॥ ॐ श्रीगणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ नमः शिवाय ॥
सौराष्ट्रदेशे विशदेऽतिरम्ये ज्योतिर्मयं चन्द्रकलावतंसम ।
भक्तिप्रदानाय कृपावतीर्णं तं सोमनाथं शरणं प्रपद्ये ॥
॥ ॐ नमः शिवाय ॥
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ ॐ श्रीगणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ नमः शिवाय ॥
सौराष्ट्रदेशे विशदेऽतिरम्ये ज्योतिर्मयं चन्द्रकलावतंसम ।
भक्तिप्रदानाय कृपावतीर्णं तं सोमनाथं शरणं प्रपद्ये ॥
॥ ॐ नमः शिवाय ॥
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्री गणेशाय नमः ॥ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ नमः शिवाय ॥
बृहस्पतिरुवाच - नमो रुद्राय नीलाय भीमाय परमात्मने । कपर्दिने सुरेशाय व्योमकेशाय वै नमः ॥१॥ भावार्थ : देवगुरु बृहस्पति म्हणाले - रुद्र, नील, भीम आणि परमात्म्यास नमन असो. जटाधारी, देवांचेही देव तसेच आकाशरूपी केश धारण केलेले व्योमकेश यांना मी नमन करतो.
वृषभध्वजाय सोमाय सोमनाथाय शम्भवे । दिगम्बराय भर्गाय उमाकान्ताय वै नमः ॥२॥ भावार्थ : ज्यांच्या ध्वजावर वृषभाचे चिन्ह आहे असे वृषभध्वज, पार्वतीपती सोम, चंद्रदेवतेचे रक्षक सोमनाथ अशा शम्भू महादेवास नमस्कार असो. सर्व दिशा हेच ज्यांचे वस्त्र आहे असे दिगंबर, तेजस्वरूप भर्ग, तसेच उमापतीस मी नमन करतो.
तपोमयाय भव्याय शिवश्रेष्ठाय विष्णवे । व्यालप्रियाय व्यालाय व्यालानां पतये नमः ॥३॥ भावार्थ : जो सर्वदा तपमग्न असतो, ज्याचे रूप कल्याणकारी आहे, तो शिवश्रेष्ठ, विष्णुस्वरूप, सर्पांचे आश्रयस्थान, सर्पस्वरूप, तसेच सर्पांचा स्वामी आहे अशा परमेश्वराला नमन असो.
महीधराय व्याघ्राय पशूनां पतये नमः । पुरान्तकाय सिंहाय शार्दूलाय मखाय च ॥४॥ भावार्थ : या धरेस (पृथ्वीस) धारण करणारा, व्याघ्ररूपी, पशुपती, त्रिपुरासुराचा विनाश करणारा, सिंहस्वरूप, शार्दूलरूपी आणि यज्ञस्वरूप महादेवास मी वंदन करतो.
मीनाय मीननाथाय सिद्धाय परमेष्ठिने । कामान्तकाय बुद्धाय बुद्धीनां पतये नमः ॥५॥ भावार्थ : जो मत्स्यरूप, मत्स्यनाथ, सिद्ध आणि परमश्रेष्ठ आहे, ज्याने कामदेवाचा नाश केला आहे, जो ज्ञानस्वरूप आहे अशा मेधापतीस नमन असो.
कपोताय विशिष्टाय शिष्टाय सकलात्मने । वेदाय वेदजीवाय वेदगुह्याय वै नमः ॥६॥ भावार्थ : जो कपोत (ब्रह्मदेव ज्यांचे पुत्र आहे), विशिष्ट (सर्वश्रेष्ठ), शिष्ट (साधुपुरुष) तथा सर्वात्मा आहे. जो वेदस्वरूप, वेदांना संजीवन देणारा तसेच वेदांतील गूढ तत्त्व जाणतो अशा ईश्वरास मी वंदन करतो.
दीर्घाय दीर्घरूपाय दीर्घार्थायाविनाशिने । नमो जगत्प्रतिष्ठाय व्योमरूपाय वै नमः ॥७॥ भावार्थ : जो दीर्घ, दीर्घरूप, दीर्घार्थस्वरूप तसेच अविनाशी आहे, जो या सकल चराचर जगताचा उत्पत्तीकर्ता आहे, तसेच सर्व चराचर व्यापून टाकणाऱ्या व्योमरूपी महादेवास नमन असो.
