॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
समस्त दत्तभक्तांना श्री दत्तात्रेय जयंतीच्या भक्तिमय शुभेच्छा !
अवश्य वाचावे असे काही -
॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
समस्त दत्तभक्तांना श्री दत्तात्रेय जयंतीच्या भक्तिमय शुभेच्छा !
अवश्य वाचावे असे काही -
॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
समस्त दत्तभक्तांना श्री दत्तात्रेय जयंतीच्या भक्तिमय शुभेच्छा !
॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥
॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
॥ ॐ श्री स्वामी समर्थाय नमः ॥ ॐ श्री साईनाथाय नमः ॥
अभंग
मनोहर ध्यान किती हें साईचें । पाठीशीं चांदीचें सिंहासन ॥ सिंहासन गादी उशांचे सहित । सछत्र शोभत प्रभावळी ॥ प्रभावळीमाजी कुंजवनशोभा । शोभेचा हा गाभा मुरलीधर ॥ मुरली धरिली सुंदर हो हातीं । वाजवूनियां ती धेनू पाळी ॥ पाळीव पक्ष्याचे समान मयूर । करिती विहार वनामध्यें ॥ वनामध्यें हरी नित्य हा क्रीडत । रवि स्थिरावत आनंदानें ॥ आनंदाने दोघे गरुड हनुमंत । जोडोनियां हात उभे सेवे ॥ सेवेकरी मोदें मोर्चेल चवरी । धरिती स्वामीवरी प्रेमभावें ॥ भावें धावूनियां येती भक्तजन । करिती पूजन एकनिष्ठें ॥ एकनिष्ठ मेघा करितां आरती । स्वामी खुणवीती आत्मबोध ॥ बोध करूनियां भक्तावरी दृष्टी । करिताती वृष्टी सुप्रेमाची ॥ सुप्रेमाची मना आवडी लागली । म्हणूनी गुंफली भावें माला ॥ माला ही गुरूची गुरूला वाहिली । पावन ती झाली गुरूचे पायीं ॥ पायीक या माना कृष्णा साईनाथा । जडो पद माथा मनोहर ॥१॥ मानसपूजा श्रीमत्साई परेश मूर्ति हृदयीं आणोनियां पाहिली । तों ती सुंदर वस्त्रवेष्टित शिरीं भासावया लागली ॥ पाहें जों निरखोनि अंगि कफनी सिंहासनाचे पुढें । बैसे आसन घालुनि सकलही ने जो लया सांकडें ॥१॥ आपाद मस्तक निहाळुनियां गुरूला । भावें पदीं नमुनि मस्तक ठेवियेला ॥ ठेवियला वरदहस्त शिरीं गुरूनें । केलें पुढें स्वमनिं पूजन तत्कृपेनें ॥२॥ प्रथम गुरुपदांघ्री अर्पिलें प्रेमवारी । त्रिभुवनपथगामी पाप ज्याचेनि वारी ॥ ग्रहण करुनियां तत्प्रेमतीर्थोदकातें । पुनित करूनि देहा पूजिलें सद्गुरुतें ॥३॥ भावें केशरयुक्त चंदन मनें पादांगुलीं लाविलें । पुष्पें सुंदर अक्षता तुलसिही वाहोनियां अर्चिलें ॥ केलें वंदन पादमार्जन शिरीं पुष्पें सुगंधीजलें । भालीं लावुनि गंध पुष्प तुलसी बिल्वाक्षतें पूजिलें ॥४॥ कर्णासि कंठासि उर:स्थळाला । लावूनियां चंदन दो करांला ॥ पुष्पाक्षता वाहुनि पुष्पमाला । गुंफोनियां अर्पिलि सद्गुरुला ॥५॥ देवाचिया हस्तिं सुगंधिपुष्प । अर्पियले नंतर धूप दीप ॥ काल्पी करीं देउनियां गुरूला । दक्षिणा विडा नंतर अर्पियेला ॥६॥ करोनियां ऐसें यजन मग मीं दीप धरुनी । तुला ओंवाळुनि मुखकमल तें नेत्र भरुनीं ॥ पहातां तूं केली मजवरि कृपावृष्टि नयनीं । अहाहा त्या सौख्या किति वदुं गुरू अल्पवदनीं ॥७॥ गादी पाट उशा समस्त उचला साई असें सांगुनि । काढिती खिचडी शिरा सकळ जें भक्तें दिलें आणुनि ॥ वांटोनि सगळें यथोचित पुढें देती प्रसादीं उदी । ती मीं घेउनि हस्तिं भाल नमुनि ठेवियला तत्पदीं ॥ ८ ॥ घेवोनि उदी दूर राहुनि उभा जैं सद्गुरु पाहिला । तेव्हां जोडुनि श्रीहरी समपदें वाटे उभा राहिला ॥ होवोनि अति सुप्रसन्न नयनीं सुप्रेमवृष्टि करी । दे जी सद्गुरु साइनाथ उदि ती आशीच भक्तावरी ॥९॥ प्रभो साईनाथा ग्रथित कवनीं मानसपुजा । करूनि केला हा गरिब अपुला दास समजा ॥ सदा गाऊनी ही करिति गुरुची मानसपुजा । तया कृष्णस्वामी वरदत्रिदिवेशस्तरुजवा ॥१०॥
॥ श्री साईसमर्थ ॥
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥
॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
भक्तांच्या कल्याणासाठी पदोपदी तळमळणाऱ्या त्या दत्तमाऊलीच्या लीलांचे किती वर्णन करावे बरें ? महाप्रसादिक श्रीगुरुचरित्र हा सिद्धमंत्ररूप आणि वरदग्रंथ आहे. त्यांमुळे मंत्राच्या अनुष्ठानविधीचे सर्व नियम या ग्रंथाचे पारायण करतांना विशेष पाळावे लागतात. मात्र आपल्यासारख्या अतिसामान्य दत्तभक्तांनाही हा परमलाभ प्राप्त व्हावा, यासाठी - " सर्वजनसुलभ अशी श्रीगुरुचरित्राची पाठावृत्ती करावी." असा श्रीदत्तात्रेय प्रभूंचा प. पू. सद्गुरु श्री. मामा महाराजांना आदेश झाला. दत्तमहाराजांच्या या आज्ञेनुसार प. पू. श्री. मामांनी श्रीगुरुचरित्राच्या प्रकाशित पोथ्या, विविध हस्तलिखिते आणि प. प. श्री. टेम्ब्ये स्वामी महाराजांचे 'समश्लोकी गुरुचरित्र' अशा अनेक उपलब्ध साहित्याचा आधार घेऊन पाठभेद निश्चित केला आणि श्रीगुरुचरित्र नित्यपाठ कसा तयार करायचा, याचे संकलन केले.
प्रत्यक्ष दत्तप्रभूंचा कृपाप्रसाद असलेल्या श्रीगुरुचरित्र नित्यपाठ या ग्रंथाच्या मनोगतात श्री. शिरीष शांताराम कवडे लिहितात - अनेक साधकांनी, भाविकांनी, श्रीदत्तभक्तांनी मुक्तकंठाने या नित्यपाठाची महती मान्य करून अनुभवलेली आहे. मूळ श्रीगुरुचरित्राची नित्य पारायणे करणाऱ्या अनेकांनी, नित्यपाठाचीच पारायणे करणे सुरू केलेले आहे; इतके हे संस्करण पारायण - सुलभ झालेले आहे. या नित्यपाठामुळे अनेकजण श्रीगुरुचरित्राच्या अमृतगंगेत सुस्नात होऊन धन्यता अनुभवू शकले आहेत; श्रीगुरूंच्या अपार कृपेची अनेक प्रकारे अनुभूती घेऊन कृतार्थ होत आहेत. ही सगळी भगवान श्रीदत्तात्रेयप्रभूंच्या प. पू. सद्गुरु श्री. मामांवर असलेल्या पूर्णकृपेचीच प्रचिती आहे.
वेदतुल्य अशा श्रीगुरुचरित्र वाचनाचे पूर्णत: समाधान अन अनुभूती देणाऱ्या या नित्यपाठाचे वैशिष्ट्य असे की - प्रत्येक अध्यायातील काही निवडक ओव्या घेऊन त्या त्या अध्यायाचे पूर्ण सार आणि कथानके, आख्याने संक्षिप्त रूपांत वर्णिली आहेत. द्विरुक्ती असलेला अथवा धर्मशास्त्रीय चर्चा, कर्मकांड निरूपणाचा भाग वगळलेला आहे. वेदतुल्य, मंत्ररूप ग्रंथराज अशा श्रीगुरुचरित्रातील केवळ निवडक २७३३ ओव्या असलेला ( मूळ श्रीगुरुचरित्र ओवीसंख्या ७४९१ आहे.) हा नित्यपाठ मूळ ग्रंथाइतकाच प्रासादिक आहे, हे निःसंशय !
