May 15, 2018

श्री स्वामी समर्थगान ( १०८ जप )


|| श्री गणेशाय नमः ||


|| श्री स्वामी समर्थ ||


१०८ वेळां " श्री स्वामी समर्थ " जप समाविष्ट असलेले सुमधुर गीत....


 

Apr 29, 2018

परिसावी विनंती माझी ....


॥ श्रीगणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥


जोडुनीया कर चरणी ठेविला माथा ।

परिसावी विनंती माझी सदगुरुनाथा


असो नसो भाव आलो तुझीया ठाया ।

कृपादृष्टी पाहे मजकडे सदगुरुराया


अखंडीत असावे ऐसे वाटते पायी ।

सांडुनी संकोच ठाव थोडासा देई


तुका म्हणे माझी सेवा वेडी वाकुडी । 

नामे भवपाश हाती आपुल्या तोडी


|| श्री गुरुदेव दत्त ||



Apr 12, 2018

कृष्णाकाठी दत्तगुरुंचा


कृष्णाकाठी दत्तगुरुंचा नित्य असे संचार

सुकृत आले फळास माझे, घडला साक्षात्कार

कृष्णाकाठी दत्तगुरुंचा घडला साक्षात्कार ।।धृ.।।


योगीराज श्री समर्थस्वामी, अवचित आले माझ्या सदनी

पदस्पर्शाने झाले पावन मम जीवन संसार

कृष्णाकाठी दत्तगुरुंचा घडला साक्षात्कार ।।१।।


वैराग्याची सोज्वळ मूर्ती, अपार करुणा ह्रदयी प्रीती

प्रणव सुरांतुनी जगा दाविती विश्वरुपाचे सार

कृष्णाकाठी दत्तगुरुंचा घडला साक्षात्कार ।।२।।


अंतर साक्षीत्वाचा प्रत्यय सदा देती मज अखंड अक्षय

सार्थकतेचे अश्रू बघती, आत्मऐक्य साकार

कृष्णाकाठी दत्तगुरुंचा घडला साक्षात्कार ।।३।।



श्री अक्कलकोट स्वामीं समर्थ प्रार्थना स्तोत्र



श्री अक्कलकोट स्वामीं समर्थ प्रार्थना स्तोत्र ( श्री आनंदनाथ महाराज कृत ) :