॥ ॐ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
जय देव जय देव जयगुरू माणिका । सद्गुरु माणिका । तव पद मोक्ष आम्हां न स्मरू आणिका ॥धृ.॥ काया वाचा मनें शुद्ध मी शरण तुसी । ठेवुनी मस्तकि हस्तक ज्योती मिळविसी । मुमुक्षूला मोक्ष क्षणार्धे तूं देशी । दाउनि चारि देह ब्रह्मा म्हणवीसी ॥१॥ देहातीत विदेही योगी मुगुटमणी । कर्म शुभाशुभ करिसी हेतू नाही मनीं । राजा अथवा रंक पाहसी सम दोनी । तवसम साधू असती परि योगित्वासि उणी ॥२॥ परोपकारी अससी वर्णू काय किती । अकल्पिता तूं देसी करू मी काय स्तुती । वर्णाया गुरुमहिमा शेषा नाहि मती । जग ताराया आलासी अंशत्रयमूर्ती ॥३॥ सुरवर इच्छिति दर्शन घेऊं आम्हि त्यासी । देवादिकां अप्राप्त प्राप्त तू आम्हासी । पडता चरणीं मी मुक्त होईन म्हणे काशी । सुकृत बहु जन्मांचें नरसिंहापाशी ॥४॥
॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥
॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥
No comments:
Post a Comment