Apr 25, 2017

श्री स्वामी समर्थ मालामंत्र


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥  ॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥ जगदंबिका म्हणे । मालामंत्र नारायणे । कथिला जो जगत्कारणे । तो हा सर्वोत्तम असे ॥ ॐ नमो नमो भगवंता । नमोजी श्री स्वामीसमर्था । स्मरणगामी दत्तनाथा । योगीमुनिजन वंदिता ॥ चिदानंदात्मका त्र्यंबका । विश्वेश्वरा विश्वधारका । बालोन्मत्त पिशाच्चवेषा । महायोगीश्वरा परमहंसा ॥ चित्-चैतन्या चिरंतना । अवधूता निरंजना । जगदाधारा सुदर्शना । सुखधामा सनातना ॥ सकलकामप्रदायका । सकलदुरितदाहका । सकल संचित-कर्महरा । सकल संकष्ट-विदारा ॥ ॐ भवबंधमोचना । ॐ श्रीं परम ऐश्वर्यघना । ॐ स्वां स्वहितधर्मचालका । ॐ मीं नित्य यशदायका ॥ ॐ सं संसारचक्रछेदका । ॐ मं महाज्ञानप्रदायका । ओमर्था महावैराग्यसाधका । ॐ नं नरजन्मसार्थका ॥ ॐ मों महाभयनिवारका । ॐ भक्तजनहृदयनिवासा । परकृत्या थोपव थोपव । परमंत्रा शांतव शांतव ॥ परयंत्रा विखर विखर । ग्रहभूतादि पिशाच्चपीडा हर हर । दारिद्र्यदु:खा घालव घालव । सुखशांती फुलव फुलव ॥ आपदा विपदा मालव मालव । गृहदोष वास्तुदोष पितृदोष  सर्पदोषादि सकल दोषा विरव विरव । अहंकारा नासव नासव । मनचित्तबुद्धी स्थिरव स्थिरव ॥ नमोजी नमो देव महादेव । देवाधिदेव श्री अक्कलकोट । स्वामी समर्थ श्रीगुरुदेव । नमो नमो नमो नमः ॥ ( सप्तशते सिद्धि: ) ॥


॥ श्रीस्वामीसमर्थार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥  

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

रचनाकार - श्रीयुत् नागेश करंबेळकर


आवडे स्वामीभक्तांसी ...

*** श्री स्वामी समर्थ मालामंत्र - भावार्थ ***

*** भावार्थ श्रीगुरुलीलामृत ***




Apr 24, 2017

॥ श्री अक्कलकोट स्वामीं महाराज स्तोत्र ॥


ओळख तो आवाज, ओळख ती खूण ।

आपल्या भक्तासाठी तो, फिरतो आहे अजून ॥


त्याला उगम नव्हता, त्याला अंत नाही ।

त्रैलोक्याचा स्वामी तो, नुसताच संत नाही ॥


त्याचे स्मरण कर देहभान विसरून ।

तो हळूवार येईल, अन् कानात जाईल सांगून -


" भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. "


श्री अक्कलकोट महाराजांचे स्तोत्रं 


सौजन्य : https://sanskritdocuments.org/ 


Mar 30, 2017

श्री स्वामीं समर्थ आरती - दादर मठ


॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
 श्री स्वामीं समर्थ जय जय स्वामीं समर्थ


