Mar 3, 2018
संपूर्ण श्री स्वामी समर्थ सप्तशती
नृसिंह सरस्वती चरित्र- कृपामूर्ती श्रीनृसिंहसरस्वती
श्रीपाद श्रीवल्लभ हा श्रीदत्तप्रभूंचा दुसरा अवतार. ‘कलौ श्रीपाद श्रीवल्लभ:’ अशी या अवताराची ख्याती आहे. श्रीनृसिंह सरस्वती हे श्रीदत्तप्रभूंचे तिसरे आणि श्रीपाद श्रीवल्लभांचे उत्तरावतार आहेत. तेच पुढे श्री अक्कलकोट स्वामी समर्थ म्हणून प्रसिद्धी पावले.
श्रीनृसिंह सरस्वती दत्तोपासनेचे संजीवक होते. तेराव्या शतकाच्या अखेरीस दत्तोपासनेच्या पुराणप्रवाहात संजीवन ओतण्याचे कार्य श्रीनृसिंह सरस्वतींनी केले. समग्र महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात ते दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरले. श्री नृसिंह सरस्वतीचा अवतार काल शके १३०० ते १३८० (इ.स. १३७८ ते १४५८) असा आहे. श्रीगुरुचरित्र हा अपूर्व ग्रंथ दत्तसंप्रदायाचा वेदतुल्य, प्राणप्रिय ग्रंथ आहे. प्रापंचिकांचा आणि पारमार्थिकांचा तो मनोकामना पूर्ण करणारा चिंतामणीच आहे. या वेदतुल्य गुरुचरित्राचे चरित्रनायक आहेत. श्री नृसिंह सरस्वती. श्री गुरूचरित्रात अध्याय ११ ते ५१ या अध्यायात त्यांचे समग्र लीलाचरित्र आलेले आहे. श्री नृसिंह सरस्वती संन्यासधर्माचे सर्वोत्तम आदर्श होते.
तू भक्तजना कामधेनु । मनुष्यदेही अवतरोनु । तुझा पार न जाणे कवणू । त्रैमूर्ती तूच होसी ।।
श्री गुरूंच्या लीलाकथा श्रीगुरूचरित्रात आलेल्या आहेत. आजही श्री गुरु गाणगापुरातच आहेत. भक्तांना ते दर्शन देतात.
श्री नृसिंह सरस्वती चरित्र - कृपामूर्ती श्रीनृसिंहसरस्वती
सौजन्य : http://www.dattamaharaj.com/
Feb 27, 2018
Feb 21, 2018
श्री स्वामी समर्थ महापर्वणी उत्सव सोहळा
|| श्री गणेशाय नमः || श्री दत्त समर्थ ||
या सोहळ्याच्या वेळी पालखी व श्रींची आरती यांचा फेसबुक लाईव्ह व्हिडियो व सोबत या उत्सव समितीचे अध्यक्ष श्री. स्वामीभक्त श्री मिलिंद पिळगांवकर यांनी स्वामीभक्तांना सांगितलेली या महापर्वणी उत्सवासंबंधी थोडक्यात माहिती !
श्रीस्वामी समर्थ महापर्वणी हा उत्सव प्रत्यक्ष श्रीस्वामीसुत महाराज यांनी इ.स. १८७० साली सुरू केला होता. मागील १५ वर्षांपासून गिरगांव येथे होणाऱ्या या उत्सवा मध्ये आजही श्रीस्वामीसुत महाराजांना अभिप्रेत असलेल्या थाटामाटात पालखीमधून श्री स्वामींच्या पादुका, मूर्ती आणि सोबत भगवे निशाण (भगवा ध्वज), गुढी घेऊन नामस्मरण करत करत तमाम स्वामीभक्त गिरगाव समुद्रकिनाऱ्यावर येतात व सगळे मिळून स्वामींच्या पादुकांना समुद्रस्नान घालतात. श्रीस्वामी समर्थ महापर्वणी उत्सवाने ११ कपिलाकष्टी केल्याचे बळ लाभते, पुण्य लाभते, असे प्रत्यक्ष श्रीस्वामीसुत महाराजांनी सांगितले आहे.
सौजन्य : Shree Swami Samarth Bhakt Parivar
Feb 7, 2018
श्री गजानन महाराज अष्टक (दासगणू महाराजकृत)
॥ ॐ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
गजानन महाराज प्रकट दिना निमित्त : पिता माता बंधु तुजविण असे कोण मजला । बहू मी अन्यायी परि सकळहि लाज तुजला ॥ न जाणे मी कांही जप तप पुजा साधन रिती । कृपादृष्टी पाहे शरण तुज आलो गणपती ॥ गजानना गुणागरा परम मंगला पावना । अशींच अवघे हरी, दुरीत तेवि दुर्वासना ॥ नसें त्रिभुवनामधे तुजविन आम्हां आसरा । करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ॥१॥ निरालसपणें नसे घडलि अल्प सेवा करी । तुझी पतितपावना भटकलो वृथा भूवरी ॥ विसंबत न गाय ती आपुलिया कधीं वांसरा । करी पदनातावरी बहु दया न रोषा धरा ॥२॥ आलास जगीं लावण्या परतुनी सु-वाटे जन । समर्थ गुरूराज ज्या भुषवि नाम नारायण ॥ म्हणून तुज प्रार्थना सतत जोडुनिया करा । करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ॥३॥ क्षणांत जल आणिले नसून थेंब त्या वापिला । क्षणांत गमनाप्रती करिसि इच्छिलेल्या स्थळा ॥ क्षणांत स्वरूपे किती विविध धरिसी धीवरा । करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ॥४॥ अगाध करणी तुझी गुरूवरा, न लोकां कळे। तुला त्यजुनी व्यर्थ ते आचरितात नाना खुळे ॥ कृपा उदक मागती त्यजुनी गौतमीच्या तिरा । करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ॥५॥ समर्थ स्वरूपप्रती धरून साच बाळापूरी । तुम्ही प्रगट जाहलां सुशिल बाळकृष्णा घरी ॥ हरिस्वरूप घेऊनि दिधली भेट भीमातिरा । करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ॥६॥ सछिद्र नौकेप्रती त्वदिय पाय हे लागतां । जलांत बुडतां तरी तिजसी नर्मदा दे हाता ॥ अशा तुजसि वाणण्या नच समर्थ माझी गिरा । करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ॥७॥ अतां न बहु बोलतां तव पदांबुजा वंदितो । पडो विसर ना कदा मदिय हेंचि मी मागतों ॥ तुम्ही वरद आपुला कर धरा गणूच्या शिरा । करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ॥८॥ ॥ श्री गजानन महाराज अष्टकं संपूर्णम ॥
॥ श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ ॥ श्री गुरुदेव दत्त ॥