Feb 27, 2018
Feb 21, 2018
श्री स्वामी समर्थ महापर्वणी उत्सव सोहळा
|| श्री गणेशाय नमः || श्री दत्त समर्थ ||
या सोहळ्याच्या वेळी पालखी व श्रींची आरती यांचा फेसबुक लाईव्ह व्हिडियो व सोबत या उत्सव समितीचे अध्यक्ष श्री. स्वामीभक्त श्री मिलिंद पिळगांवकर यांनी स्वामीभक्तांना सांगितलेली या महापर्वणी उत्सवासंबंधी थोडक्यात माहिती !
श्रीस्वामी समर्थ महापर्वणी हा उत्सव प्रत्यक्ष श्रीस्वामीसुत महाराज यांनी इ.स. १८७० साली सुरू केला होता. मागील १५ वर्षांपासून गिरगांव येथे होणाऱ्या या उत्सवा मध्ये आजही श्रीस्वामीसुत महाराजांना अभिप्रेत असलेल्या थाटामाटात पालखीमधून श्री स्वामींच्या पादुका, मूर्ती आणि सोबत भगवे निशाण (भगवा ध्वज), गुढी घेऊन नामस्मरण करत करत तमाम स्वामीभक्त गिरगाव समुद्रकिनाऱ्यावर येतात व सगळे मिळून स्वामींच्या पादुकांना समुद्रस्नान घालतात. श्रीस्वामी समर्थ महापर्वणी उत्सवाने ११ कपिलाकष्टी केल्याचे बळ लाभते, पुण्य लाभते, असे प्रत्यक्ष श्रीस्वामीसुत महाराजांनी सांगितले आहे.
सौजन्य : Shree Swami Samarth Bhakt Parivar
Feb 7, 2018
श्री गजानन महाराज अष्टक (दासगणू महाराजकृत)
॥ ॐ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
गजानन महाराज प्रकट दिना निमित्त : पिता माता बंधु तुजविण असे कोण मजला । बहू मी अन्यायी परि सकळहि लाज तुजला ॥ न जाणे मी कांही जप तप पुजा साधन रिती । कृपादृष्टी पाहे शरण तुज आलो गणपती ॥ गजानना गुणागरा परम मंगला पावना । अशींच अवघे हरी, दुरीत तेवि दुर्वासना ॥ नसें त्रिभुवनामधे तुजविन आम्हां आसरा । करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ॥१॥ निरालसपणें नसे घडलि अल्प सेवा करी । तुझी पतितपावना भटकलो वृथा भूवरी ॥ विसंबत न गाय ती आपुलिया कधीं वांसरा । करी पदनातावरी बहु दया न रोषा धरा ॥२॥ आलास जगीं लावण्या परतुनी सु-वाटे जन । समर्थ गुरूराज ज्या भुषवि नाम नारायण ॥ म्हणून तुज प्रार्थना सतत जोडुनिया करा । करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ॥३॥ क्षणांत जल आणिले नसून थेंब त्या वापिला । क्षणांत गमनाप्रती करिसि इच्छिलेल्या स्थळा ॥ क्षणांत स्वरूपे किती विविध धरिसी धीवरा । करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ॥४॥ अगाध करणी तुझी गुरूवरा, न लोकां कळे। तुला त्यजुनी व्यर्थ ते आचरितात नाना खुळे ॥ कृपा उदक मागती त्यजुनी गौतमीच्या तिरा । करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ॥५॥ समर्थ स्वरूपप्रती धरून साच बाळापूरी । तुम्ही प्रगट जाहलां सुशिल बाळकृष्णा घरी ॥ हरिस्वरूप घेऊनि दिधली भेट भीमातिरा । करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ॥६॥ सछिद्र नौकेप्रती त्वदिय पाय हे लागतां । जलांत बुडतां तरी तिजसी नर्मदा दे हाता ॥ अशा तुजसि वाणण्या नच समर्थ माझी गिरा । करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ॥७॥ अतां न बहु बोलतां तव पदांबुजा वंदितो । पडो विसर ना कदा मदिय हेंचि मी मागतों ॥ तुम्ही वरद आपुला कर धरा गणूच्या शिरा । करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ॥८॥ ॥ श्री गजानन महाराज अष्टकं संपूर्णम ॥