धन्य तारक प्रदक्षिणा या श्रीगुरुरायाची, माझ्या स्वामीरायाची 

स्वामी आवड झाली, भक्तजनांला भव उतरायाची || धृ || 

प्रदक्षिणा करितां दुरित भार हा जाई 

स्वामी एक एक पाऊली कोटी तीर्थे आंघोळी || १ ||

कोटीकोटी अश्वमेध एक पाऊली 

स्वामिनाम मुखी गाता गाता पुण्याची भोई || २ ||

कोटी कन्यादान शतकोटी या कपिला 

स्वामी मेरुतुल्य कांचन देतां भार नसे पाऊला || ३ ||

दगड पाषाण तरुवर तरती जाणा ज्या नामे 

स्वामी पदोपदी हे पुण्यची भारी तुटती भवभ्रमे || ४ ||

भूत पिशाच्च समंध जाती प्रदक्षिणा केल्या 

स्वामी बहात्तर रोग कर जोडीती तीर्थे सेवील्या || ५ ||

देवादिक हे कर जोडीती जाणा तद्भक्ता 

स्वामी प्रदक्षिणा ही करितां भावे नाही कधी चिंता || ६ ||

पूर्वज तरती नाती जाती होती सुखरूप 

स्वामि नाम प्रदक्षिणे कार्य साधे नको जपतप || ७ ||

म्हणुनी जना हे सांगतसे मी निज सुख जाणा 

स्वामी आनंदनाथ हा करुणा वचने बोधितसे मना || ८ ||


।।  श्री स्वामीं समर्थ जय जय स्वामीं समर्थ ।।

॥ श्री स्वामीं समर्थ प्रार्थना ॥


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥


गुलाब पुष्पासम गौर कांती आजानुबाहु अशी दिव्य मुर्ति ॥
कृपापूर्ण ती नेत्रदीप्ती सतेज । नसे मानवी देह हा स्वामीराज ॥१॥ प्रत्यक्ष नृसिंह सरस्वतींचे । जे रूप श्रीपाद श्री वल्लभाचे ॥ अवधूत मूर्ती अवतार झाला । नमो सदगुरू दत्त स्वामी पदाला ॥२॥ जयाच्या पुढें काळ ही नम्र आहे । अशा स्वामीच्या मी पदी बाळ आहे ॥ समर्था तुझें पोर ना दीन व्हावे । चरणी तुझ्या ते सदा लीन व्हावे ॥३॥ अनन्य भावे घडे स्वामी भक्ती । करिती तयां संतही साह्य प्रीती ॥ ग्रहांची नसे त्या प्रतिकुल भीती । कुलदेवता ही अनुकुल होती ॥४॥ पदी भक्त आले कृपा पात्र झाले । बहु सिद्ध केले किती उद्धरीले ॥ असामान्य तुमची असें किर्तीगाथा । म्हणोनीच हा ठेविला पायी माथा ॥५॥ नसे पात्र स्वामी मी तुमच्या कृपेसी । नको सोडू माते तरी या मुलासी ॥ मला संपदाही तुझे पाय दोन्ही । तुझ्याविण माझे जगी नाही कोणी ॥६॥ फळाली कृपा संत देवादिकांची । मिळाली मला जोड स्वामी पदांची ॥ हृदयी ठेव जीवा धरी घट्ट पाय । तया सारखी न करी कोणी माया ॥७॥ मातेची माया पित्याचीच छाया । दया मूर्तिच्या या नको सोडू पाया ॥ मना भार ठेवी अरे याच ठाया । मिळेना कुठे ही अशी स्वामी माया ॥८॥ सदा स्वामी सन्नीध ऐसे करावे । तुम्ही साह्यकारी मनीं हे ठसावे ॥ जाज्वल्य तुमचा अभिमान राहो । भयाचा मला लेश ना स्पर्श होवो ॥९॥ समर्थ जाणोनी आलो मी पाया । तुम्हीच माझे सर्वस्व व्हाया ॥ कृपेचे जरी अल्प देशी निधान । जीवा सारीखे मी तयासी जपेन ॥१०॥ पदी हट्ट ऐसा धरीला असें मी ॥ ध्यानी दिसावे मला याच जन्मी ॥ मी स्वामीचा,स्वामी सर्वस्व माझे । असें प्रेम वाढो गुरूमाय तुझे ॥११॥ मला स्वामीराया तुमचीच छाया । तुम्हाविण देवा करी कोण माया ॥ स्वामी समर्थ गर्जूनी गावे । या जीवनाचा महायज्ञ होवो ॥१२॥ आधार नाही तुम्हांविण कोणी । नसे आश्रयदाता तुम्हाविण कोणी ॥ माता पिता सदगुरू एक स्वामी । जवळी मला घ्या करी प्रार्थना मी ॥१३॥ स्वामी करावे इतुके करावे । हाती धरावे मला ना त्यजावे ॥ होईन मीं पात्र तुमच्या कृपेने । अशा तळमळीवीण मी कांहीं नेणे ॥१४॥ प्रभो मी न माझा तुमचाची होवो । त्वदिच्छेप्रमाणे ही वृत्ती राहो ॥
असे हो कृपाळा तुम्हां वाहिलो मी चरणारविंदार्पणमस्तु स्वामी ॥१५॥

॥ श्री स्वामी समर्थार्पणमस्तु ॥