गजासुरमहाकालायान्धकासुरभेदिने । नीललोहितशुक्लाय चण्डमुण्डप्रियाय च ॥८॥ भावार्थ : गजासुराचा कर्दनकाळ असणाऱ्या, अंधकासुराचा विनाश करणाऱ्या आणि जो नील-लोहित-शुक्लस्वरूपी आहे तसेच चण्ड- मुण्ड नामक शिवगण ज्यास अतिप्रिय आहेत अशा श्रीशंकरांस नमन असो.
भक्तिप्रियाय देवाय ज्ञात्रे ज्ञानाव्ययाय च । महेशाय नमस्तुभ्यं महादेव हराय च ॥९॥ भावार्थ : ज्यास भक्तिभाव प्रिय आहे, जो महादेव आहे, जो ज्ञाता आणि ज्ञानही आहे, जो अव्यय (विकाररहित) आहे, जो महादेव आणि हर या नावांनी प्रसिद्ध आहे, अशा महेशास मी नमस्कार करतो.
त्रिनेत्राय त्रिवेदाय वेदाङ्गाय नमो नमः । अर्थाय चार्थरूपाय परमार्थाय वै नमः ॥१०॥ भावार्थ : ज्याला तीन नेत्र आहेत, तीन वेदस्वरूपी, आणि जो वेदांग (वेदांतील कठिण शब्दाचें अर्थ स्पष्ट करणारें शास्त्र) आहे अशा शिवरूपास नमन असो. जो अर्थ (धन), अर्थरूप (काम) तथा परमार्थ (मोक्षस्वरूप) आहे अशा परब्रह्मास मी प्रणिपात करतो.
विश्वभूपाय विश्वाय विश्वनाथाय वै नमः । शङ्कराय च कालाय कालावयवरूपिणे ॥११॥ भावार्थ : जो या अखिल विश्वाचा स्वामी अर्थात जगन्नियंता आहे, जो विश्वरूप आणि विश्वनाथ आहे. जो काळ आणि कालावयवरूप आहे अशा शंकरांस नमन असो.
अरूपाय विरूपाय सूक्ष्मसूक्ष्माय वै नमः । श्मशानवासिने भूयो नमस्ते कृत्तिवाससे ॥१२॥ भावार्थ : जो रूपरहित आहे, विरूप आहे तथा सूक्ष्माहूनही सूक्ष्म आहे. जो स्मशानभूमीत वास करतो आणि व्याघ्राम्बरधारी अशा महादेवास मी पुन्हा पुन्हा नमस्कार करतो.
शशाङ्कशेखरायेशायोग्रभूमिशयाय च । दुर्गाय दुर्गपाराय दुर्गावयवसाक्षिणे ॥१३॥ भावार्थ : जो ईश्वर असूनही भयंकर अशा स्थळीं शयन करतो, त्या भगवान चन्द्रशेखरास नमस्कार असो. जो अभक्तांना अतिशय दुर्गम आहे, ज्याचे स्वरूपज्ञान होणे अतिशय दुष्कर आहे, जो दुर्गम अवयवस्वरूप (दुर्गारूपी पार्वतीचा पती) आहे अशा गिरिजापतीस नमन असो.
लिङ्गरूपाय लिङ्गाय लिङ्गानां पतये नमः । नमः प्रलयरूपाय प्रणवार्थाय वै नमः ॥१४॥ भावार्थ : जो शिवलिंगरूप, अविकारी आणि आत्मज्ञानी आहे. त्या सदाशिवास नमन असो. महाप्रलयरूप रुद्रास नमन असो, आणि प्रणवाचे आदितत्त्व अर्थात परमात्मारूपी श्रीशंकरांस मी वंदन करतो.
नमो नमः कारणकारणाय मृत्युञजयायात्मभवस्वरूपिणे ।
श्रीत्र्यम्बकायासितकण्ठशर्व गौरीपते सकलमङ्गलहेतवे नमः ॥१५॥
भावार्थ : जो आदिस्वरूप आहे, जो मृत्युंजय तथा स्वयम्भूरूप आहे अशा परब्रह्मास नमस्कार असो. हे श्रीत्र्यम्बका, हे नीळकंठा, हे शर्वा, हे गौरीच्या स्वामी तू कल्याणकारी, मंगलमय आहेस. तुला नमन असो.
