॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा l
कृष्णेच्या हो तीरा, उभा मंदिरा, शंख-चक्र-गदाधरा ॥ श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा l दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥धृ.॥
हाच त्रिभुवना पालनहारा, मूर्त ब्रह्मा-विष्णु-महेश्वरा l वसतो औदुंबरा, गाणगापुरा, शंख-चक्र-गदाधरा ॥ श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा l दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥१॥ भक्तांची विघ्नें हरणारा, त्रिविधताप दुरी करणारा l
अखंड करी संचारा, दत्त हा खरा, शंख-चक्र-गदाधरा ॥ श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा l दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥२॥ भक्तांसाठी कल्पतरू हा, नसे समाप्ती या अवतारा l अविनाशी हो खरा, तू निरंतरा, शंख-चक्र-गदाधरा ॥
श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा l दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥३॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥
No comments:
Post a Comment