूप पाहिले । बघ मना रुप मंगल हे किती । करी दया नरसिंह सरस्वती ॥५॥ तव कृपेविण जीवचि घाबरे । अभय दे शिरी ठेवचि हस्त रे । तव पथा गुरु वासचि पाहती । करी दया नरसिंह सरस्वती ॥६॥ बहुत भोगियल्या गुरु आपदा । चुकवि दावी आतां तुझिया पदा । द्रुतगती आजि धावचि संकटी । करी दया नरसिंह सरस्वती ॥७॥ कितीतरी आळवु तुजला श्रीगुरु । बहुत ही श्रमलें भवि लेकरु । कशी दया तुजला लव ये न गा । अनसूयात्मज भो मज पावगा ॥८॥ तुज समक्ष अरी मज गांजिती । लवभरी तुजला कशी ना क्षिती । उगीच कां त्रिशुला धरिलें अगा । अनसूयात्मज भो मज पावगा ॥९॥ मदीय प्राण हरिलचि काळ तो । मग तुझा उपयोगचि काय तो । म्हणुनी मी पुसतो कधीं येशि गा । अनसूयात्मज भो मज पाव गा ॥१०॥ सदयता हृदयीं लव तु धरी । भजनी मंडळी हे गुरु तु उद्धरी । स्वकिय, आप्त, रिपु आणि निंदका । अनसूयात्मज भो मज पावगा ॥ ११॥ अदयता धरिली अशी का बरे । भवपुरी बुडतो जिव घाबरे । पुरवी हेतु न मी गुरु दास गा । अनसूयात्मज भो मज पावगा ॥१२॥

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 


No comments:

Post a Comment