॥ इति गौरीपतिशतनामस्तोत्रं सम्पूर्णम् ॥
॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
कृपा असू दे या दासावर । सद्गुरु वासुदेवानंद ॥धृ.॥
तव नामाच्या जयघोषाने लाभे आत्मानंद । सद्गुरु वासुदेवानंद ॥
धन्य झाले श्री टेंब्ये कुल । माणगांव हे अति पुण्यस्थल ॥१॥
तिथे जन्मुनी पसरविलास तू । आपुला किर्ती सुगंध । सद्गुरु वासुदेवानंद ॥
मानवदेही जणु परमेश्वर । अवतरलासी या भूमीवर ॥२॥
भक्तांच्या हृदयात रुजविला । आत्मोन्नतीचा कंद । सद्गुरु वासुदेवानंद ॥
तुझे आचरण, दिव्य तपोबल । त्यागी जीवन, चरित्र उज्ज्वल ॥३॥
श्रवणीं पडता जग मायेचे । तुटोनी जाती बंध । सद्गुरु वासुदेवानंद ॥
साहित्याची करुनी सेवा । उद्धरण्यास्तव मानवजीवा ॥४॥
प्रदान केला, निज ग्रंथातुनी । आध्यात्मिक मकरंद । सद्गुरु वासुदेवानंद ॥
सुबोध त्यातील अमृतवचनें । जागृत करीती आत्मलोचनें ॥५॥
पढता पढता ज्ञानी बनले । कितीक तरी मतीमंद । सद्गुरु वासुदेवानंद ॥
गरुडेश्वरचा अगाध महिमा । मांगल्याची जिथे पौर्णिमा ॥६॥
तुझ्या दर्शने पावन होत । भाविक भक्तजनवृंद । सद्गुरु वासुदेवानंद ॥
नामस्मरणीं चित्त जडावे । जीवा-शिवाचे ऐक्य घडावे ॥७॥
सहज सुटावा संसारातील । आसक्तीचा छंद । सद्गुरु वासुदेवानंद ॥
मी अज्ञानी अनाथ म्हणूनी । हीच प्रार्थना करितो चरणीं ॥८॥
कृपा ओघ तव माझ्यावरचा । कधी न व्हावा बंद । सद्गुरु वासुदेवानंद ॥
॥ नमो गुरवे वासुदेवाय ॥
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥
॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ श्री सरस्वत्यै नमः ॥ ॐ श्री गुरूदेव दत्तात्रेयाय नमः ॥ हे अत्रिनंदना योगेश्वरा । अनसूया सतीच्या तपास प्रभुवरा । भुलोनी भुवनीं करूणासागरा । त्रयमूर्ति झालासी आनंदानें ॥१॥ ब्रह्मा-विष्णु-महेशमूर्ती । दत्ताची सगुण सत्कीर्ती । अकारणवत्सल या त्रिजगतीं । भक्तारक्षणा अवतरलेली ॥२॥ काळाप्रमाणे अंगीकारोनी । उचीत सर्वहिताय तें करोनी । कर्मभक्तींच्या संगमी दोन्ही । सरस्वती योगाची राखिली गुप्त ॥३॥ पूर्वी सहस्त्रार्जुनासी । उन्मक्तपणे दिधलें वरासी । राखाया प्रभो अपल्या शब्दासी । दंडिलें परशुधर होऊनियां ॥४॥ अवधुतमिषे आपण हिंडोनि । गुणांचे सार अवघ्यापासौनी । कैसे घ्यावें तें आचरोनी । दाविलें करितां चोविस गुरू ॥५॥ वेद धर्माची गहनगाथा । होऊन प्रत्यक्ष योग तत्वतां । साक्षात् तुम्ही श्रीगुरूदत्ता । वस्तुपाठ झाले जगासाठी ॥६॥ 'श्रीगुरूचरित्र' पुण्यपावन । तुमचेच नाथा कथा-जीवन । आजही त्रिजगीं संजीवन । देत आर्त जीवनासी ॥७॥ वेदाधारा भक्तरक्षका । औदुंबरींच्या दत्तनायका । लीलाविनोदें देहा अनेकां । तुम्हीच वत्सले स्वीकारले ॥८॥ करंजनगरीं, अक्कलकोटी । आळंदीसही देवा तुमची भेटी । गरूडेश्वरास नर्मदातटी । आनंदें रमला योगिराया ॥९॥ नारेश्वरीं, करविरपुरीं । हिमाद्रीच्या, गिरिगव्हरी । सह्याद्रिवासी पावन माहुरी । पवित्र निवासें त्रैलोक्य तुझ्या ॥१०॥ आज माऊले नाना रूपें । दिसती नेत्रांसी जगीं स्वरूपे । अनंत धरोनि नामे गौप्यें । क्रीडा नित्य चाले तुमची ॥११॥ देवाधिदेवा श्रीगुरूदत्ता । कैसें पूजन करू समर्था । हृदयीं दाटून आलें आता । अपार तुम्ही, निःशब्द मीही ॥१२॥ पाणावल्या लोचनांसी । अर्घ्यॆं वाहतो मी चरणांसी । लाजुनी वाणी मौनासी । लपते माझी अंर्तमुख ॥१३॥ मागें पुढें खालीं वरतीं । दयाळे तुझ्याच पाहतों मुर्ति । अससी तयांप्रती । अखंड माझे साष्टांग नमन ॥१४॥ घ्यावें अपराधी मी अनन्य । चरणी लेकरूं करूनी मान्य । दिनार्ताचे मंगल शरण्य । तुम्हीच त्रिवार वंदन प्रभो ॥१५॥ श्रोते गुरूमूर्ति नानांच्या । कथा पुण्य जीवनाच्या । निवेदिल्या मी तयांच्या । प्रेमळ आर्शिवचनें तुम्हा ॥१६॥ आचरले वेळोवेळी जाणा । सदभावे ध्यान पूजना । केल्या अनेक देवतांच्या आराधना । गुरुमूर्ति नानांनी ॥१७॥ पूर्वजीवनी श्रीगणेशा । आराधिलें यथासांग मंगलमूर्तीस । पाठ अखंड अथर्वशीर्ष । करोनी आणिलें ध्यान चित्तीं ॥१८॥ ॐ गं गणपतये नमः । या मंत्रास सतत नाना । जपोनी यथाशास्त्र दर्शना । प्राप्त करिती संकल्पिता ॥१९॥ त्रयोदशाक्षरी प्रभुरामाचा । अहर्निश एके काळीं साचा । जप-यज्ञ करोनि मनाचा । नाना उपासिती सीतापति ॥२०॥ उपासना होतां उत्कट । पाहती नाना रघुवीर निकट । तृप्तावूनी मग अम्बेसी नीट । आराधिती नानागुरू ॥२१॥ स्वप्नी जागृतीं अंबामूर्ति । दृष्टांत होतां पुढे वळती । वसुदेव-देवकी लाडक्याप्रति । निष्ठा मनीं धरोनियां ॥२२॥ तें सुगंधित अमर दर्शन । घडतां मानसीं संतोषून । अखंड नाना करिती ध्यान । श्री दत्तांचे मनोभावें ॥२३॥ 'दत्तप्रबोध', 'दत्तपुराण' । गुरूचरित्राचे अनिवार पठण । दत्तमाहात्म्यही आवडतें पूर्ण । आजही लाडके नानांचें तें ॥२४॥ श्रीदत्तांचे बीजमंत्र । दत्तसुतांची वाणी पवित्र । वाचिती ऐकती क्षणमात्र । नाना तल्लीन मनें अति ॥२५॥ श्रीगायत्रीचे पुरश्चरण । पितयापासोनी व्रताचरण । घेती नाना आपुलें जीवन । तप:शुद्ध करावयासी ॥२६॥ कित्येक वर्षापासूनि नक्त । भोजन एकदां घेती फक्त । देंतां प्रेमें कुणी भक्त । स्विकारिती फराळ रात्री ॥२७॥ मातापित्यांच्या वियोगावरी । न धरिती अंगरखा अंगावरी । शुभ्र उपरणे खांद्यावरी । पायींचे चढाव सोडिती तदा ॥२८॥ वीस वर्षापूर्वी नाना । नव्हतें जाणे कुठेही भोजना । स्वयंपाक सोंवळयांत जाणा । करिती त्रिकाल संध्यापूजा ॥२९॥ पहाटे तीनला उठोनियां । स्नानपूजा आवरोनियां । नानांची थोडी दिनचर्या । सांगेन संक्षेपें तुम्हांलागीं ॥३०॥ हरसिद्धीवरी जरी । आपण गेलां आजही निर्धारीं । शुचिर्भुत नानांची स्वारी । आसनीं डोलत पहाल तुम्ही ॥३१॥ मग माध्यान्हीचे वेळी । घेती भोजन सात्विक थाळी । कसली आवड नाही वेगळी । आनंदे सेविती प्रसाद अन्न ॥३२॥ दुपारी वाचन लहर जैसी । प्रिती 'योगवासिष्ठ' ग्रंथासी । 'अध्यात्म रामायण' भागवतासी । विशेष वाचती आवडीने ॥३३॥ उपनिषदांचे सदा मनन । आत्मदेवाचें अनन्य चिन्तन । दत्त नामाचा अन्तरी पूर्ण । श्वासासवें ध्यास त्यांना ॥३४॥ सायंकाळी उतरता दिन । जाती नेमें बाहेर फिरून । आठापूर्वी पुन्हा परतून । त्रिपदी होई गाभाऱ्यात ॥३५॥ दिवसारात्री उघडी दारें । कोणी न अडवेल कधीच सारे । भक्तांचे संतत हे सोयरे । येती केव्हाही दर्शनास ॥३६॥ गुरूवारी अचूक रात्रीसी । दरबार लाडक्यांचा भजनासी । लयलूट भजनांची धुंद मनेंसी । चाले पहाटे पर्यंत कधीं ॥३७॥ गुरूपौर्णिमा श्रीदत्तजयंती । नागपंचमी भक्त प्रेमें करिती । उत्सव कीर्तन अभंग रीतीं । साजरे होती हरसिद्धीस ॥३८॥ अन्नशांती हा नानांचा । आवडीचा संकल्प मनींचा । पुरवितो मात्र श्रीगुरू त्यांचा । सकळ समृद्धी आनंदानें ॥३९॥ विख्यात जागोजागींचे । संत येती घरीं साचे । आवार आनंद कैवल्यांचें । हरसिद्धीवर नांदे पहा ॥४०॥ सुन मुलगा नातू नानांचे । कन्या जामात आदि निकटचे । छत्र आप्तांवरी हास्यांचें । सकळांवरी धरिती नानागुरू ॥४१॥ प्रापंचिक संकटे त्यांनाही । येती खरीच कधीं गृहीं । प्रसन्न मुद्रेनें सर्वास पाही । शांती क्षमाशील नाना ॥४२॥ चहूं दिशांत संचार त्यांचा । वाढला शिष्ययोग भक्तांचा । होतो दरसाल आमंत्रणाचा । वर्षाव दूर ठिकाणाहूनी ॥४३॥ कधीं रंगांत येती नाना । तेव्हांच कथिती भक्तांना । आनंदें कथांच्या लाटांना । येते भरती सहज मग ॥४४॥ रात्री भजनांचे अवसरीं । वाजविती नाना टाळ साजिरी । पाहतां चकीत होतो अंतरी । उत्कट चपळ तालगति ॥४५॥ उपनेत्र मुळी न लागती । आजही नानांसी वाचण्याप्रती । श्रोते ! दोन तासांची विश्रांती । पुरी वाटें अहर्निशीं ॥४६॥ चालती अखंड सुक्ष्मान्तरीं । किया त्यांच्या साक्ष खरी । देतील कित्येक भक्त तरी । आजही प्रत्यय साक्षात ये ॥४७॥ केव्हाही जा, वत्सलतेनें । भक्तांचे कुशल प्रेमानें । पुसती देती आठवणीनें । विभूती नाना भक्तकरी ॥४८॥ जैसी ज्याची उपासना । तैसेंच वदती त्यासवें नाना । कठोरतेचे कधीही ना । नावहीं दिसे सान्निध्यांत ॥४९॥ दिवसा रात्रीं अवेळीही जावें । तरी आनंद शांत दिसावे । नानागुरूंचे पाय पहावे । तृप्त मानसें भक्तीं अवघ्या ॥५०॥ जुने नवे अवघे संत । असो कोणताही पंथा । नानांसी वाटे प्रेम अमित । नांव काढतां त्यांचे पुढे ॥५१॥ पाठान्तर स्तोत्रांचे, अभंगांचे । हिंदुस्थानीही कितीक पदांचें । वेदपाठ ऐकावे ऋचांचे । मुद्दाम एकदा नानामुखें ॥५२॥ ताल, भाव, उच्चारण । ऐकता आपण होऊं तल्लीन । वाटे वेदोनारायण । बैसला नाना होऊनियां ॥५३॥ देव पतिपत्नी रतलामींचे । सुभेदार कुटुंब पूर्णचि साचें । भिडे, काळे आदि मुंबईचे । आराध्य अवघ्यांचे नानागुरू ॥५४॥ भैय्या-वहिनी प्रेमळ नानांची । अखंडचि प्रत्यंतरें अंतरीची । कितीक लाडक्या भक्तांची । सांगू नांवे अमित खरें ॥५५॥ पवार आबा मृदंग भजनीं । तिवारी देवता नित्य यांनीं । जिंकिला हा चिंतामणी । अनन्य आपुल्या निष्ठेनेंच ॥५६॥ श्रोते! प्रकार रोज अनिवार । घडती जिथें अथांग सागर । काय वर्णू मी हा अवतार । एकनाथांचा खचित वाटें ॥५७॥ पहावें शुद्धमने येऊन । मुद्दाम इंदुरीं हरसिद्धीलागून । ऐकाल जयजयकार पूर्ण । दत्तप्रभूचा अखंड इथें ॥