मागील काही काळ हा ग्रंथ सहज उपलब्ध नव्हता. मात्र प. पू. सद्गुरु योगिराज श्री. गुळवणी महाराजांच्या आशीर्वादस्वरूप आणि दत्तभक्तांच्या मागणीनुसार श्रीगुरुचरित्र नित्यपाठ या ग्रंथाची आता चतुर्थ आवृत्ती राजसंस्करण स्वरूपांत प्रकाशित झाली आहे. श्रीवामनराज प्रकाशनाच्या या प्रासादिक ग्रंथाचे मूल्य केवळ दोनशे रुपये आहे. शक्य झाल्यास सर्व दत्तभक्तांनी याचा अवश्य लाभ घ्यावा.
श्रीवामनराज प्रकाशनाच्या अधिकृत संस्थळावर या ग्रंथाविषयी अधिक माहिती मिळू शकेल.
अर्थात श्रीगुरुचरित्र हा वरदग्रंथही असल्याने म्हणजेच प्रत्यक्ष श्रीगुरुंचा वर या ग्रंथास प्राप्त झाला असल्याने तो सर्वथैव सिद्धीप्रद आहे. या ग्रंथाच्या केवळ वाचनानेही भगवान दत्तप्रभूंच्या कृपेची अनुभूती निश्चितच येते.
भगवान दत्तमहाराजांची कुठल्या ना कुठल्या रूपांत सतत सेवा घडावी, व त्या भक्ताभिमानी, शरणागतवत्सल परब्रह्मानेही ही सेवा त्यांच्या दिव्य चरणीं रुजू करून घ्यावी, आणि आपल्या सर्वांवर त्यांची सर्वमंगला कृपादृष्टी व्हावी, हीच नित्य प्रार्थना !
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥
॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
श्रीदत्त संप्रदायांतील सर्वच अधिकारी विभूतींनी श्री सरस्वती गंगाधर विरचित श्रीगुरुचरित्र ग्रंथाचे माहात्म्य पुन्हा पुन्हा अधोरेखित केले आहे. तर असंख्य दत्तभक्तांनीदेखील या वेदतुल्य ग्रंथाचे नित्यपाठ वाचन, पारायण करून श्रीदत्तमहाराजांच्या कृपेची प्रचिती अनुभवली आहे. ज्या दत्तभक्तांना काही कारणास्तव समग्र गुरुचरित्राचे पारायण करणे शक्य होत नाही, त्यांनी निदान काही विशिष्ट अध्यायांची यथाशक्ती, भक्तिपूर्वक पारायणे करावीत, असे अनेक अधिकारी संतमहात्म्यांनी सांगितले आहे. त्यांतीलच एक अध्याय म्हणजे चौदावा अध्याय - आकस्मिक अरिष्ट निवारणार्थ हा अध्याय अवश्य वाचावा. गुरुकृपा किती प्रभावी असते हे सांगणारा हा अध्याय या श्रीगुरुचरित्र अध्यायमालिकेचा मेरुमणि आहे. मेरुमणि म्हणजेच एखाद्या माळेंतील मोठा, मध्यवर्तिमणि किंवा मुख्य आधारस्तंभ ! क्रुरयवनशासनं-सायंदेववरप्रदानं नामक या अध्यायचेही असेच महत्व आहे. ' न मे भक्त: प्रणश्यति ' अर्थात माझा भक्त कधीही नाश पावत नाही, असे भगवंतांचे वचन आहे. याच वचनांची, श्रीगुरूंच्या भक्तवात्सल्यतेची पूर्णतः अनुभूती देणाऱ्या या अध्यायाच्या चिंतनाचा हा अल्प प्रयास ! ही यथामति केलेली वाङ्मयसेवा कृपामूर्ती श्रीदत्तमहाराजांनी त्यांच्या दिव्य चरणीं रुजू करून घ्यावीं, हीच अंतःकरणपूर्वक प्रार्थना !!