॥ श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ ॥ श्री गुरुदेव दत्त ॥
तो अनाथनाथ दत्त, माहुरांत पाहिला
यामिनीस शोभवीत, चंद्र तों प्रजापती ।
दूर वास अवतार, तोचि श्रीउमापती ।
श्रीरमापतीच अत्रि, आश्रमांत राहिला ।
तो अनाथनाथ-दत्त, माहुरांत पाहिला ॥ १ ॥
जो अखंड चंद्र श्रीमृगेंद्र नाम शिखरीं ।
जो पहावयासि होति, वासना मसी खरी ।
म्यां वियोग-ताप त्या, चकोरतुल्य साहिला ।
तो अनाथनाथ-दत्त, माहुरांत पाहिला ॥ २ ॥
मायही यदा कदा, पिता कुमार भारवी ।
सद्गुरुस हांसतील, कीं उमा रमा रवी ।
जो कुठेंचि नीगमास, दिसला न गाइला ।
तो अनाथनाथ-दत्त, माहुरांत पाहिला ॥ ३ ॥
अर्जुना अधीक आपल्याहिहून बाहु दे ।
याचका उचीत दान हे बहुत बाहुदे ।
जो सुरासुरें धराधरें नरेंही गाइला ।
तो अनाथनाथ-दत्त, माहुरांत पाहिला ॥ ४ ॥
धर्म अर्थ काम मोक्ष, ग्राम गाणगापुर ।
श्रीगुरुचरित्रनाम, हेंचि गाणं गा पुरं ।
नारसिंह श्रीसरस्वती स्वरुप जाहला ।
तो अनाथनाथ-दत्त, माहुरांत पाहिला ॥ ५ ॥
ज्या कधीहि कष्टती न पातकांसि तासिता ।
वांच्छिती सदैव पाद, मृत्तिका सिताऽसिता ।
जो समस्त योगज्ञानि सन्मुनीनि ध्याइला ।
तो अनाथनाथ-दत्त, माहुरांत पाहिला ॥ ६ ॥
जो रविशशीस स्वप्रकाश रंग वर्णवी ।
जो प्रबोध-ज्ञान-सिंधूचे-तरंग वर्णवी ।
जो घटांत ही मठांत, भूपटांत लीहिला ।
तो अनाथनाथ-दत्त, माहुरांत पाहिला ॥ ७ ॥
जों न लोटिताहि जाय, भक्त लालसे दुर ।
जेंवि कां पटासि स्नेह, सक्त लाल सेंदूर ।
कीं रुपज्ञ मानिताति आम्रवृक्ष कोकिला ।
तो अनाथनाथ-दत्त, माहुरांत पाहिला ॥ ८ ॥
जो सुगंधगंध मंद, हास्य मुख साजरा ।
पंकजा सतीगमेचि, नीलपंखसा जरा ।
जो सुगंधगंध देत, पाच जाइ जुईला ।
तो अनाथनाथ-दत्त, माहुरांत पाहिला ॥ ९ ॥
जो त्रिगुणरूप पूर्ण, ब्रह्म आजरामर ।
ज्यासि सामरादि लोक, वारिताति चामर ।
जो अनसुयेचिया निजूनि पायी नाहिला ।
तो अनाथनाथ-दत्त, माहुरांत पाहिला ॥ १० ॥
हे सुधाकरासी देति, पुष्टी श्लोक आकरा ।
कोण या नको म्हणेल, पुण्यश्लोक 'आ' करा ।
विष्णुदास या कथामृतासि पिउनि धायिला ।
तो अनाथनाथ-दत्त, माहुरांत पाहिला ॥ ११ ॥
Feb 5, 2018
श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत सार
भगवान दत्तात्रेय जगदोद्धारासाठी इ. स. १३२०मध्ये आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात पिठापूर क्षेत्री अप्पल राजु आणि सुमती या पुण्यदांपत्याच्या पोटी श्रीपाद श्रीवल्लभ नावाने प्रकट झाले. दत्तात्रेयांचा हा आद्य अवतार होय. श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्राची रचना शंकर भट्ट यांनी केली.
श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत सार इथे वाचू शकता.
Source : http://www.dattamaharaj.com/
Feb 3, 2018
श्री नृसिंहवाडी दर्शन
Published by : Vasudev Shashwat Abhiyan
(https://www.facebook.com/VasudevShashwatAbhiyan/)