॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
॥ श्रीमन्नृसिंहसरस्वती महाराजाय नमः ॥
‘ संन्यासी वेषधारी श्रीदत्तप्रभू ’ या नांवाने जगतविख्यात असलेले, श्री भगवान दत्तात्रेयांचे द्वितीय अवतार ‘ श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज ’ यांच्या जन्मोत्सवाच्या सर्वांना भक्तिमय शुभेच्छा !!
ऋतकृत्स्वगिरोऽमरोऽभवद्द्विजपत्न्यास्तनयोऽपि योऽभवत् । स नृसिंहसरस्वती यतिर्भगवान्मेऽस्ति परा वरा गतिः ॥१॥
भावार्थ : जे स्वतः साक्षात परमेश्वर असूनही केवळ आपले वचन सत्य करण्यासाठी ब्राह्मणपत्नीचे पुत्र झाले, ते भगवान नृसिंहसरस्वती स्वामी महाराज माझे सर्वश्रेष्ठ कृपास्थान आहे, आश्रयदाते आहेत.
प्रणवं प्रपपाठ जन्मतो विजहाराल्पदशोऽपि सन्मतः । स नृसिंहसरस्वती यतिर्भगवान्मेऽस्ति परा वरा गतिः ॥२॥
भावार्थ : जन्मतःच ज्यांनी ॐकाराचा उच्चार केला, जे सत्पुरुषांचे श्रद्धास्थान आहेत, आणि ज्यांनी बालपणीच लोककल्याणार्थ तीर्थाटन-भ्रमण केले, ते भगवान नृसिंहसरस्वती स्वामी महाराज माझे सर्वश्रेष्ठ कृपास्थान आहे, आश्रयदाते आहेत.
मृतविप्रसुतं व्यजीवयद्य उ वंध्यामहिषीमदोहयत् । स नृसिंहसरस्वती यतिर्भगवान्मेऽस्ति परा वरा गतिः ॥३॥
भावार्थ : ज्यांनी मृत द्विजपुत्राला जिवंत केले, तसेच ज्यांनी एका वांझ म्हशीला दुग्धवती केले, ते भगवान नृसिंहसरस्वती स्वामी महाराज माझे सर्वश्रेष्ठ कृपास्थान आहे, आश्रयदाते आहेत.
स्वतनुं यतये व्यदर्शयद्-द्विजगर्वं बुरुडाद्व्यनाशयत् । स नृसिंहसरस्वती यतिर्भगवान्मेऽस्ति परा वरा गतिः ॥४॥
भावार्थ : ज्यांनी त्रिविक्रमभारती नामक संन्याशाला विश्वरूप दर्शन दिले, आणि एका अंत्यजाकरवी वेदसंपन्न, ज्ञानी तथापि मदोन्मत्त झालेल्या ब्राह्मणांचे गर्वहरण केले, ते भगवान नृसिंहसरस्वती स्वामी महाराज माझे सर्वश्रेष्ठ कृपास्थान आहे, आश्रयदाते आहेत.
प्रददौ हि मृतप्रियस्त्रिया अपि सौभाग्यमु यन्नमस्क्रिया । स नृसिंहसरस्वती यतिर्भगवान्मेऽस्ति परा वरा गतिः ॥५॥
भावार्थ : पती मृत झालेल्या विप्र स्त्रीने केवळ भक्तिभावाने नमन केले असता, ज्यांनी तिच्या मृत पतीला जिवंत करून त्या पतिव्रता स्त्रीला चिरसौभाग्य प्राप्त करून दिले, ते भगवान नृसिंहसरस्वती स्वामी महाराज माझे सर्वश्रेष्ठ कृपास्थान आहे, आश्रयदाते आहेत.
स्वमुदेऽभवदन्नवृद्धिकृत्सुवशाया अपि वंशवृद्धिकृत् । स नृसिंहसरस्वती यतिर्भगवान्मेऽस्ति परा वरा गतिः ॥६॥
भावार्थ : स्वतःच्या (भास्कर नामक नि:सीम भक्ताच्या) आनंदासाठी ज्यांनी केवळ तिघांना पुरेल एव्हढे अन्न चार सहस्त्र लोकांना पुरेल इतके वाढविले, आणि वांझ स्त्रीच्या श्रद्धाभावाने प्रसन्न होऊन ज्यांनी कन्या-पुत्र देऊन तिचा वंश वाढविला, ते भगवान नृसिंहसरस्वती स्वामी महाराज माझे सर्वश्रेष्ठ कृपास्थान आहे, आश्रयदाते आहेत.
द्रुरकार्यपि शुष्ककाष्ठतः कुसुरौ येन शुची च कुष्ठतः । स नृसिंहसरस्वती यतिर्भगवान्मेऽस्ति परा वरा गतिः ॥७॥
भावार्थ : ज्यांच्या कृपेने वाळलेल्या लाकडाला पालवी फुटून त्याचा आर्द्र वृक्ष झाला, तसेच ज्यांनी दोन कुष्ठरोगग्रस्त ब्राह्मणांना व्याधिमुक्त करून निरोगी केले, ते भगवान नृसिंहसरस्वती स्वामी महाराज माझे सर्वश्रेष्ठ कृपास्थान आहे, आश्रयदाते आहेत.
अमराख्यपुरे च योगिनीवरदो योऽखिलदोऽस्ति योगिनीः । स नृसिंहसरस्वती यतिर्भगवान्मेऽस्ति परा वरा गतिः ॥८॥
भावार्थ : ज्यांनी अमरापूर येथे निवास असणाऱ्या चौसष्ट योगिनींना वर देऊन त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण केल्या, ते भगवान नृसिंहसरस्वती स्वामी महाराज माझे सर्वश्रेष्ठ कृपास्थान आहे, आश्रयदाते आहेत.
॥ इति प. प. श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचितं श्रीनृसिंहसरस्वतीप्रार्थनाष्टकम् संपूर्णम् ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥
No comments:
Post a Comment