॥ श्री गणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ नामधारक शिष्य देखा । विनवी सिद्धासी कवतुका । प्रश्न करी अतिविशेखा । एकचित्ते परियेसा ॥१॥ जय जयाजी योगीश्वरा । सिद्धमूर्ति ज्ञानसागरा । पुढील चरित्र विस्तारा । ज्ञान होय आम्हांसी ॥२॥ उदरव्यथेच्या ब्राह्मणासी । प्रसन्न जाहले कृपेसी । पुढे कथा वर्तली कैसी । विस्तारावे आम्हांप्रति ॥३॥ श्री सिद्धांनी सांगितलेल्या श्रीगुरूंच्या लीला ऐकून नामधारक भक्तिरसांत रंगून गेला. त्याने मोठ्या उत्सुकतेने सिद्धांना प्रश्न केला, " हे योगीश्वरा, मला श्रीगुरुंचे पुढील चरित्र विस्तारपूर्वक सांगा. पोटशूळ असलेल्या त्या ब्राह्मणांवर श्रीगुरुंनी कृपा केली आणि त्याला व्याधिमुक्त केले. त्यानंतर काय घडले ? " ऐकोनि शिष्याचे वचन । संतोष करी सिद्ध आपण । श्रीगुरुचरित्र कामधेनु जाण । सांगता जाहला विस्तारे ॥४॥ ऐक शिष्या शिखामणि । भिक्षा केली ज्याचे भुवनी । तयावरी संतोषोनि । प्रसन्न जाहले परियेसा ॥५॥ गुरुभक्तीचा प्रकारु । पूर्ण जाणे तो द्विजवरू । पूजा केली विचित्रु । म्हणोनि आनंद परियेसा ॥६॥ तया सायंदेव द्विजासी । श्रीगुरू बोलती संतोषी । भक्त होय रे वंशोवंशी । माझी प्रीति तुजवरी ॥७॥ शिष्याचा हा भाव पाहून सिद्धांना संतोष झाला आणि त्यांनी कामधेनूस्वरूप श्रीगुरुचरित्र सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, " हे शिष्योत्तमा, त्या दिवशी ज्याच्या घरी भिक्षा घेतली होती, त्या सायंदेव नामक ब्राह्मणावर श्रीगुरु प्रसन्न झाले. त्याची श्रीगुरुचरणीं अनन्य भक्ति दृढ झाली होती, गुरुभक्ती कशी करावी हे तो जाणत होता.
' न करा चिंता असाल सुखे । सकळ अरिष्टे गेली दुःखे ।... ' अशी भाक प्रत्यक्ष त्या परब्रह्माकडून सायंदेवाला मिळाली, त्याच्या भाग्याचे काय अन किती वर्णन करावे बरें ? वरद-कृपाघन श्रीनृसिंहसरस्वती महाराजांनी कडगंची इथे त्याच्या घरी भिक्षा घेतलीच, अन तद्-नंतर गाणगापुर येथे श्रीगुरु असतांनादेखील पुनःश्च स्वगृहीं यथासांग श्रीगुरुपूजन आणि मोठी समाराधना करण्याचे महद्भाग्य या सद्भक्तास अन त्याच्या संपूर्ण परिवारास लाभले. भक्तकामकल्पद्रुम दत्तमहाराज किमान दोनदा तरी या शिष्योत्तमाच्या घरीं गेले होते, असा श्रीगुरुचरित्रांत स्पष्ट उल्लेख आहे. तसेच, पुढें पंधरा वर्षांनी नित्य श्रीगुरुदर्शन, सेवा, सान्निध्य, काशीयात्रापुण्यफळ आणि प्रत्यक्ष श्रीगुरुदेवांच्या उपस्थितीत अनंतव्रत पूजन असे अनेक परमलाभ सायंदेवास प्राप्त झाले. अर्थात त्याचा जो अनन्यभाव श्रीगुरुचरणीं स्थिर झाला होता, त्याचेच हे वरदानस्वरूप फळ होते.
' कांहीं मला सेवनही न झालें । तथापि तेणें मज उद्धरीलें ।... ' या उक्तीची प्रचिती असंख्य दत्तभक्तांनी आजपर्यंत नित्य अनुभवली आहे. तेव्हा आपणही - " श्रीगुरुकृपेची त्वरित प्रचिती देणाऱ्या या मेरुमणि अध्यायाचे नित्य स्मरण-पठण घडावें आणि गुरुमहाराजांच्या ठायीं सायंदेवाचा जो उत्कट भक्तिभाव होता, त्याच्या किमान एक कोट्यांश भक्तिभाव तरी दत्तमहाराजांची ही अत्यल्प सेवा करतांना आपल्या मनांत दृढ व्हावा !", हीच त्या भक्तवत्सल, शरणागत-तारक आणि भवभय-वारण अशा श्रीदत्तप्रभूंच्या चरणीं प्रार्थना करू या !
॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥
ब्राह्मण्यै यो मंक्षु भिक्षान्नतोऽभूत्प्रीतस्तस्या यः कृपार्द्र: सुतोऽभूत् ।
विस्मृत्यास्मान् किं स गाढं निदद्रौ श्रीपादद्रौ वापदाहानिद्रौ ॥१॥ भावार्थ : जे सुमतीनामक ब्राह्मणीने दिलेले भिक्षान्न स्वीकारून तिच्यावर त्वरित प्रसन्न झाले, आणि कृपाप्रसाद म्हणून स्वतः तिचे पुत्र झाले. ते भक्तांच्या आपदा तत्काळ निवारण करणारे श्रीपाद श्रीवल्लभ आम्हांला विसरून दूर एखाद्या पर्वतावर अथवा औदुंबर वृक्षातळीं गाढ निद्रिस्त झाले आहेत का ? आश्वास्याम्बां प्रव्रजन्नग्रजान्यः कृत्वा स्वङ्गान् संचचारार्यमान्यः । विस्मृत्यास्मान् किं स गाढं निदद्रौ श्रीपादद्रौ वापदाहानिदद्रौ ॥२॥ भावार्थ : ज्यांनी (साधुजनांना दीक्षा देण्यासाठी) तीर्थाटनाला जातांना (केवळ आपल्या हस्तस्पर्शाने) ज्येष्ठ बंधुंच्या व्यंगाचा परिहार करून मातेला आश्वस्त केले, जे सर्व विद्वज्जनांना पूजनीय आहेत आणि जे भक्तजनांच्या कल्याणासाठी या भूमीवर संचार करू लागले, ते तत्काळ संकट निवारण करणारे श्रीपाद श्रीवल्लभ आम्हांला विसरून एखाद्या पर्वतावरील एकांत स्थळीं अथवा औदुंबर वृक्षातळीं गाढ निद्रिस्त झाले आहेत का ? सार्भा मर्तुं योद्यता स्त्रीस्तु तस्या दुःखं हर्तुं त्वं स्वयं तत्सुतः स्याः । विस्मृत्यास्मान् किं स गाढं निदद्रौ श्रीपादद्रौ वापदाहानिदद्रौ ॥३॥ भावार्थ : मंदमती मुलासह जी स्त्री प्राणत्याग करण्यास निघाली होती, तिचे दुःख दूर करण्यासाठी जे श्रीगुरु स्वतः तिचे पुत्र झाले, तेच भक्तांची अरिष्टे तत्काळ दूर करणारे श्रीपाद श्रीवल्लभ आम्हांला विसरून एखाद्या पर्वतावर अथवा औदुंबर वृक्षातळीं गाढ निद्रिस्त झाले आहेत का ? राज्यं योऽदादाशु निर्णेजकाय प्रीतो नत्या यः स्वगुप्त्यै नृकायः । विस्मृत्यास्मान् किं स गाढं निदद्रौ श्रीपादद्रौ वापदाहानिदद्रौ ॥४॥ भावार्थ : भक्तिभावाने केलेल्या केवळ नमस्काराने प्रसन्न होऊन ज्यांनी एका परिटाला राज्याचे वरदान दिले, आणि लौकिकदृष्ट्या अदृश्य होऊनही, जे अजूनही गुप्तरुपें लीलादेह धारण करून भक्तजनांच्या कामना पूर्ण करतात, ते भक्तांच्या आपदा तत्काळ निवारण करणारे श्रीपाद श्रीवल्लभ आम्हांला विसरून दूर एखाद्या पर्वतावर अथवा औदुंबर वृक्षातळीं गाढ निद्रिस्त झाले आहेत का ? प्रेतं विप्रं जीवयित्वाऽस्तजूर्ति यश्चक्रे दिक्शालिनीं स्वीयकीर्तिम् । विस्मृत्यास्मान् किं स गाढं निदद्रौ श्रीपादद्रौ वापदाहानिदद्रौ ॥५॥ भावार्थ : ज्यांनी (वल्लभेश) ब्राह्मणाला जिवंत करून त्याचे ऐहिक आणि पारलौकिक कल्याण केले, ज्यांची कीर्ती अखिल दिगंतात पसरली आहे, तेच तत्काळ संकट निवारण करणारे श्रीपाद श्रीवल्लभ आम्हांला विसरून एखाद्या पर्वतावर अथवा औदुंबर वृक्षातळीं गाढ निद्रिस्त झाले आहेत का ? ॥ श्री.प.प.श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचितं श्रीपादश्रीवल्लभस्तोत्रं संपूर्णम् ॥
