Oct 21, 2016

॥ श्री दत्त स्तुती ॥


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥


श्रीदत्तराया गिरनार वासी । अस्तित्व आहे गाणगापुरासी । औदुंबरीही तुझी नित्य फेरी । तुजविण दत्ता मज कोण तारी ॥ १ ॥ कषाय वस्त्रे जटाभार झोळी । पायी खडावा शुभ्र भस्म भाळी । शिरें तीन सहा हस्त शस्त्रधारी । तुजविण दत्ता मज कोण तारी ॥ २ ॥ गोरूप भूमाय श्वानरुप वेद । दुर्लक्षी माझे सहस्त्र प्रमाद । शास्त्रे पुराणे तुझे भाट सारी । तुजविण दत्ता मज कोण तारी ॥ ३ ॥ ह्रदयी असावी तुझी मूर्ती देवा । मनी हिच इच्छा घडो तुझी सेवा । विरक्ती असावी असोनी संसारी । तुजविण दत्ता मज कोण तारी ॥ ४ ॥ भवदु:ख आता क्षणी दूर व्हावे । आयुष्य आरोग्य सकळांसी द्यावे । तव दर्शनाची मला आस भारी । तुजविण दत्ता मज कोण तारी ॥ ५ ॥ कृपा दृष्टी होता जळे पापराशी । सदा सर्वदा सर्वही सौख्य देसी । परब्रह्मरूपी गुरू मोक्षकारी । तुजविण दत्ता मज कोण तारी ॥ ६ ॥ दत्तगुरू जय दत्तगुरू हा । महामंंत्र हृदयी सुरू असे पहा । कैवारी माझा तू दंडधारी । तुजविण दत्ता मज कोण तारी ॥ ७ ॥ तुझा दास मी दीन दत्ता दयाळा । मन:शांती लाभो मज विश्वपाळा । धावून ये रे हो देहधारी । तुजविण दत्ता मज कोण तारी ॥ ८ ॥ एकांती ये रे गुरूदत्तराया । इच्छित माझे वरदान द्याया । विनंती पदी सर्व चिंता निवारी । तुजविण दत्ता मज कोण तारी ॥ ९ ॥ ॥ अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥   

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 


Oct 20, 2016

॥ श्रीदत्तात्रेयस्तोत्रम् ( नारदपुराण ) ॥


॥ श्री गणेशाय नमः ॥ श्री गुरवे नमः ॥


जटाधरं पांडुरंगं शूलहस्तं कृपानिधिम् । सर्वरोगहरं देवं दत्तात्रेयमहं भजे ॥ १॥

अस्य श्रीदत्तात्रेयस्तोत्रमंत्रस्य भगवान् नारदऋषिः । अनुष्टुप् छन्दः । 

श्रीदत्त: परमात्मा देवता । श्रीदत्तप्रीत्यर्थे जपे विनियोगः ॥

जगदुत्पत्तिकर्त्रे च स्थितिसंहार हेतवे । भवपाशविमुक्ताय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ १॥

जराजन्मविनाशाय देहशुद्धिकराय च । दिगंबर दयामूर्ते दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ २॥

कर्पूरकांतिदेहाय ब्रह्ममूर्तिधराय च । वेदशास्त्रपरिज्ञाय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ ३॥

ऱ्हस्वदीर्घकृशस्थूल-नामगोत्र -विवर्जित । पंचभूतैकदीप्ताय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ ४॥

यज्ञभोक्त्रे च यज्ञाय यज्ञरूपधराय च । यज्ञप्रियाय सिद्धाय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ ५॥

आदौ ब्रह्मा मध्ये विष्णुरंते देवः सदाशिवः । मूर्तित्रयस्वरूपाय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ ६॥

भोगालयाय भोगाय योगयोग्याय धारिणे । जितेंद्रिय जितज्ञाय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ ७॥

दिगंबराय दिव्याय दिव्यरूपधराय च । सदोदित परब्रह्म दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ ८॥