५८॥ धन्य माझें भाग्य आतां । कळसाध्याय तुम्ही ऐकतां । नानाकृपेनेंच ही गाथा । आली सांगतेस पूर्वभाग्यें ॥५९॥ या ग्रंथांची अवतरणिका । अवघे भक्तहो तुम्ही ऐका । आला श्री गजाननांसारिखा । संतराणा जीवनीं धन्य ॥६०॥ श्रीदत्तजयंतीचे योगावरी । स्फुर्ति गजाननें मला खरी । दिधली आणि संपूर्ण सारी । केली श्रीगुरूनानांनीं ती ॥६१॥ वंदन विनम्र सद्गुरूंसी । माझ्या हृदयींच्या गजाननासी । शारदामाता कुलदेवांसी । संतमुर्ति आळविल्या मीं ॥६२॥ नानागुरूंचा कुलवृतांत । सद्गुरूंची परंपरा सांगत । माता-पित्याची शुचिर्भुत । जीवनें कशी ती बोलिलों हो ॥६३॥ नागपंचमीचा गुरूवार । अवतरले नाना अवनीवर । बाळपणींच्या आवडी साचार । कथिल्या अवघ्या प्रथमाध्यायीं ॥६४॥ उपनयन अध्ययन नानांचें । उपासनेचे आर्त मनींचे । वेडे कैसे गुरूकृपेचे । द्वितीयाध्यायीं नाना पहा ॥६५॥ कठोरतेनें सप्ताह वाचन । करितां आले दुरूनि धावून । सद्गुरुमूर्ति वासुदेव जाण । पावन कथा ही नानांची ॥६६॥ मातोश्री तीर्थरूप देवाघरीं । भार घरांतील नानांवरी। तत्पुर्वी प्रथम लग्नाची घटना सारी । कथिली असे तृतियाध्यायीं ॥६७॥ ज्येष्ठ पुत्रजन्मांनंतरीं । पत्नी दैवें नानांची अंतरली । द्वितीय पत्नीही ये संसारी । अल्प काळचि नानांचिया ॥६८॥ कन्या देऊनि लहान साजिरी । लगेच पुढे तीही निर्वर्तली । संसार माया इथेंच सरली । नानाजीवनींची सदासाठी ॥६९॥ वामनबुवा योगी मंदिरीं । अचानक आले देऊनी । योगानंद सुख गेलेनी । कथा ही चतुर्थासी ॥७०॥ नानागुरूंचा छंद जाणा । जाती एकटे यात्रेस गहना । काशीपुरीस वृंदावना । स्वच्छंदतेने पाहती सर्व ॥७१॥ श्री शंभुची दिव्य विभूति । गोपालाची गोजिरी मूर्ति । भाग्यें नाना दर्शनें घेती । पंचमात या अद्भुत कथा ॥७२॥ जलेरी प्रदक्षिणा नर्मदेचि । विख्यात देवता भूमंडळींची । करिती नाना महंत मठाची । कथा आली षष्ठाध्यायीं ॥७३॥ अथांग सुंदर रेवामाई । काठांनें पहात नाना पायीं । पंथांत शिवमंदिरीं होई । मुक्त ब्रह्मसमंध एक ॥७४॥ थकले नाना परिकमेंत । आली अन्नपूर्णा रेवा सत्य । दुग्धकलशा आणुनी देत । कथा रमणीय सप्तमात ॥७५॥ नाना गेले, बद्रिकेदारी । हिमाद्रीच्या कुशिमाझारी । गुंफेंत सिद्धांची दर्शनें सारी । घडली त्यांना अनिवार ॥७६॥ द्वापारींचे योगी सिद्ध ।गुंफेंत तपस्या करीत शुद्ध । भेटीत नानांचे मानस विशुद्ध-। ज्ञानें भरलें रात्रभरी ॥७७॥ गंगोत्रीस न्यावें विनवितां । गिरीकंदरां निमिषांत तत्वतां । ओलांडुनी नानांस झाले आणितां । गंगेवरी अष्टमांत ॥७८॥ गिरनारी सौराष्ट्र प्रांतांत । आले फिरत फिरत । नाथ दर्शनार्थ चढत । माथा गिरीचा अनोळखी तो ॥७९॥ अवधुतांचे साहाय्य तिथें । अश्वत्थामा अवचित भेटे । साक्षात् अनसूया मातेश्वरीतें । वंदिती नाना यात्रेंत त्या ॥८०॥ श्रीगुरूंचे नव्हतें दर्शन । गरूडेश्वरीं मुद्दाम म्हणुन । निघाले नाना पूर्तता जाण । नवमोध्यायाची होय इथें ॥८१॥ गरूडेश्वरासी पुण्यतिथीस । पोंचले नाना, रम्य खास । वृतांत तो घेती प्रसादास । समाधीवरील पावन-मनें ॥८२॥ गाणगापुरी निवास करिती । सप्ताह साधना चरणीं वाहती । यतिपूजनासी पुजारी नेती । गाभाऱ्यातही नानागुरूंना ॥८३॥ हा अवघा अलौकिक । वृतांत पहावा आणिक । नाना छाबडा नामक । खेडयांत जाती दशमाध्यायीं ॥८४॥ प्रभु राघवांची दिव्यलीला । दिसते मंदिरीं नानालोचनाला । आचार्य यज्ञांचे वैश्वानराला | प्रगट करिती ऐनवेळीं ॥८५॥ शक्तीस्वाहाकार कथा । विश्वासें घडली सर्वथा । मधमाशांची प्रचिती भक्तां । अकराव्यांत आली हो ॥८६॥ संत चैतन्याच्या अवघ्या भेटी । द्वादशाध्यायासी येती । संत भगवंताच्या मूर्ती । जागोजागी विख्यात ज्या ॥८७॥ नानागुरूंसी एकांतीं । पुसतां बोलले कृपामूर्ती । कैवल्य ज्ञान साधन रीती । तेराव्यांत कथिली प्रसन्नपणे ॥८८॥ तोच संवाद विदेही नानांचा । चिदब्रह्माच्या विलासाचा । पुढे चाले कथिती हृदयींचा । शांत भाव चवदाव्यांत ॥८९॥ होळकराच्या आदेशानें । राहिले नाना सोडुनी तराणें । श्रीमंत कार्यार्थ राहणें । घडले त्यांचे बराच काळ ॥९०॥ श्रीमंत तुकोजींनी भली । सदभावें सोय सारी केली । अहिल्येच्या वंशजाघरीं । पंधराव्यांत राहती नानागुरू ॥९१॥ तराण्यासी लागून । नाना उद्वेगले मनांतून । इंदुरासी त्यांचे आगमन I पुढे राहणे भैय्यासवें ॥९२॥ अनसूयामाता सिन्नोरची । तृप्तविलीं अंतरे भक्तांची । अन्नपूर्णाचि होऊनि मार्गीची । कथा ही नाना यात्रेंतील ॥९३॥ नंतर देशपांडे बाळांची । विचित्र भयभीत मनःस्थितीची । ओळख करूनी सोळाव्याची । अखेर होई न पूर्ण कथा । स्थित्यंतर ये अकस्मात । साधना करविती नानागुरू ॥९५॥ यज्ञांतली मांत्रिककथा । बाळांवरी ती ओढवतां । नाना निवारिती संकटा । दिसती यात्रेंस रखमाईस ॥९६॥ चिमणलाल मास्तरांची । माहिती भोळया देवतांची । दुग्धकथा ती कोजागिरीची । वर्णिली श्रोते अठराव्यांत ॥९७॥ अष्टादश या नाना कळांचा । अध्याय सुंदर हा कळसाचा । दिनकम अवघा नानागुरूंचा । संक्षेपे म्यां कथिला इथें ॥९८॥ ही अदभुत नानाकथा । आनंद अनिवार झाला चित्ता । वैखरीस आली धन्यता । प्रसंग इथें परोपरींचे ॥९९॥ बडोद्याहुनी भक्तांनीं । लिहीली नानांस विचारूनी । टांचणे ती मजलागुनि । दिली आणून बाळांनींच ॥१००॥ त्या आधारे ग्रंथ लिहिला । प्रत्येक त्यांतल्या माहितीला । पुसोनी नानांस पक्का केला । कथाभाव अध्यायींचा ॥१०१॥ उपयोग ना केला कल्पनेचा । इतुकाही म्यां येथे साचा । गहन नाना जीवनाचा । अर्थ वदलो माझ्यापरी ॥१०२॥ जे लिहविलें तैसेंच लिहिलें । साक्षी सद्गुरूंस सदा ठेविलें । लेखणिनें नानांस सदा ध्यायिलें । लेखनाचे कार्य करितां ॥१०३॥ हा प्रसाद माना नानांचा । आनंद माझ्या जीवनाचा । नित्यासाठी जगीं साचा । होवो आतां मंगलमय ॥१०४॥ सद्गुरु माझे गजानन । पाहतों नाना मी साक्षात् पूर्ण । तुमच्यांत, आता या वत्सालागुन । धरावें चरणीं वात्सल्याने ॥१०५॥ आशिर्वाद उदंड द्यावें । वाचितां ग्रंथास मनोभावें । संकटीं भक्तांच्या धावूनी यावें । करूणामया मार्तंडनाथा ॥