श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी दीपावली दिनी भक्तासाठी आठरूपे धारण केली.
॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥
॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥
श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी दीपावली दिनी भक्तासाठी आठरूपे धारण केली.
॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥
॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥
।। श्री गणेशाय नमः ।।
।। श्री दत्तात्रेयाय नमः ।।
।। श्री स्वामीं समर्थाय नमः ।।
विश्वमाया तू मम अंबिके ll निजभक्त हो जाण पाळके ll
निर्गुणे तुला कैसे आठवू ll निज हृदयी कोठे साठवू ll१ll
काय ते मुनी कष्टती सदा ll तुजविणे नसे जाण फायदा ll
धीपुरी खरा वास करुनी ll रूप दाविले पाप मर्दनी ll२ll
भक्त हे तुझे तूच रक्षिसी ll प्रेम देवोनी नित्य पोषिसी ll
काय मी वंदू शेष शीणला ll कैसे बोलवू सांग त्या मुला ll३ll
चारी वेद ते नेति म्हणती ll तेथे हो खरी अल्पही मती ll
तूच बोलसी जग कारणा ll देऊनी तरी नाम तारणा ll४ll
म्हणुनी स्तविता तुज माय हो ll दावि दावि तू आजि पाय हो ll
रूप ते जसे गुण हा तसे ll योगी ध्यान ते नित्य पाहतसे ll५ll
आकृती कशी निर्गुण तरी ll मूर्ति ही तुझी जाण साजिरी ll
स्वामी माय तू सत्य लेकरा ll रक्षिसी खरे करूनि आसरा ll६ll
बहुत तारिले भक्त या जनी ll धरुनी रूप ते सगुण कारणी ll
दुरित जाळुनि भव तारिले ll नामी भक्त ते जाण हो भले ll७ll
म्हणूनिया तुला देव नमिती ll पाय वंदुनी सौख्य पावती ll
तीच तू खरी धीपुरी बरी ll पाय लाउनी जग उद्धरी ll८ll
कितीक तारिले जड ते बहु ll पाप जाळुनी दिधले नऊ ll
ऐसे गे तुला कैसे आठवू ll शेषपुष्ठिसी ठाव हा मऊ ll९ll
बाळ हा तुझा तुज आठवी ll विश्वजननी हृदयी साठवी ll
पावतो जना भक्ती करीता ll कलियुगी हो पायी सरिता ll१०ll
भक्ती करीता मुक्ती ही खरी ll स्वामीद्वारीची जाण पायरी ll
नवनिधी हे हात जोडिती ll द्वारी ते उभे नित्य कष्टती ll११ll
काय हो उणे तुझिया घरा ll पाव पाव तू आजि लेकरा ll
धरिले बाळ पाय अंतरी ll वचन देऊनी बोलली खरी ll१२ll
सत्य ते करी आजि तत्वता ll माझे देऊनी मज रक्षिता ll
बद्री ते खरी नाम पावली ll बोरी म्हणती जन हो भली ll१३ll
पावन जनी स्नान करिता ll पळून जाय ते दुरित तत्वता ll
स्वामी पायी ती वास पावली ll तारण्या जना कलियुगी भली ll१४ll
म्हणुनिया जनी जावे तत्वता ll वेळ हा असा जाईल हाता ll
चुकल्या तरी वेळ ही बरी ll करिल बा पुढे जाण घाबरी ll१५ll
काळ दंड तो चुकणे तरी ll स्वामीद्वारीची नमी पायरी ll
सावध तुला करितो मुला ll घेई घेई रे घेई दाखला ll१६ll
आपण तरुनी कूळ तारिसी ll प्रेमभावे हे स्तोत्र वाचिसी ll
दुःख ते तुझे वाचिता बरे ll जाईल खरे प्रेम पाझरे ll१७ll
कामना मनी धरुनी जरी ll वाचिती तया पावे लवकरी ll
एक शत ते आठ हो बरे ll पाठ करीता दुःख ते सरे ll१८ll
जन तरती घेतल्या करी ll भवनौका हो नाम लौकरी ll