जंबुद्वीपे महाक्षेत्रे मातापुरनिवासिने । जयमान, सतां देव, दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ ९॥

भिक्षाटनं गृहे ग्रामे पात्रं हेममयं करे । नानास्वादमयी भिक्षा दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ १०॥

ब्रह्मज्ञानमयी मुद्रा वस्रमाकाशभूतले । प्रज्ञानघनबोधाय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ ११॥

अवधूत सदानंद परब्रह्मस्वरूपिणे । विदेहदेहरूपाय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ १२॥

सत्यरूप सदाचार सत्यधर्मपरायण । सत्याश्रय परोक्षाय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ १३॥

शूलहस्त गदापाणे वनमालासुकंधर । यज्ञसूत्रधर ब्रह्मन् दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ १४॥

क्षराक्षरस्वरूपाय परात्परतराय च । दत्तमुक्तिपरस्तोत्र दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ १५॥

दत्तविद्याढ्य लक्ष्मीश दत्त स्वात्मस्वरूपिणे । गुणनिर्गुणरूपाय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ १६॥

शत्रुनाशकरं स्तोत्रं ज्ञान-विज्ञानदायकम् । सर्वपापं शमं याति दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ १७॥

इदं स्तोत्रं महद्दिव्यं दत्तप्रत्यक्षकारकम् । दत्तात्रेयप्रसादाच्च नारदेन प्रकीर्तितम् ॥ १८॥


॥ इति श्रीनारदपुराणे नारदविरचितं दत्तात्रेयस्तोत्रं सुसंपूर्णम् ॥




Oct 15, 2016

॥ श्रीगुरू दत्तात्रेय प्रार्थना ॥ 


॥ श्रीगणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥


येई बा गुरुराया, मज घें पदरीं । लोटेना भवसिंधु, बळिया लहरी ।। येई बा गुरुराया

मायेचा पूर लोटे, मज वाहवितो । काळाचें भय वाटे, तुज आळवितो । 

युगसम बहु कष्टी बा, दिस घालवितों । तुजसाठीं ऊर दाटे , जीव कालवतों येई बा गुरुराया  


कोठें न गमे देवा, हरि काय करू । कोणातें दु:ख सांगू, गुरू कल्पतरू ।

आतां तुजविण दत्ता, किती धीर धरू । भेटायां गुरूराशी, तप कोण करू येई बा गुरुराया 


कोण दुजा प्रणिता बा, प्रतिपाळ करी । तुज विरहित मज नाहीं, गति बा दुसरी ।

बुडतों या भवडोही, करि कोण धरी । देवा बहु श्रम झालें, मम दु:ख हरी येई बा गुरुराया 


योगीजनमनरमणा, जननी जनिता । देवा बहु दिसं झालें, मज चाळवितां ।

कैसें मम दु:ख न ढळें , शिरी तू असतां । स्वामी तू गुरू माझा, भव उद्धरितां येई बा गुरुराया 


प्राण विसावा माझा, हरि तू अससी । सागर तू करुणेचा, मज कां छळिसी ।

सूरनरमुनि सकळांच्या, हृदयीं वससी। सेवक मी हरि तुझा, दूरि कां धरिशी येई बा गुरुराया 


तव विरहित मम नयनीं, जळ पाझरतें । लव पळ आयुष्य हे माझें, हरि हें सरतें ।  

साधन काय करू मी, मनना परतें । जिवलग तू कधिं येशी, मन घाबरतें येई बा गुरुराया 


यत्नांची हद्द झालीं, मति हें भ्रमली । नाहीं धीर दयाळा, वृत्ति डळमळली । 

तव पद सेवा कांही, मज ना घडली । निरपेक्षा हरि माझी, भूलि कां पडली येई बा गुरुराया 


कैसा तरी गुरुवर्या, तव दास असें । सम्यक सगुण रूप तुझें, नयनीं विलसे ।

नारायण तुज विनवी, पथ पाहतसें । स्वामीं निरंजन दत्ता, पदी लागतसें येई बा गुरुराया   


॥ श्रीगुरुदेव दत्त