दत्त दत्त ऐसे लागले ध्यान ...

श्रीदत्त: शरणं मम

Jan 24, 2023

तुझ्या कांतिसम...


श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ 


तुझ्या कांतिसम, रक्तपताका पूर्वदिशी फडकती अरुण उगवला, प्रभात झाली, ऊठ महागणपती ॥धृ.

सूर्याआधी दर्शन घ्यावें, तुझे मूषकध्वजा शुभद सुमंगल सर्वांआधी तुझी पाद्यपूजा छेडुनी वीणा, जागविते तुज सरस्वती भगवती ॥१ आवडती तुज म्हणुनि आणिली रक्तवर्ण कमळे पाचमण्याच्या किरणांसम ही हिरवी दुर्वादळे उभ्या ठाकल्या, चौदा विद्या घेउनिया आरती ॥२ शूर्पकर्णका, ऊठ गजमुखा, उठी रे मोरेश्वरा तिन्ही जगांचा तूच नियंता, विश्वासी आसरा तुझ्या दर्शना अधीर देवा हर, ब्रह्मा, श्रीपती ॥३



No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.