१०६॥ आदरें करितां पारायण । द्यावें आपुलें प्रसन्न दर्शन । हरावें भवभय निरसोन । भीती भक्त-चित्तांतली ॥१०७॥ रामनवमीच्या नवरात्रांत । शुद्ध सप्तमीच्या तृतिय प्रहरांत । शके अठराशें ब्याण्णवांत । ग्रंथ कळसास आला पहा ॥१०८॥ असो त्रिवार शांती आतां । वंदन तुम्हांसी सद्गुरुनाथा । मार्तण्डाची गाथा गातां । विजय लेखणी पावन आज ॥१०९॥ शुभं भवतु ॥ ॥ इति श्री एकोनविंशोऽध्यायः समाप्तः ॥ ॥ पुंडलिक वरदा हरि विठ्ठल ॥ ॥ सीताकांत स्मरण जय जय राम ॥ ॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥ ॥ नर्मदे हर हर हर ॥
सौजन्य : https://shantipurush.org/
॥ श्रीगणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
स त्वं परात्मा पुरुषोत्तम श्रुति-ख्यातः समाविश्य जगत्त्रयं सदा । ईशाव्ययानन्त बिभर्षि दत्त ते पादाब्जयुग्माय नमोऽस्तु सर्वदा ॥१॥ वज्राङ्कुशध्वजाब्जाड़्क-युग्रक्ताब्जाभपत्तलः। गूढगुल्फः कूर्मपृष्ठोल्लसत्पादोपरिस्थलः ॥२॥ जानुपूर्वकजङ्घश्च विशालजघनस्थलः । पृथुश्रोणिश्च काकुत्स्थश्चारुनाभिर्दलोदरः ॥३॥ अररोरा मांसलांसो युगव्यायतबाहुकः । सुचिह्नचिह्नितकरः कम्बुकण्ठः स्मिताननः ॥४॥
स्नैग्ध्यधावल्ययुक्ताक्षश्चलत्-पिङ्गजटाधरः। चन्द्रकान्तिः प्रभुः कृष्ण-भ्रूरःश्मश्रुकनीनिकः ॥५॥
भावशुद्धद्विजाकीर्ण-स्वास्याब्जोऽभीवरप्रदः । दत्तात्रेयः स भगवान्सदा वसतु मे हृदि ॥६॥
भावार्थ : सर्वांतर्यामी, क्षर-अक्षर अर्थात सर्व जड-स्थावर-चेतन पदार्थांचा नियंता, वेदश्रुतींनी पुरुषोत्तम असे समर्पक वर्णन केलेला, त्रैलोक्यव्यापी, पालनकर्ता, अव्यय आणि अनंत ईश्वररूपी असा तू परमात्मा आहेस. तुझ्या या भवतारक चरणद्वयांना सतत वंदन असो. वज्र, अंकुश, ध्वजा आणि पद्म या शुभ चिह्नांनी युक्त, लाल कमळाप्रमाणे आरक्त तळवे, पदांचा वरील भाग कांसवाच्या पाठीसारखा फुगीर आणि टांचा झांकलेले असे ज्याचे चरण आहेत, ज्याने मांडीच्या वरच्या भागावर एक पाय ठेवलेला आहे, स्थिर आणि विशाल बैठकीवर सिद्धासन घालून जो बसलेला आहे, जो दिगंबर आहे, ज्याच्या पिंपळाच्या पानाप्रमाणे पातळ अशा उदरावर (पोटावर ) शोभायमान नाभी आहे, तसेच रुंद छाती असलेला, मांसल आणि विशाल स्नायूयुक्त असे द्विबाहू असलेला, ज्याचे हात शुभचिन्हांनी मंडित आहेत, ज्याचा कंठ एखाद्या शंखाप्रमाणे तीन वलयांनी युक्त आहे, प्रसन्न चेहऱ्यावर मधुर स्मित विलसत आहे, ज्याचे नयन अतिशय तेजस्वी आणि कृपार्द्र आहेत, (ज्याच्या कपाळावर) पिंगट अशा जटा रुळत आहे, चंद्राप्रमाणे ज्याची कांती दिव्य आहे, ज्याच्या भुवया, छाती, दाढीमिशा आणि डोळ्यांतील बुबुळे काळी आहेत, सुंदर अशा दंतपंक्तीने ज्याचे मुखकमल शोभत आहे, आणि आपल्या दोन वरदहस्तांनी, आपल्या भक्तांना सर्वदा अभय तसेच वरदान देणारा तो अत्रि-अनसूयानंदन श्री दत्तप्रभू सदैव माझ्या हृदयांत वास करो.॥ दत्तात्रेयः स भगवान्सदा वसतु मे हृदि ॥
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