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥॥ श्रीगुरुदेवदत्त ॥
॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥
॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥
सद्भावें शरणागत आली, गाणगापुरी निज ठाया ॥ स्थानिक लोकां सती म्हणतसे, दावा सद्गुरुचे पाया । भीमाsमरजा संगम ठायी, अनुष्ठान विधी सांगुनिया ॥ येतील तेव्हा सांगा आम्हा, दीनावरती करा दया । श्यामल सुंदर रूप तेधवा, पाहीन नरहरी यतिराया ॥ ग्रामीचे जन म्हणती सतीला, गुरुवर येतील दो प्रहरी । यतिवेशे प्रगटले, श्रीगुरू भीमरथी गंधर्वपुरी ॥१॥ प्राणपतीसी पाहता अधिक, त्रिलोक जमला ते समयी । अंतकाळ जाहला पतीचा, सती घाबरली ते पायी ॥ आक्रोशाने म्हणे, आता मी काय करू दत्ता बाई । कीर्ती ऐकुनी, वीस योजने सौभाग्यास्तव या ठायी ॥ आले परंतु नरहरी राया, सार्थक त्वां केले नाही । देह काय कामाचा भोगुनी, म्हणुनी घेते ठायी सुरी ॥
यतिवेशे प्रगटले श्रीगुरू भीमरथी गंधर्वपुरी ॥२॥ रुद्राक्षांचे हार गळ्यामध्ये, भस्मांकित श्यामल काया । धरुनी प्रगटले म्हणती, सतीला का दुःखी होसी वाया ॥ भक्ति पाहुनी, पतिव्रतेचा आचार सर्वही सांगुनिया । सहगमनाते फार चांगले जाई, म्हणे ती निज ठाया ॥ शोक मोह त्यागुनी तेधवा, पतीसवे स्वर्गां जाया । सर्व तयारी केली, सतीची आनंद जलमय झाली काया ॥ वाणे देती पाहण्यासाठी, दाटी झाली भीमातीरी । यतिवेशे प्रगटले श्रीगुरू भीमरथी गंधर्वपुरी ॥३॥ अवधूताचे आज्ञा अन्वये, संगमठायी गुरुमूर्ती । पाहुनी येते मग संस्कारी, म्हणुनी विप्राते प्रार्थी ॥ अश्वत्थातळी पाहुनी गुरुवर, नमस्कार प्रेमें करें ती । सौभाग्ये ध्रुव नांदे, सतीला हास्यमुखे गुरुवर वदती ॥ प्रेत आणुनी, तीर्थ शिंपुनी, अमृतदृष्टीने पाहती गुरु । सजीव करुनी ब्राह्मण, दिधले सौभाग्या सावित्रीप्रति ॥ नारायणसुत गातो प्रेमें, सद्गुरुचे यश परोपरी । यतिवेशे प्रगटले श्रीगुरू भीमरथी गंधर्वपुरी ॥४॥
॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥
॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥
॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ ऐं र्हीं क्लीं चामुण्डायै विच्चे ॥
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥
अवश्य वाचावे असे काही -
*** उपासना आदिशक्तीची - श्री दुर्गा सप्तशती, श्री देवी माहात्म्य ***
॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ ऐं र्हीं क्लीं चामुण्डायै विच्चे ॥
नमोऽस्तु ते महादेवि शिवे कल्याणि शाम्भवि।
प्रसीद वेदविनुते जगदम्ब नमोऽस्तु ते ll१ll
हे प्रभू शिवशंकरांची शक्ति असलेली आदिमाया महादेवी, अखिल विश्वाचे कल्याण करणारी कल्याणी, शंभुची पत्नी शाम्भवि तुला माझे नमन असो. हे आदिशक्ति, सकल वेदही तुझी प्रार्थना करतात. तुझ्या कृपाप्रसादाचा लाभ मला प्राप्त व्हावा, हीच तुझ्या चरणीं प्रार्थना ! हे जगदम्बे, तुला माझा नमस्कार असो.