म्हणूनिया तुम्हा सांगतो सुखे ll भक्ती ती करा स्वामींची सुखे ll१९ll
स्तोत्र वाचिता पावे लौकरी ll तीन काळ ते साधी लौकरी ll
तीन मंडळे दुःख ते हरे ll नित्य वाचिता भव हा तरे ll२०ll
पुत्र संतती सौख्य पावती ll स्वामी भक्ती हो केलिया प्रिती ll
धनधान्य ते गृही साठवे ll द्वारी झुलती गाईचे थवे ll२१ll
अश्वकुंजरी वन दाटले ll मुक्ती ठाव हा पायी की झुले ll
चुकती जरी जन फासती ll येईल पुढे काय वेळ ती ll२२ll
म्हणुनि सांगतो तुमच्या हिता ll ठेवा भाव हो पायी तत्वता ll
तारण्या तुम्हा साधन बरे ll कलियुगी हा स्वामी अवतरे ll२३ll
आनंदनाथ तो भक्ती करिता ll सांगतो खरे तुमच्या हिता ll
घेतल्या जरी सौख्य पावती ll स्तोत्र वाचिता साधिती गती ll२४ll
ll अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त ।। श्रीस्वामी समर्थ महाराज की जय ll
ll श्रीगुरुस्वामीसमर्थापर्णमस्तु ll
साभार : श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट , शिर्डी
http://www.saibabashirdi.co/
॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥ जगदंबिका म्हणे । मालामंत्र नारायणे । कथिला जो जगत्कारणे । तो हा सर्वोत्तम असे ॥ ॐ नमो नमो भगवंता । नमोजी श्री स्वामीसमर्था । स्मरणगामी दत्तनाथा । योगीमुनिजन वंदिता ॥ चिदानंदात्मका त्र्यंबका । विश्वेश्वरा विश्वधारका । बालोन्मत्त पिशाच्चवेषा । महायोगीश्वरा परमहंसा ॥ चित्-चैतन्या चिरंतना । अवधूता निरंजना । जगदाधारा सुदर्शना । सुखधामा सनातना ॥ सकलकामप्रदायका । सकलदुरितदाहका । सकल संचित-कर्महरा । सकल संकष्ट-विदारा ॥ ॐ भवबंधमोचना । ॐ श्रीं परम ऐश्वर्यघना । ॐ स्वां स्वहितधर्मचालका । ॐ मीं नित्य यशदायका ॥ ॐ सं संसारचक्रछेदका । ॐ मं महाज्ञानप्रदायका । ओमर्था महावैराग्यसाधका । ॐ नं नरजन्मसार्थका ॥ ॐ मों महाभयनिवारका । ॐ भक्तजनहृदयनिवासा । परकृत्या थोपव थोपव । परमंत्रा शांतव शांतव ॥ परयंत्रा विखर विखर । ग्रहभूतादि पिशाच्चपीडा हर हर । दारिद्र्यदु:खा घालव घालव । सुखशांती फुलव फुलव ॥ आपदा विपदा मालव मालव । गृहदोष वास्तुदोष पितृदोष सर्पदोषादि सकल दोषा विरव विरव । अहंकारा नासव नासव । मनचित्तबुद्धी स्थिरव स्थिरव ॥ नमोजी नमो देव महादेव । देवाधिदेव श्री अक्कलकोट । स्वामी समर्थ श्रीगुरुदेव । नमो नमो नमो नमः ॥ ( सप्तशते सिद्धि: ) ॥
रचनाकार - श्रीयुत् नागेश करंबेळकर
आवडे स्वामीभक्तांसी ...
*** श्री स्वामी समर्थ मालामंत्र - भावार्थ ***
*** भावार्थ श्रीगुरुलीलामृत ***
ओळख तो आवाज, ओळख ती खूण ।
आपल्या भक्तासाठी तो, फिरतो आहे अजून ॥
त्याला उगम नव्हता, त्याला अंत नाही ।
त्रैलोक्याचा स्वामी तो, नुसताच संत नाही ॥
त्याचे स्मरण कर देहभान विसरून ।
तो हळूवार येईल, अन् कानात जाईल सांगून -
" भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. "
श्री अक्कलकोट महाराजांचे स्तोत्रं
सौजन्य : https://sanskritdocuments.org/