जगतामादिभूता त्वं जगत्त्वं जगदाश्रया ।
एकाप्यनेकरूपाऽसि जगदम्ब नमोऽस्तु ते ll२ll
या जगताचे मूळ स्वरूप असलेली तू आदिमाया आहेस. तू विश्वव्यापक असून या सर्व चराचर सृष्टीचा आश्रय आहेस. तू परमात्म्याची शक्ति असून अनेक रूपांत प्रगट होत असते. हे जगदम्बे, तुला मी नमन करतो.
सृष्टिस्थितिविनाशानां हेतुभूते मुनिस्तुते ।
प्रसीद देवविनुते जगदम्ब नमोऽस्तु ते ll३ll
हे महामाये, केवळ तुझ्याच संकल्पमात्रें या सृष्टीची उत्पत्ती, पालन आणि विनाश या प्रक्रिया होत असतात. हे भगवती, सर्व ऋषीमुनी तुझेच नित्य स्तवन करतात. सर्व देवही तुझ्या कृपेची प्रार्थना करतात. हे जगन्माते, माझ्यावर कृपादॄष्टी कर. हे जगदम्बे, तुला माझा नमस्कार असो.
सर्वेश्वरि नमस्तुभ्यं सर्वसौभाग्यदायिनि ।
सर्वशक्तियुतेऽनन्ते जगदम्ब नमोऽस्तु ते ll४ll
हे आदिशक्ति, तू सर्व चराचराची परमेश्वरी असून भक्तांना सर्व सौभाग्य प्रदान करणारी आहेस. तूच सर्व शक्तिस्वरूपिणी आहेस. हे जगदम्बे, तुला मी नमन करतो.
विविधारिष्टशमनि त्रिविधोत्पातनाशिनि ।
प्रसीद देवि ललिते जगदम्ब नमोऽस्तु ते ll५ll
हे भगवती, केवळ तुझ्या कृपादृष्टीनें सर्व अरिष्टांचे शमन होते आणि त्रिविध तापांचा नाश होतो. हे ललितादेवी, मला तुझा कृपाप्रसाद दे. हे जगदम्बे, तुला माझा नमस्कार असो.
प्रसीद करुणासिन्धो त्वत्तः कारुणिका परा ।
यतो नास्ति महादेवि जगदम्ब नमोऽस्तु ते ll६ll
हे जगज्जननी, तू करुणासागर आहेस. हे महादेवी, तू परमश्रेष्ठ असून तुझ्याइतके कृपाळू इतर कोणीही नाही. हे जगदम्बे, तुला मी नमन करतो.
शत्रून्जहि जयं देहि सर्वान्कामांश्च देहि मे । भयं नाशय रोगांश्च जगदम्ब नमोऽस्तु ते ll७ll हे भगवती, तुझ्या कृपेने आमच्या सर्व शत्रूंचा नाश होऊन आम्हांला जय प्राप्त व्हावा. आमच्या सकल अभीष्ट मनोकामना पूर्ण व्हाव्यात. तसेच भय आणि रोग यांचा नाश होऊ दे.(असे तू आम्हांस वरदान दे.) हे जगदम्बे, तुला माझा नमस्कार असो. जगदम्ब नमोऽस्तु ते हिते जय शम्भोर्दयिते महामते । कुलदेवि नमोऽस्तु ते सदा हृदि मे तिष्ठ यतोऽसि सर्वदा ll८ll हे जगन्माते तुला नमन असो. हे सकल विश्वाचे कल्याण करणारी महादेवांची मूळ प्रकृति शाम्भवी, तुझा जयजयकार असो. हे कुलस्वामिनी आदिशक्ति तुला मी नमस्कार करतो. माझ्या हृदयात तुझा नित्य वास राहो, हीच प्रार्थना ! तुलजापुरवासिन्या देव्याः स्तोत्रमिदं परम् । यः पठेत्प्रयतो भक्त्या सर्वान्कामान्स आप्नुयात् ll९ll तुळजापूरवासिनी भवानी देवीचे हे स्तोत्र अतिशय श्रेष्ठ असून जो भक्तिभावाने पठण करेल, त्याच्या सर्व मनोकामना श्री भगवतीच्या कृपेने निश्चितच पूर्ण होतील. ll इति श्री प. प. श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचितं श्रीतुलजापुरवासिन्या देव्याः स्तोत्रं संपूर्णम् ll
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